Kabaddi information in marathi | कबड्डी खेळाची माहिती

Kabaddi information in marathi – नमस्कार मित्रानो inmarathi.in या मराठी ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. तर आजच्या या लेखात आपण कबड्डी या खेळाची सुरुवात कशी आणि कधी झाली  याबद्दल संपुर्ण माहिती पाहणार आहोत तर आशा करतो आपल्याला लिहिलेली हि माहिती आवडेल. चला तर पाहूया.

खेळ खेळायच म्हटलं कि ज्याच्या त्याच्या तोंडी क्रिकेट चं नाव येतं. आज केवळ भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला या खेळाने पछाडलेलं आहे. किंबहुना कित्येक पालकांना आपल्या मुलाने क्रिकेट खेळावे आणि सचिन तेंडुलकर व्हावे असेही वाटत असते. कित्येक मुलांचे आदर्श व्यक्तिमत्व हे क्रिकेटर्स असतात. परंतु मला मात्र कबड्डी हा खेळ सर्वात जास्त आवडतो. महाराष्ट्राच्या मातीतला हा रांगडा खेळ. क्रिकेटच्या झगमगाटात झाकोळला गेलेला.
महाराष्ट्रात होळी, शिमगा अशा सणांच्या वेळी हा खेळ खेळला जात असे. प्रामुख्याने आखाडय़ात व तालमीत हा खेळ खेळला जायचा. मुका असलेला हा खेळ हळूहळू बोलका होऊ लागला. सू सू, सूर सूर, राम लक्ष्मण जानकी, जय बोलो हनुमानकी, हुतूतू असे वेगवेगळे शब्द उच्चाराने हा खेळ बोलका झाला.

क्रिकेट खेळाची माहिती

महाराष्ट्र व मध्यप्रदेशात लोकप्रिय असलेल्या या खेळाला हुतूतू या नावानेही ओळखले जाते. कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये या खेळाला चेडुगुडू असे म्हटले जाते. कबड्डी हा खेळ भारतात जेवढा लोकप्रिय आहे तेवढाच तो भारताचे शेजारी देश नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका आणि पाकिस्तानातही लोकप्रिय आहे. भारताबरोबरच बांगलादेश चा हि  कबड्डी हा राष्ट्रीय खेळ आहे. परंतु जगभरात हा खेळ प्रसिद्ध करण्यात महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा आहे.
अमरावतीच्‍या जगविख्‍यात श्री हनुमान व्‍यायाम प्रसारक मंडळाने १९३६ मध्ये बर्लिन ऑलिंपिकमध्ये खेळाच्या प्रसारासाठी प्रदर्शनीय सामना खेळून दाखवला. त्‍यापूर्वी म्‍हणजे १९३४ मध्‍ये कबड्डीचे नियम तयार झाले आणि १९३८ पासून हा खेळ भारतात राष्ट्रीय खेळ म्हणून ओळखला जाऊ लागला.

१९९० साली बीजिंग येथे झालेल्या एशियाडपासून कबड्डीचा एशियामध्ये समावेश करण्यात आला. शरद पवार व बुवा साळवी यांच्या प्रयत्नांमुळे कबड्डी आंतरराष्ट्रीय झाली. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळेच कबड्डीने आशिया खंडाची वेसही ओलांडली. गेल्या पन्नास वर्षात संपूर्ण देशात कबड्डीचा विकास झाला व प्रचार झाला. कबड्डी आंतरराष्ट्रीय झाली. याचे श्रेय महाराष्ट्राला आहे.
पाटण्यात गेल्या वर्षी झालेल्या महिला विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघानं विश्वचषकाला गवसणी घालून देशाचा तिरंगा अभिमानानं फडकावला. या विजयात मोलाचा वाटा उचलला तो दीपिका जोसेफ, अभिलाषा म्हात्रे आणि सुवर्णा बारटक्के या महाराष्ट्राच्या सुवर्णकन्यांनी. क्रिकेटपटूंप्रमाणेच कबड्डीपटूही कोटय़धीश झाल्या, हा ‘न भूतो, न भविष्यती’ क्षण महाराष्ट्राने अनुभवला.

kabaddi in marathi

या खेळात दोन संघ मैदानाच्या दोन बाजू राखून आळीपाळीने प्रतिस्पर्धी संघावर चढाया करायला एक खेळाडू पाठवतात. प्रत्येक संघात बारा खेळाडू असतात. प्रत्यक्ष सामन्यात सात खेळाडू खेळतात. इतर पाच खेळाडू बदली खेळाडू म्हणून खेळवले जातात.
पुरुषांसाठी वीस मिनिटांचे, तर महिलांसाठी पंधरा मिनिटांचे दोन डाव खेळवले जातात. संपूर्ण सामन्यात बरोबरी झाल्यास पुन्हा पाच मिनिटांचे दोन डाव खेळवतात. पूर्वी फक्त खुल्या जागेवर खेळला जाणारा हा खेळ आता बंदिस्त जागेत व मॅट वरही खेळवला जातो.

