आपण हॉटेलमध्ये गेलो की कधी कधी थाळी ऑर्डर
करतो त्या थाळीमध्ये काही मोजकेच पदार्थ असतात
पण, पुण्यात आत एक भली मोठी थाळी आली आहे. ती
थाळी जर तुमच्यासमोर आली तर पाहूनच तुम्ही थक्क
व्हाल. कारण या थाळीचं नाव आहे, बाहुबली थाळी!
आता या नावाप्रमाणेच ही थाळी ही पूर्णपणे अनोखी
आहे.
पुण्यातील ‘हाऊस ऑफ पराठा’मध्ये ही थाळी
खवय्यांच्या जीभेचे चोचले पुरवत आहे. ऑर्डर करताना
मेन्यूमध्ये बाहुबली थाळी हे नाव पाहिल्यावरच तुम्हाला
ही थाळी काहीशी वेगळी असणार याचा अंदाज येतो. या
थाळीची अनेक वैशिष्ट्य आहेत.
त्यापैकी एक म्हणजे, ही थाळी 7-8 माणसंही संपूर्ण
संपवू शकत नाहीत, असं सांगितलं जातं. दुसरं म्हणजे,
खवय्यांच्या चवीचा पूर्ण विचार करून या थाळीची
निर्मिती केली आहे. तिसरं वैशिष्ट्य म्हणजे, बाहुबली
थाळीत नावाप्रमाणेच पदार्थांचा समावेश केला आहे.
या थाळीमध्ये वसेना मिक्स पराठा’, ‘कटप्पा बिर्यानी’,
‘शिवगामी पंचपकवान’, ‘भल्लाल देव लस्सी आणि छास’
अशा अनोख्या पदार्थांचा समावेश आहे. तर, शाही पनीर,
लच्छा पराठा, जीरा राईस, पापड हे देखील या थाळीच्या
सैन्यात सामील आहेत. बाहुबली थाळी ही भारतामधील
सर्वात मोठी थाळी असल्याचा दावाही केला जात आहे.