Marathi Goshti : नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या वेबसाइटवर. जर तुम्ही stories in marathi, moral stories in marathi, marathi katha, सुंदर छान छान मराठी गोष्टी, संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत. मी आशा करतो की तुम्हाला आमच हे stories with moral in marathi, कलेक्शन नक्की आवडल ,जर आवडले तर सोशल मीडिया वर जरूर शेयर करा आणि अश्याच भारी भारी पोस्ट्स साठी आमचा ब्लॉग inmarathi.in ला आवश्य भेट दया…
.
Marathi Goshti : कुणाला कमी समजू नये..
प्रयाग (गया) येथे एक खूप चांगले पंडित राहत होते. एकदा नेपाळचे राजे सामान्य वेशात पंडितांमागे फिरू लागले, माझ्या आजोबांचे पिंडदान करून द्या, माझ्याजवळ काहीच पैसे नाहीत. थोडेसे लाडू भरून आणलेत तेच दक्षिणा म्हणून स्वीकार करून घ्या. जे लोभी पंडित होते त्यांना पैशाची हाव होती त्यांनी या सामान्य वेशातील राजांना नकार दिला. अशा वेळेस राजांना तेथील एक पंडित गाठ पडला. त्याला महाराजांनी पिंडदान करण्याची विनंती केली. त्याने ती कबूल केली. तो म्हणाला, भाऊ! पैशाची काही बाब नाही. मी पिंडदान करून देतो.
त्या पंडिताने फाटक्या तुटक्या कपडय़ात आलेल्या राजांचे पिंडदान पूर्ण करून दिले. यावर महाराज खूश झाले. त्या वेळेस ते त्याला म्हणाले, पंडितजी! या कार्यानंतर काही न काही दक्षिणा मी तुम्हास देणे लागतो. मी घरून काही लाडू आणले आहेत त्याचा तुम्ही स्वीकार करावा. मात्र या लाडूचे गाठोडे तुम्ही घरी जाऊन उघडावे.
पंडित म्हणाले, बरं भाऊ, तुम्ही गरीब दिसता पण तुम्ही प्रेमाने दिलेल्या लाडूचा मी स्वीकार करतो. या नंतर पंडितास ते गाठोडे देऊन राजे निघून गेले. पंडिताने घरी जाऊन जेवायला बसायची तयारी केली. अचानक त्याला लाडूची आठवण झाली त्यावर त्याने ते गाठोडे सोडून पाहिले असता तो चकित झाला. कारण त्या गाठोडय़ात वीस सोन्याचे लाडू होते.
तात्पर्य – कधीही कुणाला कमी समजू नये कारण कोणत्या रुपात कोण असेल याचा भरवसा नाही.
Marathi Goshti : आई ती आई
मूल होत नसलेल्या एका बाईने दुसर्या एका बाईचे दोन तीन महिन्यांचे मूल पळविले. खऱ्या आईला चोरट्या बाईचा पत्ता लागताच, ती तिच्याकडे गेली व आपले मूल मागू लागली; पण ती चोरटी बाई ते मूल आपले च असल्याचा कांगावा करु लागली. अखेर ते प्रकरण न्यायालयात नेले गेले. न्यायमुर्ती अत्यंत चतूर होते. त्यांनी दोघींनाही अनेक प्रश्न विचारले, परंतु दोघीनीही अशी चपलख उत्तरे दिली, की न्यायमुर्तींनाही या दोघींतली खरी आई कोण ?’ हा प्रश्न पडला.
अखेर न्यायमुर्ती त्या दोन बायांना खरे वाटेल अशा तऱ्हेनं मुद्दाम म्हणाले, ‘ज्या अर्थी तुम्ही दोघीही हे मूल आपलेच असल्याचा दावा करता, व हे मूल नक्की कुणाचे आहे हे कळणे कठीण आहे त्या अर्थी मी या मुलाला कापून त्याचा अर्धा अर्धा भाग तुम्हा दोघींपैकी प्रत्येकाला देण्याचा सेवकाला हुकुम सोडतो.’
न्यायमुर्तींचा हा कठोर निर्णय ऎकून चोरटी बाई गप्प बसली, पण त्या बालकाची खरी आई कळवळून व हात जोडून न्यायमुर्तींना म्हणाली, ‘महाराज, असे कठोर होऊन माझ्या बाळाचा जीव घेऊ नका. वाटल्यास माझं बाळ या बाईला द्या, पण असं काही करु नका. कुणीकडे का असेना, माझं लेकरु सुखरुप असलं की झालं.
