केक ओवन में ही बनाया जाता है. अनेकदा बाजारातील केक खाण्यापेक्षा घरात बनवलेला केक खाण्यात एक वेगळीच मज्जा असते. तसेत तो स्वत:च्या हाताने बनवलेला असल्यास तो अधिक चविष्ट लागतो.
साहित्य:
• १ कप पुरण (पुरणपोळीला करतो तसेच पुरण)
• १ कप गव्हाचे पीठ (कणिक)
• २ टीस्पून तेल
• तेल किंवा तूप कडबू तळण्यासाठी
• चिमूटभर मीठ
कृती:
• पुरण बनवण्यासाठी चणाडाळ कुकरमध्ये ४-५ शिट्ट्या करून शिजवून घ्यावी. डाळ शिजली कि त्यातील पाणी निथळून टाकावे. या पाण्याची कटाची आमटी बनवता येते.
• पुरण बनवायला जेवढी चणाडाळ घेतली असेल तेवढाच गुळ घ्यावा, गोड जास्त हवे असेल तर २ चमचे गुळ जास्त घालावा.
• शिजलेली डाळ गरम असतानाच त्यात गुळ घालावा. आणि घट्ट होईस्तोवर पुरण ढवळावे. १/२ टीस्पून वेलची पूड आणि २ चिमटी जायफळ पूड घालावी.

• २ टीस्पून गरम तेल गव्हाच्या पिठात घालावे. त्यात १ चिमटी मीठ घालावे. पाणी घालून घट्टसर माळून घ्यावे. पीठ १५ मिनिटे झाकून ठेवावे.
• पीठाचे १ इंचाचे गोळे करावे. गोळे लाटून त्यात मध्यभागी पुरण ठेवावे. कडा जोडून करंजी बनवावी. कातण्याने कडा कापून घ्याव्यात.
• करंज्या घट्ट पिळलेल्या सुती कपड्याखाली झाकाव्यात. अशाप्रकारे सर्व करंज्या करून तुपात तळून घ्याव्यात.
• करंज्या गरमच छान लागतात. वाढताना चमचाभर पातळ तुप घालावे.