Kaju curry

साहित्य:


• ओले काजू एक वाटी
• धने-जिरं एक एक चमचा
• सुक्या मिरच्या एक-दोन
• ओलं खोबरं अर्धी वाटी
• चवीनुसार मीठ

कृती:


• ओले काजू पाण्यात टाकून नीट सोलून व धुऊन घ्यावे . (त्यावर चिक असल्यानं घसा खवखवतो .)


• धने , जिरं , सुक्या मिरच्या गरम करून घ्याव्या . अर्धी वाटी ओलं खोबरं आणि वरील सर्व पदार्थ वाटून घ्यावे .

Kaju curry


• काजू फोडणीला टाकून त्यात एक वाटी पाणी ओतावं . उकळी आल्याबरोबर मीठ टाकावं .


• काजू शिजत आले की त्यात वाटलेला मसाला घालून ढवळावं . आवश्यक असेल तर थोडं पाणी , आवडत असल्यास थोडा गूळ व जराशी चिंच घालावी . या उसळीत गरम मसाला व भाजून कांदाही चांगला लागतो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *