{Best} marathi grammer | मराठी व्याकरण

इथे तुम्हाला काय काय बघायला मिळणार आहे.

व्याकरणाच्या अभ्यासाचे महत्व (marathi grammer) :

भाषेची देवाणघेवाण म्हणजेच भाषेचा व्यवहार व्यवस्थित रीतीने चालावा यासाठी काही नियम ठरविण्यात आले आहेत या नियमांनाच व्याकरण असे म्हणतात. भाषेच्या अंगभूत नियमांची व्यवस्था म्हणजेच भाषेचे व्याकरण होय. व्याकरण म्हणजे भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र होय.       

 व्याकरण हा शब्द वि  आ  कृ (= करण) यांपासून बनला आहे. याचा शब्दश: अर्थ स्पष्टीकरण असा आहे. भाषेचे व्यवहार ज्या नियमांनी ठरविले जातात ते नियम स्पष्ट करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण होय असे श्रीपाद भागवत यांनी म्हटले आहे.          

महर्षी पतंजलींनी व्याकरणाला ‘शब्दानुशासन’ असे नाव दिलेले आहे. अनुशासन म्हणजे नियमन, शिस्त. आपल्या भाषेतील शब्दातील वर्ण, त्यांचे उच्चार, शब्दसिद्धी, वाक्यरचना, वाक्यातील पदांचे, शब्दांचे परस्परसंबंध इत्यादी बाबतीत नियम घालून देणारे शास्त्र म्हणजे व्याकरण.    

व्याकरण हे भाषेचे रचनास्वरूप आदर्श कसे असावेत हे प्रतिपादन करणारे शास्त्र आहे. भाषास्वरुपात बदल होत जाणे हे भाषेच्या जिवंतपणाचे लक्षण असते. भाषा ही स्थलकालानुरूप बदलत जाते.           
भाषेची घडण समजून घेताना प्रथम लक्षात येते की भाषा वाक्यांनी बनते, वाक्य शब्दांनी बनतात आणि शब्द वर्णानी बनतात. (marathi grammar)

व्याकरणाच्या अभ्यासाचे घटक :
१. वर्णविचार
२. शब्दविचार
३. वाक्यविचार 

Read More : मराठी निबंध यांचा संग्रह (essay in marathi पाहण्यासाठी यावर क्लिक करा..

शब्दविचार :

शब्द आणि पद :-

तोंडावाटे निघणा-या मूलध्वनींना आपण वर्ण असे म्हणतो.  
हे ध्वनी आपण कागदावर लिहून दाखविताना विशिष्ट चिन्हे दाखवितो, वापरतो.  हे ध्वनींच्या चिन्हांना आपण अक्षरे असे म्हणतो.

उदाहरणार्थ:- 

ब, द, क ही तीन अक्षरे आहेत.  ही अक्षरे विशिष्ट क्रमाने आल्यामुळे त्यांना अर्थ प्राप्त झाला आहे, म्हणून ‘बदक’ हा शब्द तयार झाला.
एखाद्या शब्दाला किंवा शब्दसमूहाला पूर्ण अर्थ प्राप्त झाला तर त्याला आपण वाक्य असे म्हणतो.

‘बदक पाण्यात पोहते’ हे वाक्य आहे.  

या वाक्यात तीन पदे आहेत. पद व शब्द यांत थोडा फरक आहे.  

‘पाणी’ हा शब्द आहे.

‘पाण्यात’ हे पद आहे.  

वाक्यात वापरताना शब्दाच्या मूळ स्वरुपात बदल करुन त्या शब्दाचे जे रुप तयार होते, त्यास पद असे म्हणतात, पण व्याकरणात पदांना देखील स्थूलमानाने ‘शब्द’ असे म्हटले जाते

Read More : पत्रलेखन कसे करावे (how to write letter writting) पाहण्यासाठी यावर क्लिक करा

वर्णविचार :

कोणताही विचार पूर्ण अर्थाचा असला की त्याला ‘वाक्य’ असे म्हणतात. वाक्य म्हणजे पूर्ण अर्थाचे बोलणे होय. वाक्यातील शब्दांना पद असे म्हणतात. वाक्य शब्दांनी किंवा पदांनी बनलेले असते.

marathi-grammer
marathi-grammer

ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला काही अर्थ प्राप्त झाला तर त्याला शब्द असे म्हणतात. शब्द हे अक्षरांनी बनलेले असतात. अक्षरे या आपल्या ध्वनीच्या किंवा आवाजाच्या खुणा आहेत म्हणून अक्षरांना ध्वनिचिन्हे असे म्हणतात.

आपल्या तोंडावाटे निघणा-या मुलध्वनींना आपण वर्ण असे म्हणतो. हे ध्वनी हवेत विरतात व नाहीसे होतात ते नष्ट होऊ नयेत म्हणून आपण लिहून ठेवतो. (आपण ते रंगाने म्हणजे वर्णाने लिहन ठेवतो म्हणून त्यांना वर्ण असे म्हणतात.) लिहून ठेवल्यामूळे ध्वनी हे नाश पावत नाहीत ते कायम राहतात म्हणून त्यांना अक्षर (म्हणजे नाश न पावणारे) असे म्हणतात.  

मराठी भाषेतील वर्णमाला पुढीलप्रमाणे आहे.         

वर्णमाला ( Alphabets)

मराठी भाषेतील वर्णमाला पुढीलप्रमाणे आहे –          

स्वर :- अ आ इ ई उ ऊ ऋ लृ ए  ऐ ओ ऑ औ      

स्वरादी : – (अं) : (अ:)

व्यंजने :-

क् ख् ग् घ् ङ् च् छ् ज् झ् ञ् ट् ठ् ड् ढ् ण्

त् थ् द् ध् न्  प् फ् ब् भ् म् य् र् ल् व् श् ष्

स् ह ळ 

संयुक्त व्यंजने :- क्ष न्

वर्णांचे प्रकार

१. स्वर :-

स्वर म्हणजे उच्चार करणे, ध्वनी करणे. या वर्णमालेतील अ पासून औ पर्यंतच्या बारा वर्णांना स्वर असे म्हणतात. स्वरांचा उच्चार करताना ओठांच्या किंवा जिभेच्या विविध हालचाली होत असतात पण ओठांचा एकमेकांशी किंवा जिभेच्या कोणत्याही भागाचा मुखातील कोणत्याही अवयवाशी स्पर्श न होता मुखावाटे जे ध्वनी बाहेर पडतात त्यांना स्वर असे म्हणतात. स्वरांचा उच्चार करतेवेळी हवेचा मार्ग अडवलेला नसतो. स्वर म्हणजे नुसते सूर.

२. स्वरादी :–

अं व अ: या दोन वर्णांना स्वरादी असे म्हणतात. यात अनुस्वार  व विसर्ग (:) असे दोन उच्चार आहेत. अनुस्वार व विसर्ग यांचा उच्चार करताना या वार्णांच्या अगोदर स्वर येतो म्हणून त्यांना स्वरादी असे म्हणतात.

उदाहरणार्थ-

अंगण, शंकर , किंकर, मन:स्थिती , दुःख

दोन नवे स्वरादी :- ओ, औ

हे नवे स्वरादी इंग्लिश भाषेतून आलेले आहेत.

