corona virus news | latest news | ताजी बातमी

कोरोना व्हायरस चे प्रमाण दिवसांदिवस वाढतच आहे. या दरम्यान, सर्वसामान्यांमध्ये जनजागृती करण्याचे काम देखील मोठ्या प्रमाणात सुरू आहे. सर्वसामान्यांना समजावून सांगितले जात आहे की, जर आपण थोडी खबरदारी घेतली तर कोरोना व्हायरसशी यशस्वीपणे सामना केला जाऊ शकतो. कोरोना वरती कोणताही उपचार नाही, परंतु या कोरोनाचे रुग्ण मात्र भारतात सातत्याने बरे होत आहेत. आतापर्यंत २० रुग्णांची प्रकृती ठीक झाल्यावर त्यांना घरी पाठवले आहे. यामध्ये यूपी मधील ९ आणि केरळमधील ३ रुग्णांचा समावेश आहे. भारतात कोरोना व्हायरसची लागण केरळमधील तीन रुग्णांमुळे झाली होती. हे विद्यार्थी चीनमधील वुहान युनिव्हर्सिटीमध्ये शिकत होते आणि तेथे रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर ते भारतात परतले होते.
*अशाप्रकारे कोरोना व्हायरसच्या रुग्णांवर केला जातो उपचार कोरोना व्हायरस आता एका माणसाकडून दुसऱ्या माणसांकडे पसरत आहे. आणि आता सर्वात मोठे आव्हान असे आहे की त्याला पसरण्यापासून कसे रोखले पाहिजे. एखाद्या रुग्णाला कोरोनाची लक्षणे दिसताच त्याला रुग्णालयात दाखल केले जाते. विशेषत: परदेशातून येणार्‍या प्रत्येक प्रवाशाची कसून तपासणी केली जाते. संशयितांना वेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आले होते म्हणजेच इतर लोकांपासून दूर ठेवण्यात आले होते. यानंतर, कोरोना व्हायरस लक्षणांवर उपचार सुरू केले.


डॉ. अजय मोहन यांच्या म्हणण्यानुसार, कोरोना व्हायरसची लस अद्यापही बनलेली नाही. जगभरातील शास्त्रज्ञ यासाठी प्रयत्न करीत आहेत. काही कंपन्यांनी औषध बनवल्याचा दावा देखील केला आहे, परंतु अद्याप याची खातरजमा झालेली नाही. सध्या कोरोना विषाणूचे रुग्ण स्वत: हून बरे होत आहेत. व आतापर्यंत त्या रुग्णांवर जे उपचार केले आहे ते उपचार त्यांच्यामधील दिसून आलेल्या लक्षणांवरचेच होते. तापासाठी पॅरासिटामोल सारख्या प्रतिजैविक औषधे दिली जात आहेत. त्याच बरोबर सर्दी खोकल्यासाठी देखील औषधे दिली जात आहेत. घशात दुखण्यासाठी विशिष्ट प्रकारचे प्रतिजैविक औषध दिली जात आहेत. त्याच बरोबर विश्रांती घेण्याचा देखील सल्ला देण्यात येत आहे.
ही प्रक्रिया 14 दिवस वापरून. यानंतर पुन्हा एकदा चाचणी घेण्यात येते आणि नकारात्मक आढळल्यास, २४ तासांनंतर पुन्हा एकदा त्याची तपासणी केली  जाते आणि ती देखील नकारात्मक असेल तर, रुग्ण पूर्णपणे बरा झाला आहे. या पद्धतीचा अवलंब करून आतापर्यंत २० रुग्णांना घरी पाठविण्यात आले आहे. तथापि, त्यांना इतर लोकांपासून दूर राहून, काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
कोरोना व्हायरस विरुद्ध लढण्याचे सर्वात मोठे हत्यार म्हणजे लोकांमधील रोग प्रतिकारशक्ती….
कोरोना व्हायरस त्या लोकांना टार्गेट करत आहे ज्या लोकांमध्ये रोग प्रतिकारशक्ती कमी आहे म्हणजे रोगांविरुद्ध लढण्याची शक्ती…! साधारणत: वृद्ध लोक याचे बळी पडत आहेत. लोकांना निरोगी जीवनशैली अवलंबण्याचा सल्ला देण्यात येत आहे. बाहेरच्या गोष्टी खाऊ नका, स्वच्छतेची पूर्ण काळजी घ्या, सतत साबणाने हात स्वच्छ करा. नंतरच्या उपचारा पेक्षा आधिच योग्य ती काळजी घेणे कधीही चांगलेच.

