gudi padwa marathi | गुढीपाडव्याचे महत्त्व जाणून घ्या..
gudi padwa : चैत्राची सुरुवात ज्या दिवसाने होते तो दिवस म्हणजे गुढीपाडवा. गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी अभ्यंगस्नान करावे व सुर्योदयापूर्वी गुढी उभी करावी असे मानतात. तो प्रत्येक हिंदुच्या दृष्टीने महत्वाचा आहे. त्या दिवसापासूनच रामाचे नवरात्र सुरु होते. ते रामनवमीला संपते. हा साडेतीन मुहुर्तापैकी एक मानला जातो. गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी अभ्यंगस्नान करावे व सुर्योदयापूर्वी गुढी उभी करावी असे मानतात. गुढी उभी करण्याच्या काठीला प्रथम गरम पाण्याने अंघोळ घालावी तिला हळद, चंदनाची सुवासिक द्रव्यांनी प्रसादीत करावे.

तिच्यावर कोरे कापड (खण), चाफ्याचा फुलांची माळ, साखरेच्या गाठी, कडुनिंब या सर्वांसमवेत गडू बांधावा व अशी सजलेली गुढी सुर्योदयापासून सूर्यास्तापूर्वी पर्यंत घरावर डौलाने उभी करावी. हा ब्रम्हध्वज आहे. आपल्या स्वतंत्र अस्मितेचे ते लक्षण आहे. विजयाचे प्रतीक म्हणुन आपण
गुढी उभी करतो. चैत्र शुक्ल पक्षाच्या प्रथम दिवशी (पाडव्याला) प्रभू राम सपत्नीक आपल्या सर्व दलासमवेत अयोध्येला १४ वर्षाचा वनवास संपवून परत आले
होते. त्या रावणावरच्या अतुलनीय विजयाचे कौतुक म्हणून रावणाच्या त्रासातून मुक्त झालेल्यांनी राम आपल्या घरी परत आल्यामुळे आनंदीत झालेल्या नगर जनानी, आपल्या आनंदाच्या प्रित्यर्थ गुढया उभ्या केल्या. आपली घरेदारे सजवली. (सोन्या माणकांसारख्या वैभव संपन्न रत्नांनी पूर्ण अयोध्या सजली होती अशी वर्णने वाचायला मिळतात).

त्या आनंदाचे प्रतीक म्हणन आपणही घरादाराला आंब्याची तोरणे बांधतो, फलांच्या माळांनी घर सजवतो. सकाळी मुख्यमार्जनानंतर कडुनिंबाची कोवळी पाने, हिंग, ओवा, चिंच या समवेत दयावीत असा प्रघात आहे. कारण कडूनिंब औषधी आहेच पण रसांसमवेत ‘आंबट, तुरट, तिखट यासारख्यांचे सेवन आर्युवेदात महत्वाचे मानले आहे.
संध्याकाळी सुर्यास्तापूर्वी गुढी खाली उतरावात त्यापूर्वी तिला धने व गुळ यांचा नैवेदय दाखवतात. पुन्हा धने उन्हाळयात उपयोगी तर उन्हातून आल्यावर पाणी देण्यापूर्वी गुळाचा खडा देण्याची प्रथा आहे. व त्यावरची साखरेची गाठी मुलीच्या गळयात घालतात. तर मुलांना साखरेचे कडे देतात होळी पासुनच हार-कडे देवाण घेवाण सुरु होते.
आनंदाची उधळण करीत
चैत्र पंचमी दारी आली…
नव्या ऋतुत नव्या जीवनात
उत्साहाची पालवी फुलली…
कडूनिंब दुःख निवारी
साखर सुख घेऊन येई…
पानाफुलांचे तोरण बांधुन दारी…
इच्छा आकांक्षांची गुढी
उभारुया आपल्या दारी…