{Best} 50+ love shayari in marathi | प्रेम शायरी | मराठी शायरी

प्रेमावरती शायरींचा संग्रह फक्त तुमच्या साठी |love shayari in marathi

Read More : love shayari marathi

एकदाच होतं, नशिबवानानाचं मिळतं,
म्हणूनच जीवापाड जपावं,
असं प्रेम करावं … असं प्रेम करावं


एका इशाऱ्याची गरज असेल.. हृदयाला किनाऱ्याची गरज असेल… मी तुला त्या प्रत्येक वळणावर भेटेन.. जिथे तुला आधाराची गरज असेल….


ओळख होण्याआधी, सगळेच अनोळखी असतात. मनं एकदा जुळली की, सहज आपले होतात…


प्रेम म्हणजे., समजली तर भावना., केली तर मस्करी., मांडला तर खेळ., ठेवला तर विश्वास., घेतला तर श्वास., रचला तर संसार.. , आणि निभावलं तर जीवन..


“तु इतक्या प्रेमाने बघावं की नजरेनेही आपोआपच लाजावं तुझ्या नुसत्या स्पर्शानेही पैंजण पायातलं वाजावं…”


Read More : प्रेम कविता 👈 यावर क्लिक करा.


तू सोबत असलीस कि मला
माझा हि आधार लागत नाही
तू फक्त सोबत रहा
मी दुसरं काही मागत नाही.


अचानक त्या वळणावर
तुझ्या नि माझ्या नजरेच जुळणं
आणि त्यातच होत आकाशातील
सप्त रंगांचे एकमेकात मिसळणं..


खुपदा तू नसून हि
जवळ असल्याचा भास होतो,
तो भास आहे हे कळल्यावर मात्र जीवाला त्रास होतो.


तुझ्या डोळयात पाणी येईल,
असे मी कधीही वागणार नाही,
कारण त्या अनमोल अश्रूंची किंमत मी कधीच चुकवू शकणार नाही..


मी तुला जाणले नाही,
असं कधीच झालं नाही,
माझ्या डोळ्यातली अबोध प्रेम
तुला कधी कळलच नाही.


नको पाहूस माझ्याकडे,
अशा वेगळ्या नजरेने
माझंही मन वेड होईल,
अशा तुझ्या पाहण्याने..


मनात चलबिचल आहे
होकार अन नकाराची
मनातलं ओठावर आणु
का ठेवु माझं मजपाशी..


Read More : Top good morning सुविचार 👈 वाचण्यासाठी यावर क्लिक करा.

Read More : love shayari marathi


खरं प्रेम जे तू पाहिलं,
जे मी केलं,
खरं प्रेम जे आता फक्त आठवणीतचं उरलं..


तूझ्या कुरळ्या केसांना सावरत,
तिरक्या नजरेने पाहिलसं मला…
अन माझ्या मनाला लागलं ध्यास,
आता बनवायचं माझं फक्त तुला…


वाटतं माझ्या हळव्या हद्यास,
कुणीतरी असावं प्रेम करणारं…
जणू सागराच्या पाण्यासारखं,
मला स्वतःत खोल सामावणारं….


तुझ्या आठवणींना आठवत,
माझं वेडं मन जगत होतं…
कधीतरी येशील तू जीवनात,
याच आशेवर वाट पाहत होतं…


हिवाळ्यातील हि गुलाबी हवा
सोबत ती हि असावी
घट्ट मारलेल्या मिठीत
शिरण्यास थंडीसही जागा नसावी..


तुझ्यावरचे प्रेम व्यक्त करणं,
मला काही जमत नाही
तुझ्या आठवणी शिवाय,
मन मात्र कशात रमत नाही..


बर्फासारख्या थंडी मध्ये,
तुझ्या मिठीत लपावसं वाटतं
एका जन्माचं आयुष्य,
एका क्षणात जगावसं वाटतं..


प्रेमात नसते कधी शिक्षा
प्रेमच घेत राहते प्रेमाची परीक्षा
करून तर बघा निस्वार्थी मनाने
उगाच कशाला ठेवता मनात अपेक्षा..


Read More : काळजाला भिडणाऱ्या अस्सल प्रेम कविता 👈 क्लिक करा


खरं प्रेम जे तू पाहिलं,
जे मी केलं,
खरं प्रेम जे आता फक्त आठवणीतचं उरलं..


