आषाढी एकादशी म्‍हणजे नक्‍की काय ? विठ्ठल विठ्ठल | Ashadhi Ekadashi 2022 In Marathi

  • काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल
    नांदतो केवळ पाडुरंग
    || जय जय हरी विठठल ||

महाराष्ट्राला संतांची भूमी समजली जाते.महाराष्ट्रातील संतांच्या हृदयात स्थान असणारे,अवघ्या महाराष्ट्राचे दैवत म्हणजे पंढरपूरचा विठोबा.मराठी वर्षाच्या आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षात जी एकादशी येते तिला आषाढी किंवा देवशयनी एकादशी असे म्हणतात. याच एकादशीला महा – एकादशी असेही म्हणतात.




वर्षातील एकूण २४ एकादशीपैकी आषाढी – एकादशीला अनन्यसाधारण महत्व आहे. कारण याच एकादशीला महाराष्ट्रातील लाखो भाविक, वारकरी वारी घेऊन पंढरपूरला जातात जीवनात एकदातरी वारी अनुभवावी असे म्हटले जाते. महाराष्ट्रात सुमारे आठशे वर्षांपासून वारीची ही परंपरा पाळली जाते असे म्हणतात.

आषाढी एकादशीपासून चातुर्मासाची सुरुवात होते. अशी आख्यायिका आहे की आषाढी एकादशीला भगवान विष्णु शेष नागावर निद्रिस्थ होतात आणि चातुर्मासानंतर कार्तिकेय एकादशीला जागे होतात.

पालखी मार्ग वृत्तांत :




आषाढी एकादशीला आळंदीवरून ज्ञानेश्वरांची देहूवरून तुकारामांची, त्र्यंबकेश्वर येथून संत निवृत्ती नाथांची, उत्तर भारतातून संत कबीर यांची, तर पैठाण वरून एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरला विठोबा च्या दर्शनासाठी येतात. या पालख्यांबरोबर सर्व भाविक पायी विठूनामाचा गजर करत पंढरपूरला पोहचतात. एकादशीच्या दिवशी पहाटे उठून चंद्रभागेच्या तीरी स्नान करतात. तुळस वाहून विष्णूची पूजा करतात. दर्शन घेतात विटेवर उभ्या – असलेल्या विठठलाचे दर्शन घेतात.

पालखी मार्ग

श्री राम हा विष्णूचा अवतार आहे, ब्रह्मदेवाची उत्पत्ती विष्णूच्या केंद्रकातून झाली आणि रुद्र ब्रह्मदेवाच्या मस्तकापासून उत्पन्न झाले. याच क्रमाने धर्मशास्त्राचा पंथ सुरू झाला. म्हणूनच याला ‘हिरण्यगर्भ संवर्तताग्रे’ म्हणतात. या हरणाच्या गर्भाचे स्वरूप व्यक्त आणि अव्यक्त असे दोन प्रकारचे असते. हिरण्याच्या गर्भातून ‘मी’ ची स्पंदने जाणवत होती.



Read More : sant tukaram in marathi information | संत तुकाराम 

आषाढी एकादशी मागची पौराणिक कथा :

या सणामागची पौराणिक कथा अशी की ‘मृदुमान्य’ नावाच्या एका राक्षसाने भगवान शंकराची उपासना करुन ‘तुला कोणाकडूनही मरण येणार नाही’ असा वर शंकराकडून मागून घेतला. पुढे त्याने सर्व देव जिंकण्याचा निश्चय केला. तेव्हा ब्रम्हा, विष्णू, महेश हे गुहेत लपून बसले. मृदुमान्य राक्षस त्यांचा शोध घेतच होता. त्यामुळे तीन दिवस झाले तरी देवांना बाहेर पडता येईना.

शेवटी त्या तिघांच्या एकवटलेल्या श्वासापासून एक देवता उत्पन्न झाली. तीच ही एकादशी होय. तिने मृदुमान्याला ठार मारले. या दिवसापासून चातुर्मास सुरू होतो. धार्मिक लोक देवाच्या भक्तीसाठी दररोज काही धार्मिक पुस्तकाचे वाचन, स्वत:चे आचरण शुध्द करण्यासाठी एखादे व्रत घेतात किंवा तत्सम नियम करतात व चार महिने ते न चुकता पाळतात. या दिवशी उपवास करुन पुढील चार महिन्यात जे काही नियम पाळावयाचे असतील त्याविषयी संकल्प करून ते निर्विघ्नपणे पूर्ण करून घेण्याबद्दल श्री महाविष्णूची प्रार्थना करतात. या दिवशी लोक गंगेकाठी स्नान करतात. पूजेच्या वेळी एक हजार किंवा एकशेआठ तुळशी विष्णूला वहातात. सारा वेळ भजन-पूजनांत घालवतात.

