buddha pornima
बुध्द पौर्णिमा वैशाख पौर्णिमेला साजरी केली जाते. ही तिथी वर्षातील सगळयात पवित्र आणि महत्वाची असते. बुध्द पौर्णिमा आणखी तीन कारणांसाठी विशेष आहे. ती कारणे म्हणजे… याच दिवशी गौतम बुध्दांचा जन्म झाला होता. याच दिवशी बुध्दांना ज्ञानप्राप्ती झाली होती आणि याच दिवशी बुध्दांचं महानिर्वाण झालं होतं. बुध्द पौर्णिमेल सूर्य मेष राशीत तर चंद्र तूळ राशीत प्रवेश करतो. या दिवशी गंगेत केलेले स्नान पवित्र मानले जाते. गंगेत स्नान केल्याने गेल्या जन्मातील कुकर्मातून मुक्ती मिळते. असा समज आहे. बुध्द पौर्णिमेच्या दिवशी बौध्द भिक्षुक ठिकठिकाणचे बुध्द विहार आणि मठांमध्ये एकत्र येऊन प्रार्थना करतात.बुध्द मूर्तीसमोर दीप लावतात. प्रार्थनास्थळं रंगीबेरंगी पताक्यांनी सजवली जातात.
बुध्दांची शिकवण आयुष्यात आणण्याचा संकल्प या दिवशी केला जातो. गौतम बुध्दांनी त्यांना मिळालेले ज्ञान समाजापर्यंत नेऊन एका वेगळयाच बदलाची पायाभरणी केली होती. त्याकाळी समाजात माजलेलं अवडंबर, पशूबळी, नरबळींसह वैदिक कर्मकांडाचा विरोध केला. मानव कल्याणाचा उपदेश केला. ते महान गुरु होते. हळत्सो मेळाव्यात एका झाडाखाली सिद्धार्थ बसले होते आणि ते एका साधनेत मग्न होते, त्यातच देव दत्ताच्या बाणाने घायाळ झालेल्या हंसाला सिद्धार्थ गौतम वाचवतात आणि सांगतात की मारणारा यापेक्षा वाचवणारा श्रेष्ठ असतो. राजकुमार सिद्धार्थ हे अहिंसात्मक धनुर्विद्याचा अभ्यास करतात . असा उत्तम संदेश देतात.
Read More : latest whatsapp status वाचा यावर क्लिक करून..👈

दुःख निवारणासाठी बुध्दांनी आठ मार्ग सांगितले होते ते म्हणजे…यम… नियम, आसन प्राणायम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी भागवत पुराणानुसार बुध्द हे विष्णूचे नववे अवतार मानले जाते. बुध्द पौर्णिमा ही केवळ भारतातच नव्हे तर जगातील अनेक देशांत साजरी केली जाते. यात श्रीलंका, कंबोडिया, व्हिएतनाम, चीन, नेपाळ, थायलंड, मलेशिया, म्यानमार, इंडोनेशिया आणि पाकिस्तान या देशांचाही समावेश आहे. श्रीलंकेत बुध्द पौर्णिमेला ‘वेसाक’ असं म्हणतात. हा वैशाखाचा अपभ्रंश आहे. गुरु विश्वामित्र, अलारा, कलम, उद्दाका रामापुत्त आदी चे प्रमुख गुरु होते
अनुक्रमाणिक
चला तर गौतम बुद्धांबद्दल थोडे जाणून घेऊया..
गौतम बुध्द हे भारतीय तत्वज्ञ व बौध्दधर्माचे संस्थापक होते. शाक्य गणराज्याचा राजा शुध्दीधन व त्यांची पत्नी महाराणी महामाया(मायादेवी) यांच्या पोटी त्यांनी लुंबिनी येथे राजकुमाराचा जन्म झाला.