महाराज ! घालाल ना एवढी भिक्षा मला ?’ त्या बाईच्या अंतरीचं ते अपत्यप्रेम पाहून न्यायमुर्ती त्या लुच्च्या बाईला म्हणाले, ‘हे बालक या बाईचंच आहे. ‘त्याला कापण्यात यावं, ‘असं मी मुद्दामच खोट बोललो. पण त्यामुळे तुझा उघड झाला. तू जर खरोखरच या बालकाची आई असतीस तर मी असा कठोर निर्णय दिल्यानंतर, अशी निर्विकारपणे बघत राहिली नसतीस. दे ते बाळ त्या बाईला परत.’
अशा रीतीनं त्या चोरट्या बाईच्या ताब्यात असलेलं मूल त्याच्या खऱ्या आईला देण्यात येऊन, न्यायमुर्तींनी त्या चोरट्या बाईला पाच वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली.
Marathi Goshti : मोहामुळे भिकारी ठरला दुर्दैवी !
एक भिकारी दिवसभर पुष्कळ नामजप करायचा. देवाला त्याची दया आली. एक दिवस देव प्रगट झाला आणि त्याने भिका-याला ‘काय हवे ते माग’, असे सांगितले. भिका-याने सोन्याच्या मोहरा मागितल्या. देव म्हणाला, ‘‘मोहरा कशात घेणार ?’’ भिका-याने झोळी पुढे केली. मोहरा ओतण्यापूर्वी देव म्हणाला, ‘‘तू ‘पुरे’म्हणेपर्यंत मी मोहरा ओतत राहीन; पण एक अट – मोहरा झोळीतून भूमीवर पडता कामा नयेत. भूमीवर पडलेल्या मोहरेची माती होईल.’’ भिका-याने अट मान्य केली.
देव भिका-याच्या झोळीत मोहरा ओतू लागला. हळूहळू झोळी भरत आली. भिका-याला सोन्याचा मोह आवरेनासा झाला. मोह-यांच्या भाराने आता झोळी फाटू शकते, हे लक्षात येऊनही भिकारी ‘पुरे’ म्हणेना. शेवटी व्हायचे तेच झाले. झोळी फाटली आणि सर्व मोहरा मातीमोल झाल्या !समाधानी वृत्ती नसलेला भिकारी दुर्दैवी ठरला !
तात्पर्य – मित्रांनो, भिकारी कोठे चुकला, ते ओळखा. तुम्हालाही सदोदित आनंदीरहायचे असेल, तर ‘समाधानी वृत्ती’ ठेवा.
Marathi Goshti : लोभी विक्रेता
एकदा एक व्यापारी आपल्या वस्तू विकायला गावात येतो. त्या गावात एक लहान मुलगी आपल्या आजीबरोबर राहत असते. तिला कानात घालण्यासाठी कानातले घ्यायचे असते. पण तिच्याकडे पैसेच नसतात. ती आपल्या आजीला सांगते कि आपण आपली जुनी ताट विकून मला कानातले घेऊयात का? आजी तयार होते. आजी तिच्याकडे एक ताट देते.
ती लहान मुलगी ते ताट घेऊन व्यापाऱ्याकडे जाते. व्य्पारी ते ताट नित निरखून पाहतो. त्याला समजते हे ताट सोन्याचे आहे. पण तो मुलीला ते सांगत नाही. उलट तो तिला म्हणतो या ताटाला काहीच किंमत मिळणार नाही. मुलगी नाराज होते. त्या दुकानदाराला तो ताट फुकट घ्यायचे असते म्हणून तो ते परत देऊन टाकतो.
त्या दुकानदाराला तो ताट फुकट घ्यायचे असते म्हणून तो ते परत देऊन टाकतो.
थोड्या दिवसांनी दुसरा एक विक्रेता येतो. त्या मुलीला पुन्हा कानात घालण्यासाठी कानातले घ्यायच्या असतात. तिची आजी पुन्हा तेच ते ताट त्या दुसर्या विक्रेत्याला दाखवते. तो त्या आजीला सांगतो कि, आजी हे ताट सोन्याचे आहे. आजीला आश्चर्य वाटते. तो विक्रेता त्या ताटाच्या मोबदल्यात त्यांना त्याच्याकडील सर्व वस्तू देऊन टाकतो.