उदाहरणार्थ-

बॅट, बॉल

अनुस्वार

स्पष्ट व खणखणीत उच्चांराना अनुस्वार असे म्हणतात, तर ओझरत्या अन अस्पष्ट उच्चारांना अनुनासिक असे म्हणतात.

अनुस्वाराचा उच्चार स्पष्ट व खणखणीत होतो असे काही शब्द आहेत.

उदाहरणार्थ-

गंगा, घंटा, उंट, इंधन, इत्यादी

काही वेळा अनुस्वरांचा उच्चार अस्पष्ट, ओझरता होतो.

उदाहरणार्थ-

देवांनी, घरांमध्ये 

विसर्ग –

विसर्ग याचा अर्थ श्वास सोडणे होय. विसर्गाचा उच्चार ‘ह’ या वर्गाला थोडा हिसडा देऊन केलेल्या उच्चारासारखा आहे.

३. व्यंजन :–

मराठी वर्णमालेतील क, ख,…….पासून ह, ळ पर्यंतचे वर्ण व्यंजन आहेत. ज्यांचा स्वतंत्रपणे उच्चार करता येत नाही त्यांना व्यंजने म्हणतात. ज्या वर्णाचा उच्चार स्वरांच्या साहायावाचून पूर्ण होत नाही त्यांना व्यंजने म्हणतात. व्यंजने अपूर्ण उच्चाराची आहेत हे दाखवण्यासाठी त्यांचा पाय मोडून लिहितात.(marathi grammar)

अक्षरे :-

अक्षरे म्हणजे पूर्ण उच्चारलेले वर्ण. अ आ इ ई वगेरे स्वर पूर्ण उच्चारांचे आहेत. सर्व स्वर व स्वरयुक्त व्यंजने यांना अक्षरे म्हणतात.

marathi-grammer

प्रत्येक व्यंजनात अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ए, ओ, औ हे दहा स्वर व अं, अ: यांची चिन्हे मिळवून आपण बारा अक्षरे तयार करतो त्याला आपण बाराखडी किंवा बाराक्षरी असे म्हणतात.

आपण जेव्हा क, ख, ग असा उच्चार करतो तेव्हा त्यात  ‘अ’ हा स्वर मिसळुन आपण त्याचा उच्चार करतो.

उदा :-

क् + अ = क

स्वरांचे प्रकार :

स्वरांचे मुख्य प्रकार दोन आहेत.

ह्रस्व स्वर व दीर्घ स्वर –

अ, इ, उ, ऋ, लु या स्वरांचा उच्चार आखूड होतो, त्यांचा उच्चार करण्यास कमी वेळ लागतो म्हणून त्यांना ह्रस्व स्वर असे म्हणतात.

आ, ई, उ, ऊ, ए, ए, ओ, औ या स्वरांचा उच्चार करण्यास अधिक वेळ लागतो, त्यांचा उच्चार लांबट होतो म्हणून त्यांना दीर्घ स्वर असे म्हणतात.

स्वरांचे इतर प्रकार-

संयुक्त स्वर –

दोन स्वर एकत्र येवून बनलेल्या स्वरांना संयुक्त असे म्हणतात.

ए, ए, ओ, औ, हे संयुक्त स्वर आहेत.

ह्रस्व स्वरांचा उच्चार करण्यास जो वेळ लागतो त्याला एक मात्रा मानतात.

दीर्घ स्वर व संयुक्त स्वर यांचा उच्चार करण्यास दोन मात्रा मानतात.

सजातीय स्वर व विजातीय स्वर –

एकाच उच्चारस्थानातून निघणार्‍या स्वरांना सजातीय स्वर असे म्हणतात.

उदाहरणार्थ :-

अ-आ , इ-ई, उ-ऊ 

भिन्न उच्चारस्थानातून निघणा-या स्वरांना विजातीय स्वर असे म्हणतात.

उदाहरणार्थ:-

अ-इ, अ-उ, इ-ए, ऊ-ए, अ-ऋ

व्यंजनांचे प्रकार :

व्यंजनाचे पाच प्रकारात वर्णन केले जाते.

१. स्पर्श व्यंजन (२५)

२. अर्धस्वर व्यंजन (४)

३. उष्मा, घर्षक व्यंजन (३)

४. महाप्राण व्यंजन (१)

५. स्वतंत्र व्यंजन (१)

स्पर्श व्यंजन :

एकूण व्यंजन २५ आहेत. ज्याचा उच्चार करतांना फुफुसातील हवा तोंडावाटे बाहेर पडतांना टाळू, कंठ, मुर्धा, दात, व ओठ यांचा स्पर्श करून बाहेर निघते म्हणून त्यांना स्पर्श व्यंजन म्हणतात.

उदाहरणार्थ:-

क, ख, ग, घ, ड, च, छ, ज, झ, त्र, ट, ठ, ड, द, ण, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म

स्पर्श व्यंजनाचे तीन प्रकारात वर्गीकरण केले जाते.

१. कठोर वर्ण 

२. मृदु वर्ण

३. अनुनासिक वर्ण  

१. कठोर वर्ण :–

ज्या वर्णाचा उच्चार करण्यास जोर द्यावा लागतो त्यांना कठोर वर्ण असे म्हणतात किंवा जे वर्ण उच्चारायला कठीण असतात, त्यांना कठोर वर्ण म्हणतात.

उदाहरणार्थ:-

क, ख च, छ ट, ठ त, थ प, फ

२. मृदु वर्ण :–

ज्या वर्णाचा उच्चार सौम्यपणे होतो त्यांना मृद वर्ण असे म्हणतात किंवा ज्या व्यंजनांचा उच्चार हळुवार असतो किंवा नाजूक असतो त्यांना मृदु वर्ण म्हणतात.

उदाहरणार्थ:-

ग, घ ज, झ ड, ढ द, ध ब ,भ

३. अनुनासिक वर्ण –

ज्या वर्णाचा उच्चार त्याच्या उच्चार स्थानासोबत काही अंशी नाकातूनही केल्या जातो त्यास अनुनासिक असे म्हणतात.

उदाहरणार्थ:-

ड, त्र, ण, न, म

अर्धस्वर व्यंजन –

य्,र्,ल्,व् यांची उच्चारस्थाने अनुक्रमे इ,ऋ,लृ,उ, या स्वरांच्या उच्चरस्थानासारखीच असल्याने या व्यंजनांचा वरील स्वरांशी निकटचा संबंध आहे. म्हणून त्यांना अर्धस्वर म्हणतात.

अर्धस्वर एकूण चार आहेत, स्वरांच्या क्रमानुसार अर्धस्वरांचा क्रम य,व,र,ल असा आहे.

उष्मे, घर्षक व्यंजन-

श्,ष्,स यांना उष्मे म्हणतात. वरील वर्णाचा उचार करतांना घर्षणामुळे उष्णता निर्माण होते,. त्यामुळे त्यांना उष्मे घर्षक व्यंजन असे म्हणतात.

महाप्राण व्यंजन-

ह् वर्णाचा उच्चार करताना फुफ्फूसातील हवा तोंडावाटे जोराने बाहेर फेकली जाते, म्हणून या वर्णाला महाप्राण असे म्हणतात.