जन्म | इ.स.पू. ५६३ लुंबिनी, नेपाळ. |
मृत्यू | इ.स.पू. ४८३ कुशीनगर, उत्तर प्रदेश, भारत. |
टोपण नावे | गौतम, शाक्यमुनी |
प्रसिद्ध कामे | बौद्ध धर्माचे संस्थापक |
मुळगाव | कपिलवस्तु |
धर्म | बौद्ध धर्म |
जोडीदार (पत्नी) | यशोधरा |
मुलगा | राहुल |
वडील | राजा शुद्धोधन |
आई | महाराणी महामाया |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
या राजकुमाराचे नाव ‘सिध्दार्थ’ असे ठेवण्यात आले. सिध्दार्थाच्या जन्मानंतर अवघ्या सातव्या दिवशीच त्यांची आई महामायाचे निधन झाले. आईचे छत्र हरवलेल्या सिध्दार्थाचा सांभाळ त्यांची मावशी व सावत्र आई महाप्रजापती गौतमीने केला. त्यामुळे राजकुमार सिध्दार्थाला ‘गौतम’ या नावानेही ओळखले जाते. राजकुमार सिध्दार्थ गौतमास आवश्यक असे सर्व शिक्षण देण्यात आले. यशोधरा या सुंदर राजकुमारीशी सिध्दार्थ गौतमाचा इ.स. पू. ५४७ मध्ये विवाह झाला व पुढे त्यांना राहुल नावाचा एक पुत्र झाला. ‘बुध्द’ या शब्दाचा अर्थ आहे ‘आकाशाएवढा प्रचंड ज्ञानी’ आणि ही उपाधी गौतम बुध्दांनी स्वप्रयत्नांनी मिळवली आहे. ‘संबुध्द’ म्हणजे बुधत्व-संबोधी प्राप्त स्वत: वर विजय मिळवलेला आणि स्वत: उत्कर्ष करु शकणारा महाज्ञानी बुध्द, आणि ‘समांसबुध्द’ म्हणजे बुध्दत्व – संबोधी प्राप्त असलेला, स्वतः सोबतच संपूर्ण जगाचा उत्कर्ष उध्दार करु शकणारा महाज्ञानी बुध्द, बौध्द अनुयायी लोक शाक्यमूनी गौतम बुध्दांना वर्तमानातीलसर्वश्रेष्ठ बुध्द म्हणजेच ‘संमासबुध्द’ मानतात. जगाच्या इतिहासातील महामानवांमध्ये तथागत बुध्द हे सर्वश्रेष्ठ बुध्द मानले जातात.

Read More : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन प्रवास वाचण्यासाठी यावर क्लिक करा..👈
बुध्दांच्या अनुयायांना बौध्द किंवा इंग्रजी भाषेत ‘बुध्दिस्ट’ म्हणतात आणि बुध्दांच्या धम्माला ‘बौध्द धर्म’ किंवा ‘बुध्दिझम्’ म्हणतात. तथागत बुध्दांचे अनुयायांत दोन भाग पडतात. एक -बुध्द भिक्खू-भिक्खूनींचा आणि दुसरा- बौध्द उपासक- उपासिकांचा. आज सर्वच खंडांत भगवान बुध्दांचे अनुयायी आहेत आशिया खंडाची जवळपास अर्धी (४९टक्के) लोकसंख्या ही बौध्द धर्मीय आहे. जगभरातील बुध्द अनुयायांची लोकसंख्या ही १८० कोटी ते २१० कोटी आहेत. अनुयायांच्या तुलनेत येशू खिस्तानंतर जगतात सर्वाधिक अनुयायी तथागत बुध्दांना लाभलेले आहेत. परंतू भारतातील कोटयावधी हिंदू धर्मीयांनी तसेच जगभरातील अनेक मानवतावादी विज्ञानवादी लोकांनी गौतम
बुध्दांचे अनुयायित्व पत्करले आहे. या सर्व बुध्द अनुयायांची एकत्रित लोकसंख्या ही २.३ अब्जांवर आहे. म्हणजेच तथागत बुध्द जगात सर्वाधिक अनुयायी असलेले सर्वाधिक प्रभावशाली धर्म संस्थापक, तत्वज्ञ आहेत. मागील १० हजार वर्षामध्ये ज्यांनी आपली बुध्दिमत्ता वापरुन मानव जातीच्या कल्याणासाठी महान कार्ये केली अशा जगातील टॉप १०० विश्व मानवांची यादी इंग्लंडमधील ऑक्सफोर्ड विद्यापीठाने तयार केली, त्या यादीत
विद्यापीठाने प्रथमस्थानी तथागत बुध्दांना ठेवले होते. जगातील पहिल्या १०० अत्यंत महान विश्वमानवांमध्ये बुध्द प्रथम स्थानी आहेत. आचार्य रजनीश बुध्दांबद्दल म्हणतात की, ‘बुध्दानंतर त्यांच्या जवळपास जाऊ शकेल असा
महामानव भारताने किंवा जगाने आजपर्यंत निर्माण केला नाही.”

भारतातील बुद्ध जयंतीचा इतिहास
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली २ मे १९५० रोजी भारतात पहिली सार्वजनिक बुद्ध जयंती दिल्ली येथे साजरी झाली. याप्रसंगी आंबेडकरांनी बुद्धांच्या जीवनकार्यावर विचार मांडले. या जयंती समारोहास अनेक देशांचे वकील/प्रतिनिधी, भिक्षू समुदाय व सुमारे वीस हजार लोकांचा समुदायही उपस्थित होता. अशाप्रकारे भारतात बुद्ध जयंतीची सुरुवात झाली.
