Read More : maharashtra day.
Read More : मराठी भाषेचे महत्व आणि इतिहास जाणून घेण्यासाठी यावर क्लिक करा..👈
महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याचा निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो.१ मे १९६० रोजी महाराष्ट्राची निर्मिती झालेली आहे. या दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी असते. हा दिवस मराठी माणसे मोठया उत्साहाने साजरा करतात, विविध कार्यक्रमांचे आयोजनही या दिवशी केले जाते. महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या १०६ हतात्म्यांचे स्मरण या दिवशी केले जाते.
२१ नोव्हेंबर इ.स. १९५६ दिवशी फ्लोरा काऊंटनच्या परिसरात तणावाचे वातावरण होते. कारण राज्य पुनर्रचना आयागाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले. त्यामुळे मराठी माणसे चिडली होती. सर्वत्र छोटया मोठया सभामधून या निर्णयाचा निषेध होत होता. या संगठनामुळे कामगारांना एक विशाल मोर्चा सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा काउंटनसमोरील चौकात येण्याचे नियोजन झाले.

त्यानंतर प्रचंड जनसमुदाय एका बाजूने चर्चगेट स्थानकाकडून वदुसऱ्या बाजूने बोरीबदरकडून गगनभेदी घोषणा देत फ्लोरा काऊटनकडे जमला. मोर्चा पोलिसी ताकद वापरुन उधळून लावण्यासाठी लाठी चार्ज करण्यात आला. मात्र अढळ सत्याग्रहीमुळे पोलिसांचे हे प्रयत्न अयशस्वी झाले आणि
पोलिंसानी गोळीबाराचा आदेश मुंबई राज्याचे तत्काली मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्याद्वारे देण्यात आला. मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्याद्वारे देण्यात आला. गोळीबार झाला आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढयात १०६ आंदोलक
हुतात्मे झाले.
या हतात्म्यांच्या बलिदानामुळे व मराठी माणसाच्या आंदोलनामले सरकारने नमते घेऊन १ मे इ.स. १९६० राजा मुबईसह संयुक्त महाराष्ट्रा स्थापना केली. त्यानंतर इ.स. १९६५ मध्य त्या जागी हुतात्मा स्मारकाची उभारणी करण्यात आली.
Read More : मराठी भाषेचे महत्व आणि इतिहास जाणून घेण्यासाठी यावर क्लिक करा..👈
अनुक्रमाणिक
हुतात्म्यांची नावे :-
२१ नोव्हेंबर इ.स.१९५६ चे हुतात्मे
१] सिताराम बनाजी पवार २] जोसेफ डेव्हिड पेजारकर ३] चिमणलाल डी. शेठ ४] भास्कर नारायण कामतेकर ५] रामचंद्र सेवाराम ६] शंकर खोटे ७] धर्माजी गंगाराम नागवेकर ८] रामचंद्र लक्ष्मण जाधव ९] के. जे. झेवियर १०] पी. एस. जॉन ११] शरद जी. वाणी १२] वेदीसिंग १३] रामचंद्र भाटीया १४] गंगाराम गुणाजी १५] गजानन ऊर्फ बंडू गोखले १६] निवृत्ती विठोबा मोरे १७] आत्माराम पुरुषोत्तम पानवलकर १८] बालप्पा मुतण्णा