कबड्डी या खेळाचे फायदेही अनेक आहेत. कबड्डीमुळे शरीर सुदृढ आणि निरोगी राहते, निर्णय क्षमता वाढते, परस्पर सहकार्याची भावना निर्माण होते तसेच अंगी सामर्थ्य आणि चतुराई निर्माण होते. महाराष्ट्राच्या रांगड्या मातीत खेळल्या जाणाऱ्या या खेळामुळे प्रत्येक खेळाडूचा आपोआपच व्यायाम होतो. गेल्या काही वर्षांपासून प्रो–कब्बडी लीग चा प्रभाव महाराष्ट्रावर दिसून येत आहे.  या स्पर्धेमुळे कबड्डी खेळाडूंना पैसे मिळू लागले. प्रसिद्धी मिळाली. लोक कबड्डी पाहू लागलेत. हे सारे ठीक आहे. परंतु या स्पर्धेमुळे पारंपरिक पद्धतीने खेळल्या जाण्या–या देशातील अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा धोक्यात आल्या आहेत.

प्रो कबड्डीत खेळणारे खेळाडू या अखिल भारतीय कबड्डी स्पार्धामध्ये खेळण्याचे टाळतात. चांगले खेळाडू या स्पर्धामध्ये खेळणार नाहीत म्हणून स्पर्धा घेण्याचे टाळले जाते. ज्या अखिल भारतीय व राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा वर्षानुवष्रे खेळल्या जात आहेत त्या स्पर्धा धोक्यात आल्या आहेत. याचा परिणाम पारंपरिक कबड्डीवर होणार आहे.
पूर्वी आपली निवड जिल्ह्याच्या, राज्याच्या नंतर भारताच्या संघात व्हावी यासाठी खेळाडू जीवाचे रान करत होते. आता खेळाडूंचे लक्ष असते ते प्रो कबड्डी. खेळाडूंची ओळख देखील त्यांच्या प्रो कबड्डीतील संघामुळे होऊ लागलीय. पूर्वी हा मुंबई शहराचा, पुण्याचा, सांगलीचा, रायगडचा, ठाण्याचा, मुबई उपनगरचा असे खेळाडू आळखले जायचे.

आता हा खेळाडू दबंग दिल्लीचा, यू मुंबाचा, पुणेरी पलटणचा अशी ओळख होऊ लागलीय. रिशांक देवाडिगा मुंबई उपनगर असे कोण आळखत नाही. तो यू मुंबाचा खेळाडू आहे ही त्याची सध्याची ओळख आहे. याचा विचार आता महाराष्ट्रने केला पाहिजे. खेळाडू देखील आपल्या जिल्हय़ापेक्षा प्रो कबड्डीच्या संघाला महत्त्व देऊ लागलेत.
ज्या व्यावसायिक संघातून या खेळाडूंची निवड झाली आहे, त्या आपल्या व्यावसायिक संघातून देखील हे खेळाडू खेळण्याचे टाळत आहेत. याचा परिणाम आता दिसला नाही तर भविष्यात दिसेल. कबड्डी खेळाडूंना खासगी कंपन्यांमध्ये नोक–या मिळणार नाहीत. मॅटवरील कबड्डीमुळे खेळाडू जखमी होण्याचे प्रमाण वाढले आहे.

मला पंख असते तर..

आपल्याच देशात वेगवेगळ्या नावाने खेळल्या जाणा–या या खेळाला महाराष्ट्राने कबड्डी हे नाव दिले. अखिल भारतीय कबड्डी संघटना उभी केली. या खेळाचा प्रसार व प्रचार केला. कबड्डीला आंतरराष्ट्रीय केले. ती पारंपरिक कबड्डी प्रो कबड्डीमुळे धोक्यात येऊ लागलीय.
टी–२० मुळे आयपीएल म्हणजेच क्रिकेट असे लोकांना वाटू लागलंय. कसोटी क्रिकेट कुणी पाहत नाही. कसोटी पाहण्यासाठी कुणी स्टेडियमवर जात नाही.

तसेच भविष्यात प्रो कबड्डी म्हणजेच खरी कबड्डी असे लोक म्हणतील. मातीतील परंपरिक कबड्डीला लोक विसरतील. काळाची पावले ओळखून वेळीच उपाययोजना केली पाहिजे. पारंपरिक कबड्डीला वाचविण्यासाठी आता महाराष्ट्रालाच पुढाकार घ्यावा लागेल.

Leave a Comment