राशिभविष्य-rashi (दिनांक १ ते ७ डिसेंबर)

मेष : विलंब करू नका.

पराक्रमी राहू, भाग्यांत गुरु-शुक्र-शनि यांच्यातील प्रतिसाद बरेच परिश्रम कारणी लावू शकतील. मंगळवारच्या शुक्र मंगळ
शुभयोगाच्या आसपासचा काळ अनुकूल असल्याने महत्त्वाच्या निर्णय कृतीस। विलंब करू नये. व्यापारांत पैसा वाढेल. नोकरीत अधिकार मिळतील. कला संगीतातील वर्तुळात आगेकूच सुरू राहील. सामाजिक क्षेत्रात प्रशंसा होईल. अशा संधीचा उपयोग करावा. गुरुवारी बुध अष्टमांत येत असल्याने आश्वासन आणि करार या संदर्भात सावध असावे. दिनांक : २ ते ५ शुभकाळ

सिंह : चक्र वेगाने फिरतील.

पराक्रमी मंगळ, पंचमात गुरु-शुक्र-शनि, लाभांत राहू प्रगतीची चक्र वेगाने फिरवत ठेवणारी ग्रहस्थिती. त्यातूनच नवीन नवीन कार्यप्रांत उभे करता येतील. बडी बडी मंडळी सहवासात येत राहातील. दूरच्या दृष्टीने असा शुभकाळ उपयोगात आणणे योग्य ठरते. उद्योग, व्यवसाय, कला, शिक्षण, साहित्य असे प्रांत त्यात समाविष्ट करावेत. मंगळवारच्या शुक्र मंगळ शुभयोगाच्या आसपास काही महत्त्वपूर्ण घटना घडतील. चतुर्थात येत असलेला बुध अचानक संभ्रम निर्माण करतो. हुशारीने त्यातून मार्ग काढता येतात. दिनांक : ३,४,५ शुभकाळ

धनु : प्रसंग लक्षात ठेवा.

गुरु-शुक्र सहयोगामुळे साडेसातीची प्रखरता कमी होणार असल्याने धनु व्यक्तींना काही निर्णय घेणे सोपे ठरणार असले तरी कोणत्याही कृतीमध्ये बेसावध राहू नये. कारण गुरुवारी बुध वृश्चिक राशीत प्रवेश करीत आहे. रवि व्ययस्थानी आहे. नोकरी, धंदा, राजकारण यामध्ये आहे तशी परिस्थिती राहिली आणि इभ्रत सांभाळली गेली तरी आपण चांगल्या परिस्थितीत आहोत, असे समजावे. चर्ची, बैठकीत घाईगर्दीने शब्दांचा उपयोग करू नका. दिनांक: २ ते ५ शुभकाळ

वृषभ : समस्यांची गर्दी.


आपण समस्यांच्या गर्दीत सापडणे शक्य आहे. कार्यपद्धतीतही सतत बदल करावे लागतात. कोणतेही साहस करता येत नाही. अष्टमांत गुरु-शुक्र-शनि यांचा सहयोग असेपर्यंत परिस्थितीत अशीच राहील. | त्यात थोडेफार चांगले बदल होतील. गुरुवारच्या बुध राश्यांतरामुळे शनिवारपर्यंत । सावध राहाणे, गोड बोलणे, गुप्तता ठेवणे याच मार्गाचा उपयोग कार्यभाग साधणेसाठी करावा. मंगळ षष्ठात असल्याने शत्र आणि विरोध यांची फारशी चिंता 5 करण्याचे कारण नाही. मौल्यवान वस्तू मात्र सांभाळा. दिनांक: २ ते ६ शुभकाळ

कन्या : साहस नको.


रवि, मंगळ, बध यांचे सहकार्य नियमित उपक्रम सुरू ठेवण्यास उपयुक्त ठरेल. परंतु नवे काही करावे, साहसाने केलेली कती यशस्वी ठरेल अशा विश्वासावर काही करता येणार नाही. कारण आहे चतुर्थात गुरु-शुक्र-शनि. या ग्रहांचे परिणाम मोठे साहस त्वरित सफल होऊ देत नाही.
कार्यपद्धतीमध्ये आणि व्यवहारातही तूर्त अवास्तव मोठे बदल करू नका. गुरुवारचे बुध राश्यतिर युक्तीमधून स्फूर्ती देईल आणि काही प्रसंग प्रभाव निर्माण करतील. त्यास काही सीमारेषा राहतील. दिनांक.१,२,६,७ शुभकाळ

मकर : रखडपट्टी दूर होईल.


व्ययस्थानी गुरु, शुक्र, शनिची साडेसाती, षष्ठात राहू अशा।ग्रहकाळांत महत्त्वाची असलेली सोपी वाटणारी प्रकरणे कसल्यातरी प्रकरणांत अडकतात आणि तेथेच रखडतात. त्यातून दडपण वाढतात. तणाव निर्माण होतो. परंतु अशा परिस्थितीत विचलित होऊ नका. सत्य, संयम, शिस्त. निर्धार यांचा समन्वय साधावा आणि कार्यशोध घेत राहावा. मंगळ दशमांत आहे. बुध दशम लाभांतून भ्रमण करीत आहे. अल्पावधीतच काही मार्ग दृष्टिपथात येतील. रखडपट्टी दूर करता येईल. दिनांक : २ ते ६-शुभकाळ

मिथुन : झटपट घडी बसवा.

