Horror Marathi Story | मराठी भयकथा | Horror Story In Marathi

Horror Marathi Story- नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या वेबसाइटवर. जर तुम्ही Horror marathi story, मराठी भयकथा  संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत. मी आशा करतो की तुम्हाला आमच हे Horror marathi story, कलेक्शन नक्की आवडल ,जर आवडले तर सोशल मीडिया वर जरूर शेयर करा आणि अश्याच भारी भारी पोस्ट्स साठी आमचा ब्लॉग inmarathi.in ला आवशय भेट दया…

Horror Marathi Story | मराठी भयकथा | Horror Story In Marathi

कारखान्यातील भूत:

एके काळी भंडारा जिल्ह्यात विड्या वळण्याचा उद्योग भरभराटीस होता. स्वस्त आणि मुबलक मनुष्यबळ,जंगलात मोठ्या प्रमाणात उगवणारी तेंदूची झाडे आणि विडी कारखान्याला असणारे पोषक वातावरण, ह्यामुळे बर्याच उद्योजकांनी बिडी कारखाने चालवले होते. सिगारेटींचे एवढे प्रस्थ नव्हते; गावोगावी, चौकाचौकांत विड्याच फ़ुंकल्या जात. एकूणच विडी कारखान्यांना भरभराट होती, नफ्याचा उद्योग होता. काळ बदलला. विड्या ओढणे गावंढळपणा झाला. सिगारेटी ओढणे ‘फॅशन’ म्हणवू लागली.

आता गावागावांत, चौकाचौकांत तरुण पोरं सिगारेटी ओढत ‘स्टाईल’ मारु लागली. विड्यांची विक्री दिवसेंदिवस मंदावत होती. नक्षलवाद्यांच्या वाढत्या त्रासामुळे जंगलातून तेंदूपत्ता आणणे जिकीरीचे होऊ लागले. तेंदूपत्ता महाग झाला. विडी कारखान्यांना ओहोटी लागली. गावोगावचे छोटे कारखाने बंद पडले. मोठे कारखाने कसेबसे तग धरून होते, पण बरेचसे नतमस्तक झाले. असाच एक विडी कारखाना एका छोट्याशा गावात टिकण्याची धडपड करत होता.

पण घर फिरले की घराचे वासेही फिरतात. जेमतेम टिकून असलेल्या या कारखान्याला एके दिवशी आगीने कवेत घेतले.( गावात अजूनही लोक कुजबुजतात की, आग मालकानेच लावली आणि विम्याची रक्कम खिशात घातली. ) कारखाना सार्या मुद्देमालासकट भस्मसात झाला.

मातीच्या भिंती आणि वरचे कौलारू छप्पर तेवढे टिकून राहिले. आग विझवण्याच्या प्रयत्नात दोन कामगार मात्र बळी पडले. कारखान्याच्या कंपाउंडबाहेर कामगारांसाठी मालकाने २०-२१ घरांची एक वसाहत बनवली होती.

कारखाना बंद झाल्यावर ती कुटुंबं नव्या रोजगाराच्या शोधात इतरत्र पांगली. मालकाने चाळ भाड्याने चढवली. गावात बदली होऊन येणार्या नोकरदार वर्गासाठी ती चाळ सोयीची होती. कारखान्याच्या भव्य लोखंडी फाटकाला मोठे कुलुप चढवून आणि गावातला आपला बंगला विकून मालक शहरात रहायला गेला. वर्षामागून वर्षे गेली. जळक्या भिंती आणि फुटक्या कौलांचे छप्पर घेऊन कारखाना एकाकी उभा होता. आवारातल्या सुंदर बागेचे रुपांतर रानात झाले. लोखंडी फाटकाला गंज चढला. चाळीला कारखान्यापासून वेगळी करणारी कंपाउंड मोडकळीस आली.

अशा इमारतींसोबत भुतांच्या गोष्टी जोडल्या गेल्या नाहीत तरच नवल. आगीत बळी गेलेल्या त्या दोन कामगारांचा भूत म्हणून पुनर्जन्म झाला होता. कारखान्यासोबत अनेक भूतकथा जोडल्या गेल्या. चाळीत एखादे नवे कुटुंब रहायला आले की, त्यांना ह्या कथा सांगून खबरदार केले जाई. मुलाने जास्त मस्ती केली की, त्याला कारखान्यातल्या भुतांचे भय दाखवले जाई. ‘अभ्यास कर नाहीतर कारखान्यात नेऊन सोडेन’ म्हणण्याचा अवकाश , मुलगा लगेच अभ्यासाला बसे!

एके दिवशी चाळीत नवे कुटुंब रहायला आले. नवरा-बायको आणि दोन मुले असे छोटेखानी कुटुंब होते. घरप्रमुखाची बॅंकेची फिरतीची नोकरी, २-३ वर्षांत बदली व्हायची. शेजारी आले, विचारपूस केली, गावाबद्दलची माहिती दिली आणि शेजारधर्म पाळत कारखान्याचीही सविस्तर माहिती दिली. हळूहळु ते कुटुंब चाळीत, गावात चांगलेच रुळले.

जवळच असलेल्या शाळेत मुले जाऊ लागली. शेंडेफळ थोडे उनाड होते. त्याचे नाव पंकज,एकदा तो कंपाउंडवरून उडी मारून कारखान्यात जाण्याचा प्रयत्न करू लागला. आईने पाहिले आणि त्याला ओढतच परत आणले. अर्थात उनाडक्या करणार्या मुलाला वठणीवर कसे आणायचे हे सर्वच आयांना ठाऊक असते. आईने त्याला तिखट-मीठ लावून कारखान्यातल्या भुतांच्या गोष्टी सांगितल्या. खरे तर तिचा भुतांवर विश्वास नव्हता, पण ह्याने पुन्हा पुन्हा कारखान्याकडे जाऊ नये हा त्यामागचा हेतू होता. बर्याच वर्षांपासून बंद असलेल्या कारखान्यात साप-विंचवांचा धोका होता. रान माजले होते. अशा जागी ती माउली आपल्या लेकराला कसे जाऊ देईल?

पंकजने आईवर विश्वास ठेवला. मनात कुठेतरी भूत घर करून बसले. आता संध्याकाळी संधीप्रकाशात, रातकिड्यांच्या किर्र-किर्र आवाजात कारखान्याकडे लक्ष गेले की, त्याच्या उरात धडकी भरायची. कंपाउंडवरून उडी मारण्याचा विचार मन त्याच्या स्वप्नातही आला नाही. वर्गात पंकजचा एक चांगला मित्र बनला होता, अमोल.

अमोल चुणचुणीत आणि हुशार मुलगा होता. दोघांची चांगलीच गट्टी जमली. दोघे एकाच बाकावर बसायचे, एकत्र डबे खायचे आणि खेळायचे. शाळेमागे थोडे अंतर चालत गेले की शेतातून तळ्याकडे जाणारी एक पायवाट होती. तिथे एक मोठे चिंचेचे झाड होते. दूर कारखान्याची मागची बाजू दिसायची. लांबच लांब काळपट लाल भिंत आणि थोड्या-थोड्या अंतराने असलेल्या लोखंडी गजाच्या मोठ्या खिडक्या.