रोगप्रतिकार शक्ती मजबूत ठेवण्यासाठी, संपूर्ण झोप घ्या, धूम्रपान आणि मद्यपानांपासून दूर रहा, फळे आणि हिरव्या भाज्या अधिकाधिक प्रमाणात खा.

चीनमधील कोरोना या विषाणूचा संसर्ग
जगभरातील ६७ हजारपेक्षा अधिक लोकांना झाला आहे.
त्यामध्ये भारतातील तीन रुग्णांचाही समावेश आहे.
चीनमधील कोरोनाग्रस्त मृतांची संख्या आता १६०० वर
पोहोचली आहे. चीनमधील शुक्रवारी आणखी १४३
कोरोनाग्रस्त रुग्ण मरण पावल्यामुळे आतापर्यंत बळींची
संख्या १६०० झाली आहे.

२६४१ नवे कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. चीनमध्ये
करोना संसर्गावरील उपचारांनंतर संपूर्ण बरे झालेल्या
८०९६ रुग्णांना घरी जाण्याची परवानगी देण्यात आली
आहे. फ्रान्समध्ये कोरोनाने पीडित एका ८० वर्षीय चीनी
पर्यटक वृद्धाचा मृत्यू झाला आहे. या विषाणुमुळे होणारा
आशियाबाहेरचा हा पहिला मृत्यू आहे.

विविध देशांमध्ये करोना विषाणूची रुग्णांची संख्या. चीन –
६६,४९२ जणांना लागण, हाँगकाँग – ५६ जणांना लागण
(एकाचा मृत्यू), मकाव – १० रुग्ण, जपान – २६२ रुग्ण
(त्यात योकोहामा येथे नांगरलेल्या क्रूझवरील २१८
जणांचा समावेश), सिंगापूर – ६७ रुग्ण, थायलंड – ३४
रुग्ण, दक्षिण कोरिया – २८ रुग्ण, मलेशिया – २१ रुग्ण,
तैवान – १८ रुग्ण, व्हिएतनाम – १६ रुग्ण, जर्मनी – १६
रुग्ण, अमेरिका – १५ रुग्ण (एक अमेरिकी नागरिक
चीनमध्ये मरण पावला), ऑस्ट्रेलिया – १४ रुग्ण, फ्रान्स –
११ रुग्ण, ब्रिटन – ९ रुग्ण, संयुक्त अरब अमिरतीज-८ रुग्ण, कॅनडा – ८ रुग्ण, फिलिपिन्स – ३ रुग्ण (त्यातील
एकाचा मृत्यू), भारत, इटली प्रत्येकी ३ रुग्ण, रशिया, स्पेन
प्रत्येकी २ रुग्ण, बेल्जियम, श्रीलंका, नेपाळ, स्वीडन,
कंबोडिया, फिनलंड, इजिप्त प्रत्येकी क्रूझवरील भारतीयांच्या प्रकृतीत सुधारणा जपानमधील क्रूझवरील कोरोनाग्रस्तांपैकी तीन भारतीयांची प्रकृती उपचारांनंतर सुधारली आहे.

तेथील भारतीयांमध्ये एकही नवा रुग्ण नाही असे जपानमधील भारतीय राजदूतावासाने म्हटले आहे. या क्रूझवर सुरक्षा अधिकारी सोनाली ठक्करला संसर्ग झाला नसल्याचे आढळून आले आहे. सोनालीसह ज्या भारतीयांना कोरोनाची लागण झालेली नाही त्यांना या क्रूझवरून हलवावे अशी मागणी सोनालीचे वडील दिनेश ठक्कर यांनी सरकारकडे केली आहे. डायमंड प्रिन्सेस क्रूझवरील ३७११ लोकांपैकी १३८ जण भारतीय आहेत.

Leave a Comment