ghavan recipe in marathi | घावणे कसे करावे ? | ghavan recipe

” नमस्कार inMarathi मध्ये तुमचे स्वागत आहे . आज तुम्हाला ह्या रेसीपी मध्ये मऊ लुसलुशीत जाळीदार घावणे कसे करायचे याची पूर्ण रेसीपी दिली आहे.मला आशा आहे कि हि रेसीपी तुम्हाला नक्की आवडेल.

घावणे हा पदार्थ मालवणात अतिशय लोकप्रिय आहे. मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असे हे घावणे नाष्ट्याला किंवा जेवताना सुद्धा खाल्ले जातात.

घावणे दोन प्रकारे केले जातात. रात्री तांदूळ भिजवून सकाळी वाटून त्याचे घावणे बनवायचे किंवा तांदळाच्या पिठाचे सुद्धा केले जातात.

तर मऊ लुसलुशीत जाळीदार घावणे कसे तयार करायचे याची संपूर्ण रेसीपी सोप्या पद्धती मध्ये देणाच्या प्रयत्न केला आहे ज्या मुळे तुमचे घावणे उत्तम होतील.

Ghavan Recipe चे साहित्य आणि कृती खालील प्रमाणे:-  

 

साहित्य :-

• १ कप तांदळाचे पीठ (पीठ मध्यम असावे, फार बारीक दळू नये. ) किंवा भिजवून वाटलेले तांदूळ

• १+१/४ कप पाणी  (थोडेफार कमी – जास्त पाणी लागेल.)

• चवीनुसार मीठ

• तेल

नक्की वाचा : उकडीचे मोदक रेसीपी

कृती :-

१) तांदळाचे पीठ, पाणी आणि मीठ एका भांड्यात मिश्रण करावे. गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्यावी.

२) नॉन – स्टीक डोसा तवा किंवा भिड्याला ऑईल ब्रश किंवा कांद्याने तेल लावून घ्यावे. त्यावर तयार मिश्रण वाटीने गोल पसरवून घ्यावे.

३) नंतर झाकण ठेवून बारिक गॅसवर घावन शिजू द्यावे . २-३ मिनिटांनी घावन झाला की आजूबाजूने चमच्याच्या किंवा सुरीच्या टोकाने घावन  उलटून पुन्हा १-२ मिनिटे शिजू द्यावा.

४) आता मऊ लुसलुशीत जाळीदार गरम गरम  घावणे तयार आहेत. आता हे नारळाच्या चटणी सोबत किंवा बटाट्याच्या पिवळ्या भाजीसोबत सर्व्ह करावे.

५) तसेच गरम गरम  घावणे तुम्ही चहासोबत सुध्दा खाऊ शकता.

नक्की वाचा : मिसळ पाव रेसिपी

टीप –

• जाडा तांदूळ धुऊन वाळत घाला आणि दळून आणा. त्यामुळे घावणे मऊ हलके आणि पांढरे शुभ्र होतील आणि बिघडण्याची शक्यता कमी होईल .

• घावण्यासाठी पीठ ताजेच घ्या जुन्या पिठाचे घावणे करताना तुटतात.

नक्की वाचा : ढोकळा रेसिपी

तर नक्की करुन पहा आणि जर तुम्हाला Ghavan Recipe आवडली असेल तर नक्की कमेंट करा. अशाच इतर नवनवीन पाककला तुमच्या जवळ असतील असतील तर आम्हाला कळवा. व InMarathi.in ला नक्की भेट घ्या .

Leave a Comment