{Best} krishna bhajan with lyrics In Marathi | कृष्णा भजन मराठी संग्रह | Krishanachya Gavlani Marathi Lyrics

कृष्णाच्या गवळणी मराठी लिरिक्स संग्रह | Best Krishanachya Gavlani Marathi Lyrics Collection 

krishna bhajan with lyrics In Marathi: भजन म्हणजे फक्त मृदूंग, ढोलकी, टाळ याचा नाद नाही. तर भजन म्हणजे सुरेख शब्दांचे बंधन आणि त्याला साथ म्हणजे या वाद्यांची, त्यामुळेच आम्ही या गोष्टीचे पूर्ण भान ठेऊन काही निवडक आणि अप्रतिम असे krishna bhajan with lyrics In Marathi घेऊन आलोय. याचा उपयोग तुम्ही कृष्णाच्या गवळणी भजन करताना करून भजनाची शुभा वाढवलं.

Read More : श्रीकृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा मराठीत 2023

krishna bhajan with lyrics In Marathi | कृष्णाच्या गवळणी मराठी लिरिक्स संग्रह

देव एका पायाने लंगडा..🙏

असा कसा ग बाई
देवाचा देव ठकडा
देव एका पायाने लंगडा ||धृ||

गवळ्या घरी जातो | दही दुध खातो
करी दहया दुधाचा रबडा ||१||

शिंकेचि तोडीतो मडकेची फोडीतो |
पाडी नवनिताचा सडा ||२||

वाळवंटी जातो कीर्तन करितो
लावी साधुसंतांचा झगडा ||३||

एका जनार्दनी | भिक्षा वाढ मायी
देव एकनाथाचा बछडा ||४||

Read More: Janmashtami Quotes In Marathi

krishna bhajan lyrics in marathi | Krishanachya Gavlani Marathi Lyrics

यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी । कान्हा वाजवितो बासरी.🎺

यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी । कान्हा वाजवितो बासरी ॥धृ॥

घागर घेऊनी पाणियासी जाता । येतां जाता आम्हा अडविता ।आमच्या शीरी घडा याने मारिला खडा । याने केली आमची मस्करी ॥१॥

दही दुध घेऊनी गवळ्याच्या नारी । जात होत्या मथुरे बाजारी ।त्यांचा भरला घडा याने मारीला खडा याने केली आमची मस्करी ॥२॥

यशोदा धुंडले गोकुळ नगरी । अवचित पाहिला राधिकेच्या घरी । राधिकेच्या घरी हरी पलंगावरी । पाहून राधा झाली घाबरी ॥३॥

जनी म्हणे बा श्रीहरी । भोग भोगिले बाळ ब्रह्मचारी । जनी म्हणे देवा खुप केला तुम्ही असुन ब्रह्माचारी ॥४॥

krishna bhajan lyrics in marathi | Krishanachya Gavlani Marathi Lyrics

जय जय राम राम कृष्ण हरी..🌺

जय जय राम जय जय राम
जय जय राम राम कृष्ण हरी ||धृ||

राजाराम कृष्ण हरी
गोवर्धन हे गिरीधारी
सावळे राम कृष्ण हरी
मुकुंद मुरारी हे गिरीधारी ||१||

होतो नामाचा गजर
श्री राम जय राम जय जय राम
जय राम जय राम
जय जय राम राम ||२||

krishna bhajan lyrics in marathi | Krishanachya Gavlani Marathi Lyrics

कृष्णा तुला मी ताकीद करते गौळण

कृष्णा तुला मी ताकीद करते, 
कुणाच्या घरी कधी जाऊ नको । 
 
गवळ्याघरी बोभाट उठला । 
माठ दह्याचे फोडू नको रे ॥१॥ 
कृष्णा तुला मी ताकीद करते, 
कुणाच्या घरी कधी जाऊ नको । 
 
रागीट तुझा पिता नंद 
मार तयाचा खाऊ नको रे ॥२॥ 
कृष्णा तुला मी ताकीद करते, 
कुणाच्या घरी कधी जाऊ नको । 
 
आली गौळण कपटी राधा, 
तिच्या घरात तू जाऊ नको  रे ॥३॥ 
कृष्णा तुला मी ताकीद करते, 
कुणाच्या घरी कधी जाऊ नको । 
 
पाळण्यात घालूनी झोके देते, 
आता मुला, तू रडू नको  रे ॥४॥ 
कृष्णा तुला मी ताकीद करते, 
कुणाच्या घरी कधी जाऊ नको । 
 
वरद्या वांकड्या पेंद्या सुदामा, 
ह्यांच्या डावामध्ये खेळू नको  रे ॥५॥ 
कृष्णा तुला मी ताकीद करते, 
कुणाच्या घरी कधी जाऊ नको । 
 