उदाहरणार्थ-

ख् (क् + ह), घ् (ग् + ह), छ् (च् + ह), झ् (ज् + ह)

ख्,घ्,छ,झ्,ठ,ढ,थ्,ध,फ,भ्,श्,ष्,स, या वर्णात ह, या वर्णाची छटा असल्याने त्यांना सुध्दा महाप्राण असे म्हणतात. मराठीतील जो वर्ण इंग्रजीत लिहीतांना H अक्षर वापरावे लागते त्या सर्व वर्णाना महाप्राण व्यंजने म्हणातात.

बाकीचे अल्पप्राण आहेत. क्, ग्, ङ, च्, ज्, त्र, ट, ड, ण्, त्, द, न्, प्, ब्, म्, य, र, ल्, व्, ळ या व्यंजनाना अल्पप्राण असे म्हणतात. या वर्णात ‘ह’ ची छटा नसते.

स्वतंत्र व्यंजन –

ळ, हा मराठीतील स्वतंत्र वर्ण मानला जातो, तो इतर भाषेकडून घेतलेला नाही.

तालव्य :-

जेव्हा च, छ, ज आणि झ वर्गातील वर्णांस  ‘य’ हा वर्ण लागून उच्चार होत असेल तर त्याचा समावेश तालव्य गटात होतो.

उदाहरणार्थ:-

चित्र, छत्री, जेवण, झेल

दंत तालव्य :-

जेव्हा च, ज, झ वर्णांस  ‘अ’ हा वर्ण लागून त्याचा उच्चार होत असेल तर त्याचा समावेश दंततालव्य गटात होतो.

उदाहरणार्थ:-

चटकन, चोर, जहाज, जमाव, झरा, झाड.

क्ष व ज्ञ मुलध्वनी आहेत असे वाटते प्रत्यक्षात ती संयुक्त व्यंजने आहेत म्हणून त्यांचा समावेश वर्णमालेत करत नाहीत.

च, छ, ज, झ, त्र, य, श हे तालव्य वर्णं आहेत मात्र त्यांचा उच्चार य ने युक्त होतो.

उदाहरणार्थ:-

च्य, ज्य

च, छ, ज, झ यांचा उच्चार तालव्य व दंततालव्य असा दुहेरी होतो.

जोडाक्षरांचे लेखन :

एकच व्यंजन दोन वेळा जोडले गेले की त्या संयुक्त व्यंजनाला द्वित असे म्हणतात.

उदाहरणार्थ:- 

क + क = क्क,

त + त = त्त

ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने एकत्र येऊन शेवटी त्यात एक स्वर मिसळतो त्यास जोडाक्षरे असे म्हणतात.

उदाहरणार्थ:-

विद्यालय मध्ये या (द + य + आ ) 

मध्ये उभा दंड असणारी व्यंजने – क, फ        

शेवटी उभा दंड असणारी व्यंजने – ग , ण, श    

अर्धा दंड असणारी आणि अर्धी होऊ शकणारी व्यंजने – छ , ल, ळ     

अर्धा दंड असणारी पण अर्धी होऊ न शकणारी व्यंजने – ट, ठ, ड, ढ, द, ह       

दंड नसलेले व्यंजन – र        

मराठीत प्रत्येक वर्णाचा पूर्णोच्चार होतो. त्याशिवाय त्याचे लांबट व तोकडा (निभृत) असेही उच्चार होतात.

अलंकार :

अलंकार या शब्दाचा अर्थ दागिना असा आहे. दागिने घातल्यावर माणसाच्या शरीराला शोभा येते. तसेच लेखक कवी आपल्या मनातील आशय सुंदर, आकर्षक शब्दांतून, विविध कल्पनांनी सजवून व्यक्त करतात. यालाच आलंकारिक भाषा म्हणतात.  

अलंकार हा मुळातले सौंदर्य वाढवणारा घटक आहे.  

उदा.

ढगांशी वारा झुंजला रे

काळाकाळा कापुस पिंजला रे

आतां तुझी पाळी, वीज देते टाळी

फुलव पिसारा नाच !              

भाषेचे अलंकार :-

भाषेला ज्या गुणधर्मामुळे शोभा येते त्या गुणधर्मांना भाषेचे अलंकार असे म्हणतात.  

केव्हा दोन वस्तूंतील साम्य दाखवून, तर केव्हा विरोध दाखवून , केव्हा नाद निर्माण करणारे शब्द वापरुन, तर केव्हा एखादी कल्पना वाजवीपेक्षा अधिक फुगवून सांगून आपण आपली भाषा अधिक सुंदर किंवा पारिणामकारक करण्याचा प्रयत्न करतो.  (marathi grammer)  

केव्हा शब्दांतील अक्षररचनेमुळे नाद निर्माण होऊन भाषेला शोभा येते तर केव्हा योजिलेल्या शब्दांमुळे अर्थांचे सौदर्य खूलून दिसते.                

भाषेच्या अलंकाराचे दोन प्रकार पडतात.          

१. शब्दालंकार  

२. अर्थालंकार         

शब्दालंकार :

शब्दालंकार अलंकाराचे तीन उपप्रकार आहेत ते पुढीलप्रमाणे

अ) अनुप्रास अलंकार :-  

एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेंव्हा त्याला सौदर्य प्राप्त होते तेंव्हा अनुप्रास हा अलंकार होतो.

उदाहरणार्थ            

गडद गडद निळे जलद भरुनी आले, 

शीतलतनु चपलचरण अनिलगण निघाले.            

पेटविले पाषाण पठारावरती शिवबांनी ।

गळ्यामध्ये गरिबाच्या गाजे संतांची वाणी ।                

ब) यमक अलंकार :-

कवितेच्या चरणाच्या शेवटी, मध्ये किंवा ठराविक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगळ्या अर्थाने आल्यास यमक या अलंकार होतो.          

उदाहरणार्थ              

राज्य गादीवरी । काढी तुझ्या आठवणी

फळा आली माय । मायेची पाठवणी

पुष्पयमक या यमकाचे उदाहरण

सुसंगती सदा घडो,  

सृजनवाक्य कानी पडो, 

कलंक मातीचा झडो, 

विषय सर्वथा नावडो

दामयमक या यमकाचे उदाहरण

आला वसंत कवीकोकील हाही आला, 

आलापितो सुचवितो अरुणोदयाला

क) श्लेष अलंकार :-         

वाक्यात किंवा पद्यचरणात एकच शब्द दोन किंवा दोहोंपेक्षा जास्त अर्थांनी वापरल्यामुळे शब्दचमत्कृती साधली जाते, तेव्हा श्लेष अलंकार होतो.

एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी वापरल्यामुळे जेंव्हा शब्दचमत्कृती साधते तेंव्हा श्लेष हा अलंकार होतो.     

