Best Janmashtami Essay In Marathi | कृष्णा जन्माष्टमी निबंध मराठी मध्ये

Janmashtami Essay In Marathi –  नमस्कार मित्रानो inmarathi.in या मराठी ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. तर आजच्या या लेखात आपण कृष्ण जन्माष्टमी विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत, आशा करतो आपल्याला लिहिलेली हि माहिती आवडेल. तर चला पाहूया.

कृष्ण हे वासुदेव आणि देवकी यांचे पुत्र आहे. हिंदू धर्मामध्ये प्रमुख देवता असल्याचा मान भगवान श्री कृष्णाला आहे. भारतात गोकुळ मथुरा, वृंदावन, द्वारका आणि पुरी या ठिकाणी या सणाला फार महत्त्व आहे.ओरिसामध्ये दहीहंडी जत्रा किंवा दहीभंगा जत्रा या दिवशी साजरी केली जाते. जन्माष्टमी च्या दिवशी उपवास करण्याची प्रथा आहे. गुजराथमध्ये ‘सातम’ म्हणजे सप्तमीच्या दिवशी पैसे लावून किंवा तसेच दिवसभर पत्ते खेळतात. रात्री बारा वाजता पत्ते बंद करून कृष्णजन्माचा उत्सव सुरू करतात.

श्री कृष्ण जन्माष्टमी ला गोकुळाष्टमी असे सुद्धा म्हणतात. हिंदू श्रद्धेनुसार भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत  झाला, म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. भगवान श्रीकृष्णाच्या भक्तासाठी हा सण खूप खास असतो या दिवशी लोक उपवास धरतात आणि रात्री १२ वाजता पूजा झाल्यानंतर, उपवास सोडला जातो,

Read: Krishna Janmashtami Quotes In Marathi

श्रीकुष्ण जन्माष्टमी च्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जाणारा उत्सव म्हणजे दही हंडी. या उत्सवाला संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पण आपल्याला माहिती आहे का की हा सण का साजरा केला जातो, जेव्हा लहानपणी भगवान श्रीकृष्ण दही दुध खाण्यासाठी मातीच्या वर लटकविलेले मडके फोडून त्यामधील दही आणि दुध फस्त करून टाकत तसेच जर मडके जास्तीचे वर टांगलेले असेल तर श्रीकृष्ण आपल्या मित्रांना घेऊन त्या मडक्याला फोडत असत.आणि त्यामधील दुध, दही, ताक सर्वांमध्ये वाटून खायचे. आणि त्यांच्या ह्या गोष्टींना आठवण ठेवत देशात सगळीकडे कृष्ण जन्माष्टमी च्या दुसऱ्या दिवशी दही हंडीचा उत्सव साजरा केला जातो.

कृष्णजन्मकथेला देखील एक मतितार्थ आहे. देवकी मानवी देहाचे प्रतीक आहे तर वासुदेव प्राणशक्तीचे प्रतीक आहे. मानवी देहामध्ये जेंव्हा प्राणशक्ती वृद्धिंगत होते तेंव्हा कृष्णाची म्हणजे आनंद ची अनुभूती प्राप्त होते.

Janmashtami Essay In Marathi | कृष्णा जन्माष्टमी निबंध मराठी मध्ये

कंस हा देवकीचा भाऊ, म्हणजे देवकीचा सहोदर, जो अहंकाराचे प्रतीक आहे. अहंकार मानवी देहासोबत येतो. होय नां ? अहंकार आनंदाच्या म्हणजे कंस कृष्णाच्या विनाशाचा प्रयत्न करतो.

आनंदी व्यक्ती कोणालाही उपद्रव देऊच शकत नाही. दुःखी आणि भावनात्मक दुखावलेली व्यक्ती व्यत्यय निर्माण करत रहाते. ज्या व्यक्तींना, आपल्यावर अन्याय झाला आहे असे वाटते, अशा व्यक्ती त्यांच्या दुखावलेल्या अहंकारापोटी इतरांवर अन्याय करतात.

