साहित्य :
• १ किलो बोनेलेस चिकन (२ १/२ इंचाचे तुकडे करून)
• ४ अंडी
• २ कप ब्रेडचा चुरा
• ४ चमचे लसून पेस्ट
• ४ चमचे तिखट
• २ चमचे जीरा पावडर
• ४ चमचे कोथिंबीर
• २ चमचे दालचिनी पावडर
• २ चमचे मैदा
• २ चमचे लिंबाचा रस
• तेल तळण्यासाठी
कृती:
• चिकन नीट धुऊन कोरडे करून घ्या.
• काटा चमच्याने त्यावर टोचे मारा.
• एका बाउल मध्ये लसून पेस्ट, तिखट, जीरा पावडर, कोथिंबीर, दालचिनी पावडर,लिंबाचा रस एकत्र करून घ्या.
• ह्यात चिकन घोळवून तास-२ तास ठेऊन द्या.

• मीठ आणि तिखट घालून अंडी फेटून घ्या.
• ब्रेडचा चुरा एका प्लेट मध्ये घ्या. प्रत्येक चिकनचा तुकडा पहिले ब्रेडच्या चुऱ्यात घोळवून नंतर अंड्यात घोळवा.
• आणि परत तो ब्रेडच्या चुऱ्यात घोळवा. ह्यामुळे चिकन ला double coat मिळेल.
• तेलावर golden रंगाचे होईपर्यंत fry करा.
• गरम गरम सर्व करा.