बरेचदा दोघेही सुटीत त्या झाडाखाली येऊन बसत. हे त्या दोघांचे छोटेसे विश्व होते. निवांत बसून गप्पा मारायची जागा होती. इथे वर्गातला, पटांगणावरचा गोंधळ नव्ह्ता. होता तो पक्ष्यांचा मंजुळ ध्वनी आणि कुठुनतरी येणारा बैलांच्या गळ्यातल्या घंटांचा किणकिण स्वर. वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारायची ती हक्काची जागा होती.

त्या दिवशी दोघे असेच गप्पा मारत चिंचेखाली बसले होते. अचानक त्या कारखान्याकडे लक्ष जाऊन पंकज
बोलला, “तुले का वाटते बे, अम्या, कारखान्यात भूत असल?”

“ह्या ss !! काहीच का बे ! आपन अश्या फाल्तू गोष्टीवर विश्वास नाही ठेवत. “”अबे, पर सबच जन तं म्हनतंत?”   “सबच जन म्हनतत म्हनून का झाला, खरा थोडीच असल. मले भुतावर विश्वास नाही. दिसला तं मानीन. आमच्या बाजूच्या घरात अमरभाऊ रायते. तो सांगते का, तो कारखान्यात गेल्ता तं त्याले भूत नाही दिसला. तो म्हन्ते का भूत नाय आहे. आपला भरोसा आहे त्याच्यावर. एकदम डेरिंगबाज मानूस आहे तो.”

“हव?”

“नाइ तं का. खोटा थोडीच सांगून रायलो. आता मले सांग, लोक म्हन्तेत का चिचेच्या झाडावर देवाल रायते. आता आपन तं रोजच या झाडाखाली बसतो का नाही? कधी कधी सायंकाळी सात वाजेवरी बसून रायलो, पर तुले दिसली आहे? कधी का आपल्या आंगावर चढली ? नाही नं ? असती तं दिसली नसती का ?” अमोल विजयी मुद्रेत पंकजकडे पाहत बोलला.

पंकजला उगीच ओशाळल्यासारखे झाले. ह्या वयात मुलांची मानस्थिक स्थिती विचित्र असते. एखादा मित्र आपण जे करू शकत नाही ते करत आहे म्हणजे काहीतरी अचाट पराक्रम करत आहे असे वाटत असते. घरची बंधने आणि आपल्या मित्राच्या व्यक्तिमत्वाचे आकर्षण अशा कात्रीच तो सापडतो. मित्रासमोर आपली प्रतिमा भागुबाईची होऊ नये असे त्यांना वाटत असते. मग तो मनातली भीती लपवतो, सारवासारव करण्याचा प्रयत्न करतो. आपण अगदीच बावळट नाही हे दाखवण्याची धडपड सुरू होते. पंकजने तेच केले.

“आपन बी भुताले काही भेवत नाही, पर विश्वास ठेवाले का जाते ? जगात चांगला आहे तं वाईट बी असलच. देव आहे तं भूत बी असलच!”

“तू ठेव विश्वास, आपन नाही ठेवत.”

“अनं तुले का वाटते, त्या कारखान्यातल्या विहीरीत पाह्यला तं मानूस साप बन्ते अनं तिच्यात पडते, खरा असल ?”

“तुले कोनं सागंलन?”

“नाही…..असाच इखनाल-तिखनाल ऐकलाओ…” खरे तर त्याला ही गोष्ट त्याच्या आईनेच सांगितली होती, पण अजूनही आपण आईने सांगितलेल्या गोष्टींवर पटकन विश्वास ठेवतो, हे अमोलसमोर स्वीकार करायची त्याला लाज वाटली. तो पुन्हा आपले हसे उडवेल अशी भीती होतीच.

“ते सब झूट आहे बे पक्या. असा कधी होऊ शकते का? वाटल्यास तूच त्या विहीरीत डोकावून पाह्य.” खरे तर तेव्हा पंकज” नाही भाऊ, मी कायले रिस्क घेऊ? ” म्हणणार होता , पण स्वतःला सावरून तो म्हणाला, “हव बे, जाऊन पाहावा लागल एखाद-दिवशी. “

” अबे, उद्याच जाउन जा. “

” हव.”

घंटा झाली. दोघे उठले आणि वर्गाकडे जायला निघाले. वर्गात पंकजच्या डोक्यात तोच विषय घॊळत
होता आणि शाळा सुटल्यावर घरी जातांनाही त्याच्या डोक्यातून कारखान्यातले भूत काही जात
नव्हते. रात्री झोपतांना पडल्यापडल्या त्याने विचार केला की एकदा खरंच कारखान्यात जायला हवे. भूत खरंच आहे की नाही बघायला हवे. त्याचे विचारचक्र सुरू झाले.

” मी जाईन, पूरा कारखाना फ़िरीन. भूत आहे का नाही पाहून येईन. पर विहीरीत नाही पाहीन. समजा विहीरीत पाह्यलो अनं साप होऊन विहीरीत पडलो तं ? बाहेर कसा येईन ? बाहेर आल्यावर आईले का सांगीन ? पर सापाच्या रुपात आई मले ओळखल का ? अनं बाहेर येताच नाही आला तं ? मंग तं आई परेशान होऊन जाईल. अनं मी साप बनून का करीन ? शाळेत कसा जाईन ? छी… भेपका अनं उंदरं खावा लागल. यक्क थू ! नाही, आपन विहीरीत नाही पाहावाचा. पर कारखान्यात जाईन. भूत दिसलाच तं त्याले ‘अगा मामा, अगा दादा ‘ करून पटवीन म्हंजे तो मले सोडून टाकल. काही नाही करल. उद्याच जाऊ का ? हव, उद्याच जातो.. नाही, नाही… उद्या नाही, मंग कई आरामात जाईन.” असा सगळा विचार करत त्याला कधी झोप लागली हे कळलेच नाही.

दुसर्या दिवशी वर्गात अमोलने त्याला विचारलेच, “का पक्या ? का म्हनतेस ? जाशील का बे कारखान्यात ?”

“हव जाईन नं बे. कावून नाही जाईन? मी घाबरतो थोडीच!”

आता जायचे तरा ठरवले आहे, तसे अमोलला सांगितले पण, पण जायचे कधी हा प्रश्न पंकजच्या मनात होता. पुढचे एक-दोन दिवस अमोल त्याला ‘कधी? विचारायला आणि हा ‘लवकरच’ असे उत्तर द्यायचा. हळूहळू गप्पांमध्ये नवे विषय आले आणि हा विषय मागे पडला. पण कारखाना तर रोजच पंकजच्या नजरेस पडायचा. त्यामुळे हा विषय त्याच्या डोक्यातून तरी जात नव्हता. ‘ कधीतरी आपन कारखान्यात जाउन पाहायचे’ अशी त्याने मनाशी खूणगाठ बांधली असली तरी तो दिवस काही उजाडत नव्हता. त्यांच्या ह्या चर्चेला सुद्धा आता वर्ष होत आले होते. एके दिवस त्याच्या आईला सामानाची आवराआवर करतांना पाहिले.

हे दृश्य त्याच्या ओळखीचे होते. बाबांची पुन्हा बदली झाल्याचे त्याच्या लक्षात आले, त्याने आईने विचारता उत्तर आले की या रविवारी निघायचे आहे. त्याला कारखान्यातल्य़ा भूताबद्दल केलेला निश्चय आठवला. म्हणजे त्याच्या हाती फक्त ४ दिवस होते. मनाचा हिय्या करून कारखान्यात भूताच्या शोधात जायचे आणि ह्या प्रकरणाचा निकाल लावायचा असे त्याने ठरवले.