अहंकाराचा शत्रू अहंकाराचा सर्वात मोठा शत्रू आनंद आहे. आनंद आणि प्रेम असेल तेथे अहंकार टिकू शकत नाही. प्रेम, साधेपणा आणि अनंदापुढे अहंकार विरघळून जातो. कृष्ण म्हणजे आनंदाचे, साधेपणाचे मूर्तिमंत उदाहरण, प्रेमाचे उगमस्थान होय.

देवकी आणि वासुदेव यांना कंसाद्वारा बंदी बनवणे, हे अहंकाराचा जीवनावरील प्रभुत्व असणे दर्शवते. कृष्ण जन्मावेळी सर्व पहारेकरी झोपले होते. आपली पंचेंद्रिये जी बहिर्मुख असतात तीअहंकाराला खतपाणी घालत असतात. आनंदप्राप्तीसाठी पंचेंद्रिये अंतर्मुख होणे गरजेचे असते.

माखनचोर :

कृष्णाचे एक रूप ‘ माखनचोर ‘ आहे. दूध पौष्टिकतेचे, परिपक्वतेचे प्रतीक आहे. ताक दुधाचे पक्व रूप आहे जे घुसळल्यावर लोणी वर तरंगते जे आणखी पौष्टिक, परिपक्व असते. तसेच आपल्या विद्ववत्तेच्या परिपाकातून प्राप्त होणाऱ्या ज्ञानप्राप्तीमूळेे आपण शांत, स्थिर बनतो, विरक्त बनतो, कुशल बनतो. माखनचोर रूप हे प्रेमाची प्रतिष्ठा वाढवणारे, विरक्ती मुळे प्राप्त होणारी मोहिनी आणि कौशल्य दर्शवणारे आहे.

मोरमुकुटधारी :

राजावर संपूर्ण राज्याची जबाबदारी असते, जी मुकुटासारखी त्याच्या डोक्यावर असते, जी डोईजड वाटू शकते. परंतू आईला आपल्या बाळाची जबाबदारी ‘ जड ‘ वाटते कां ? तसे कृष्णाने त्याच्या सर्व जबाबदाऱ्या मोरपिसासारख्या लीलया आणि सहजतेने पार पाडल्या.

आपल्या प्रत्येकामध्ये असणारी सहजता, आकर्षकपणा आणि आनंद म्हणजेच कृष्ण होय. जेंव्हा चंचलता, चिंता आणि आशा अपेक्षा नसतील, जेथे गाढ शांती असते तेथे कृष्णाचा जन्म होतो.

कृष्ण जन्माष्टमी हा आनंद, भक्ती, प्रेम आणि सर्वधर्मसमभाव या भावनांचे मिश्रण असलेला उत्सव भारतात सर्वत्र उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातो. हा सण नैराश्यातून उत्साहाकडे जाण्याची प्रेरणा देतो.

मित्रानो तुमच्याकडे जर “कृष्ण जन्माष्टमी वर निबंध तसेच कृष्ण जन्माष्टमी सणाची माहिती” विषयावर अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते Essay On Janmashtami Information in Marathi | कृष्ण जन्माष्टमी निबंध मराठी article मध्ये update करू . मित्रानो  हि Essay On Janmashtami In Marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share  करायला विसरू नका. तसेच आपण Essay On Janmashtami In Marathi या लिखाचा वापर Janmashtami information in Marathi असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक
माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.in

हे देखील वाचा : 

सूर्य संपावर गेला तर..| surya sampavar gela tar marathi nibandh

मी मुख्यमंत्री झालो तर..| mi mukhyamantri jhalo tar marathi nibandh

मोबाईल नसते तर.. | Mobile naste tar nibandh in marathi

{Best} maza avadta khel marathi nibandh

Leave a Comment