विनोदी कवितांचा संग्रह फक्त तुमच्या साठी | funny poem in marathi funny kavita in marathi. | आता तरी facebook बाबा पावशील का 😅
Read More : विनोदी कविता (funny poems that are short)
Read More : emotional love/ प्रेम poems
आता तरी facebook बाबा पावशील का.😆
आता तरी facebook बाबा पावशील का…..
पोरिगी मला पटवून… देशील का…. हो हो
हो…. आता तरी facebook बाबा पावशील
का…..
दिलेस उघडून मला अकाउंट… तरी,
chating मला करायची आहे स्वरी,
छान छान request मला पाठवशील का….
पोरगी मला पटवून देशील का… हो हो हो…
आता तरी facebook बाबा पाचशील का
पोरगी मला पटवून देशील का…..
दिसता नविन मुलगी facebook वरी,
जिव माझा असा हा तळमळ करी,
request accept करायला सांगशील
का….. पोरगी मला पटवून देशील का… हो हो
आता तरी facebook बाबा पावशील का
पोरगी मला पटवून देशील का…..
जुने मित्र जरी भेटले…. हरी,
मैत्री त्यांची टिकवायची आहे खरी,
आठवणिना उजाळा तू देशील का….. पोरगी
मला पटवून देशील का… हो हो हो…
आता तरी facebook बाबा पावशील का
पोरगी मला पटवून देशील का…..
पटली पोरगी मला facebook वरी,
guarantee नाही तिची ती आहे गोरी,
शेवट पर्यंत साथ द्यायला सांगशील का…..
पोरगी मला पटवून देशील का… हो हो हो…
आता तरी facebook बाबा पावशील का
पोरगी मला पटवून देशील का…..
पोरगी मला पटवून देशील का….. हो हो हो…
पोरगी मला पटवून देशील का…….
Read More : friendship poem
Read More : Top 50 business idea
विनोदी कवितांचा संग्रह फक्त तुमच्या साठी | funny kavita in marathi. | दारू चा पाढा 🍻 | funny poems that are short
Read More : Marathi Suvichar
दारू चा पाढा 🍻
दारु एके दारु, बैठक झाली सुरु
दारु दूने ग्लास, मज्जा येई ख़ास
दारु त्रिक वाईन, वाटे कसे फाईन
दारु चौक बिअर, टाका पुढचा गीअर
दारु पंचे रम, विसरून जाऊ गम
दारु सक ब्रांडी, हाना चिकन हंडी
दारु साते व्हिस्की, कोकटेल असते रिस्की
दारु अठे बेवडा, चखना शेव चिवडा
दारु नव्वे कंट्री, मारा परत एन्ट्री
दारु दाहे प्याला, स्वर्ग सुखी न्याहला…..

Read More : funny status for whatsapp | funny jokes | विनोदी स्टेटस..👈
प्रेमाच्या एक्झाममध्ये….. माझा पुरता पोपटच झाला.😊
रात्र रात्र जागून
खूप अभ्यास केला
बऱ्याच एक्झाममध्ये
साला top हि केला ……
पण एका दिवशी
घडलं आक्रीत ………..
प्रेमाच्या एक्झाममध्ये माझा
पुरता पोपटच झाला
बोलू बोलू तिच्याशी
घाबरून दिवस दवडताना
मला आवडणारी मैना
मेला कावळाच घेऊन गेला
आणि मित्रानो…….
प्रेमाच्या एक्झाममध्ये माझा
पुरता पोपटच झाला
पुरता पोपटच झाला ………….
विनोदी कवितांचा संग्रह फक्त तुमच्या साठी | funny kavita in marathi. | funny poem on girl
Read More : विनोदी कविता (funny poems)
एक पोट्टी…👧🏻
एक पोट्टी…..
एक पोट्टी रोज माह्या
सपनामंधी येते
हिचक विचक खाता पेता
उचकी देऊन जाते
थयथय नाचे मनामंची
मोरनी हाय जशी
येड लावुन जाते
तिचे नखरे बावनमिशी
एक दिवस अशी अचानक
माह्यासमोर आली
पाहुन मले काय सांगु
खुदकन हसुन गेली
म्या म्हनलं काय ती
हिच पोट्टी हाय
कोनबी असुदे यार
पन हिले तोड नाय
सपनामंधली पोट्टी पुन्हा
दिवसा दिसुन जाते
कं दिवसा पाह्यलेली पोट्टी
पुन्हा सपनामंधी येते
काय करु चायला
पुरता लोचा झाला
माह्या मनाच्या डुगडुगीचा
चक्का जाम झाला
एक वाटे सुंदरा मले
एक वाटे अप्सरा
चायला सपनातल्या पोट्टीचं
रुप दिवसा आठवत नाही
तिच्या नांदी दिवसाच्या पोट्टीचं
रुप मनी साठवत नाही
डोये खुल्ले तवा माह्या
च्यानामंधी आलं
दिवसाढवळ्या सपन पाहुन
कोनाचं भलं झालं….
ती एकटीच दात घासतेस..😁
सकाळी हसतेस दुपारी हसतेस
संध्याकाळी हसतेस रात्री हसतेस
घरात हसतेस रस्त्यात हसतेस
येताना बघून हसतेस
जाताना बघून हसतेस
तिला काय वाटत ती
एकटीच दात घासतेस

विनोदी कवितांचा संग्रह फक्त तुमच्या साठी | funny kavita in marathi. | funny poem on wife
गोरी बायको 👸कश्यासाठी ? 👈🤔😄
गोरी बायको कश्यासाठी ?
लोकांनी पाह्ण्यासाठी
आपल्यावर जळण्यासाठी
त्यांना जळतांना पाहून
आपण खुश होण्यासाठी .
गोरी बायको कश्यासाठी ?
समारंभी मिरवण्यासाठी
गर्दीत सांभाळण्यासाठी
सांभाळतांना तिला तसे
गर्दीत हिरो ठरण्यासाठी
गोरी बायको कश्यासाठी ?
गोरी पोर होण्यासाठी
कष्ट त्यांच्या लग्नाचे
आपोआप टाळण्यासाठी
गोरी बायको कश्यासाठी ?
कुणा विसरून जाण्यासाठी
तुझ्याहून सुंदर गोरी …
असे काही जिरवण्यासाठी
विनोदी कवितांचा संग्रह फक्त तुमच्या साठी | funny kavita in marathi. | funny poem on friends.
🍻 बेवडे मित्र उठेना..👬😄
अटक मठक रात्रभर भटक
मित्रांना लागली दारूची चटक
दारू लागली गोड गोड
बीयर ची बॉटल लवकर फोड
बीयर ची बॉटल संपेना
बेवडे मित्र उठेना…😄

अशीही एक विनोदी (funny) आरती..
तिची तार तुटलेली
त्याचा स्वर फाटलेला
आरतीत होता त्यांच्या
रंग सारा विटलेला
होते माहित तरीही
तिने कानाडोळा केला
खोबऱ्यात मोदकांच्या
नारळ तो खवटला
काय दिले देवराया
पूजा अर्चा करुनिया
गळयामध्ये बांधियले
मज आग्या वेताळा या
तोही म्हणे का रे बाबा
हीच हडळ भेटली
ऐशीकैशी माझ्या गळा
दोर फासाची लावली
आधी कर रे सुटका
करू जय मग तुझा
कसे काय करायचे
प्रश्न सोडव तू तुझा