Marathi Poems On Friendship – नमस्कार Inmarathi.in मध्ये तुमचे स्वागत आहे. मैत्रीवरील लोकप्रिय कवींच्या काही उत्कृष्ट कवितांचा संग्रह तुमच्यासाठी तयार करण्याचा प्रयत्न केला आहे.आणि तो तुम्हाला नक्कीच आवडेल अशी आशा बाळगतो.
मैत्रीच नात ऐक अस नात ज्याची निवड आपण स्वतः करतो आणि हे नात हे आई – वडील , बहीण – भाऊ , काका – काकी यांच्या पेक्षा खूप वेगळ आणि खास असतं. अशाच Friendship Poems In Marathi निमित्ताने रुसवे फुगवे जिव्हाळयांनी भरलेल्या मैत्रीवर मराठी कविता साधार करतो .
Marathi Poems On Friendship | मैत्रीवर मराठी कविता | Friendship Poems In Marathi
अनुक्रमाणिक
मित्रांचे कट्टे..👬
मित्रांचे कट्टे आजकाल ओसच पडतात.
कुणी ‘whatsapp’ वर तर कुणी ‘Facebook वर जमतात.
प्रत्यक्ष भेटीत सगळेच बुचकळ्यात पडतात.
कारण सगळे विषय ‘Chat’ वरच संपलेले असतात.
मग ‘Chat’ वर भेटूच याचं ‘Promise’ होतं.
आणि संभाषणातून ‘Sign out’ केलं जातं.
‘लाल’ ‘हिरव्या’ दिव्यांच्या गर्दीत मग हरवायला होतं.
घट्ट पकडलेल्या हातानांही सैल सुटायला होतं.
‘Available” आणि ‘Busy’ मध्ये
प्रत्येकाचा ‘Status’ घुटमळत राहतो.
आपणहून ‘Add’ केलेल्या मित्रापासून
लपण्याकरिता ‘Invisible’चा आडोसा घेतला जातो.
ताप आल्याचं आजकाल आईच्या
आधी ‘Facebook’ला कळतं.
औषधापेक्षा ‘Take care’च्या डोसेजनीच
तापालाही पळायला होतं.
मनातलं सगळं ‘Facebook वर ओकायची
मैत्रीत गरजच का असावी?
नात्यांना धरून ठेवायला
‘Net’ची जाळीच का असावी?
कधीतरी वाटतं पुन्हा कट्ट्यावर जमावं.
‘Chat’ला गप्पांनी आणि ‘Smile’ ना
हास्यांनी ‘Replace’ करावं.
शब्दापेक्षा सोबतीचं सामर्थ्य जास्त असतं.
मैत्रीचं खरं समाधान
खांद्यावरच्या हातात असतं.
चला तर पूर्वीचे दिवस
पुन्हा अनुभवूया.
मैत्रीला ‘Technology
पासून जपून ठेवूया.
नक्की वाचा: Marathi Prem kavita
नक्की वाचा: Marathi Motivational Kavita
एक प्रवास मैत्रीचा..👬
एक प्रवास मैत्रीचा
जश्या हळुवार पावसाच्या सरींचा
ती पावसाची सर अलगद येवुन जावी
अन एक् सुंदरशी संध्याकाळ हळुच खुलुन यावी..
एक प्रवास सहवासाचा
जणु अलगद पडणार-या गारांचा
न बोलताही बरच काही सांगणारा
अन स्पर्श न करताही मनाला भिडणारा..
एक प्रवास शुन्याचा जणु हीमालयाशी
भिडण्याचा शुन्यातुन नवे जग साकारणारा
अन नव्या निर्मितीची चाहुल देणारा..
एक प्रवास जगण्याचा क्षणा क्शणाला
माणुस घडवण्याचा हसता हसता रडवणारा
अन रडवुन हळुच हसवणारा..
एक प्रवास प्रेमाचा भुरभुरणार-या दोन जिवांचा
जिंकलो तर संसार मांडायचा
अन हरलो तर नवीन वाटा शोधायच्या..
एक प्रवास प्रयत-नांचा सुख दुखातील
नाजुक क्षणांचा अखंड घडवणार-या माणुसकीचा
अन नवी उमेद देणार-या घडींचा..
एक प्रवास.. तुमच्या आमच्या आवडीचा
साठवु म्हंटले तर साठवणींचा आठवु
म्हंटले तर आठवणींचा इथे हळुच
येवुन विसावलाय..एक प्रवास…
जिवलग मित्र..