उदाहरणार्थ

मित्राच्या उद्याने कोणाला आनंद होत नाही.- अभंग श्लेष

हे मेघा, तू सर्वांना जीवन देतोस.- अभंग श्लेष          

ते शीतललोपचारे जागी झाले हळूच मग बोले

औषध नलगे मजला, परिसुनी माता बरे म्हणुनी डौले- अभंग श्लेष

श्रीकृष्ण नवरा मी नवरी  

शिशुपाल नवरा मी न-वरी- सभंग श्लेष  

कुस्करु नका ही सुमने  

जरी वास नसे तीळ यास, तरी तुम्हास अर्पिली सु-मने- सभंग श्लेष            

वरील ओळींमधील नवरी, न-वरी, सुमने, सु-मने, नलगे, न-लगे अशा रीतीने त्या त्या शब्दांची फोड केल्यानंतर दोन अर्थ कळून येतात या प्रकारच्या श्लेषाला सभंग श्लेष व एकच शब्द जसाच तसा ठेवून त्याचे दोन अर्थ संभवतात त्यास अभंग श्लेष म्हणतात.           

श्लेष हा शब्दालंकार आहे आणि अर्थालंकार ही आहे.

अर्थालंकार

अर्थालंकार अलंकाराचे काही उपप्रकार पुढीलप्रमाणे :-

१) उपमा अलंकार :-

दोन वस्तूतील साम्य चमत्कृतीपूर्णरीतीने जिथे वर्णन केलेले असते तिथे उपमा हा अलंकार होतो.

उदाहरणार्थ  

अ) मुंबईची घरे मात्र लहान, कबुतराच्या खुराड्यासारखी 

आ) सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी 

इ) आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे 

२) उत्प्रेक्षा अलंकार :- 

उत्प्रेक्षा म्हणजे कल्पना. ज्या दोन वस्तूंची आपण तुलना करतो त्यातील एक म्हणजेच उपमेय हि जणू काही दुसरी वस्तूच म्हणजेच उपमानच आहे, अशी कल्पना करणे यालाच उत्प्रेक्षा म्हणतात.

उदाहरणार्थ

ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू.

अत्रीच्या आश्रमी, नेले मज वाटे, माहेरची वाटे, खरेखुरे

किती माझा कोंबडा मजेदार, मान त्याची कितीतरी मजेदार  

शिरोभागी तांबडा तुरा हाले, जणू जास्वंदी फुल उमललेले  

अर्धपायी पंढरीशी विजार, गमे विहंगातीत बडा फौजदार

३. अपन्हुती अलंकार

उपमेयाचा निषेध करून ते उपमानच आहे असे जेंव्हा सांगितले जाते तेंव्हा अपन्हुती अलंकार होतो.

उदाहरणार्थ- 

आई म्हणोनी कोणी, आईस हाक मारी  

ती हाक येई कानी, मज होय शोककारी  

नोहेच हाक माते, मारी कुणी कुठारी

ओठ कशाचे ? देठची फुलले पारिजातकाचे              

हे हृद्य नसे, परी स्थंडिल धगधगलेले   

मानेला उचलीतो, बाळ मानेला उचलितो  

नाही ग बाई, फणा काढुनी नाग हो डोलतो           

४. रूपक अलंकार         

उपमेय व उपमान यात एकरूपता आहे, ती भिन्न नाहीत असे जेथे वर्णन असते तिथे रूपक अलंकार होतो.   

उदाहरणार्थ  

लहान मूल म्हणजे मातीचा गोळा, आकार दयावा तशी मूर्ती घडते.

उठ पुरुषोत्तमा, वाट पाहे रमा  

दावी मुखचंद्रमा सकळीकांसी

बाई काय सांगो, स्वामीची ती दृष्टी  

अमृताची वृष्टी, मज होय.                    

५. व्यतिरेक अलंकार   

उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असे वर्णन केले असेल तर व्यतिरेक हा अलंकार होतो.   

उदाहरणार्थ  

अमृताहून गोड, नाम तुझे देवा             

कामधेनुच्या दुग्धाहुनही ओज हीच बलवान       

तू माउलीहून मयाळ, चंदाहून शीतळ, 

पानियाहुनी पातळ, कल्लोळ प्रेमाचा         

सावळा ग रामचंद्र, रत्नमंचकी झोपतो,

त्याला पाहता लाजून, चंद्र आभाळी लोपतो      

६. अनन्वय अलंकार    

उपमेयाला दुस-या कशाचीच उपमा देता येत नसेल म्हणजे जेंव्हा उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते तेंव्हा अनन्वय अलंकार होतो. अन्वय = संबंध    

उदाहरणार्थ  

झाले बहु, होतील बहु, आहेताही बहु, परंतु यासम हा

आहे ताजमहाल एक जगती तो तोच त्याच्यापरी

या दानासी या दानाहुन अन्य नसे उपमान     

७. भांतीमान अलंकार         

उपमानाच्या जागी उपमेयच आहे असा भ्रम निर्माण होऊन तशी काही कृती घडली तर तिथे भ्रांतीमान अलंकार असतो.        

उदाहरणार्थ 

हसा विलोकुनी सुधाकर अष्टमीचा, 

म्या मनिला नितीलदेश तिचाच साचा  

शंख द्वयी धरुनी कुंकुम किरवाणी  

लावाक्या तिलक लांबविला स्वपाणी            

भृंगे विराजित नवी अरविंदपत्रे, 

पाहुनी मानुनी तिचीच विशाल नेत्रे  

घालीन अंजन अशा मातीने तटाकी  

कांते वृथा उतरलो, भिजलो विलोकी     

८. संसदेह अलंकार         

उपमेय कोणते किंवा उपमान कोणते असा संदेह किंवा संशय निर्माण होऊन मनाची जी विधा अवस्था होते त्या वेळी संसदेह हा अलंकार असतो.   

उदाहरणार्थ  

चंद्र काय असे, किंवा पद्य या संशयान्तरी, 

वाणी मधूर ऐकोनी कळले मुख ते असे  

चांदण्या रात्री गच्चीवर पत्नीच्या मुखाकडे पाहताना पतीला वाटले – 

कोणता मानू चंद्रमा ? भूवरीचा कि नभीचा ? 

चंद्र कोणता ? वदन कोणते ? 

शशांक मुख कि मुख शशांक ते? 

निवडतील निवडोत जाणते  

मानी परी मन सुखद सभमा मानू चंद्रमा, कोणता ?

९. अतिशयोक्ती अलंकार

कोणतीही कल्पना आहे त्यापेक्षा खूप फुगवून सांगताना त्यातील असंभाव्यता अधिक स्पष्ट करून सांगितलेली असते त्या वेळी अतिशयोक्ती हा अलंकार होतो.            

उदाहरणार्थ  

दमडीच तेल आणल, सासूबाईच न्हान झाल, 

मामंजीची दाढी झाली, भावोजींची शेंडी झाली, 

उरल तेल झाकून ठेवल, लांडोरीचा पाय लागला, 

वेशीपर्यत ओघळ गेला, त्यात उंट पोहून गेला.  

जो अंबरी उफळता खुर लागलाहे

तो चंद्रमा नीज तनुवरी डाग लाहे 

१०. दृष्टांत अलंकार

एखाद्या विषयाचे वर्णन करून झाल्यानंतर ती गोष्ट पटवून देण्यासाठी त्याच अर्थाचा एखादा दाखला किंवा उदाहरण दिल्यास दृष्टांत अलंकार होतो.

