Indian Cricket News In Marathi: भारतीय संघात खेळणे प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असते. आणि ही संधी लाखो खेळाडू पैकी काही नशीबवणांच्याच वाट्याला येते.आश्याच यादीत आपले नाव दाखल करण्यात मनोज तिवारीला सुधा यश आले.
भारतीय क्रिकेटपटू आणि पश्चिम बंगाल सरकारमधील क्रीडामंत्री असलेले मनोज तिवारी यांनी सर्वांचे आभार करत सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली. सर्व फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर मनोज तिवारीने स्वतः चा एक फोटो ट्रिट करून धन्यवाद लिहिले.
मनोज तिवारी हा अष्टपैलू आसून उजव्या हाताचा फलंदाज होता आणि लेगब्रेक गोलंदाजी करायचा. भारतीय संघात खेळण्या बरोबरच स्थानिक क्रिकेटमध्ये आणि आयपीएल मध्ये ही उत्कृष्टी कामगिरी करून दाखवली होती.
बंगालचे संघाचे प्रतिनिधित्व करण्याबरोबरच मनोज तिवारी आयपीएलमध्ये एम.एस. धोनीच्या नेृत्वाखाली
तसेच तिवारीने इंडियन प्रीमियर लीगमध्ये दिल्ली डेअर डेव्हिल्स, कोलकाता नाईट रायडर्स, किंग्ज इलेव्हन पंजाब आणि इतर संघांचे प्रतिनिधित्व केले असून आपले सर्वात प्रदर्शन केले आहे.
मनोज तिवारीने भारतासाठी कमी काळ दिला असला तरी कामगिरी खूप चांगली होती. त्यांनी १२ एकदिवसीय आणि ३ टी-२० सामन्यांमध्ये भाग घेतला. एकदिवसीय सामन्यात त्यांनी एक शतक आणि अर्धशतक केले असून आपले एकमेव शतक (१०४) वेस्ट इंडिजविरुद्ध झळकावले होते.
क्रिकेटच्या प्रवासातून विराम घेताना मनोज तिवारीचे वक्तव्य:
क्रिकेटला अलविदा.. या खेळाने मला सर्व काही दिले आहे, म्हणजे ते सर्व काही ज्याचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता. मी या खेळाचा आणि देवाचा सदैव ऋणी राहीन, जो नेहमी माझ्या पाठीशी असतो. व्यक्त होण्याची ही संधी मी घेतो. माझ्या क्रिकेटच्या प्रवासात ज्यांनी भूमिका बजावली त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. माझ्या लहानपणापासून गेल्या वर्षापर्यंत माझ्या सर्व प्रशिक्षकांचे आभार.
• मनोज तिवारी