कामाठी १९] धोंडू लक्ष्मण पारडूले २०] भाऊ सखाराम कदम २१] यशवंत बाबाजी भगत २२] गोविंद बाबूराव जोगल २३] पांडूरंग धोंडू धाडवे २४] गोपाळ चिमाजी कोरडे २५] पांडूरंग बाबाजी जाधव २६] बाबू हरी दाते २७] अनुप माहावीर २८] विनायक पांचाळ २९] सिताराम गणपत म्हादे ३०] सुभाष भिवा बोरकर ३१] गणपत रामा तानकर ३२] सिताराम गयादीन ३३] गोरखनाथ रावजी जगताप ३४] महमद अली ३५] तुळशीराम पुंजाजी बेलसरे ३६] देवाजी सखाराम पाटील ३७] शामलाल जेठानंद ३८] सदाशिव महादेव भोसले ३९] भिकाजी पांडूरंग रंगाटे ४०] वासुदेव सुर्याजी मांजरेकर ४१] भिकाजी बाबू बांबरकर ४२] सखाराम श्रीपत ढमाले ४३] नरेंद्र नारायण प्रधान ४४] शंकर गोपाल कुष्टे ४५] दत्ताराम कृष्णा सावंत ४६] बबन बापू भरगुडे ४७] विष्णू सखाराम बने ४८] सिताराम धोंडू राडये ४९] तुकाराम धोंडू शिंदे ५०] विठ्ठल गंगाराम मोरे ५१] रामा लखन विंदा ५२] एडवीन आमब्रोझ साळवी ५३] बाबा महादू सावंत ५४] वसंत द्वारकानाथ कन्याळकर ५५] विठ्ठल दौलत साळुंखे ५६] रामनाथ पांडूरंग अमृते ५७] परशुराम अंबाजी देसाई ५८] घनश्याम बाबू कोलार ५९] धोंडू रामकृष्ण सुतार ६०] मुनीमजी बलदेव पांडे ६१] मारुती विठोबा म्हस्के ६२] भाऊ कोंडीबा भास्कर ६३] धोंडो राघो पुजारी ६४] ह्रुदयसिंग दारजेसिंग ६५] पांडू माहादू अवरीरकर ६६] शंकर विठोबा राणे ६७] विजयकुमार सदाशिव भडेकर ६८] कृष्णाजी गणू शिंदे ६९] रामचंद्र विठ्ठल चौगुले ७०] धोंडू भागू जाधव ७१] रघुनाथ सखाराम बीनगुडे ७२] काशीनाथ गोविंद चिंदरकर ७३] करपैया किरमल देवेंद्र ७४] चुलाराम मुंबराज ७५] बालमोहन ७६] अनंता ७७] गंगाराम विष्णू गुरव ७८] रत्नु गोंदिवरे ७९] सय्यद कासम ८०] भिकाजी दाजी ८१] अनंत गोलतकर ८२] किसन वीरकर ८३] सुखलाल रामलाल बंसकर ८४] पांडूरंग विष्णू वाळके ८५] फुलवरी मगरु ८६] गुलाब कृष्णा खवळे ८७] बाबूराव देवदास पाटील ८८] लक्ष्मण नरहरी थोरात ८९] ठमाबाई विठ्ठल सूर्यभान ९०] गणपत रामा भुते ९१] मुनशी वझीऱअली ९२] दौलतराम मथुरादास ९३] विठ्ठल नारायण चव्हाण ९४] देवजी शिवन राठोड ९५] रावजीभाई डोसाभाई पटेल ९६] होरमसजी करसेटजी ९७] गिरधर हेमचंद लोहार ९८] सत्तू खंडू वाईकर ९९] गणपत श्रीधर जोशी १००] माधव राजाराम तुरे(बेलदार) १०१] मारुती बेन्नाळकर १०२] मधूकर बापू बांदेकर १०३] लक्ष्मण गोविंद गावडे १०४] महादेव बारीगडी १०५] कमलाबाई मोहिते

‘महाराष्ट्र दिन’ हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. १ मे १९६० रोजी महाराष्टाची निर्मिती झालेली आहे. या दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी असते. हा दिवस मराठी माणसे मोठया उत्साहाने साजरा करतात.
कामगार दिन कसा सुरू झाला?