मनाची तयारी करण्यातच पुढचे दोन दिवस गेले. शुक्रवारी शाळेत जाताना शाळेतून परतून कारखान्यात जायचे असे त्याने ठरवले. मात्र त्य़ाने ही गोष्ट अजून अमोलला सांगितली नव्ह्ती. आपण अजूनपर्यंत कारखान्यात गेलेलो नाहीहे त्याला कळले तर तो आपली उडवेल, असे त्याला वाटले. त्यापेक्षा उद्या शाळेत आपण सांगायचे असा त्याने विचार केला. शुक्रवारी शाळेतून तो लगबगीने परतला. हिवाळ्याचे दिवस होते. अंधार लवकर पडतो तेव्हा घाई करणे गरजेचे होते. त्याने कपडे बदलले आणि आईचे लक्ष नाही हे बघून तो कंपाऊंडकडे गेला. विटांच्या भिंतीत असलेल्या खाचांमध्ये पाय रोवत तो भिंतीवर चढला. भिंतीवरून त्याने कारखान्यावर नजर फ़िरवली. हिवाळ्याचे दिवस, संध्य़ाकाळचे पाच वाजले असावेत. प्रकाश मंदावला होता.

बागेतली बेछूट वाढलेली झाडे, तण , झुडूप आणि तो पडका कारखाना. सारेच दृश्य मनात भीती निर्माण करणारे होते. तो भिंतीवरून खाली उडी मारणार तेवढ्यात त्याचे लक्ष झाडीत दडलेल्या विहीरीकडे गेले आणि काळजाचा ठोका चुकला. पण आता माघार घ्यायची नाही असे त्याने ठरवले होते.

“जय बजंरग बली, तोड़ दे दुश्मन की नली ” म्हणत त्याने भिंतीवरून उडी मारली. मनात ” भूत पिशाच निकट नहीं आवें….” सुरू झाले होते आणि तो सगळीकडे भिरभिरती नजर ठेवत एक-एक पाऊल टाकत होता. अचानक चर्र.. असा आवाज झाला आणि त्याने भिंतीकडे धूम ठोकली. पण, भिंतीवर चढतांना त्याने मागे वळून पाहिले, तेव्हा त्याच्या लक्षात आले की तो पाचोळ्यावर पाय पडल्याचा आवाज होता. ” ह्या ss आपन बिनफ़ुकट घाबरलो,

“त्याने मनात म्हटले. तो परत वळला आणि आता सरळ कारखान्याकडे जाऊ लागला. पण वारंवार त्याचे लक्ष त्या विहीरीकडे जात होते. कोण जाणे, पण त्या विहीरीत एक विचित्र आकर्षण होते. पण आपण विहीरीत डोकावलो तर विहीर आपल्याला साप बनवून आत ओढेल आणि साप बनलो तर मग आई काय म्हणेल हा विचार त्याच्या डोक्यात यायचा आणि तो विहीरीकडे जाणे टाळायचा.
आता तो कारखान्याच्या अगदी समोर उभा होता. त्याच्या डोळ्यासमोर पोपडे उडालेल्या जळक्या काळपट भिंती होत्या. सगळीकडे कोळ्याच्या जाळ्यांचे साम्राज्य होते आणि खाली फ़रशी पाल्यापाचोळ्याने झाकली गेली होती. तो कारखान्यात शिरला.

दोन्ही बाजूंना छोट्या छोट्या खोल्या होत्या. तो त्या खोल्यांत शिरला. फ़ुटक्या कौलांतून प्रकाश अंधार दूर सारत होता. तो एकेका खोलीत जाऊन फ़ेरी मारून यायचा. अजून त्याला भूत दिसले नव्हते. आता त्याची भीती बरीच कमी झाली. तो शेवटच्या खोलीत शिरला.लांबच लांब खोली होती. थोड्या- थॊड्या अंतरावर लोखंडी गजांच्या अनेक मोठ्या खिडक्या होत्या. हे कदाचित गोदाम असावे, असा त्याने अंदाज बांधला आणि तो खरादेखील होता. ते गोदाम होते. चिंचेच्या झाडाखालून आपल्याला हीच खोली दिसले हेदेखील त्याच्या लक्षात आले. त्याने चौफ़ेर नजर फ़िरवली. खाली फ़ुटक्या कौलांचा खच होता, पालापाचोळा, कोळीष्टके होतीच. तो खिडकीबाहेरून कसे दृश्य दिसते हे बघायला खिडकीपाशी गेला.

चिंचेच्या झाडाखाली त्याला एक आकृती दिसली. अंधूक प्रकाशात चेहरा नीट दिसत नसला कपड्यांवरून आणि एकंदर शरीरयष्टीवरून हा अमोलच असल्याचे त्याच्या लक्षात आले. अमोल कधीकधी शाळा सुटल्यावरदेखील चिंचेच्याझाडाखाली बसून चिंतन का मनन, अमोलच्याच भाषेत, “विचार करतो विश्वाचा” वगैरे अलाना- फलाना करत असतो हे त्याला माहीत होते.

अचानक पंकजच्या मनात एक विचार आला…

“समजा आपन अमोलले उद्या सांगितला की कारखान्यात जाऊन आलो तरी त्याचा विश्वास बसन्याची शक्यता कमीच राह्यल. आज तो आपल्या डोळ्यानं पाह्यल तं त्याचा विश्वास पन बसून जायल.”
आणि तो खिडकीपाशी जाऊन अमोलला हातवारे करू लागला. मोठ्याने हाका मारू लागला. पण अमोलचे काही लक्ष जाईना. एव्हाना अंधारू लागले होते. कदाचित ह्यामुळे असेल, असे वाटून तो अधिकच मोठमोठ्याने हातवारे करू लागला. खिडकीतून हात बाहेर करून आपल्याकडे बोलवू लागला. पण अमोल खाली मान घालून कुठल्या विश्वात गुंग झाला होता देव जाणे.

तो जणू तिथेच थिजला होता, काहीच प्रतिसाद देत नव्हता. शेवटी कंटाळून पंकजने तो प्रयत्न सोडला आणि खिडकीतून परत वळला. मग त्याने उग्गाच खेळ म्हणून खोलीच्या ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत उड्या मारत धाव घेतली. मग पुन्हा एकदा प्रयत्न करावा म्हणून खिडकीपाशी गेला तर अमोल तिथे नव्ह्ता. तो घरी परतला असावा. इकडे कारखान्यात पंकजची भिड पुरती चेपली होती. तो आता कारखान्यात ” अगा भूत भाऊ, भूत काका, भूत मामा, सामोर ये गा ..” असे मोठ्याने ओरडत हिंडत होता.

तो आता कारखान्यातून बाहेर पडला.त्याचे लक्ष पुन्हा विहीरीकडे गेले.

‘आता भुताची कहानी खोटी आहे म्हंजे सापाची पन खोटीच असल..’ त्याने विचार केला. तो हळूहळु विहीरीकडे जाऊ लागला. पण त्याच्या डोक्यात पुन्हा विचार आला,

‘अनं सापाची गोष्ट खरी राह्यली तं ? मंग त मी साप बनून जाईन. मग आई का म्हनल ? भुताले तं पटवता पन येउन जायल, पर सापाचा मानूस कसा बनीन ?’ आणि तो परत विहीपासून दूर झाला.