राशिस्थानी राह. सप्तमांत गुरु, शुक्र, शनि यांच्या शुभ परिणामांचा सप्ताहात अधिकाधिक उपयोग करून संशयास्पद परिस्थितीत असलेल्या कार्याची घडी झटपट बसवून घ्यावी आणि बुधाचे गुरुवारी राश्यांतर होत असल्याने अवजड योजनांच्या संबंधात सावध असावे. सूर बघून बैठकी, चर्चा यासंबंधात निर्णय घ्यावेत. त्यात मंगळवारच्या शुक्र मंगळ शुभयोगाच्या आसपासचा काळ शुभ आहे. मंगलकार्य ठरेल. जागेचा प्रश्न सुटेल. अचानक काही प्रकरण निकालात निघतील. प्रार्थना प्रसन्नता देईल. दिनांक ४ ते ७ शुभकाळ

तूळ : सफलता ते सत्कार.

धनु राशीत गुरु-शुक्र-शनि, भाग्यात मिथुन राहू, प्रथम भावात मंगळ अनेक प्रांतात तुला व्यक्ती आघाडीवर राहाव्यात अशी
ग्रहस्थिती आहे. मंगळवारच्या शुक्र-मंगळ शुभयोगापासून त्यात व्यापकता येईल आणि सफलता सत्कार समारंभापर्यंत पोहचू शकेल. संपर्कातून विशेष प्रकरण मार्गी लागतील. उद्योगांतून पैसा मिळेल. कला, संगीत, शास्त्र यातून प्रभाव प्रस्थापित करता येईल. गुरुवारचे बुध राश्यांतर प्रगल्भ विचारातून व्यावहारिक अंदाज प्रबल करील. दिनांक : १, २, ६,७ शुभकाळ

कुंभ : नेत्रदीपक यश.

भाग्यांत मंगळ, दशमांत रवि, अनुकूल बुध आणि लाभांत गुरु-शुक्र-शनि. कार्य गुणिले प्रयत्न बरोबर नेत्रदीपक यश असे प्रतिसाद या ग्रहांचे राहातात. त्यातून काही नवे कार्यप्रांत उभे राहातात. स्थगित योजनांना वेगवान करता येते. त्यात राजकारण, कलाप्रांत, सामाजिक उपक्रम, दूरचे प्रवास,
प्रसिद्धी यांचा समावेश असतो. गुरुवारचे बुध राश्यांतर अशा संधी व्यापारातून अधिक निर्माण करतो. संपर्क, चर्चा, बैठकी यातून सफलता व्यापक करता येईल. दिनांक : ४ ते ७ शुभकाळ

कर्क : सफलता अवघड.

गुरु, शुक्र, शनि नाराज, व्ययस्थानी राहू अशा ग्रहकाळात सफलवा संपादन करणे फार अवघड असते. अडचणी येतात. विरोध वाढतो. संयम ठेवून सावध राहनच कार्यपथावरील प्रवास सुरू ठेवावा लागतो. गुरुवारचे बुध राश्यांतर यक्तीयक्तीने मार्ग कसे शोधायचे यासाठी उपयुक्त ठरेल आणि
अधिकार, अधिकारी, सहकारी सहकार्य यांच्यातून प्रतिष्ठा मजबूत ठेवणारे व्यावहारिक रसायन निर्माण करता येईल. चतुर्थात मंगळ असेपर्यंत परिवारात शांतता ठेवणेच अधिक फायदेशीर ठरणार आहे. दिनांक: १,२,६,७ शुभकाळ

वृश्चिक : संशय वाढतील.

पुढे शनि, मागे मंगळ अशी परिस्थिती राशीची होते तेव्हा कार्यपद्धतीत संशय निर्माण होतात. त्यातून अस्थिरता वाढते.
व्यवहाराच्या कोणत्याही वर्तुळांत कसलाही धोका स्वीकारू नका. त्यात मंगळ व्ययस्थानी असल्याने आर्थिक देवघेव ते आश्वासन यामध्ये अधिक सावध राहावे, गुरुवारी बुध राशिस्थानी येईल आणि त्यातून युक्ती युक्तीने मार्ग शोधता येतील. त्याचा उपयोग प्रतिष्ठा सांभाळण्यासाठी करून घेता येईल. प्रवास जपून करा. घरांत शांतता ठेवा. दिनांक: १,२,६,७ शुभकाळ

मीन : व्यत्यय कमी होतील.

चतुर्थात राहू, अष्टमांत मंगळ यांचा अशुभ काळ असतो थोडा, परंतु शभकारक गुरु, शुक्र, शनि यांच्यातील परिणामामध्ये व्यत्यय निर्माण करून काही प्रांतात सफलतेसाठी परीक्षात घेत असतो. सरळ मार्ग, स्वच्छ।
कती. तज्ज्ञांचं मार्गदर्शन यांच्यातून व्यत्यय कमी करता येतील. काही प्रमाणात कार्यभाग साधता येईल. त्यामुळे बाजारपेठेतील प्रतिमा चकचकीत ठेव शकाल.। गुरुवारच्या बुध राश्यांतरापासून युक्ती-प्रयोग कमीअधिक प्रमाणात सफल होता राहातील. त्याचा फायदा करून घ्यावा. दिनांक १,२,६,७ शुभकाळ

Leave a Comment