उदाहणार्थ 

लहानपण दे गा देवा, मुंगी साखरेचा रवा, 

ऐरावत रत्न थोर, त्यासी अंकुशाचा मार        

न कळता पद अग्नीवरी पडे, न करी दाह असे न कधी घडे  

अजित नाम वदो भलत्या मिसे, सकल पातक भस्म करीतसे

११. अर्थांतरन्यास अलंकार

एखाद्या सामान्य विधानाच्या समर्थनात विशेष उदाहरणे किंवा विशेष उदाहरणांवरून शेवटी एखादा सामान्य सिद्धांत काढला तर अर्थातरन्यास हा अलंकार होतो. (अर्थांतर -दुसरा अर्थ, न्यास = शेजारी ठेवणे) (marathi grammer)  

उदाहरणार्थ 

बोध खलास न रुचे अहिमुखी दुग्ध होय गरळ  

श्वानपूछ नलिकेत घातले होईना सरळ

एका हाते कधीतरी मुली वाजते काय टाळी

सावळा वर बरा गौर वधूला

जातीच्या सुंदराना काहीही शोभते

मूळ स्वभाव जाईना

का मरणी अमरता ही न खरी ?

अत्युची पदे थोरही बिघडतो हा बोल आहे खरा

१२. स्वभावोक्ती अलंकार

एखाद्या व्यक्तीचे, प्राण्याचे, वस्तूचे त्याच्या स्वाभाविक स्थितीचे किंवा हालचालीचे ययार्थ म्हणजेच हुबेहूब पण वैशिष्ट्यपूर्ण वर्णन हाही भाषेचा एक अलंकार ठरतो याला स्वभावोक्ती अलंकार असे म्हणतात.

उदाहरणार्थ

गणपत वाणी विडी पिताना चावायचा नुसतीच काडी, 

म्हणायचा अन मनाशीच की ह्या जागेवर बांधीन माडी, 

मिचकावुनी मग उजवा डोळा आणि उडवूनी डावी भिवई, 

भिरकवुनी तो तशीच द्यायचा लकेर बेचव जशी गवई    

पोटीच एक पद लांबविला दुजा तो, 

पक्षी तनु लपवी, भूप तया पाहतो          

मातीत ते पसरले अतिरम्य पंख, 

केले वरी उदर पांडूर निष्कलंक , 

चंचू तशीच उघडी पद लांबविले  

निष्प्राण देह पडला श्रमही निमाले                  

१३. अन्योक्ती अलंकार 

ज्याच्याबद्दल बोलायचे त्याच्याबद्दल काहीच न बोलता दुस-याबद्दल बोलून आपले मनोगत व्यक्त करण्याची जी पद्धत तिलाच अन्योक्ती असे म्हणतात. अन्योक्तीला अप्रस्तुत प्रशंसा असेही म्हणतात.               

उदाहणार्थ  

येथे समस्त बहिरे बसतात लोक, का भाषणे मधून तू करीशी अनेक  

हे मूर्ख यास किमपिही नसे विवेक, रंगावरून तुझला गणतील काक                      

१४. पर्यायोक्त अलंकार            

एखादी गोष्ट सरळ शब्दात न सांगता ती अप्रतेक्ष रीतीने सांगणे यास पर्यायोक्त असे म्हणतात.            

उदाहरणार्थ  :

त्याचे वडील सरकारचा पाहुणचार घेत आहेत.

काळाने त्याला आमच्यातून हिरावून नेले.

तू जे सांगतोस ती कल्पित कथा वाटते.               

१५. विरोध किंवा विरोधाभास अलंकार        

एखाद्या विधानात वरचेवर दिसायला विरोध आहे असे वाटते पण वास्तविक तसा विरोध नसतो अशा ठिकाणी विरोधाभास हा अलंकार असतो.     

उदाहरणार्थ :

कठोर वज्रापेक्षाही मृदू पुष्पाहुनी अशी, 

लोकोत्तरांची हृदये कळती न कुणासही

वियोगार्थ मिलन होते नेम हा जगाचा

जरी आंधळी तरी मी तुला पाहते

स्वतःसाठी जगलास तर मेलास, दुसन्यासाठी जगलास तरच जगलास

सर्वच लोक बोलू लागले कि कुणीच ऐकत नाही.              

१६. असंगती अलंकार        

कारण एका ठिकाणी आणि त्याचे कार्य दुस-या ठिकाणी असे जिथे वर्णन असते तेथे असंगती अलंकार होतो.

उदाहरणार्थ  :

कुणी कोडे माझे उकलील का ? कुणी शास्त्री रहस्य कळवील का ? 

हृदयी तुझ्या सखी दीप पाजळे, प्रभा मुखावरी माझ्या उजळे  

नवरत्ने तू तुज भूषविले, मन्मन खुलले आतील का ? 

गुलाब माझ्या हृदयी फुलला, रंग तुझ्या गालावर खुलला.  

काटा माझ्या पायी रुतला, शूर तुझ्या उरी कोमल का ? 

माझ्या शिरी ढग निळा डवरला, तुझ्या नयनी पाऊस खळखळला  

शरच्चंद्र या हृदयी उगवला, प्रभा तुझ्या उरी शीतल का ?

१७. सार अलंकार             

एखाद्या वाक्यातील कल्पना चढत्या क्रमाने मांडून उत्कर्ष किंवा अपकर्ष साधलेला असतो तेंव्हा सार हा अलंकार होतो.     

उदाहरणार्थ  :

आधीच मर्कट तशातही मद्य प्याला, झाला तशात जरी वृश्चिक दंश त्याला  

झाली तयास तदनंतर भूतबाधा, चेष्टा वदू मग किती कापिच्या अंगाचा            

काव्यात नाटके रम्य, नाटकांत शकुंतला, 

त्यामध्ये चौथा अंक, त्यातही चार श्लोक ते        

वाट तरी सरळ कुठे पंदितील सारी, त्यातून तर आज रात्र अंधारी भारी    

आणि बैल कसल्याही बुजती आवाजा, किरकिरती रातकिडे झाल्या तिन्हीसांजा                    

१८. व्याजस्तुती अलंकार         

बाह्यत स्तुती पण आतून निंदा किंवा बाह्यतः निंदा पण आतून स्तुती असे जिथे वर्णन असते तिथे व्याजस्तुती हा अलंकार असतो.            

उदाहरणार्थ  :

होती वदनचंद्राच्या दर्शनाचीच आस ती, 

अर्धचंद्रच तू दयावा, कृपा याहून कोणती ?           

सर्वास सर्व देशी मिथ्या हि चव स्तुती महीपाला  

न परस्त्रिया दिले त्वा वक्ष, न वा पृष्ठ तव विपक्षाला     

म्हणूनिया आलो तेंव्हा परतुनी घराला

काव्य ऐकविले ते सहधर्मचारीनीला  

गानलुब्ध तीही होई झोप ये तियेला  

काव्यरसिक तिजसम कोणी जगामधी असेल ?           

१९. व्याजोक्ती अलंकार      

एखाद्या गोष्टीचे खरे कारण लपवून दुसरेच कारण देण्याचा प्रयत्न जेथे होतो तेथे व्याजोक्ती हा अलंकार असतो. 

उदाहरणार्थ  :

येता क्षण वियोगाचा पाणी नेत्रांमध्ये दिसे, 

डोळ्यांत काय गेले हे ? म्हणुनी जयना पुसे  

काग गे बघशी मागे वळूनी वळूनी अशी ? 