‘कारखान्यात भूत नाही आहे इतका माहीत झाला तोच बहोत आहे, आता जास्ती मस्ती नाही करावले पाइजे.’ असा विचार करत तो कंपाउंडपाशी आला आणि भिंतीवर चढला. एव्हाना चांगलेच अंधारले होते, पण तो आता अंधाराला घाबरत नव्हता. त्याने पुन्हा एकदा कारखान्यावर नजर फ़िरवली आणि अगदी आनंदाने खाली उतरला. घराकडे परत जातांना त्याला खूप हलके वाटत होते. एक ओझे उतरले होते. कारखान्यात भूत नाही हे त्याला कळले होते. उद्या अमोलला हे सारे सांगायचे हे ठरवले. आज त्याला अतिशय शांत झोप आली.

दुसर्या दिवशी शनिवार, सकाळची शाळा, पण पंकजला जाग आली नाही. आईनेही त्याला धपाटे घालून उठवले नाही. जेव्हा जाग आली , तेव्हा सकाळचे १० वाजले होते. त्याची शाळा सुटली होती. त्याने आईला विचारले तर तिने सांगितले की, आपण आजच जात आहोत. म्हणून तुला उठवले नाही. काल अचानक जाण्याचा दिवस बदलला. तुझ्या शाळेचे सगळे काम झालेच आहे. तिने त्याला पटकन आवरून तयार व्हायला सांगितले.

तो अमोलला भेटू शकत नव्हता. भूत नाही हे त्याचे म्हणणे पटले आहे हे सांगू शकत नव्हता. अमोलने त्याच्या जीवनात किती मोठे स्थान बनवले आहे हे सांगू शकत नव्हता. आणि शेवटचे चिंचेच्या झाडाखाली बसून पोटभर गप्पा करू शकतनव्हता. एक गळाभेट पण घ्यायची होती.

“आई, मी शाळेत जाऊन येऊ ५ मिनिट?” त्याने विचारले.

” अरे, आता कसा जाशील? वर्ग चालू असतील आणि आपली सगळी तयारी झाली आहे. गाडी बाहेर वाट बघत आहे. आवर पटकन.” उगाच त्याच्या मनावर मळभ दाटले. गाडीत बसून जातांना इथली ३ वर्षें डोळ्यांसमोर येऊ लागली; आणि कारखान्यातले चित्र तर वारंवार डोळ्यांपुढे यायचे. कालचा दिवस त्याच्या आयुष्यातला महत्त्वाचा दिवस होता. मनातल्या मनात तो म्हणाला,
“अम्या, दोस्ता, तू सही होतास. आपला आता बिल्कुल विश्वास बसला आहे. भूत नावाची गोष्ट या जगात
रायतच नाही…… “


आज अमोल शाळेत अंमळ लवकरच आला. वर्गात त्याची नजर भिरभिरली. मग तो आपल्या जागी जाऊन बसला. पण त्याची सारखी चुळबुळ सुरु होती. प्रार्थना संपली, वर्ग सुरु झाले तरी त्याच्या बाजूची जागा रिकामीच होती. पंकज आला नव्हता. त्याने पंकजच्याच चाळीत राहणारा मित्र संक्याला विचारले, त्याने सांगितले की, ते लोक आजच जाणार होते, गेले असतील.

“पन तो तं उद्या जानार होता?”

“हव, पन काल रात्री त्याची आई माझ्या आईले भेटाले आली होती तं माहीत झाला का ते आजच चाल्ले म्हनून.”

“हट बे यार… त्याले एक मोठी गोष्ट सांगावाची होती बे.. कालचा दिवस जबरदस्त होता बे.. ‘पक्या’, दोस्ता, तू सही होतास, आपला आता बिल्कुल विश्वास बसला आहे, या जगात भुत राहायतात.”, अमोल.
“का बे असा काऊन बोलून राहिला, काय बगीतला का काय”, संक्या.

“हौ… काल सांच्याला गेलो होतो कारखान्याच्या मागच्या मैदानात, चिचाच्या झाडाखाली बसला हुतो. सज नजर गेली ना बे कारखान्यावर आणि बगतो त काय”, अमोल डोळे विस्फारून बोलत होता. थोडी धापहि लागत होती.

“का सांगत बे.. पुढे काय”, संक्या तोंडाचा आ वासून ऐकत होता.

“संक्या, कारखान्यात कोणतरी होत बे, मले हातवारे करून दाखवत होत, बोलावत होत, उड्या मारत इकडून तिकडे पळत होत…का सांगू बे अंगावर ह्यो काटा आले, हातपाय गार पडल, तसाच पळत सुटल आणि घरला गेल.”, अमोल शहारून गेला होता.

तर मित्रांनो अशी हि कारखान्यातल्या भुताची कथा. घडलेली एक घटना दोन मुलांच्या मनावर भिन्न परिणाम करणारी.

कथा कशी वाटली नक्की कळवा.

बांधाकडचा रस्ता

मी मामाच्या गावाला दर वर्षी प्रमाणे दिवाळी साजरी करायला गेलो होतो. खेडेगाव असल्यामुळे तिथे अंधार पडायला लागला की लगेच शुकशुकाट व्हायचा. मी आणि माझ्या मामाची दोन मुलं असे आम्ही तिघे जण बाहेर खाट टाकून मस्त गप्पा करत बसायचो. बहुतेक गप्पांचा विषय असायचा भुटाखेतांच्या गोष्टी. त्या रात्री ही जेवण वैगरे आटोपून आम्ही गप्पा करत बसलो होतो. मामा ही जागा होता. आमच्या गोष्टी ऐकुन तो बाहेर आला आणि म्हणाला तुम्हाला मी आज एक खरी गोष्ट सांगतो तुमच्या आजोबांबरोबर घडलेली. तसे आम्ही तिघेही उत्सुकतेने ऐकू लागलो आणि त्याने गोष्ट सांगायला सुरुवात केली.

साधारण १९८२ चा काळ असावा. तेव्हा मी अगदी लहान होतो. तुमचे आजोबा म्हणजे माझे बाबा त्याचं गावात शिक्षक होते आणि त्याच बरोबर शेती सुद्धा करायचे. दिसायला अगदी रुबाबदार आणि शरीरयष्टी ही अगदी भक्कम होती. भूत वैगरे असल्या गोष्टी ते कधीच मनात नसतं. त्यामुळे अगदी बिनधास्त रात्री एकटे शेताला पाणी द्यायला जातं. रात्री १०.३०-११ च्या सुमाराला रोज जाऊन शेताला पाणी देऊन यायचे.

तर कधी अधून मधून वाटले तर तिथेच झोपुनही जायचे. आमचे शेत तेव्हा गावाच्या वेशीबाहेर होते. आमच्या शेताला लागून च दुसऱ्या गावाचा फाटा होता. तिथून दुसरे गाव ५-६ किलोमीटर वर असेल. रस्ता अगदी सरळ होता आणि रस्त्याकडे ला एकही विजेचा खांब नाही त्यामुळे तो रस्ता अतिशय भयाण वाटायचा. अंधार पडल्यावर तर अगदी निर्मनुष्य व्हायचा.