नामा म्हणे पतित पावना, 
ह्यांच्या नामा तू विसरू नको  रे ॥६॥
कृष्णा तुला मी ताकीद करते, 
कुणाच्या घरी कधी जाऊ नको । 
 
krishna bhajan lyrics in marathi | Krishanachya Gavlani Marathi Lyrics
 

बाई माझ्या गं दुधात नाही पाणी गवळन 

बाजाराला विकण्या निघाली
दही दूध ताक आणि लोणी
बाई माझ्या गं दुधात नाही पाणी || धृ ||

गोकुळच्या त्या गाई म्हशीचं
खाणं सगळं राण माळाचं
उगीच कशाला चाखून बघायचं
पैशा विणा घेणं
बाई माझ्या गं दुधात नाही पाणी || १ ||

यमुनेचा तो अवघड घाट
चढता चढता दुःखतिया पाट
नेहमीच तयाची वारी कट
थांबू नका गवळणी
बाई माझ्या गं दुधात नाही पाणी || २ ||

महानंदाची वेडी माया
देवासाठी तिची सुखली काया
एका जनार्दनी पडू त्याच्या पाया
देवा लीन होवूनी
बाई माझ्या गं दुधात नाही पाणी || ३ ||

बाजाराला विकण्या निघाली
दही दूध ताक आणि लोणी
 

krishna bhajan with lyrics In Marathi | कृष्णाच्या गवळणी मराठी लिरिक्स संग्रह

दही घ्या दही घ्या रे गौळन


दही घ्या दही घ्या रे दही घ्या दही घ्या रे
गोकुल च्या या गौळनि सार्या
मथुरे ला आल्या रे
दही घ्या दही घ्या रे दही घ्या दही घ्या रे

एक आन्याला कोणी दोन आन्याला
चार आन्यला कोणी आठ आन्याला
आ …आ…आ…
दही घ्या दही घ्या रे दही घ्या दही घ्या रे

आम्बट घ्या कोणी खारट घ्या
गोड घ्या कोणी चवदार
आ …आ…आ…
दही घ्या दही घ्या रे दही घ्या दही घ्या रे

गोदा आली गंगा आली
यमुना आली नर्मदा
आ …आ…आ…
दही घ्या दही घ्या रे दही घ्या दही घ्या रे

एकाजनार्धनी राधा आली
कृष्णाला जाऊंन मीडाली
आ …आ…आ…
दही घ्या दही घ्या रे दही घ्या दही घ्या रे

दही घ्या दही घ्या रे दही घ्या दही घ्या रे
गोकुल च्या या गौळनि सार्या
मथुरे ला आल्या रे
दही घ्या दही घ्या रे दही घ्या दही घ्या रे

krishna bhajan lyrics in marathi | Krishanachya Gavlani Marathi Lyrics

राधे तुझ्या कानात ग झुम्बर वारयाने हालतय ग


राधे तुझ्या कानात ग
झुम्बर वारयाने हालतय ग
वारयाने हालतय ग
कान्हा गोड गोड बोलतोय ग

घागर घेउनी मथुरेशी जाता
आडवा कान्हा राधे
वाटेवर उभा होता
राधे तुझ्या कानात ग
झुम्बर वारयाने हालतय ग
वारयाने हालतय ग
कान्हा गोड गोड बोलतोय ग

दही दूध घेउनी मठुरेशी जाता
आडवा कान्हा राधे
वाटेवर उभा होता
राधे तुझ्या कानात ग
झुम्बर वारयाने हालतय ग
वारयाने हालतय ग
कान्हा गोड गोड बोलतोय ग

एका जनार्धानी गवळण राधा
नको लागु हरिच्या नादा
राधे तुझ्या कानात ग
झुम्बर वारयाने हालतय ग
वारयाने हालतय ग
कान्हा गोड गोड बोलतोय ग

krishna bhajan with lyrics In Marathi | कृष्णाच्या गवळणी मराठी लिरिक्स संग्रह

नेसली ग बाई मी चंद्रकला ठिपक्यांची


नेसली ग बाई मी, चंद्रकला ठिपक्यांची.
बाई ठिपक्याची,
तिरपी नजर माझ्यावर ह्या सावळ्या हरीची,

शिट्टी मारून करतो गोळा गोपाळांचा मेळा.
राधिकेला अडवून धरतो मिठी मारतो गळा.
शर्त झाली बाई याची निर्लजपणाची,
या कान्हाची, या कृष्णाची.
तिरपी नजर माझ्यावर ह्या सावळ्या हरीची.

पाणीयाशी जात बाई, वाटेवरी उभा कान्हा.
सोड देवा पदर माझा, नार आहे परक्याची.
या कान्हा ची, या कृष्णाची.
तिरपी नजर माझ्यावर ह्या सावळ्या हरीची.

