कंबर दुखीच्या त्रासाला कंटाळलाय का ? हे घरगुती उपाय नक्की करून बघा, सविस्तर वाचा..

Health Tips In Marathi: बदलत चालेल्या राहणीमान आणि सवयी मुळे आपण खूपसाऱ्या त्रास आणि आजारांनी ग्रस्त झालो आहे. अश्याच एक वाढत चालेल आजार म्हणा किंवा त्रास तो म्हणजे कंबर दुखणे. लहानांपासून ते मोठ्या वयोवृद्ध म्हाताऱ्या माणसांन पर्यंत हा त्रास आहे.

आपण कामकाज मुळे लॅपटॉप किंवा कॉम्पुटर सामोरा सतत बसत असतो. तसेच लहान मुलं सुद्धा खूप वेळ टीव्ही समोर बसत असल्या  मुळे त्याना सुद्धा कंबरे चा त्रास होत आहे.आम्ही घेऊन आलो आहे काही असे घरगुती उपाय ज्यांनी तुम्हाला नक्कीच मदत होणार आहे .

अगदी उपयोगी घरगुती कंबर दुखी वर उपाय: 

1) कंबर दुखीचा उपचार चालू असतांना, तळलेले पदार्थ, भात, उडदाची डाळ, इत्यादि वर्ज्य करावे. उकळलेले पाणी प्यावे. उपाय- रात्री 60-70 ग्रॅम गहू पाण्यात भिजवून ठेवावे. सकाळी या गव्हात 30 ग्रॅम खसखस व तीस ग्रॅम धणे मिसळून बारीक वाटून घ्यावे. त्यात अर्धा लीटर दूध टाकून उकळावे. हे मिश्रण गरजेनुसार दोन आठवडे लागोपाठ घेत राहिल्याने कंबरेचे दुखणे थांबते.

2) जायफळ पाण्यात उगाळून तिळाच्या तेलात मिसळून गरम करावे. चांगले गरम झाल्यावर थंड करून कंबरेवर चोळल्याने दुखणे एकदम थांबते.

3) एक चमचा आल्याच्या रसात अर्धा चमचा मध टाकून प्यावे. असे दिवसातून 3 वेळा करावे.

Leave a Comment