देव एका पायाने लंगडा..🙏
असा कसा ग बाई
देवाचा देव ठकडा
देव एका पायाने लंगडा ||धृ||
गवळ्या घरी जातो | दही दुध खातो
करी दहया दुधाचा रबडा ||१||
शिंकेचि तोडीतो मडकेची फोडीतो |
पाडी नवनिताचा सडा ||२||
वाळवंटी जातो कीर्तन करितो
लावी साधुसंतांचा झगडा ||३||
एका जनार्दनी | भिक्षा वाढ मायी
देव एकनाथाचा बछडा ||४||
Read More : krishna bhajan with lyrics..
यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी । कान्हा वाजवितो बासरी.🎺
यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी । कान्हा वाजवितो बासरी ॥धृ॥
घागर घेऊनी पाणियासी जाता । येतां जाता आम्हा अडविता ।आमच्या शीरी घडा याने मारिला खडा । याने केली आमची मस्करी ॥१॥
दही दुध घेऊनी गवळ्याच्या नारी । जात होत्या मथुरे बाजारी ।त्यांचा भरला घडा याने मारीला खडा याने केली आमची मस्करी ॥२॥
यशोदा धुंडले गोकुळ नगरी । अवचित पाहिला राधिकेच्या घरी । राधिकेच्या घरी हरी पलंगावरी । पाहून राधा झाली घाबरी ॥३॥
जनी म्हणे बा श्रीहरी । भोग भोगिले बाळ ब्रह्मचारी । जनी म्हणे देवा खुप केला तुम्ही असुन ब्रह्माचारी ॥४॥
जय जय राम राम कृष्ण हरी..🌺
जय जय राम जय जय राम
जय जय राम राम कृष्ण हरी ||धृ||
राजाराम कृष्ण हरी
गोवर्धन हे गिरीधारी
सावळे राम कृष्ण हरी
मुकुंद मुरारी हे गिरीधारी ||१||
होतो नामाचा गजर
श्री राम जय राम जय जय राम
जय राम जय राम
जय जय राम राम ||२||