अजून याला नाही कळे करी तसे भलते चाळे.
सोड देवा पदर माझा चोळी आहे बुरख्याची.
या कान्हाची, या कृष्णाची.
तिरपी नजर माझ्यावर ह्या सावळ्या हरीची.

एका जनार्दनी गवळण हासुनी,
हरी चरणाशी मिठी मारूनी.
फिटली ग बाई माज्या, हौस या मनाची.
या कान्हाची, या कृष्णाची.
तिरपी नजर माझ्यावर ह्या सावळ्या हरीची.

नेसली ग बाई मी, चंद्रकला ठिपक्यांची.
बाई ठिपक्याची.
तिरपी नजर माझ्यावर ह्या सावळ्या हरीची.

krishna bhajan lyrics in marathi | Krishanachya Gavlani Marathi Lyrics

यशोदा तेरे कान्हा ने बड़ा ही उद्धम मचाया है


यशोदा तेरे कान्हा ने बड़ा ही उद्धम मचाया है
मेरे ही घर में आ करके मेरा ही माखन चुराया है
यशोदा तेरे कान्हा ने ……

गई थी मथुरा के बाजार ओ मैया माखन बेचन मै
तेरे ही कान्हा ने मोरी गगरिया को कंकड़ मारा है
यशोदा तेरे कान्हा ने ……

गई थी यमुना के उस पार ओ मैया पनिया भरन को मै
तेरे ही कान्हा ने मोरी गगरिया को कंकड़ मारा है
यशोदा तेरे कान्हा ने ……

गई थी कुंज गलियन मै ओ मैया रास खेलन मै
तेरे ही कान्हा ने मोरी धीरे से बैया मरोड़ी है
यशोदा तेरे कान्हा ने

krishna bhajan with lyrics In Marathi | कृष्णाच्या गवळणी मराठी लिरिक्स संग्रह

सांग राधे कुणा संग हसली गं गौळण


सांग सांग सांग राधे सांग ना ग
सांग राधे कुणा संग हसली गं
तुझ्या वेणिची गाठ कशी सुटलीग

घागर घेउन पानियाशी जाता
पानियाशी जाता बाई ग यमुनेशी जाता
पानियाशी गं यमुनेशी गं
अग हसली….
सांग राधे कुणा संग हसली गं
तुझ्या वेणिची गाठ कशी सुटलीग

दही दूध घेउन बाजाराला जाता
बाजाराला जाता बाई ग मथुरेला जाता
बाजाराला गं मथुरेला गं
अग हसली…
सांग राधे कुणा संग हसली गं
तुझ्या वेणिची गाठ कशी सुटलीग

एका जनार्धनी राधा गौळण
गौळण गेली कृष्णा ला शरण
नव्या युगाची नवरी नटली ग
तुझ्या वेणिची गाठ कशी सुटलीग

krishna bhajan lyrics in marathi | Krishanachya Gavlani Marathi Lyrics

नको मारू रे कान्हा पिचकारी


नको मारू रे कान्हा पिचकारी
साड़ी रंगान भिजल माझी साड़ी
कान्हा पड़ते रे पाया दही दूध देते रे खाया
कातू रागावला माझा वरी

गोकुलात जेव्हा तुझी माझी जोड़ी
नित्य वाटेत कान्हा करतोय खोडी
कान्हा पड़ते रे पाया….

गवळनि मधे मी गवळन छोटी
तुझी वागनुक भल्तिच खोटी
कान्हा पड़ते रे पाया दही दूध देते रे खाया
चुगली सांगते माझा घरी

गोकुलात तुझी माझी झाली निंदा
सम्ध्यानी मला पहिलेच तिनदा
कान्हा पड़ते रे पाया दही दूध देते रे खाया
नवरा मारू देई पलंगावरी

krishna bhajan with lyrics In Marathi | कृष्णाच्या गवळणी मराठी लिरिक्स संग्रह

सांग राधे कुणा संग हसली गं गौळण


सांग सांग सांग राधे सांग ना ग
सांग राधे कुणा संग हसली गं
तुझ्या वेणिची गाठ कशी सुटलीग

घागर घेउन पानियाशी जाता
पानियाशी जाता बाई ग यमुनेशी जाता
पानियाशी गं यमुनेशी गं
अग हसली….
सांग राधे कुणा संग हसली गं
तुझ्या वेणिची गाठ कशी सुटलीग

दही दूध घेउन बाजाराला जाता
बाजाराला जाता बाई ग मथुरेला जाता
बाजाराला गं मथुरेला गं
अग हसली…
सांग राधे कुणा संग हसली गं
तुझ्या वेणिची गाठ कशी सुटलीग

एका जनार्धनी राधा गौळण
गौळण गेली कृष्णा ला शरण
नव्या युगाची नवरी नटली ग
तुझ्या वेणिची गाठ कशी सुटलीग

 

 

Leave a Comment