विचारीता म्हणे, माझी राहिली पिशवी कशी ?

२०. चेतनगुणोक्ती अलंकार

निसर्गातील निर्जीव वस्तू सजीव आहेत अशी कल्पना करून त्या मनुष्याप्रमाणे वागतात किंवा कृती करतात असे जिथे वर्णन असते तिथे चेतनगुणोक्ती हा अलंकार होतो.

उदाहरणार्थ :

आला हा दारी उभा वसंत फेरीवाला  
पोते खांद्यावरी सौद्याचे, देईल ज्याचे त्याला
कुटुंबवत्सल इथे फणस हा, कटीखांद्यावर घेवून बाळे  
कथिते त्याला कुशल मुलांचे, गंगाजळीचे बेत आगळे

काळ –

वाक्यात दिलेल्या क्रियापदावरून जसा क्रियेचा बोध होतो तसेच ती क्रिया कोणत्या वेळी घडत आहे याचा जो बोध होतो त्याला काळ असे म्हणतात.

क्रियापदांच्या रूपावरून त्याने दाखवलेली क्रिया कधी घडते, याचा जो बोध होतो, त्याला काळ म्हणतात.

मुख्य काळ तीन आहेत.

१. वर्तमानकाळ

क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडते असे जेंव्हा समजते तेंव्हा तो वर्तमानकाळ असतो.

जेव्हा क्रियापदांच्या रूपावरून क्रिया आता म्हणजे वर्तमानात घडते, असा बोध होतो, तेव्हा त्या क्रियापदाचा वर्तमानकाळ असतो.

उदाहरणार्थ 

१) सागर अभ्यास करतो.

२) संदेश पाणी पितो.

२. भूतकाळ

क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पूर्वी घडली असे जेंव्हा समजते तेंव्हा तो भूतकाळ असतो.

जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पूर्वी घडली आहे, असा बोध होतो, तेव्हा त्या क्रियापदाचा भूतकाळ असतो.

उदाहरणार्थ

१) सागरने अभ्यास केला.

२) संदेशने पाणी पिले.

३. भविष्यकाळ

क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पुढे घडेल असे जेंव्हा समजते तेंव्हा तो भविष्यकाळ असतो.

जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पुढे घडेल, असा बोध होतो, तेव्हा त्या क्रियापदाचा भविष्यकाळ असतो.

उदाहरणार्थ

१) सागर अभ्यास करील.

२) संदेश पाणी पिईल.

काळांचे उपप्रकार

वर्तमान काळाचे पोटप्रकार :-

१) साधा वर्तमानकाळ :-

जेव्हा क्रिया ही वर्तमानकाळात घडते तेव्हा त्याला ‘साधा वर्तमानकाळ’ असे म्हणतात.

उदा.

सागर अभ्यास करतो.

२) अपूर्ण किंवा चालू वर्तमानकाळ :-

जेव्हा एखादी क्रिया वर्तमान काळात असून ती अपूर्ण किंवा चालू असे तेव्हा त्या वर्तमान काळाला ‘अपूर्ण किंवा चालू वर्तमानकाळ’ म्हणतात.

उदा.

सागर अभ्यास करीत आहे.

३) पूर्ण वर्तमानकाळ :-

जेव्हा क्रिया ही वर्तमानकाळातील असून ती नुकतीच पूर्ण झालेली असेल तेव्हा त्याला ‘पूर्ण वर्तमानकाळ’ असे म्हणतात.

उदा.

सागरने अभ्यास केला आहे.

४) रीती वर्तमानकाळ :-

वर्तमानकाळात एखादी क्रिया सतत घडत असल्याची रीत दाखविली तर त्याला ‘रीती वर्तमानकाळ’ असे म्हणतात.

उदा.

सागर अभ्यास करीत असतो.

भूतकाळाचे पोटप्रकार :-

१) साधा भूतकाळ :-

एखादी क्रिया ही अगोदर घडून गेलेली असते व त्या संदर्भात जेव्हा बोलले जाते तेव्हा त्या काळास ‘साधा भूतकाळ’ असे म्हणतात.

उदा.

सागरने अभ्यास केला.

२) अपूर्ण किंवा चालू भूतकाळ :-

एखादी क्रिया मागील काळात चालू होती किंवा घडत होती म्हणजेच त्यावेळेस ती क्रिया अपूर्ण होती तेव्हा क्रियेच्या त्या अवस्थेला ‘अपूर्ण भूतकाळ/चालू भूतकाळ’ असे म्हणतात.

उदा.

सागर अभ्यास करीत होता.

३) पूर्ण भूतकाळ :-

एखादी क्रिया मागील काळात पूर्ण झालेली असते किंवा ती क्रिया पुर्णपणे संपलेली असते, असा जेव्हा अंदाज येतो तेव्हा त्याला ‘पूर्ण भूतकाळ’ असे म्हणतात.

उदा.

सागरने अभ्यास केला होता.

४) रीती भूतकाळ :-

भूतकाळात एखादी क्रिया सातत्याने घडत आलेली असून ती क्रिया पूर्ण देखील झालेली असते. अशा काळाला ‘रीती भूतकाळ’ असे म्हणतात.

उदा.

सागर अभ्यास करत असे.

भविष्यकाळाचे पोटप्रकार :-

१) साधा भविष्यकाळ :-

जेव्हा एखादी क्रिया पुढे घडणार असेल असा बोध होतो अशा वेळी ‘साधा भविष्यकाळ’ असतो.

उदा.

सागर अभ्यास करील.

२) अपूर्ण किंवा चालू भविष्यकाळ :-

जेव्हा एखादी क्रिया ही भविष्यकाळामध्ये चालू असेल किंवा पूर्ण झाली नसेल तेव्हा त्याला ‘अपूर्ण किंवा चालू भविष्यकाळ’ असे म्हणतात.

उदा.

सागर अभ्यास करत असेल.

३) पूर्ण भविष्यकाळ :-

जेव्हा एखादी क्रिया ही भविष्यकाळातील असून ती पूर्ण झाल्याची जाणीव झालेली असते तेव्हा त्याला ‘पूर्ण भविष्यकाळ’ असे म्हणतात.

उदा.

सागरने अभ्यास केला असेल.

४) रीती भविष्यकाळ :-

जेव्हा एखादी क्रिया ही भविष्यात नेहमी घडणारी असेल, तर त्याला ‘रीती भविष्यकाळ’ असे म्हणतात.

उदा.

सागर अभ्यास करत जाईल.

काळाचे उपयोग :

अ.वर्तमानकाळ

१. सर्व काळी व सर्वत्र सत्य असलेले विधान करताना

उदाहरणार्थ :

अ. सूर्य पूर्वेस उगवतो.

आ. पृथ्वी सूर्याभोवती फिरते.

२. भूतकाळातील घटना वर्तमानात सांगताना

उदाहरणार्थ :

अर्जुन श्रीकृष्णास म्हणतो.( म्हणाला )

३. लवकरच सुरु होणारी क्रिया दर्शवताना (संनिहित भविष्यकाळ )

उदाहरणार्थ :

तुम्ही पुढे चला, मी येतोच. ( मी येईन ) 

४. अवतरण देताना.