घरी त्या काळी ही मोटार होती पण बाबा चालतच जायचे. रोज जेवण आटोपल्यावर तासाभराने तोंडात तंबाखू असायचा आणि हातात बॅटरी घेऊन शेतात जायला निघायचे. त्या रात्री ही ते जायला निघाले तसे मी त्यांना विचारले “बाबा मी पण येऊ का मला उद्या सुट्टी “आहे”.

त्यांनी माझ्याकडे पाहून नकारार्थी मान हलवली. मी पुन्हा म्हणालो “अहो बाबा येऊ द्या ना” तसे ते चिडले आणि “नाही” इतकेच म्हणाले. त्यांचा एक शब्द माझ्यासाठी पुरेसा होता. मग मी तरी काय करणार, गाव गुमान गोधडी घेऊन आईच्या बाजूला जाऊन झोपलो. त्यांनी नेहमी प्रमाणे दरवाज्याला बाहेरून कुलूप लावले आणि शेतावर जायला निघाले.

बॅटरी घेऊन तिच्या उजेडात वाट काढत ते काही मिनिटात शेतावर येऊन पोहोचले. जाताना एक नजर त्या अंधाऱ्या रस्त्यावर गेली. तो आजही निर्मनुष्य होता अगदी भयाण. शेताच्या बांधावरून ते आत शिरले. नेहमी प्रमाणे बॅटरी
जवळच्या खांबावर ठेऊन मोटार सुरू केली आणि बाजूच्या बाकावर पाठ टेकवून थोड्यावेळ पडले. थंडी चे दिवस असल्यामुळे गार वारा सुटला होता. त्या मंद वाऱ्याने त्यांचा डोळा लागला. बऱ्याच वेळा नंतर जाग आली. त्यांनी हातातल्या घड्याळात पाहिले तर दीड वाजून गेला होता. त्यांनी लगेच उठून मोटार बंद केली आणि पुन्हा एक तंबाखूची पुडी उघडून तोंडात टाकून बॅटरी हातात धरून घराच्या वाटेला लागले.

बांधावरून निघताच त्यांना कसलीशी चाहूल जाणवली. तसे त्यांनी दूरवर नजर टाकली आणि त्यांना विडीचा चटका चमकताना दिसला. तसे मनातच म्हणाले “चला गावात जायला कोणाची तरी साथ मिळाली”. तसे ते थोडे हळू चालू लागले. तितक्यात त्यांना मागून हाक ऐकू आली “दादा थांबा.. ओह दादा”. त्यांनी मागे वळून बॅटरी त्या दिशेला वळवली तसे त्यांना एक व्यक्ती हातात विडी घेऊन त्यांच्या दिशेने येताना दिसला. बाबा त्याच्या येण्याची वाट बघत तिथेच थांबले होते. तो व्यक्ती ही मस्त विडी ओढत, त्याचा धूर सोडत अगदी आरामात चालत येत होता.


मुडदा घर 

साधारण चाळीस वर्षापूर्वीची गोष्ट. तेव्हा आमचे डॉक्टर काका मिरजच्या मेडिकल कॉलेज मध्ये शिकत होते. मेडिकल कॉलेज तसे बरेच जुने आणि सरकारी. इस्पितळात एक मुडदा घर होते. त्या मुडदा घराबद्दल बरेच प्रवाद ऐकिवात होते. कोणी म्हणे तेथे रात्री आत्मे फिरतात. रात्री बारा नंतर तेथे रडण्याचे, ओरडण्याचे आणि इतर विचित्र आवाज येत असतात. एका वार्ड बॉयला येथे रात्रपाळी करीत असताना महिलेचा रडण्याचा आवाज आला. खिडकीतून वाकून बघतले असता एक जळलेली स्त्री तिच्या पलंगावर उठून बसलेली त्याला दिसली. ते पाहून तो तेथून पळत सुटला ते परत आलाच नाही.

त्यांच्या कॉलेज मध्ये एक मुलांचा ग्रुप होता. एकदा रात्री गप्पा मारता मारता पैज लागली. जो कोणी मुडदा घरात रात्री बारा नंतर एक तास थांबून परत येईल त्याला हजार रुपये. सात आठ जणांच्या त्या ग्रुप मधल्या एका मुलाने ती पैज स्वीकारली. विराज असे त्या मुलाचे नाव होते.

दुसऱ्या दिवशीच्या रात्री सर्व तयारी झाली. मुडदा घराबाहेररील दरवानाला थोडे फार पैसे आणि दारूची एक बाटली देऊन तेथून कटवण्यात आले. रात्री ठीक बाराच्या सुमारास विराज तयार झाला. मुडदा घराचे कुलूप उघडले आणि तो आत शिरला. दार मागे लोटून दिले तसे बाहेरच्या मुलांनी टाळा परत लावून दार बंद करून घेतले.

मुडदा घरात भयाण शांतता पसरली होती. खिडक्यांमधून अंधुक प्रकाश मुडदा घरात पसरला होता. पहिली पाच मिनिटे विराज दरवाजा जवळील भिंतीला टेकून फक्त समोर बघत होता. काही वेळ गेल्यावर तो खाली बसला. धीटपणा असला तरी भीती मनात हळू हळू दाटत होती.

रात्री बाराचा सुमार आणि भयाण अशा काळोखात मुडदा घरात आपण एकटेच या विचारांनी विराज थोडा अस्वस्थ होऊ लागला होता. वीस मिनिटे उलटली होती. विराज तसाच बसून होता. डोळे टक्क उघडे होते. मुडदा घरात स्थब्ध वातावरण होते. विराजच्या समोर ओळीने पलंग होते आणि त्यावर ठेवेलेले मुडदे. विराज हळू हळू एक एक करून सर्व प्रेतांवरून त्याची नजर फिरवीत होता. निचेतन होऊन पडलेल्या त्या मृत शरीरांसोबत एका बंद खोलीत आपण एकटे बसलो आहोत हि जाणीवच हृदय गोठवणारी आहे. एक क्षण विराजला हि पैज स्वीकारल्याबद्दल पश्चाताप हि झाला.

मुडदा घराची शेवटची खिडकी उघडी होती तेथून प्रकाशाचा झोत सरळ एका प्रेतावर पडत होता. विराजची नजर त्या प्रेतावर पडली. का कुणास ठाऊक पण विराजला अंधुकशी हालचाल त्या पलंगावर जाणवली. विराजच्या अंगातून भीतीची लहर सळसळ करीत थेट मेंदूत घुसली. विराज उठून उभा राहिला. भीतीने त्याच्या मानेवरचे केस ताठ झाले होते.

आणि अचानक…

शेवटच्या पलंगावरची हालचाल आता स्पष्ट विराजला दिसू लागली. हळू हळू ते प्रेत त्याच्या जागेवर उठून बसू लागले होते. अंगावरची पांढरी चादर तशीच त्या प्रेतावर पसरली होती. विराजच्या हृदयाचे ठोके वाढू लागले. ओरडण्यासाठी त्याने आ वासला पण घशातून आवाज बाहेर पडत नव्हता. ते प्रेत आता कमरेतून सरळ होत पलंगावर उठून बसले होते. डोक्यावरून चादर हळू हळू खाली सरकत होती. एक भयंकर किंकाळी फोडत विराज दरवाज्यावर हात आपटू लागला.

