Read More : ganpati aarti marathi lyrics
Read More : सकाळची भक्तिगीते वाचण्यासाठी यावर क्लिक करा.👈
आरती संग्रह | ganpati aarti sukhkarta dukhharta | ganpati aarti with lyrics
🙏 सुखकर्ता दुखहर्ता 🙏
सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची
नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची
कंठी झरके माल मुक्ताफळाची || १||
जय देव जय देव जय मंगलमूर्ती
दर्शनमात्रे मनकामना पुरती ||
रत्नखचित फरा तूज गौरीकुमरा
चंदनाची उटी कुंकुमकेशरा |
हिरेजडित मुकुट शोभतो बरा
रुणझुणती नुपुरेचरणी घागरिया||2||
लंबोदर पितांबर फनी वरवंदना
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना |
दास रामाचा वाट पाहे सदना
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवंटना
जय देव जय देव जय मंगलमूर्ती
दर्शनमात्रे मनकामना पुरती ||३||

ganpati aarti in marathi | घालीन लोटांगण | ganpati aarti
घालीन लोटांगण..आरती
घालीन लोटांगण, वंदीनचरण।
डोळ्यांनी पाहीन रुप तुझें।
प्रेमेंआलिंगन, आनंदेपूजिन।
भावेंओवाळीन म्हणेनामा।।१।।
त्वमेव माता पितात्वमेव।
त्वमेव बंधुक्ष्च सखा त्वमेव।
त्वमेव विध्या द्रविणं त्वमेव।
त्वमेव सर्वंममदेवदेव।।२।।
कायेनवाचा मनसेंद्रीयेव्रा,
बुद्धयात्मनावाप्रकृतिस्वभावात।
करोमियध्य्तसकलंपरस्मे,
नारायणायेति समर्पयामि।।३।।
अच्युतंकेशवं रामनारायणं
कृष्णदामोदरं वासुदेवं हरिम।
श्रीधरं माधवंगोपिकावल्लभं,
जानकीनायकं रामचंद्रभजे।।४।।
हरेरामहरेराम, रामरामहरेहरे।
हरेकृष्णहरेकृष्ण, कृष्णकृष्णहरेहरे।
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
निढळावरी कर ठेवुनि वाट मी पाहें ॥ ध्रु० ॥
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
आलिया गेलिया हातीं धाडी निरोप ।
पंढरपुरीं आहे माझा मायबाप ॥ येई० ॥ १ ॥
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
पिवळा पीतांबर कैसा गगनीं झळकला ।
गरुडावरि बैसोनि माझा कैवारी आला ॥ येई० ॥ २ ॥
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
विठोबाचे राज्य आम्हां नित्य दिपवाळी ।
विष्णुदास नामा जीवें भावें ओंवाळी ॥ येई हो० ॥ ३ ॥

Read More : गणेश चतुर्थी मराठी निबंध | ganesh chaturthy essay in marathi | marathi nibandh….
ganpati aarti in marathi | आधी वंदू तुझं मोरया | ganpati aarti with lyrics
🌺 आधी वंदू तुझं मोरया 🌺
गजानना श्री गणराया।
आधी वंदू तुज मोरया॥
मंगलमूर्ती श्री गणराया।
आधी वंदू तुज मोरया || १||
सिंदुरचर्चित धवळे अंग।
चंदन उटी खुलदी रंग ||
बघतां मानस होते दंग।
जीव जडला चरणी तुझिया || २||
गौरीतनया भालचंद्रा।
देवा कृपेच्या तूं समुद्रा॥
वरदविनायक करूणागारा।
अवघी विघ्ने नेसी विलया|| ३||

|| जय गणेश जय गणेश देवा ||
जय गणेश जय गणेश जय गणेश देवा।
माता जाकी पार्वती पिता महादेवा ।। जय.
एक दन्त दयावन्त चार भुजा धारी।
माथे सिन्दूर सोहे मूसे की सवारी।। जय.
अन्धन को आँख देत कोढ़िन को काया।
बाँझत को पुत्र देत निर्धन को माया । जय.
हार चढ़े फूल चढ़े और चढ़े मेवा।
लड्डुअन का भोग लगे सन्त करे सेवा ।। जय.”
दीनन की लाज राखो, शम्भु पुत्र वारी।
मनोरथ को पूरा करो, जय बलिहारी॥ जय.

“गणराज माझा नाचत आला”
गणराज माझा नाचत आला
मनोभावे पुजुया तयाला ।।धृ।।
शेंदूर दुर्वा आवडती गणराजाला
कंठी घालोनिया गळा ।।१।।
मुशकवाहनावरी बैसला
हाती परसु घेउनी आला ।।२।।
सुखकारक तु दु:खविदारक
मंगलमूर्ती तु मोरया
भक्तांसाठी धावला
सकळजणांना पावला ।।३।।
गणराजाची ही थोरवी
गजाननाच्या मुखी वदविली ।।४।।

Read More : krishna bhajan with lyrics / मराठी भजनांचा संग्रह वाचण्यासाठी यावर क्लिक करा. 👈
Read More : सकाळची भक्तिगीते वाचण्यासाठी यावर क्लिक करा.👈
Read More : आई वरती कविता / poems on mother वाचण्यासाठी यावर क्लिक करा.👈