Doctor babasaheb ambedkar in marathi | डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Doctor babasaheb ambedkar in marathi – डॉ.भीमराव रामजी आंबेडकर (१४ एप्रिल, १८९१ ते ६ डिसेंबर १९५६) हे बाबासाहेब आंबेडकर नावाने ओळखले जात. आंबेडकरांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या दोन्हीतून अर्थशास्त्रातील डॉक्टरेट पदव्या मिळवल्या. आपल्या सुरुवातीच्या कारकिर्दीत ते अर्थशास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि वकील होते. त्यांनी नंतरच्या जीवनात राजकीय कार्यावर लक्ष केंद्रीत केले, ते भारताच्या स्वातंत्र्यांसाठी प्रचार व चर्चामध्ये सामील झाले, वृत्तपत्रे प्रकाशित करणे, दलितांसाठी राजकीय हक्क व सामाजिक स्वातंत्र्यांचा पुरस्कार केला.

१९५६ त्यांनी वैदय धर्म स्विकारला व लक्षवधी दलितांना बौध्द धम्माची दीक्षा दिली. १९५० च्या दशकात बौध्द भिक्खुंनी त्यांना बौध्द धर्मातील उपाधी प्रदान केली. इ.स. १९९०साली त्यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान केला. आंबेडकरांच्या स्मरणार्थ अनेक स्मारके आणि चित्रणे लोकप्रिय संस्कृतीत उभी राहिली आहेत. मालोजीराव हे रामजींचे वडील आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आजोबा होते. आजोबा मालोजीराव इंग्रजी राजसत्तेत सैन्यात शिपाई म्हणून भरती झाले होते. सैन्यातील नोकरीमुळे सैनिकी शाळेत म्हणजेच ‘नार्मल स्कूल’ मध्ये शिक्षण घेऊ शकले. (Dr. Babasaheb ambedkar jayanti).

लोकमान्य टिळक माहिती

भीमराव आंबेडकर doctor babasaheb ambedkar यांनी सामाजिक दृष्टया मागासलेल्या वर्गाच्या निराशेला दुर केले आणि त्यांना समानतेचा अधिकार मिळवुन दिला. आंबेडकरांनी सतत जातिपातीच्या भेदभावाला संपवण्याकरता कठोर परिश्रम केले.भारतीय समाजात जातिपातीच्या भेदभावामुळे पसरलेल्या दुराचाराला संपवण्यात आपली मोलाची भुमिका बजावली.

जातीपातीच्या भेदभावाने भारतीय समाजाला संपुर्णतः विस्कळीत आणि अपंग बनविले होते त्याला पाहाता आंबेडकरांनी दलितांच्या हक्काची लढाई लढली आणि देशातील सामाजिक स्थितीत ब.याच प्रमाणात बदल केला. “शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि हे पिणारा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही.” हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रेरणादायी विचार आहे.

उच्च शिक्षण (babasaheb ambedkar qualification) :

बाबासाहेब आंबेडकरांचे आपले उच्च शिक्षण मुंबई विद्यापीठ, कोलंबिया विद्यापीठ, बॉन विद्यापीठ, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि ग्रेज इन या संस्थांमधून घेतले आहे. त्यांनी इ. स. १९१२ मध्ये बी.ए., इ. स. १९१५ मध्ये दोन वेळा एम.ए., इ. स. १९१७ मध्ये पी.एचडी., इ. स. १९२१ मध्ये एम.एस्‌‍सी.,इ. स. १९२२ मध्ये बार-ॲट-लॉ, इ. स. १९२३ मध्ये डी.एस्सी., इ. स. १९५२ मध्ये एल्‌एल.डी., इ. स. १९५३ मध्ये डी.लिट पदव्या मिळवल्या.

babasaheb ambedkar jayanti
Doctor babasaheb ambedkar in marathi
वकिली :

ऑक्टोबर इ.स. १९२६ मध्ये आंबेडकरांनी काही महत्वपूर्ण खटल्यात सहभाग घेतली होता. ब्राम्हण तीन गैर-ब्राम्हण नेते के.बी. बागडे, केशवराव जेधे आणि दिनकरराव जावळकर यांच्यावर ब्राम्हणांनी देश उद्ध्वस्त केला. अशा आशयाची पत्रके लिहिली होती. म्हणून त्या तिघांवर खटका भरण्यात आला होता. फिर्यादीच्या बाजूने पुण्यातील वकील एल.बी. भोपटकर होते. आंबेडकरांनी आपला खटला अतिशय विश्वासाने लढला, अतिशय, प्रशंसनीय बचाव केला आणि खटला जिंकला.

