love poem in marathi | प्रेम कविता| मराठी कविता | prem kavita

प्रेम कविता संग्रह फक्त तुमच्या साठी | emotional poem for love in marathi prem kavita in marathi.

Read More : prem kavita 

मैत्रीविना सारेच फिके .🤝

मैत्री कशी हळुवार उमलते
उन्हातही मग सावली वाटते
अश्रूत दुःख वाहून जाते
व्यथांनाही हसू येते
मैत्रीविना सारेच फिके
आनंदाचे क्षणही मुके

म्हणूनच मैत्रीला फुलवायचे
फुलासारखे जपायचे
अन त्या सुगंधात
जीवन सुगंधी करायचे


💞 प्रेम किनारा..💞

कातरवेळी उधाणलेला सागर,
अन हाती तुझा हात….
स्पर्श रेशमी रेतीचा,
तशीच मखमली तुझी साथ….
साद घाली मना,

झोंबनारा गार हा वारा….
शहारालेलं सर्वांग त्या लाटांपरी,
भावनाही उधाणलेल्या….
तयांशी लाभलेला तू…
प्रेम किनारा

love poem in marathi
love poem in marathiRead More : Marathi prem kavita

Read More : Good morning suvichar

प्रेम कविता संग्रह फक्त तुमच्या साठी| emotional poem for love in marathi prem kavita in marathi. | तू आणि मी 👩‍❤️‍👩


तू आणि मी 👩‍❤️‍👩

पहिल्यांदा जेव्हा पाहिलं मी तुला,
माझ्या मनाचं पाखरू लागलं होत उडायला
बाकी कशाचाचं नव्हतं रे मला भान,
काय करु, तुझ्यावरुन हटतचं नव्हतं माझं
ध्यान

बोलायला तुझ्याशी मला शब्दांची गरज वाटत
नव्हती,
कारण त्यासाठी तुझी एक नजरच पुरेशी होती
गंमत वाटत होती मला चोरून पाहताना
तुझ्याकडे,
मन चिंब झालं होत,जेव्हा तू हसला होता
पाहून माझ्याकडे
आपली ही पहिली भेट माझ्यासाठी खूप खास
होती,

कारण या भेटीनेच कदाचित पण आपली मनं
जुळली होती
माझ्या मनात फक्त तुला आणि तुलाच होती
जागा,
माहित नव्हतं तरिही काय होता आपल्याला
जोडणारा धागा
तुझ्याच विचारांत असायची मी नेहमीच दंग,
कारण तूच भरला होता ना माझ्या आयुष्याला

समजायला लागलं होतं आता मलाही थोडं
थोडं,
का झालं होत माझ मन तुझ्यात एवढं वेडं
गुंतला होता तुझ्यात जीव,माझं हृदयही
तुझ्याचसाठी धडधडत होतं,
आता मात्र हे वेडं मन,तुझ्याच सोबतीची स्वप्न
पाहत होतं

आणि तुझ्याच साठी जगात होतं ….


love poem in marathi
love poem in marathi

Read More : prem kavita

Read More : Easy Recipes in marathi


वेड्या मनास माझ्या ..

वेड्या मनास माझ्या कसलेच भान नाही
ये ना प्रिये समोरी जगण्यास मान नाही
वेड्या मनास माझ्या ………..

बघता तुझी सावली जचली या मनाला
हरवून भान सारे मी शोधतो कुणाला
वाटेवरी उभा त्या मी रोजचाच होतो
घेतांना थांग तुझा विचारतो कुणाला
वेड्या मनास माझ्या …………

वाटे हवा हवा का हा जीवनी किनारा
बघ वाहूनिया आला बेधुंद गार वारा
प्रेमाची साथ अपुली जोडू ये सांजवेळी
पाहू नकोस मागे समजून घे इशारा
वेड्या मनास माझ्या …

येतील चांद तारे देतील साक्ष तुजला
प्रेमात खोट नाही विचार या नभाला
आलीस तू जीवनी होऊन आशा नवी
दे अर्थ तू साजणी बेअर्थी जगण्याला

वेड्या मनास माझ्या कसलेच भान नाही
ये ना प्रिये समोरी जगण्यास मान नाही
वेड्या मनास माझ्या कसलेच भान नाही


प्रेम कविता संग्रह फक्त तुमच्या साठी| emotional poem for love in marathi prem kavita in marathi. | प्रिये…..❤


प्रिये…..❤

प्रिये…

माझा प्राण नाही पण आत्मा तु आहेस.,
माझा श्वास तुच आहेस…
आता माझ्या जगण्याची आस तुच आहेस…

जग किती सुंदर आहे बघ माझ्या मिठीत येऊन..
डोळे लावुन भिजुन जा..
माझ्या प्रेमाच्या धुंद वर्षावात…

कितीही झालं तरी प्रिये तु माझी जान आहेस
आता माझ्या जगण्याची आस तुच आहेस…

love poem in marathi
love poem in marathi

प्रीत..👨‍❤️‍💋‍👨

तुझ्या अशा फसव्या नजरांनाच
मी भुलत गेलो
तू सोडत होतीस केस मोकळे
मी मात्र गुंतत गेलो

तुझ्या जादुई हसण्यातच
मी फसत गेलो
त्या मोहवणाऱ्या क्षणात
मी हरवत गेलो

तुझ्या पुसटश्या स्पर्शानही
मी बेभान होत गेलो
तो गंध माझ्या तन-मनात
नकळत साठवत गेलो

कळलं नाही हा श्वास
कधी झाला तुझा
इतकी प्रीत तुझ्यावर
मी कसा करत गेलो


Read More : Romantic love story..| प्रेम कहानी वाचण्यासाठी यावर क्लिक करा..


 

Leave a Comment