तुझ्या मनाचे दार
जेव्हा मी हळूच लोटलं
माझंच प्रतिबिंब
तेव्हा मला भेटलं…..


तूझ्या कुरळ्या केसांना सावरत,
तिरक्या नजरेने पाहिलसं मला…
अन माझ्या मनाला लागलं ध्यास,
आता बनवायचं माझं फक्त तुला…


जवळ तिच्या असताना,
शब्दांना फुटली ना भाषा…
विसरुन जात मन माझं सार,
अशी तिच्या प्रेमाची नशा…


अनेक जण भेटतात..
खूप जण आपल्या जवळ येतात
आणि दुरावतात ही…
अनेक जन आपल्याला शब्द देतात
आणि विसरतात ही…
सूर्यास्ता नंतर स्वताःची सावलीही दूर जाते..
शेवटी आपण एकटेच असतो
आणि.. सोबत असतात फक्त आणि फक्त आठवणी.


आजकाल प्रेम तुझं आधी
सारखं दिसत नाही…
तुझी मिठीही तेवढी
घट्टपणे बसत नाही ..


आज पुन्हा तुझी आठवण आली
आणि मी उगीच हसु लागलो
खोटं खोटं हसताना…
कळलेच नाही, कधी रडु लागलो…


अश्रु लपविण्यांच्या प्रयत्नांत,
मग मी मलाच दोष देत राहते
आणि या खोट्या प्रयत्नांत,
तुला आणखीनच आठवत राहते..


अशाच एका वळणावरती
तुझी-माझी भेट झाली…
तेव्हापासून या ह्रदयाला तुझ्या
भेटीची ओढ लागली…⁠⁠⁠⁠


अलगद धरलेला हात तू
अलगदच सोडला होतास
आणि स्वप्नात बांधलेला संसार
तू अलगदच मोडला होतास..


आडोशाला उभा राहून,
तुला पाहत असतो कित्येकदा…
बघ माझ्याकडेही तू ,
जरा मागे वळून एकदा…


अजूनही जातो त्याच बागेत
रातराणी फ़ुलताना
पण मला फ़क्त दिसते
सकाळी ती कोमेजताना…


या सौद्यातील नफा तोटा
नाहीच तसा लपण्यासारखा …..
तुझ्या प्रेमात मला मिळाला
एक विरह जपण्यासारखा…


मला विसरण्याची तुझी
सवय जुनी आहे …..
तुझ्या आठवणीत माझी
रात्र सुनी आहे..


मी मुद्दामच छत्री आणत नाही,
पाऊस येणार म्हणून,
मला भिजताना पहिले,
तू छत्रीत घेणार म्हणून..


मला आवडतो पाऊस,
गुलमोहराला फुलावणारा,
अन, तेवढ्याच मायेने,
बाभळीला हि झुलवणारा…


नुसती उत्तरे द्यावी लागतात,
वेड्यासारखं वागल्यावर,
पण वेड्यासारखं वागायला होतं,
पाऊस पडायला लागल्यावर…


आठवणीतला पाऊस नेमका,
तुझ्या घरापाशी बरसतो,
माझा वेडा चातक पक्षी इथे,
एका थेंबासाठी तरसतो..


माझ्या ओठावरचं हसु,
आहे साक्ष तु आठवल्याचं.
आठवणी तुझ्या आठवुन,
क्षणभर जगाला विसरल्याचं..


तुझे काय ते तुला माहित
प्रेम माझे खरे होते
तुला ओळखता नाही आले
मी तर सर्वस्व तुला वाहिले होते..


तु जरी नसती आलीस जीवनात
तरी जगलो असतो..
श्वास घेण्याच निमित्त मात्र जन्मभर
शोधत राहिलो असतो…


जरी शिक्षण घेण्यासाठी लावलेलं कॉलेज आहे
तरी,कॉलेजपेक्षा जास्त कट्ट्यावरच नॉलेज आहे..


प्राण माझा असला तरी,
श्वास मात्र तुझाचं आहे..
प्रेम माझे असले तरी,
सुगंध मात्र तुझाचं आहे…


मैत्रीमध्ये जरुरी नाही दररोजची भेट,
ह्रदयाचा ह्रदयाशी संवाद असता थेट..


कुणीच कुणाचा नसतो साथी
देहाची आणि होते माती
आपणच आपल्या जीवनाचे सोबती
कशाला हवी ही खोटी नाती..

Leave a Comment