बाहेरच्या मुलांनी गडबडीने टाळा खोलत विराजला बाहेर काढले. बाहेर आल्या आल्या विराज पळत सुटला. ओरडत किंचाळत तो इस्पितळाच्या बाहेर गेला. काही मुले त्याच्या मागे धावली तर काही मुले फिदीफिदी हसत होती.

विराज पैज हारला अशी चर्चा करीत मुले उभे होते. आतून त्यांचा मित्र सुखराम मुडदा म्हणून पलंगावर झोपणार होता त्याची वाट बघत…

बराच वेळ झाला सुखराम आतून बाहेर आला नव्हता तेव्हा मुले मुडदा घरात गेले. सुखराम चौथ्या पलंगावर चादर ओढून पडला होता. त्याला मुलांनी उठवला आणि बाहेर घेऊन आले.

मुलांनी मुडदा घराला टाळा लावून तेथून निघून गेले. सुखरामला आत काय काय घडले ते विचारण्यात आले तेव्हा त्याला कोणत्याच घटनेची पुसटशीही कल्पना नव्हती असे कळाले. विराज चे मुडदा घरात येणे, ओरडत किंचाळत बाहेर जाणे काहीच नाही. सुखराम जेव्हा मुडदा घरात जाऊन पलंगावर झोपला तेव्हा काही क्षणातच त्याला भयंकर थंडी वाजू लागली आणि काही कळायच्या आताच तो तेथे बेशुद्ध होऊन पडला होता. हे ऐकून मुलांची बोबडी वळली.

सुखराम जर तेथे बेशुद्ध होऊन पडला होता तर त्या शेवटच्या पाचव्या पलंगावर कोण…?


त्या अमावस्येच्या रात्री

एका दिवशी मी मित्राच्या शॉप वर गेलो होतो. तिथून आमचा मस्तपैकी फिरायला जायचा प्लॅन होता. पावसाळ्याचे दिवस होते त्यामुळे एक लाँग ड्राईव्ह ला जायचे ठरले होते. रात्री जेवण वैगरे आटोपून मी मित्राच्या शॉप वर आलो आणि गप्पा मारत बसलो होतो. साधारण १० वाजत आले होते. पावसाने नुकताच विश्रांती घेतली होती. तितक्यात माझ्या मित्राला त्याच्या गर्लफ्रेंड चा कॉल आला.

ती त्याच्या दुकानापासून थोड्या अंतरावर असलेल्या एका हॉटेल मध्ये जेवायला आली होती. त्यामुळे तिने माझ्या मित्राला भेटायला बोलावले. तसे तो मला म्हणाला की “सागर मी १०-१५ मिनिटात जाऊन येतो आणि तिला भेटुन येतो. आल्यावर आपण दुकान बंद करून जाऊ लाँग ड्राईव्ह ला. मी ही त्याला ठीक आहे म्हंटले.

तो गेला आणि मुसळधार पाऊस सुरू झाला. आजूबाजूची दुकान कधीच बंद झाली होती. मी मात्र त्याच्या दुकानात बसून मान खाली मोबाईल मध्ये घालून निवांत यु ट्यूब वर व्हिडिओ पाहत बसलो होतो. तेवढ्यात एक आवाज कानावर पडला “दादा खूप पाऊस आहे मी इथे आडोशाला थोड्या वेळ बसू का?” तसे मी मान वर करून पाहिले. एक वयस्कर बाई मला विनंती करत होती. तसे मी त्यांना दुकानातील एक खुर्ची बसायला दिली. ती माझ्याकडे पाहतच त्या खुर्चीवर बसली आणि म्हणाली “तुम्ही नवीन दिसताय ते नेहमी असतात ते कुठे गेले?”. तसे मी म्हणालो “अहो आजी.. तो एका कामासाठी गेलाय मी त्याचा मित्र आहे सागर”.

“बरं पण अरे इतक्या रात्री का बसलाय इथे, आसपास ची सगळी दुकानही बंद झाली. आज अमावस्या आहे. लवकर घरी जायला पाहिजे..” आजी समजवायचा प्रयत्न करत होती. मी तिला म्हणालो “त्यात काय एवढे आजी.. मी नाही मनात अमावस्या वैगरे, आता मित्र आला की आम्ही जाणार आहोत फिरायला. तसे ती आजी एकदम चिडली आणि म्हणाली “कशाला जाता रात्री अपरात्री फिरायला, पोरा सारखा आहेस माझ्या म्हणून सांगतेय”. मी पुन्हा त्याच सुरात म्हणालो “काही नाही होत हो आजी, तुम्ही उगाच काळजी नका करू”,

माझे असे बोलणे ऐकून ती थोडी शांत झाली आणि मला पुन्हा समजावून सांगायचा प्रयत्न करू लागली “मी काय समजावणार बाळा तुला.. स्वतःच्या पोराला कधी समजावू शकले नाही.. त्याला ही असेच रात्री फिरायची सवय होती. एके रात्री तो २ मित्रांसोबत असाच फिरायला गेला, जाताना म्हणाला ‘चंद्रग्रहण पाहायचय’, त्या रात्री गेला तो परत आलाच नाही.” मी थोडे दचकून च विचारले “का काय झालं त्याला”. तसे ती म्हणाली “गेला तो.. पाय घसरला आणि खोल दरीत पडला.

माझ्या म्हातारपणी तोच आधार होता मला. त्याला खूप समजावले की नको जाऊस पण त्याने काही ऐकले नाही. आता मी कोणाकडे बघून जगायचे रे.. ज्या टेकडीवर ग्रहण पाहायला गेला होता ती खूप विचित्र जागा आहे. तिथे एक हडळ आहे, तरुण पोरांना आत ओढते. आज पर्यंत किती तरी पोर गिळली त्या हड ली ने. मी लहानपणापासून ऐकत आले होते पण जेव्हा माझ्या पोरा सोबत घडले तेव्हा मला कळले. “

मी म्हणालो “अहो आजी.. असे काही नसते, आपण माणसं अविचारी बागतो आणि दोष भूतांना. भूत, पिशाच्च, हडळ, आत्मा असले काही नसते हो, सगळे आपल्या मनाचे खेळ आहेत. तसे ती आजी हसतच म्हणाली “असते रे बाळा, हे सगळे असते.. तुला कधी जाणवले नसेल म्हणून म्हणतोस.. असू दे.. तुम्ही तरुण पोर कोणाचं ऐकणार पण बाळा खूप विश्वासान अगदी मुलासारखे समजून तुझ्याशी सगळे बोलले, हे दुसऱ्या कोणाला सांगू नकोस कारण ते मला अजिबात आवडणार नाही. तसे मी म्हणालो “नाही आजी.. नाही सांगणार कोणाला.. काळजी नका करू” एव्हाना पाऊस थांबला होता म्हणून ती आजी उठून निघून गेली.