Top Marathi suvichar वाचण्यासाठी यावर क्लिक करा.

महाडचा सत्याग्रह :

इ.स. १९२६ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मुंबई प्रांतिक विधान परिषदेचे नेमलेले सदस्य बनले. इ.स.१९२७ च्या सुमारास त्यांनी अस्पृश्यतेविरुध्द जागृत चळवळ सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पिण्याच्या पाण्यासाठी व हिंदू देवळामध्ये प्रवेशासाठी चळवळी व मोर्चे काढण्यास सुरुवात केली.

स्वातंत्र्य लढा :

डॉ. बाबासाहेब आंबेडकर केवळ जातिव्यवस्थेच्या विरोधातच लढत होते असे नव्हे, किंवा ते केवळ विशिष्ट एका समाजाच्या विकासाचाच केवळ विचार करत होते असेही नव्हे. त्यांना भारतीय स्वातंत्र्य लढ्याचेही भान होते. शिक्षण,  अंधश्रद्धा,  स्त्रियांची स्थिती, अर्थकारण,  राजकीय किंवा प्रशासकीय व्यवस्था या मुद्यांकडेहीत्यांचे अवधान होते. बाबासाहेबांनी भारतातील सर्व समाजांचा आणि सर्वप्रथम देशहिताचाच विचार केलेला आहे. 

एकीकडे ते जसे १९३० ते ३२ मध्ये झालेल्या गोलमेज परिषदांतून अस्पृश्यांच्या न्याय व हक्कांसाठी लढतात तसेच दुसरीकडे ते भारतातील सर्व स्त्रीयांच्या उन्नतीसाठी विशेषत हिंदू समाजातील स्त्रियांना सामाजिक प्रतिष्ठा, संपत्तीतील हक्क,घटस्फोट इत्यादीबाबत स्वातंत्र्य मिळावे म्हणून हिंदू कोड बील संसदेत मांडतात आणि ते नामंजूर झाले म्हणून आपल्या मंत्रिपदाचा राजीनामाही देतात. स्त्रीयांना त्यांचा अधिकार मिळत नाही यामुळे बाबासाहेबांनी मंत्रीपदाचा त्याग केला.

संत तुकाराम महाराज माहिती

राजकीय स्वातंत्र्य आधी की सामाजिक सुधारणा हा टिळक व आगरकर यांच्यातील वाद डॉ. आंबेडकरांच्याही मनात चालत होता. स्वातंत्र्योत्तर भारतात तत्कालीन अस्पृश्यांच्या स्वातंत्र्याला काहीच किंमत नसेल, तर त्यातून अधिक गुंतागुंतीच्या समस्या निर्माण होतील. तसे होऊ नये यासाठी त्यांनी अस्पृश्यता निवारणाचे कार्य हाती घेतले.१९३० सालच्या लंडन मधील गोलमेज परिषदेच्या वेळी त्यांनी ब्रिटिशांना भारत सोडावा असे ठणकावून सांगितले होते. आपल्या पी.एचडी. च्या प्रबंधातूनही त्यांनी ब्रिटिशांनी भारताच्या चालवलेल्या आर्थिक शोषणाचे विश्लेषण केलेले आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
बहिष्कृत भारत – १८ जानेवारी १९२९

