Health Tips In Marathi आजकाळ या धावपळीच्या जीवनात आपण कुठेना कुठे आपण आपले आरोग्य कडे दुर्लक्ष्य करत असतो. आणि त्याचा परिणाम आपल्या जीवनात कामकाजात, वयक्तिक जीवनात दिसून येतो. या सगळ्याचा विचार करता काही साधे आणि सरळ उपाय आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी नक्कीच मदत करतील. तर चला जाणून घेऊया काही साधे आणि सरळ मार्ग स्वस्थ निरोगी शरीरासाठी.
पाच कामे नेहमी योग्य वेळी केली पाहिजेत :
-> सकाळी उठल्या बरोबर दात स्वच्छ करून किंवा चूळ भरून एक पेला थंड पाणी प्यावे. नंतर एक पेला कोमट पाण्यात लिंबू पिळून प्यावे व नंतर शौचास जावे.
-> मलमूत्र, शिंक, अश्रु, जांभई, झोप, उलटी, ढेकर, भूक, तहान, अपान वायु व श्रमाने झालेला श्वास वेग ही स्वाभाविक वेग आहेत. या वेगांना रोकु नये.
-> कमी खाणे हे नेहमी स्वास्थ्या करिता चांगले. भूकेपेक्षा एक पोळी कमी खाल्याने पोट ठीक राहते.
-> धैर्याने काम केल्यास बुद्धि ठीक राहते. पोट व बुद्धि ठीक राहिल्यासमाणूस स्वस्थ राहतो.
-> अन्न ग्रहण केल्यावर लगेच झोपणे किंवा श्रम करणे, जेवतांना काळजी करणे, जेवतांना बोलणे व जेवल्यावर लगेच पाणी प्याल्याने अपचन व अजीर्ण होते.
-> भूक असल्यावर न जेवणे, भूक नसल्यावर भोजन करणे, न चावता गिळणे, जेवल्यावर तीन तासाच्या आत परत जेवणे व भुके पेक्षा अधिक जेवणे प्रकृतिला चांगले नसते. बघितल्या शिवाय पाणी पिऊ नये, जाणल्या शिवाय मित्रता करू नये, हात धुतल्याशिवाय जाऊ नये, विचारल्या शिवाय सल्ला देऊ नये. आपल्यापेक्षां मोठ्याचा तिरस्कार करू नये. बलवानाशी शुत्रता व दुष्टांशी मित्रता करू नये, अनोळखी माणसावर एकदम विश्वास करू नये. हया गोष्टी लक्षात ठेवल्यास अनेक व्याधि आणि विपत्तिपासून बचाव होऊ शकतो.
-> जेवताना सॅलेड म्हणून गाजर, मुळा, काकडी, कांदा, कोबी, कोथिंबीर, मुळयांची पाने, पालक इत्यादि जे काही उपलब्ध असेल ते बारीक कापून सॅलेड करून खावे.
-> अतिव्यायाम, अति थट्टा विनोद, अति बोलणे, अति परिश्रम, अति जागरण, अति मैथुन, हया गोष्टींचा अभ्यास असला तरी अति कारणे योग्य नाही, कारण अति करणे आज ना उद्या कष्ट कारकच ठरते.
-> या जगात असा कुठलाही पदार्थ नाही जो योग्य प्रमाणात व रितीने प्रयोग केल्यास औषधाचे काम करणार नाही. योग्य रितीने व योग्य प्रमाणात जेवण न केल्यास त्याचे हि विष होऊ शकते. हिवाळ्यात सकाळी उन घेणे व रात्री थंडी पासून बचाव करणे हितकारी असते. पंरतु उपाशी राहणे व उशीरा पर्यत जागणे नुकसानकारक असते.
-> झोपवयास जाण्या अगोदर लघवी करणे, गोड दुध पिणे, दात घासुन, चुळ भरणे, हात पाय धुणे, दिवसाभर केलेल्या कामावर मनन करून. ईश्वराचे ध्यान करत झोपणे, मानासिक आणि शारिरिक स्वास्थासाठी हितकार असते. जेवताना आणि झोपताना मन एकाग्र असते.