उदाहरणार्थ :

समर्थ रामदास म्हणतात, जगी सर्व सुखी असा कोण आहे ?’

५. लगतचा भूतकाळ सांगताना ( संनिहित भूतकाळ )

उदाहरणार्थ :

मी बसतो ( बसलो ), तोच तुम्ही हजर !

६. एखादी क्रिया सतत घडते अशा अर्थी. ( रीती वर्तमानकाळ )

उदाहरणार्थ :

तो नेहमीच उशिरा येतो. ( येत असतो. ) 

आ.भूतकाळ

१. ताबडतोब घडणा-या क्रियेबाबत ( संनिहित भविष्यकाळ )

उदाहरणार्थ :

तुम्ही पुढे व्हा, मी आलोच (येईन)

२. एखादी क्रिया भविष्यकाळी खात्रीने होणार या अर्थी   

उदाहरणार्थ :

जवळ ये, की मार बसलाच म्हणून समज.

३. संकेतार्थ असल्यास

उदाहरणार्थ :

पाउस आला, तर ठीक.

४. वर्तमानकाळातील अपूर्ण क्रिया संपण्याच्या बेतात आहे अशा अर्थी

उदाहरणार्थ :

तो पहा तुझा मित्र आला.

भविष्यकाळ

१. संकेतार्थ असल्यास –

उदाहरणार्थ :

तू मदत देशील, तर मी आभारी होईन.

२. अशक्यता दर्शवलाना

 उदाहरणार्थ :

सगळेच मूर्ख कसे असतील ?

३. संभव असताना –

उदाहरणार्थ :

गुरुजी आत शाळेत असतील.

४. इच्छा व्यक्त करताना –

उदाहरणार्थ :

मला दोन रुपये हवे होते.

शब्दांच्या जाती

शब्दांचे असे आठ प्रकार आहेत त्यांनाच शब्दांच्या आठ जाती असे म्हणतात.

बदल होणे याला व्याकरणात विकार असे म्हणतात.

शब्दांच्या आठ जातींपैकी नाम, सर्वनाम, विशेषण व क्रियापद ही चार विकारी आहेत म्हणजेच त्यांच्यात लिंग, वचन, विभक्ती यामुळे बदल होतो.

क्रियाविशेषण, शब्दयोगी, उभयान्वयी व केवलप्रयोगी ही चार अविकारी आहेत म्हणजेच त्यांच्यात लिंग, वचन, विभक्ती यामुळे बदल होत नाही.

विकारी व अविकारी यांना अनुक्रमे सव्यय व अव्यय असे म्हणतात.

शब्दांच्या जाती- 
१.नाम

वाक्यात येणा-या शब्दांपैकी जे शब्द प्रत्यक्षात असलेल्या किंवा काल्पनिक वस्तूंची किंवा त्यांच्या गुणांची नावे असतात, त्यांना नाम असे म्हणतात.  

उदाहरणार्थ  :

फूल, हरी, गोडी इत्यादी     

२.सर्वनाम

जे शब्द कोणत्याही प्रकारच्या नामांच्या ऐवजी येतात त्यांना सर्वनाम असे म्हणतात.  

उदाहरणार्थ  :

मी, तू, हा, जो, कोण इत्यादी  

३. विशेषण

जे शब्द नामाबद्दल अधिक माहिती सांगतात व त्यांचे क्षेत्र मर्यादित करतात त्यांना विशेषण असे म्हणतात.      

उदाहरणार्थ  :

कडू, गोड, दहा, त्याचा इत्यादी. 

४. क्रियापद

जे शब्द क्रिया दाखवून वाक्याचा अर्थ पूर्ण करतात त्यांना क्रियापद असे म्हणतात.  

उदाहरणार्थ  :    

बसतो, जाईल, आहे इत्यादी

५. क्रियाविशेषण

जे शब्द क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगतात त्यांना क्रियाविशेषण असे म्हणतात.     

उदाहरणार्थ : 

आज, काल, तिथे, फार इत्यादी 

६. शब्दयोगी अव्यय

जे शब्द नामांना किंवा सर्वनामांना जोडून येतात व वाक्यातील शब्दांचा संबंध दाखवतात त्यांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतात.  

उदाहरणार्थ  :      

झाडाखाली, तिच्याकरिता, त्यासाठी इत्यादी 

७. उभयान्वयी अव्यय

जे शब्द दोन शब्द किंवा दोन वाक्ये जोडतात त्यांना उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.  

उदाहरणार्थ   :

व, आणि, परंतु, म्हणून इत्यादी       

८. केवलप्रयोगी अव्यय

जे शब्द आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात त्यांना केवलप्रयोगी अव्यय असे म्हणतात. 

उदाहरणार्थ  :   

शाब्बास, अबब, अरेरे इत्यादी

लिंगविचार    

लिंग, वचन व विभक्ती यांमुळे नामाच्या रुपात बदल होतो त्याला नामांचे विकरण असे म्हणतात.          

नामाच्या रूपावरून एखादी वस्तू वास्तविक अगर काल्पनिक पुरुषजातीची आहे की स्त्रीजातीची की दोन्हीपैकी कोणत्याही जातीची नाही असे ज्यावरून कळते त्याला त्या शब्दाचे लिंग असे म्हणतात.        

उदा.        

१. तो पुरुष. 

२. ती स्त्री. 

३. ते मूल.         

वरील प्रत्येक शब्दमागे आलेली तो, ती आणि ते ही सर्वनामे त्या त्या शब्दाची वेगवेगळी जात किंवा लक्षण दाखवतात. ह्याच लक्षणांना  लिंग असे म्हणतात.

मराठीत तीन लिंगे मानतात.  

१. पुल्लिंग  

२. स्त्रीलिंग  

३. नपुंसकलिंग          

पुल्लिंग         

प्राणीबाचक नामांतील पुरुष किंवा नरजातीचा बोध करून देणा-या शब्दाला पुरुषलिंगी, पुंलिंगी किंवा पुल्लिंगी असे म्हणतात.       

उदाहरणार्थ  :

चुलता, शिक्षक, घोडा, चिमणा, मुंगळा इत्यादी.            

स्त्रीलिंग     

स्त्री किंवा मादी जातीचा बोध करून देणा-या शब्दांना स्त्रीलिंगी असे म्हणतात.           

उदाहरणार्थ :

चुलती, शिक्षिका, घोडी, चिमणी, मुंगी इत्यादी.  

नपुंसकलिंग 

निर्जीव वस्तुवाचक शब्दांवरून पुरुष किंवा स्त्री कोणत्याच जातीचा बोध होत नसेल तर त्या शब्दांना नपुंसकलिंगी असे म्हणतात.      

उदाहरणार्थ  :

घर, वरण, पेन, तेज इत्यादी            

मराठीतील लिंग ओळखण्याची पद्धत पुढीलप्रमाणे आहे.   

प्राणीमात्रांमधील पुरुष किंवा नर यांचा उल्लेख आपण तो या शब्दाने करतो तर स्त्री किंवा मादी जातीचा उल्लेख ती या शब्दाने करतो.      

