
नवी दिल्ली: पुढील वर्षी होणऱ्या
आयपीएलनंतर भविष्याचा निर्णय घेणार
असल्याचे माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी
याने निकटवर्तीय सूत्रांच्या माध्यमातून
मंगळवारी जाहीर केले. या वक्तव्यामुळे
धोनीबाबत सुरु असलेल्या
अटकळबाजीला सध्यातरी पूर्णविराम
मिळाला, असे म्हणावे लागेल.
जुलैमध्ये भारतीय संघ इंग्लंडमधील
एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकात
उपांत्य फेरीत पराभूत होऊन स्पर्धेबाहेर
पडला. तेव्हापासून धोनी एकही सामना
खेळला नाही. तो वेस्ट इंडिज दैन्यावर
गेला नव्हता. द.आफ्रिका तसेच
बांगलादेशविरुद्ध मालिकेतही तो
खेळला नाही. सूत्रांनी वृत्तसंस्थेला सांगितले की,
‘धोनी स्वत:च्या कारकिर्दीचा विचार
पुढील आयपीएलनंतरच करेल.

अटकळबाजी काहीही असो, पण धोनी
हा मुरब्बी तसेच संयमी खेळाडू आहे.
तंदुरुस्तीमध्ये कुणाच्याही तुलनेत तो
सरस आहे. मागच्या महिनाभरापासून तो
नेटमध्ये सतत घाम गाळत आहे.
आयपीएलमध्ये माही किती सामने
खेळेल, याचा निर्णय तो स्वतः घेईल.’
चेन्नई सुपरकिंग्सचा कर्णधार असलेला
३८ वर्षांचा धोनी वेस्ट इंडिजविरुद्ध
आगामी ६ डिसेंबरपासून सुरु होत
असलेल्या मालिकेतही खेळणार नाही.
या मालिकेत तीन टी२० आणि तीन व
एकदिवसीय सामने खेळले जातील.
निवड समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष
एमएसके प्रसाद यांनी आमचे पॅनल ति
आता भविष्यातील खेळाडूंचा वेध घेत अ
असल्याचे आधीच संकेत दिले आहेत. अलीकडे डीआरएसमध्ये चुकीचे
निर्णय घेतल्याप्रकरणी पंतवर वारंवार
टीका झाली. याबाबत धोनी अधिक
सरस ठरला होता.