औद्योगिक क्रांती झाल्यानंतर कामगारांना रोजगार मिळू लागला परंतु त्यांची पिळवणूकही होत होती. कोणत्याही सुविधा न देता अल्प मजुरीच्या बदल्यास १२ ते १४ तास राबवून घेतले जात होते. याविरोधात कामगार एकत्र आले व कामगार संघटनांनी निर्मिती झाली. प्रत्येक कामगाराला केवळ ८ तास काम असावे, असा ठराव करण्यात आला. परंतु उद्योजक जुमानत नसल्याने मोठे आंदोलन उभारण्यात आले. त्यानंतर कामगार संघटनांची दोन आंतरराष्ट्रीय अधिवेशने झाली व १८९१पासून १ मे हा कामगारदिन पाळण्यात येतो.
कामगारांच्या प्रमुख मागण्या कोणत्या होत्या :-
१. कायद्याने ८ तासांचा दिवस
२. लहान मुलांना कामाला लावण्यावर बंदी
३. महिला कामगारांच्या कामावर मर्यादा
४. रात्रीचे काम व धोक्याचे काम यासाठी खास नियम
५. कायद्याने साप्ताहिक सुट्टी
६. कामाचा मोबदला वस्तुच्या रूपात न देता नगद द्यावा.
७. समान कामासाठी समान वेतन आणि संपूर्ण संघटना
स्वातंत्र्य. कामगारांच्या प्रमुख मागण्या होत्या.

संयुक्त महाराष्ट्राचा लढा आणि त्यानंतरचा महाराष्ट्र :
मराठी भाषिकासाठी महाराष्ट्र राज्याची निर्मिती व्हावी हि संकल्पना दस्तुरखुद्द लोकमान्य टिळक यांनी १९०६ साली मांडली होती. १९१९ साली कॉग्रेसंच्या जाहीरनाम्यात लोकमान्य टिळक याच्या अध्यातेखाली या संदर्भातील ठराव नमूद करण्यात आला होता. पण असं असलं तरी कालांतराने महाराष्ट्र् राज्याची वेगळी निर्मिती व्हावी याला कॉग्रेसंमधूनच विरोध होत गेला. कधी बॉम्बें हे व्दिभाषिक राज्य व्हावं, तर कधी विदर्भ वेगळा राज्य व्हाव अशा नानाविध सूचना पुढे येऊ लागल्या. दरम्यान चलेजाव आंदोलनान जोर धरला होता तर दुसरीकडे दुसर महायुद्ध जोरात सुरु होत, हि परिस्थीती लक्षात घेऊन संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सहभागी असलेल्या कार्यकत्यांनी जरा सबुरीन घेत थोडीशी माघार घेतली होती. १३ एप्रिल १९४७ रोजी झालेल्या अकोला करारअंतर्गत असा ठराव करण्यात आला की महाराष्ट्र एकीकरण परिषद महा विदर्भा, मराठवाडा, बॉम्बे आणि उर्वरित महाराष्ट्र याच्या एकत्रीकरणासह संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी कार्यरत राहील.काही महिन्यातच भारत स्वतंत्र झाला. अखंड भारत देश हि संकल्पाना अस्तित्वात आली,संस्थाने खालसा करण्यात आली १९५३ साली तेलगु भाषिकांसाठी आंध्र प्रदेश राज्याची निर्मिती करण्यात आली. संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीकडे मात्र दुर्लक्ष होत गेले. १९५५ च्या दरम्यान डाव्या पक्षांनी बॉम्बे बंद चा इशारा दिला, त्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. २० मार्च १९५५ रोजी गिरगाव इथं काढण्यात आलेला मोर्चा रोखण्याचे आदेश मोरारजी देसाई यांनी दिले. २१ नोव्हेंबर १९५५ रोजी डाव्या पक्षांनी काढलेल्या मोर्चावर हुतात्मा चौक इथं मोरारजी देसाई सरकारने अमानुष लाठीचार्ज केला. एवढ्यावर न थांबता मोर्चा वर गोळीबार कारण्यात आला. यात शेकडो जन जखमी झाले तर १०५ जनाचे प्राण गेले.

Read More : मराठी भाषेचे महत्व आणि इतिहास जाणून घेण्यासाठी यावर क्लिक करा..👈
Read More : महाराष्ट्रात मराठीतूनच बोला 👈