थोड्या दिवसांनी पुन्हा तो हावरट, लोभी दुकानदार येतो. ताटाबद्दल चौकशी करतो. आजी चांगलीच भडकते. खरा प्रकार लक्षात आल्यावर तो पळून जातो.
तात्पर्य – नेहमी खरे बोलावे आणि प्रामाणिक राहावे.
Marathi Goshti : जशी करणी तशी भरणी
एका गावात एक माणूस राहत असतो. त्याच्या पत्नीचे नाव होत शांताबाई. शांताबाई दिसायला खूप सुंदर होती. तो आपल्या पत्नीवर म्हणचे शांताबाईवर खूप प्रेम करत असे. पण शांताबाईचा स्वभाव खूप क्रूर असतो. ती आपल्या सासू-सासऱ्याशी नीट वागत नसे, नीट बोलत नसे. ते अंध असतात म्हणून ती सासू-सासऱ्याशी छळत असते.
एक दिवस शांताबाई त्याच्या नवऱ्याला सांगते कि तुमच्या आई वडिलांना जंगलात सोडून या. मी त्यांची काळजी घेणार नाही. सुरुवातीला नवरा काही ऎकत नाही. काही दिवसांनी ती त्याला सारखे- सारखे तेच सांगू लागली त्यामुळे शेवटी निर्णय घेतला बायकोचे ऎकुन तो आपल्या अंध आई-वडिलांना जंगलात सोडून येतो. त्याचे आई-वडील त्याची विनवणी करतात. आम्ही अंध आहोत आम्हाला सोडून जाऊ नकोस. पण तो त्यांचे काहीच ऎकत नाही.
आई-वडिलांना सोडून येत असतांना तो एका खोल खड्यात पडतो. त्याच्या पायांना मोठी दुखापत होते. तिथून एक साधू जात असतो तो त्याला बाहेर काढतो त्याच्या पायाला खूप लागले असते . त्यामुळे तो अपंग होतो.
त्याला कळते आपण आपल्या अंध आईवडिलांना एकटेच सोडल्यामुळे देवाने आपल्याला शिक्षा दिली. तो आईवडिलांकडे जातो. त्यांची क्षमा मागतो व त्यांना घरी आणतो.
तात्पर्य – संस्काराची बीजे लहानपणीच पेरले जातात.
Marathi Goshti : आचार्य विनोबा भावे:-
भूदान चळवळीच्या काळातील ही गोष्ट आहे. या चळवळीचे प्रणेते आचार्य विनोबा भावे होते. त्यांची पदयात्रा सुरु होती. आपल्या काही शिष्यांसह विनोबाजी मीराजींच्या आश्रमात थांबले होते. अल्पशा विश्रांतीनंतर त्यांची पदयात्रा पुन्हा सुरु झाली. त्यावेळी ते हरिद्वारकडे चालले होते. विनोबाजींची प्रकृती थोडी ठीक नव्हती. त्यांची कंबर आणि पाय दुखत होते. त्यामुळे त्यांना खुर्चीत बसवून नेण्यात येत होते. मध्ये मध्ये खुर्चीतून उतरून पायी चालायचे. तेव्हा एक शिष्य त्यांच्याजवळ येऊन म्हणाला,” बाबा, मला खूप राग येतो, मी काय करावे” विनोबाजी म्हणाले,” मी लहान असताना मलाही खूप राग यायचा, मग माझ्याजवळ मिश्री असायची ती मी तोंडात ठेवायचो, परंतु कधीकधी ती ही नसायची” मग तुम्ही काय करत होता असे त्या व्यक्तीने विचारले. विनोबाजी म्हणाले,” मी यावर खूप विचार केला, मग माझ्या मनात एक गोष्ट आली. जेव्हा आपल्या मनाविरूद्ध एखादी गोष्ट आली जेव्हा आपल्या मनाविरूद्ध गोष्ट घडली तर लगेच नाराज होतो जर तो क्षणच आपण टाळला तर रागावर विजय मिळवू शकतो. आनंद आणि नाराजी यावर आपण तेव्हाच प्रकट करतो तो पहिलाच क्षण आपल्यावर वरचढ ठरू पाहतो. तो क्षण टाळणे कठीण आहे. पण मनन करून तो टाळता येतो. मी यावर खूप मनन केले, यामुळेच जीवनात कितीही मोठी आपत्ती आली तरी मी संयम ढळू दिला नाही.”
