प्रवास महागडा असूनही कोकण मार्गावर धावलेल्या वंदे भारत एक्स्प्रेसच्या काही फेऱ्यांचा अपवाद वगळता अन्य फेऱ्या हाऊसफुल्लच राहिल्या आहेत.आशयात भर वंदे भारत एक्स्प्रेसच्या उद्घाटनापूर्वीच गणेशोत्सवातील चार दिवसांचे आरक्षण हाऊसफुल्ल झाले होते म्हणजे १९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवासाठी गाव येण्यासाठी चाकरमान्यांनी वंदे भारत एक्स्प्रेसला सर्वाधिक पसंती दिली आहे.
गणेशोत्सव कालावधीतील आलिशान वंदे भारत एक्स्प्रेसच्या सर्वच फेऱ्या फुल्ल झाल्या असून ३ ऑक्टोबरपर्यंतच्या फेऱ्यांचे प्रतीक्षा यादीवरील बुकिंग सुरू असल्याची माहिती आहे.आतापर्यंत मुंबई- मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसच्या, आलिशान आणि वेगवान फेऱ्यांमुळे मध्यरेल्वेच्या आणि कोकण रेल्वेच्या तिजोरीतही मोठ्या प्रमाणात भर पडत आहे. कोकण मार्गावर धावणाऱ्या आठ डब्यांच्या वंदे भारत एक्स्प्रेसची आसनक्षमता ५३० इतकी आहे.
प्रवाशांचा वंदे भारत एक्स्प्रेसला मिळत असलेला प्रतिसाद लक्षात घेत ८ ऐवजी १६ डबे चालवण्याचा प्रस्ताव मध्य रेल्वेने पाठवला आहे. गणपती स्पेशलच्या फेऱ्यांचे आरक्षण काही मिनिटातच फुल्ल झाल्याने चाकरमान्यांपुढे मुंबई-मडगाव वंदे भारतचा पर्याय आहे.