आषाढी एकादशीचे महत्त्व :

हिंदू कॅलेंडरमध्ये एका वर्षात एकूण २४ एकादशी असतात. प्रत्येक एकादशीचे वेगळे महत्त्व आणि पूजेची पद्धत आहे. या दिवशी प्रामुख्याने भगवान विष्णूची पूजा केली जाते, म्हणूनच वैष्णव समाजात एकादशीला विशेष महत्त्व आहे, शास्त्रानुसार शारीरिकदृष्ट्या सक्षम व्यक्तीने आठ वर्ष ते ऐंशी वर्षांपर्यंत एकादशीचे व्रत अवश्य पाळावे.

विठ्ठल विठ्ठल

असे मानले जाते की एकादशीचे व्रत केल्याने माणसाची अनेक जन्मांची पापे नष्ट होतात आणि त्याला भगवान विष्णूच्या वैकुंठधाममध्ये स्थान मिळते. जो एकादशीचे व्रत करतो तो संसाराच्या आसक्तीच्या प्रभावापासून मुक्त होतो आणि त्यात दुष्कर्मांचा अंत होतो.

आषाढी एकादशीचे उपवासाचे महत्त्व :

आषाढ महिन्यात पाऊस असतो. अग्नी मंद होऊन पचनसंस्था मंदावलेली असते. अशा – वेळी जड पदार्थ खाणे आपल्या आरोग्यासाठी योग्य नसते. अशावेळी पचायला सोपे पदार्थ खाणे, कमी आहार होणे हे उपयुक्त ठरते. आणि म्हणूनच या काळात उपवास करणे आपल्या आरोग्यासाठी हितकारक आहे. अशाप्रकारे आषाढी एकादशीचा वैज्ञानिक संबंधही लावता येतो.

Read more : sambhaji maharaj information | छत्रपती संभाजी महाराज

एकादशीचा उपवास करणाऱ्या व्यक्तीने या दिवशी संपूर्ण ब्रह्मचर्य पाळून मांस, तांदूळ, जव, लसूण, मसूर, कांदे यांचे सेवन करू नये.एकादशीला लक्षात ठेवण्याच्या गोष्टी.एकादशी हा व्रताचा मुख्य सण आहे, त्यामुळे या दिवशी खालील गोष्टी अवश्य कराव्यात.एकादशीच्या दिवशी आपल्या श्रद्धेनुसार दान करावे.या दिवशी उपवास ठेवलात की नाही, दुसऱ्याने दिलेले अन्न घेऊ नका.

विठ्ठल विठ्ठल

या दिवशी दूध, फळे, फळांपासून बनवलेल्या वस्तू, बदाम किंवा पिस्ते यांचे सेवन करून देवाला नैवेद्य दाखवावा. भोग अर्पण करताना भोगामध्ये तुळशीचे पान ठेवावे. एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला ब्राह्मण मेजवानी देऊन दान करावे.

आषाढी एकादशीच्या वारी मागील महत्त्व :

हे अभिव्यक्त आणि निहित दोन्ही आहे. ‘मी’ ही भावना मुळात निहित होती, पण ती कंपनांच्या रूपाने व्यक्त होते. या महत्त्वाच्या तत्त्वाची जाणीव असल्याने ‘भूतस्य जटा पतिरेक असित’ अव्यक्त ज्ञान हिरण्यगर्भातून दृढनिश्चयाने व्यक्त झाले आणि तेथून गुरुसंप्रदायाची सुरुवात झाली, असे वेदांमध्ये सांगितले आहे. हिरण्यगर्भ हे ब्रह्मा-विष्णू-महेश यांच्या आत्मबोधाचे कारण होते. विष्णू आत्म्याचा रक्षक आहे. म्हणजेच एकादशीच्या दिवशी राम त्याची पूजा करतात.

आपल्या शेतात पेरणी करूनच हे शेतकरी बांधव वारीला निघतात पंढरपूरला विठोबाच्या पायी मस्तक ठेवून यंदाची सुगी चांगली येऊ देत, अवघ्या मानवजातीवर कोणतेही संकट येऊ देऊ नकोस असं मागणं तो विठोबाकडे मागतो.मोठ्या भक्तिभावाने महाराष्ट्रातील लाखो भाविक ही परंपरा पाळताना दिसून येतात.

Leave a Comment