तात्पर्य – विचारपूर्वक उचललेले पाऊल आयुष्याला योग्य दिशा देते.
Marathi Goshti : गुरूदक्षिणा
एक दिवस गुरू ज्ञानदेव हे नदीच्या काठावर साधना करण्यात गुंग होते. तेव्हा त्यांचा एक शिष्य त्यांच्याजवळ आला. त्याने गुरूंच्या प्रति भक्ति आणि समर्पणाची भावना म्हणून त्यांच्या पायाजवळ दोन अमूल्य असे मोती ठेवले. ते मोती म्हणजे त्याच्याकडून गुरूंना दक्षिणा होती. मोतींच्या स्पर्शाने गुरूंनी आपले डोळे उघडले आणि शिष्याला विचारले, “हे सगळे काय आहे?”
शिष्य म्हणाला, “गुरूजी हे मोती माझ्याकडून तुम्हाला गुरूदक्षिणा आहे. कृपया तुम्ही याचा स्वीकार करा.”
गुरूंनी दोन्ही मोती हातात घेतले, त्यातील एक मोती हातातून निसटून नदीत जाऊन पडला. शिष्याने पाण्यात उडी मारली. तो खूप वेळ मोती शोधत होता. शेवटी निराश होऊन त्याने गुरूंना विचारले, “तुम्ही बघितले का, मोती कुठे पडला ते! तुम्ही मला ती जागा सांगितली तर तो शोधून मी तुम्हाला परत आणून देईन.”
गुरूंनी दूसरा मोती उचलला आणि तोही नदीत टाकत ते म्हणाले, “तेथे पडला होता.”
त्यांचे तसे वागणे पाहून शिष्याला समजले की, हा अनमोल मोती त्याच्यासाठी किंमती असू शकेल परंतु गुरूंना त्याची काहीही गरज नाही. त्याने दक्षिणा देण्याच्या स्वरूपात चुकीच्या वस्तुचा अवलंब केला होता.
तात्पर्य – यावरून आपणास समजते की, गुरूंच्यामुळे मिळालेले ज्ञान हे अतिशय अनमोल असते, त्याची आपण काहीही किंमत लावू शकत नाही.
Marathi Goshti : लौकिक राजा
जनकराजाच्या ज्ञानी अलिप्तपणाची ही कथा. राजा जनक कीर्तन ऐकण्यात दंग होता. कीर्तन अगदी रंगात आले होते.
इतक्यात एक रक्षक धावत आला आणि त्याने जनकाच्या कानात हळूच सांगितले, ‘महाराज! राजवाडयाला आग लागली आहे.’
जनक म्हणाला, ‘मी कीर्तन ऐकतो आहे. देवाची भक्ती करतो आहे. आत्ता काही सांगू नको. नंतर ये.’
थोडा वेळ गेला. रक्षक पुन्हा धावत आला. म्हणाला, ‘महाराज!आग भडकली आहे. कोठीघरार्पत थोडया वेळातच पसरेल.’
तरीही जनक स्तब्धच होता. कीर्तन सुरूच होते.
तेवढयात रक्षकाने तिसरी बातमी आणली, ‘महाराज! आपला राजवाडा जवळजवळ जळून खाक झाला आहे आणि आता आग शहरात पसरण्याची शक्यता आहे. सार्या प्रजेची घरं जळून खाक होतील.’
हे ऐकल्यावर मात्र जनक ताडकन उठला. म्हणाला, ‘किर्तन थांबवा. मी गावात जातो. सगळ्या प्रजेच्या रक्षणाची काळजी मला घ्यावी लागेल. ती माझी जबाबदारी आहे.’
म्हणजे राजाला स्वत:चा राजवाडयाचे दु:ख नव्हते. प्रजेचा जीव, मालमत्ता त्याला वाचवायची होती.
तात्पर्य – कर्तव्याला लिप्त आणि स्वत:च्या सुखसोयीशी अलिप्त राहिले तरच व्यक्तीचा लौकिक शतकानुशतके राहतो.
हे सुद्धा वाचा :
20+ मराठी बोधकथा | Stories in marathi
छान छान मराठी बोधकथा | 10+ Small stories in marathi with moral