१. एक चमचा बडीशेप उकळत्या पाण्यात टाकून १० मिनिटे ठेवावे आणि थंड झाल्यास प्यावे याने वजन कमी होण्यास मदत होते.
२. वजन कमी करण्यासाठी ओटस (Oats) चा वापर करावा.
३. दुधीभोपळ्याचा ज्यूस सकाळी अनशेपोटी घ्यावा याने वजन कमी करण्यास मदत होते .
४. रात्रीचे जेवण कमी करा व आहारात ज्वारीची भाकरी व एखादया भाजीचा समावेश करावा .
५. वजन प्रमाणात येण्यासाठी १ मुठी फुटाणे सायंकाळी ४ ते ५ च्या दरम्यान खावे.
६. मुरमुरे (भडंग) हे दुपारच्या नंतर खावे त्याने पोट भरल्यासारखे वाटते व वजन आटोक्यात राहते .
७. दुपारच्या जेवणानंतर ताकाचे सेवन करावे त्याने वजन कमी होण्यास मदत होते .
८. बॉडी मसाज व स्टिम घेतल्याने वजन कमी होते .
९. रोज सकाळी हिरवे मूग उकडून खावे याने वजन आटोक्यात राहते.
१०. काकडी,पालक ,टोमॅटो दुधीभोपळा या भाज्या कमी कॅलरीच्या असतात आणि त्यामुळेच यांचा रस उपयुक्त.
११. मिठाई आणि साखर कमी खावे.
१२. कोल्ड्रींक पिऊ नये त्याएवजी नारळ पाणी, व्हेजिटेबल सूप किंवा मठ्ठा प्यावे.

१३. वजन कमी करण्यासाठी सकाळी अनाशापोटी असताना ग्रीन टी घ्या.
१४. एका थंड ग्लासाच्या पाण्यात २ चमचे मध मिक्स करून पिल्याने वजन कमी करण्यास मदत होते.
१५. कारल्याची भाजी नेहमी जेवणात असावी.
१६. लिंबाचा रस, खडिसाखर आणि मध रोज खावे.
१७. १/२ लिंबू आणि १/२ चमचा मध गरम पाण्यातून रोज सकाळी अनशापोटी प्राशन करावे.
१८. वजन कमी करण्यासाठी पाण्यात १ चमचा काळे मीठ टाकून घ्या .
१९. गरम पाणी पिल्याने वजन वेगाने कमी होते.
२०. कोल्ड्रिन्स्झ पेक्षा लिंबू रस घ्या .
२१. उकडलेल्या अंडयातील पांढरा भाग खा (पिवळा भाग खाऊ नये) वजन कमी होते .
२२. रोज १ चमचा मेथीचे दाणे सकाळी अनशापोटी ,दुपारी जेवनानंतर व रात्री जेवणानंतर घेतल्यास वजन कमी होते .
२३. वजन कमी करण्यासाठी उपवास मार करू नका योग्य आहार घ्या.
२४. वजन कमी करण्यासाठी कोबी काकडी या पालेभाज्या खा.
२५. पाणी जास्त असलेले फळे खावीत . टरबूज,खरबूज ,स्ट्रोबेरी.
२६. सकाळी ब्रेकफास्ट च्या वेळी केळासोबत १ कप गरम पाणी घेतल्याने लठ्ठपणा कमी होतो .