मी मनातल्या मनात खुश झालो कारण मला माझ्या पुढच्या हॉरर कथे साठी विषय मिळाला होता.. चंद्र ग्रहण, हडळ आणि टेकडी. तितक्यात माझा मित्र तिथे आला तसे मी त्याला म्हणालो “अरे एक भारी आयडिया मिळाली आहे स्टोरी साठी तुझ्या दुकानात बसल्या बसल्या.” तेवढ्यात तो म्हणाला “अरे आपल्याला आजचा प्रोग्राम कॅन्सल करावा लागेल, माझ्या कॉलनी

मध्ये एक मयत झालेय, जवळची व्यक्ती आहे जावे लागेल. मी ही प्रसंगाचे गांभीर्य ओळखून “हरकत नाही” म्हणालो आणि तिथून थेट घरी आलो.

एका अर्थी लाँग ड्राईव्ह कॅन्सल होऊन बरेच झाले होते कारण त्यामुळे मला माझी स्टोरी लिहायला बराच वेळ मिळणार होता. मी वर माझ्या रूम मध्ये जाऊन बसलो. दार लावून घेतले आणि ट्युब लाईट बंद करून नेहमी प्रमाणे माझ्या डेस्क वर एक मेणबत्ती पेटवून ठेवली. हे थोडे विचित्र वाटेल तुम्हाला पण भी हॉरर स्टोरी लिहायला बसलो की मेणबत्तीच्या प्रकाशात लिहितो कारण तशी वातावरण निर्मिती झाली की लिहायला बरे पडते. मी स्टोरी लिहायला सुरुवात केली. नाव ही पटकन सुचले “एक मंतरलेली टेकडी”. जसे मी नाव लिहिले मला एक कर्णकर्कश किंचाळी ऐकू आली. मी दचकलो आणि धावतच खाली गेलो.

मला वाटले की माझी आई किंवा बहीण किंचाळली पण खाली गेलो तर सगळे शांत झोपले होते. मी खिडकी उपटून बाहेर नजर फिरवली पण तिथे ही कोणी नव्हते. तसे मी पुन्हा वर माझ्या रूम मध्ये आलो आणि समोर पाहतो तर काय.. माझ्या त्या बहीवर मेणबत्ती पटून कागदाने पेट घेतला होता. मी पटकन आग विझवली आणि पुन्हा दुसरा कोरा कागद घेऊन त्यावर लिहायला सुरुवात केली. का कोण जाणे पण मला सतत जाणवत होत की माझ्या रूम च्या खिडकी जवळ कोणी तरी आहे. मी नेहमी खिड़की उघडी ठेवतो पण त्या रात्री बारा पाऊस असल्यामुळे खिडकी बंद केली होती. मी लिहायला सुरुवात केली आणि अचानक खिडकीवर जोरात धाप पडली.

आता मात्र मी घाबरलो. कारण माझी रूम दुसऱ्या मजल्यावर आहे त्यामुळे इतक्या उंचावर कोणी पोहोचणे शक्य नाही. मी धीर एकवटून उठलो आणि दबक्या पावलांनी खिडकी जवळ आलो. भीतीने काळीज धडधडायला सुरुवात झाली होती. मी हळूच खिडकी उघडली आणि बाहेर नजर फिरवली. पण तिथे कोणीही नव्हते. मुसळधार पाऊस आणि वारा शुरू होताच. याच्यामुळे जोरात खिडकी आपटली असेल असा विचार करत मी खिडकी बंद करू लागलो पण खिडकीचे दार कुठे तरी अडकल्यासारखे वाटले. मी अगदी ताकदीनिशी ती बंद करण्याचा प्रयत्न करू लागलो पण असे वाटत होते की खिडकी बाहेरून कोणी तरी पकडली आहे आणि ती बाहेरच्या दिशेला खेचली जातेय.

तितक्यात अचानक माझ लक्ष गार्डन मध्ये गेले. तिथे एक आकृती उभी होती. इतक्या रात्री भर पावसात ती आकृती माझ्या दिशेने एकटक पाहत होती. जसे पहले तसे तिले नकारार्थी मान हलवली आणि अतिशय किळसवाण्या आवाजात किंचाळली. मी खाली सुटलो आणि वडिलांना उठवले. मी त्यांना म्हणालो की आपल्या गार्डन मध्ये कोणीतरी आहे. त्यांनी झटकन उठून बॅटरी घेतली आणि गार्डन मध्ये जाऊन पण त्यांना तिथे कोणीही दृष्टीस पडले नाही. त्यांनी मला ठीक दिसत नाहीये. तुला नको ते भास होत आहेत. आले. वर जाऊन झोप आता मी पुन्हा रूम मध्ये आलो आणि लिखाण तसेच अर्धवट ठेऊन अंथरुणात जाऊन पडलो. त्या रात्री मला खूप ताप भरला.

सकाळी जेव्हा जाग आली तेव्हा आई पाण्याच्या पाठेवत होती. ती म्हणाली काल रात्री तू तापाने फणत होताच खूप ताप भरना होता तुला दुसऱ्या दिवशी मी घराबाहेर पडलोच नाही. आराम करत होतो. माझा मित्र ज्याच्या बरोबर भी लॉग ड्राईव्ह ला जाणार होतो तो संध्याकाळी मला भेटायला आला. आई ने आम्हाला दोघांना भरत गरग चहा करून दिला. आम्ही दोघं माझ्या रूम मध्ये बोलत बसलो होतो. मी त्याला रात्री जे घडले ते सांगितले ऐकून त्याला ही थोडे विचित्र वाटले पण नंतर बोलता बोलता आम्ही विषय बदलला. मी त्याला विचारले की काल तुमच्या इथे कोण गेलं रेयताला गेला होतास तू?.

तसे तो म्हणाला ‘अरे एक आजी होती. ला
काही वर्षांपूर्वी गेला आणि तिला तिचे असे दुसरे
कोणीही नव्हते त्यामुळे एकटीच राहायची.
नक एक शंका येऊन गेली
तसे मी त्याला विचारले “तिचा मुलगा त्या
टेकडीवरच्या अपघातात गेलाय का?” मित्र

मामाकडे आायनि पाहून म्हणाला “हो.. पण तुला कसे माहीत?” तसे मी त्याला सांगू लागलो “काल तू गेल्यावर एक आजी आली होती शॉप वर तिनेच सांगितले मला त्याने पटकन मोबाईलकडला आणि त्या आजीचा फोटो मला दाखवला. मी फोटो पाहताच म्हणालो “अरे.. हीच आपल्या हाल, माझे बोलणे ऐकुल मित्र हसत म्हणाला “तुझा ताप तुझ्या डोक्यात गेलाय बहुतेक काय अभद्र बडबडतोय.. काल एक्सपायर झाल त्याचे बोलणे ऐकून मी काही क्षण अगदी शून्यात गेलो. माझा अश्या गोटीवर कधीही विश्वास नव्हता पण जे झाले ते नक्की काय होते? डोळ्यात प्राचं काहूर माजलं होत. मित्र काही वेळानंतर त्याच्या घरी निघून गेला. पण मी मात्र मला पडलेल्या असंख्य प्रांची उत्तरे शोधण्यात गुंग झालो होतो.

काल रात्री पासूनच्या सगळ्या गोष्टी आठवायला सुरुवात केली आणि हळू हळू मला घडलेल्या विचित्र प्रसंगाचा उलगडा होता गेला माझी खूप मोठी चूक झाली होती त्या आणी काल रात्री पुन्हा आल्या होत्या. त्यांच्या आत्म्याने माझ्याशी केलं आणि मला सांगून गेले होते की माझ दुःख कोणालाही सांगू नकोस. आणि मी काय केलं? मी त्याचीच कथा लिहून प्रदर्शित करणार होतो. तेच त्यांना नक होत त्यासाठीच अहवायला त्या आल्या होत्या बहुतेक भी खरंच चुकलो कथा लिहायला घेतलेले पान भी फाडून टाकले आणि पुन्हा त्या बद्दल काहीच लिहिणार नाही असे स्वतःच स्वतःला वचन दिले.