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ते मत किती सत्यात उतरणारे आहे हे आज उभा देश अनुभवत आहे. CAA आणि NRC सारख्या कायद्यांमुळे देशातील नाकरिकांना मग तो कोणत्याही जाती धर्माचा असो त्याला या कायद्याने काहीही नुकसान होणार नाही. उलट झालाच तर फायदा होणार आहे. देशात अवैधरित्या राहणाऱ्या घुसखोरांना बाहेर काढल्यानंतर त्याचा फायदा नक्कीच स्थानिकांना होणार आहे. पण आज देशातील बहुसंख्य मुस्लिम समाज ज्याला या कायद्याने काहीही त्रास होणार नाहीय परंतु या  तो कायद्या विरोधात पाकिस्तानातून – बांग्लादेशातून अवैधरित्या हिंदुस्थानात घुसलेल्या  घुसखोरांच्या समर्थनार्थ स्त्यावर उतरला आहे हे या देशाचे दुर्भाग्य आहे ….

information about dr babasaheb ambedkar in marathi
information about dr babasaheb ambedkar in marathi

पण असे होइल …. हिंदुस्थानातील मुसलमान वेळ आल्यावर पाकिस्तान – बांग्लादेशातील मुसलामांनासाठी आपल्याच देशाच्या विरोधात उतरतील हे सत्य भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांनी १०० वर्षापूर्वीच ओळखले होते…

 या देशाला नुकसान बाहेरील देशाकडून जितका नाही त्यापेक्षा जास्त त्रास देशात राहणाऱ्या देशविरोधी लोकांचा आहे ! जो कायदा देशवासीयांसाठी फायदेशीर आहे त्याला विरोध हा फक्त नावाला आहे खर तर देशात घुसलेल्या पाकिस्तानी – बांग्लादेशींना पाठीशी घालण्यासाठी आज देशात हिंसाचार आणि जाळपोळ सुरु आहे . अजूनही वेळ गेलेली नाही देशातील सुजाण आणि देशभक्त नागरिकांनी हीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचीही इच्छा होती हे ओळखून CAA आणि NRC कायद्याच्या पाठीमागे ठामपणे उभे राहणे काळाची गरज आहे.

राजकीय विचार :

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे राजकीय विचार म्हणजे स्वराज्य, राष्ट्रवाद, लोकशाही, मूलभूत हक्क, अल्पसंख्यकाचे हितरक्षण, समाजवाद, साम्यवाद, बौद्ध धर्म इत्यादी संबंधीची विचार होते. डॉ. आंबेडकरांनी भारतातील विविध राजकीय प्रश्नासंबंधी आणि राजकीय तत्त्वज्ञानासंबंधीची मते आपल्या अनेक लेखातून, पुस्तकातून आणि भाषणांतून मांडली आहेत. तेच बाबासाहेबांचे राजकीय विचार आहेत. डॉ. आंबेडकरांचे काही राजकीय विचार हे त्यांनी घटना परिषदेच्या अधिवेशात केलेल्या भाषणातूनही व्यक्त झालेले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या या विचारांचा तत्कालीन राजकारणावर तसेच स्वातंत्र्याच्या राजकारणावर प्रभाव पडला आहे.

आंबेडकर इ.स. १९३० मध्ये लंडन येथे भरलेल्या पहिल्या गोलमेज परिषदेस उपस्थित राहिले. या परिषदेत त्यांनी देशातील अस्पृश्यांच्या परिस्थीतीबद्दल आवाज उठवला आणि अस्पृश्यता निर्मूलनाची मागणी केली. त्यांनी दलित वर्गाच्या मूलभूत हक्कांचा एक जाहीरनामा तयार केला आणि अल्पसंख्याकांसाठी नेमलेल्या समितीसमोर सादर केला. त्या जाहीरनाम्यात अस्पृश्यांना स्वतंत्र मतदार संघाची मागणी केली होती. परिषदेत बाबासाहेबांच्या प्रभावी वक्तृत्वाने साऱ्यांना प्रभावित केले. हा जाहिरनामा ब्रिटीश सरकारने मान्य केला. परंतु मोहनदास करमचंद गांधी यांनी स्वतंत्र्य मतदार संघाच्या कल्पनेस प्रखर विरोध केला. तेव्हा ते असेही म्हणाले की,

‘प्राण गेला तरी चालेल पण अस्पृश्यांना हा अधिकार मिळू देणार नाही’.

doctor babasaheb ambedkar information in marathi

Leave a Comment