१९५१ मध्ये आंबेडकरांच्याच अध्यक्षतेखाली तीन दिवसीय बुद्ध जयंती महोत्सव साजरा झाला. १९५६ ला बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यातील शेवटची बुद्ध जयंती दिल्लीतच साजरी केली. दिल्लीनंतर बाबासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रातही बुद्ध जयंतीस १९५३ पासून सुरुवात केली. १९५६ पर्यंत त्यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख उपस्थितीत बुद्ध जयंतीचे महाराष्ट्रात भव्य कार्यक्रम झाले. महाराष्ट्रातले बुद्ध जयंतीचे कार्यक्रम प्रामुख्याने मुंबईत झाले. भारतात व महाराष्ट्रात बुद्ध जयंती महोत्सवाच्या परंपरेची सुरूवात बाबासाहेब आंबेडकरांनी केली, म्हणून ते भारतातील सार्वजनिक बुद्ध जयंती महोत्सवाचे प्रणेते ठरतात.
‘इतर सर्व धर्म संस्थापकांच्या जन्मदिनी देशात सुट्टी मिळते. मग मानवतेचा महान संदेश देण्याऱ्या तथागत बुद्धांच्या जयंतीस सुट्टी का नाही? एक तर नियोजित सुट्ट्यातील एक सुट्टी कमी करा अथवा एक सुट्टी वाढवून आम्हाला द्या.’ अशी आग्रही मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना तत्कालीन केंद्र सरकारकडे केली होती. बुद्ध जयंती दिनी सार्वजनिक सुट्टी असावी ही १९४२ पासूनच मागणी होती. आंबेडकरांच्या प्रयत्नांमुळे व दबावामुळे २७ मे १९५३ रोजी केंद्र सरकारने बुद्ध जयंती निमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर केली. महाराष्ट्र सरकारने मात्र त्या वर्षी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली नाही. या सर्व बाबींचा उल्लेख बाबासाहेबांनी १९५३ च्या आपल्या मुंबईतील बुद्ध जयंती कार्यक्रमाच्या भाषणात स्वतः केला होता.
भारतीय इतिहासातील लोकशाही, स्वातंत्र्य आणि समतेचा अग्निस्रोत म्हणजे गौतम बुद्ध, या शब्दांत थोर विचारवंत शरद पाटील यांनी बुद्धाची महती वर्णिली आहे, तर दुसरे एक प्रख्यात विचारवंत आ. ह. साळुंके यांनी बुद्धाला सर्वोत्तम भूमिपुत्र संबोधले आहे.
बौद्ध संप्रदाय-
बुद्धाच्या वेळी कोणताच संप्रदाय वा पंथ नव्हता. परंतु त्यानंतर मात्र मतभेद होऊन हिनयान व महायान हे पंथ तयार झाले. महायान म्हणजे मोठी नौका वा गाडी तर हिनयान म्हणजे छोटी गाडी वा नौका. महायान संप्रदायांतर्गतच वज्रयान नावाचीही एक उपशाखा होती. झेन, ताओ, शिंतो हेही बौद्ध धर्माचे संप्रदाय मानले जातात.

बौद्ध धर्मग्रंथ-
बौद्ध धर्माची मूळ तत्वे ही आहेत- चार आर्य सत्ये, अष्टांगिक मार्ग, निर्वाण. बुद्धाने आपली शिकवण पाली भाषेत दिली. ती त्रिपिटीकामध्ये संकलित केली आहे. त्रिपिटक तीन भागात आहे. विनयपिटक, सुत्तपिटक व अभिधम्मपिटक.या पिटकांमध्येही अनेक उपग्रंथ आहेत. सत्तपिटकमध्ये ने आहेत. धम्मपदे लोकप्रिय आहेत.
बुद्धांनी सांगितलेली चार आर्यसत्य
चार आर्यसत्य आचरणात आणल्यास माणूस त्याचं जीवन आनंदात घालवू शकतो. ती सत्य म्हणजे…
> दु:ख असते.
> दु:खाला कारण असते.
> दु:खाचे निवारण करता येते.
> दु:ख कमी करण्याचे उपाय आहेत.
बुद्धांनी आठ मार्ग सांगितले
दु:ख निवारण्यासाठी बुद्धांनी आठ मार्ग सांगितले होते.
> यम
> नियम
> आसन
> प्राणायाम
> प्रत्याहार
> ध्यान
> धारणा
> समाधी
तथागत बुद्धांनी या जगात चार प्रकारचे लोक सांगितले :
1.अंधारातून अंधाराकडे जाणारे
2.अंधारकडून प्रकाशाकडे
जाणारे
3. प्रकाशकडून अंधारकडे
जाणारे
4. प्रकाशकडून प्रकाशाकडे
जाणारे
भवतू संबं मंगलं ! भवतू संबं मंगल ! भवतू संबं मंगलं !