कसारा घाट

कसारा घाट हे स्थान नाशिकच्या हायवेस लागून आहे. या घाटाला झपाटलेला घाट असे म्हणून लोक ओळखतात. बऱ्याच अनुभवी लोकांच्या तक्रारी आणि त्यांचे कन्फेशन आल आहे कि तो घाट झपाटलेला आहे. बऱ्याचश्या लोकांनी तिथ अनैसर्गिक आणि
प्रेतात्म्याच्या असण्याची संमती दाखवली आहे. आणि बऱ्याच जणांनी तिथ आपल्या डोळ्यांनी पाहिले देखील आहे. त्या घाटातून जाणारा हायवे. आणि त्याच्या दोन्ही बाजूची ती गर्द झाडी त्या जागेला अजून भयानक दर्शवते. रात्रीच्या वेळीतर ते विचारनच नको
रात्रीच्या वेळी एकट्याने तो रस्ता क्रॉस करन म्हणजे मृत्यूला आमंत्रणच देन एक प्रकारे.

तिथ रात्र होताच एक सैतानी आत्मा कार्यक्षम होते. आणि त्यामूळच तिथ बरेच असे अपघात झाले आहेत. ज्याचं कारण अजून पण कळलेलं नाहीये. आजचा आपला हा एका वाचकाचा अनुभव आहे ज्यांनी आपल्या मित्रासमवेत ती जागा रात्रीच्या वेळी क्रॉस करण्याची चूक केली मी कनिश्क सादर करीत आहे. मी अविनाश कुरकुटे. मित्रहो हि घटना एक १९९८ आणि ९९ ची आहे मी आणि माझे काही मित्र मुंबईवरून नाशिकला माझ्या मित्राच्या लग्नासाठी यायला निघालो होतो लग्न तीन दिवसानंतर होते. आम्ही त्या आधीच निघालो होतो. आणि आमच नियोजन अस होत कि रात्र व्हायच्या आत लवकर निघायचं.

पण माझ्या काही आळशी मित्रामुळ आम्हाला निघायला रात्रीच्या ११ वाजल्या तेव्हा गाडी मी चालवत होतो काही एक दीड तास झाला आम्ही कल्याण क्रॉस केल होत आणि शहापूरला पोहोचलो होतो. एकूण १२:४५ पावणे एक वाजला होता तेव्हा आम्ही तिथेच एका ढाब्यावर थांबलो आणि आम्ही जेवण करून घेतल. आणि काही कोल्ड्रिंक्स सोबत घेतल्या रस्त्यामध्ये झोप लागू नये म्हणून आणि आम्ही तिथ काही ट्रक ड्रायव्हरना पण बरोबर रस्ता विचारून घेतला त्यांनी तस आम्हाला सांगितल देखील.

पण ते म्हणले ” सांभाळून जा गाडी अधे मध्ये नका थांबवू आज अमावस्या आहे ” ते ऐकून आम्हा चेहऱ्यावरचा रंग उडाला आता निघताना तिथून आम्हाला दीड वाजला होता. आम्हाला बराच वेळ झाला आंनी आम्ही त्या मुख्य रस्त्याला लागलो होतो. तेव्हा कसारा घाट इतका विकसित नव्हता जितका आज आहे. तेव्हा त्याचा रस्ता तसासाधाच होता आणि आजूबाजूला बरीच उंचउंच गर्द झाडी होती रस्त्याला कुठेसुद्धा वळण नव्हत एकदम तो सरळ रस्ता गेला होता त्या घाटातून.

आम्ही गाडीमध्ये रेडियो ऐकत चाललो होतो. गाडी चालवत असल्यामूळ माझ सर्व लक्ष पुढच होत… आम्ही १५ ते २० मिनिटच्या ड्राईव्ह नंतर आता त्या घाटात येऊन पोहोचलो. मी गाडी सावकाश चालवत होतो आणि अचानक माझ्या मागे बसलेल्या माझ्या मित्रापैकी एकाने समोर बोट करत म्हणाला “अरे बघा बघा तिथ कोणीतरी झाडाजवळ उभा आहे ” मी काही लक्ष दिल नाही पण माझा तो मित्र गाडीची लाईट त्या व्यक्तीवर पडताच इतका जोरात ओरडला कि आमचे काही झोपलेले मित्र भीतीने जागे झाले.. “काय झाल ? काय झाल ?” अस सगळे त्याला विचारू लागले.. तो भीतीने थरथर कापत ओरडू लागला. आणि त्यान मला गाडी पळवायला लावली..

आणि एकवेळ त्यान तिकड बोट केल आणि आम्ही सगळ्यांनी पाहिल.. तर तिथल्या झाडाच्या फांदीवर एक वृद्ध स्त्री आपले पाय झाडावरून खाली सोडून बसली होती. पण विना मुंडीची. ते पाहून माझ्या हातापायाला घाम फुटला.. त्या रस्त्याला मागे कोणी नव्हते न पुढून कोणाची गाडी होती. माझे हात स्टेरिंग वरून ओल्या घाम आलेल्या हातात्ने सटकू लागले ..पण माझ्या सगळ्या मित्रांनी
आरडा ओरडा सुरु केला.. ते प्रेत त्या फांदीवर बसून हसत होत त्याचा तो भयंकर आवाज.. पुन्हा फुल स्पीड ने गाडी पळवली. मला गाडीचा कंट्रोल नीट ठेवता येईल झाला होता. आम्ही कितीहि दूर आलो तरी अस वाटायचं कि ती म्हातारी प्रत्येक दुसऱ्या झाडावर बसून आहे.. मी गाडी पूर्ण पळवली आम्हा सर्व जनाच्या घश्याला कोरड पडली होती..

आणि असच आम्ही घाबरून कसेबसे मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो आम्हाला पोहोचायला रात्रीच्या तीन वाजल्या होत्या. आमच्या पैकी कोणीच काहीही बोलण्याच्या तयारीत नव्हत आम्ही सगळे गेल्या गेल्या झोपी गेलो. आणि सकाळी उठल्यानंतर पाहिलं कि आमचा एक मित्र ज्याने ते सर्वात आधी पाहिलं तो तापेने फणफणत होता. आम्ही घडलेलं आमच्या त्या मित्राला सांगितल ज्याच्या घरी आम्ही होतो. त्याने व त्याच्या वडिलांनी आम्हाल सांगितल कि तिथ बऱ्याच लोकांना तसे अनुभव आले आहेत. त्यांनी परत निघताना आम्हाला दिवसाच्या वेळी जाण्यास सांगितले…
धन्यवाद !!

तुमच्याजवळ अजून मराठी भयकथा ,Horror Marathi Story असतील तर आम्हाला पाठवा किंवा कंमेंट करा आम्ही त्या नक्की पोस्ट करू. या आजच्या पोस्टमध्ये दिलेले Horror Marathi Story आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका.

 

Leave a Comment