हाच तर जिवलग मित्र असतो…
१ दिवस फोन नहीं केला तर रागवतो
फोन केला तरीही शिव्या घालतो
कोलेजला आल्यावर पहिला कॉल आपल्याला करतो
कुठे आहेस म्हणुन विचारतो
पिकनिकला जाताना आई बाबांना
हाच तर मस्का लावायला कामी येतो बाइक
वरून पडलो की सगळे हसत असताना
धावत येउन उचलतो आपण विसरलो तरीही
वाढदिवशी १२ वाजता बरोबर मेसेज करतो
परिक्षेच्या वेळी सुपरवायज़रला घाल चुलीत
म्हणुन सप्प्लिमेंट हातात देतो काही चुकले
तर ओरडतो गरज असेल तर कान पीळतो
इतर मित्रांच्या तुलनेत आपली जास्त काळजी
घेत असतो हाच असतो जो आपल्या कली
मैत्रीच्या कवितांचा संग्रह फक्त तुमच्या साठी
Marathi Poems On Friendship | मैत्रीवर मराठी कविता | Friendship Poems In Marathi
🤝 ..मैत्री ..🤝
मैत्री नाही फ्रेंडशीप डे सारखी
एका दिवसात नातं जोडणारी
अनोळखी व्यक्तिंना ओळख देणारी
मैत्री नाही फ्रेंडशीप बँडसारखी दोन
दिवसांत रस्त्यांवर पायाखाली येणारी
निरनिराळ्या रंगांत अन् आकारात भेद
करणारी मैत्री नाही फ्रेंडशीप बँडसारखी
फक्त निवडक मित्रपरिवारासाठी राखीव असणारी …
शरीरावर मैत्रीचा दिखावा करणारी मैत्री
नाही पुसल्या जाणार्या नावासारखी एक
दिवस हातभर जागा व्यापणारी अन् काही
काळानंतर लोप पावणारी मैत्री नाही
एका एसेमेस अन् ईमेलसारखी तोच मेसेज
सगळ्यांना फॉरवर्ड होणारी इनबॉक्स
भरल्यावर आपोआप मेसेज डिलिट होणारी
मैत्री असते निखळ नाते प्रेमाच्यापलीकड जाणारे
एकमेकांना निरपेक्ष मनाने जीवाभावाची
साथ देणारे मैत्रीत कधी प्रेम,
कधी राग आहे कधी आपुलकी,
तर कधी दरारा आहे कधि अनोळखी भाव,
तर कधी जिव्हाळा आहे नाही कळली
ही मैत्री तर जीवनंच व्यर्थ आहे मैत्री साजरी
करायला एक दिवस पुरेसा नाही संपुर्ण
आयुष्य सरले तरी कित्येकांना मैत्री कळलीच नाही.
poem in marathi on friendship
लक्षात राहणारी ती मैत्री..
शाळेत असताना…
एक बाकावर सोबत जडलेली,
वर्गात असल्याने…
वर्षानुवर्षे संगतीने जोडलेली.
निरागस अन स्वच्छंदी बालपणाची ती मैत्री…
कॉलेजमध्ये असताना…
नव्या चेहेरयांमध्ये लपलेली,
कॉलेज कट्टा, कॅन्टीन मध्ये…
मजा मस्तीने रमलेली.
ती तारुण्यातली मैत्री…
चाळीत,बिल्डींगमध्ये राहत असताना…
ती बालपणाची खेळांमधून फुललेली,
दंगा मस्ती करताना…
हमारी – तुमरी वरून सच्चा दोस्त बनलेली.
ती कायमची ना विसरण्याजोगी मैत्री….
निरनिराळ्या पटलावर स्वार ….
हळू हळू फुलत जाणारी,
सुरुवात कुठून माहित नसणारी…
पण शेवट सोबत असणारी नानाविध
प्रकारे लक्षात राहणारी ती मैत्री.
हे देखील वाचा :
marathi poem on mother | आईवर काही सुंदर कविता
love poem in marathi | प्रेम कविता| मराठी कविता | prem kavita
Prem kavita in marathi | मराठी कविता | प्रेम कविता
मित्रानो तुमच्याकडे जर “Marathi Poems On Friendship” विषयावर कविता असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते friendship poems in marathi मैत्रीवर मराठी कविता या article मध्ये update करू . मित्रानो हि Marathi Poems On Friendship कविता जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.in