उदाहरणार्थ  :

तो बाप, ती आई, तो घोडा, ती घोडी, तो पोपट, ती मैना इत्यादी

सजीव प्राण्यातील एखादा नर आहे किंवा मादी हे निश्चित सांगता येत तर त्याला नपुंसकलिंगी मानून त्याचा उल्लेख ते या शब्दाने करतात.  

उदाहरणार्थ   :

ते कुत्रे, ते वासरू, ते पाखरू  इत्यादी

निर्जीव वस्तूंच्या बाबतीत काही वेळेस काल्पनिक पुरुषत्व व स्त्रीत्व लादून त्या वस्तूच्या मागे तो ती ते हे शब्द वापरून आपण लिंग ठरवतो.    

उदाहरणार्थ   :

१. तो वाडा 

२. ती इमारत 

३. ते घर 

४. तो भात 

५. ती भाकरी 

६. ते वरण  

७. तो टाक

८. ती लेखणी

९. ते पेन

१०. तो दिवा 

११. ती पणती 

१२. ते तेज

लिंगभेदामुळे नामांच्या रुपात होणारा बदल       

नियम : १

‘अ’ कारान्त पुल्लिंगी प्राणीवाचक नामांचे स्त्रीलिंगी रूप ‘ई’ कारान्त होते व त्याचे नपुसकलिंगी ‘ए’ कारान्त होते.         

उदा :   

१. मुलगा – मुलगी – मूलगे

२. पोरगा – पोरगी – पोरगे

३. कुत्रा – कुत्री – कुत्रे 

नियम : २

काही प्राणीवाचक पुल्लिंग नामांना ईन प्रत्यय लागून त्यांचे स्त्रीलिंगी रूप होतात.            

उदा :  

१. सुतार – सुतारीन   

२. माळी – माळीन

३. तेली – तेलीन      

४. वाघ – वाघीन         

नियम : ३

काही प्राणीवाचक ‘अ’ कारान्त, पुल्लिंगी नामांची स्त्रीलिंगी रुपे ‘ई’ कारान्त होतात.      

 उदा :  

 १. हंस – हंसी     

 २. वानर – वानरी

 ३. बेडूक – बेडकी     

 ४. तरुण – तरुणी       

 नियम : ४

 काही आ कारान्त पुल्लिंगी पदार्थ वाचक नामांना ई प्रत्यय लावून त्यांची स्त्रीलिंगी रूप बनतात.       

 उदा :  

 १. लोटा – लोटी  

 २. खडा – खडी

 ३. सुरा – सुरी  

 ४. गाडा – गाडी  

 ५. दांडा – दांडी  

 ६. आरसा – आरशी           

 नियम : ५

 संस्कृतातून मराठी आलेल्या नामांची स्त्रीलिंगी रूप ई प्रत्यय लागून होतात.      

 उदा :  

 १. युवा – युवती   

 २. श्रीमान – श्रीमती

 ३. ग्रंथकर्ता – ग्रंथकर्ती            

 नियम : ६

 काही नामांची स्त्रीलिंगी रुपे स्वतंत्ररीतीने होतात.         

 उदा :  

 १. बाप – आई

 २. नवरा – बायको  

 ३. वर – वधु

 ४. मुलगा – सून  

 ५. राजा – राणी

 ६.दीर – जाऊ  

 ७. पती – पत्नी

 ८. पुत्र – कन्या  

 ९. भाऊ – बहीण

 १०. सासू – सासरा  

 ११. पिता – माता

 १२. पुरुष स्त्री

 १३. बोकड – शेळी

 १४. रेडा – म्हेस  

 १५. मोर – लांडोर  

 १६. बैल – गाय  

 १७. बोका – भाटी  

 १८. खोंड – कालवड    

नियम : ७

मराठीतील काही शब्द निरनिराळ्या लिंगात आढळतात.

उदा :                  

पुल्लिंगी

स्त्रीलिंगी

नपुंसकलिंगीबाग

बाग

—–वेळ

वेळ

—–वीणा

वीणा

—–मजा

मजा

—–ढेकर

ढेकर

—–हरिण

हरिण

हरिणतंबाखू

तंबाखू

—–व्याधी

व्याधी

—–पोर

पोर

पोरसंधी

संधी

—–मूल

मूल

मूलनेत्र

नेत्र

नेत्र

नियम : ८

परभाषेतून आलेले शब्दांचे लिंग त्याच अर्थाच्या शब्दांच्या लिंगावरून ठरवितात. 

उदा :  

१. बुट (जोडा) – पुल्लिंगी  

२. क्लास (वर्ग) – पुल्लिंगी

३. पेन्सिल (लेखणी) – स्त्रीलिंग  

४. बुक (पुस्तक) – नपुंसकलिंगी  

५. कंपनी (मंडळी) – स्त्रीलिंगी

६. ट्रंक (पेटी) – स्त्रीलिंगी            

नियम : ९

सामासिक शब्दांचे लिंग हे शेवटच्या लिंगाप्रमाणे असते.

उदा :  

१. साखरभात – पुल्लिंगी

२. मिठभाकरी – स्त्रीलिंगी

३. भाजीपाला – पुल्लिंगी  

४. भाऊबहीण – स्त्रीलिंगी

५. देवघर – नपुसकलिंगी           

नियम : १०

काही नामे पुल्लिंगी व स्त्रीलिंगी असूनही उल्लेख पुल्लिंगीच करतात.          

उदा .

१. गरुड       

२. मासा        

३. सुरवड

४. साप        

५. होळ          

६. उंदीर      

नियम : ११

काही नामे पुल्लिंगी व स्त्रीलिंगी असूनही त्यांचा उल्लेख केवळ स्त्रीलिंगी करतात.            

उदा.

१. घुस      

२. पिसू       

३. माशी

४. ऊ          

५. सुसर      

६. खार

७. घार         

८. पाल

वचन

नामाच्या ठिकाणी संख्या सुचविण्याचा जो एक धर्म आहे त्याला वचन असे म्हणतात. एक आहे की अनेक आहेत ती संख्या बोध सूचक गुणधर्मास व्याकरणात ‘वचन’ असे म्हणतात.  

मराठी प्रमाणेच बहुसंख्य भाषात वचनांचे एकवचन आणि अनेकवचन असे दोन प्रकार असतात. 

मराठीत एकवचन आणि अनेकवचन अशी दोन रुपे असली तरी काही शब्दांच्या बाबतीत अनेकवचनात शब्दाचे रुप बदलत नाही.

मराठीत दोन वचनें मानतात.     

१. एकवचन  

२. अनेकवचन      

एकवचन –    

जेव्हा एका वस्तूचा बोध होतो तेव्हा एकवचन असे म्हणतात.  

उदा.  

मासा, गाय, फूल, मुलगा इ.      

अनेकवचन –

जेव्हा एकापेक्षा अधिक वस्तूंचा बोध होतो तेव्हा अनेकवचन असे म्हणतात. 

उदा.     

मासे, गाई, फुले, मुलगे इ.  

वचनभेदामुळे नामांच्या रुपात होणारा बदल

आकारांत पुल्लिंगी नामाचे अनेकवचन एकारांत होते.

एकवचन

अनेकवचन  

कुत्रा

कुत्रे  

आंबा

आंबे

घोडा

घोडे  

ससा

ससे  

रस्ता

रस्ते  

लांडगा

लांडगे  

मुलगा

मुलगे

फळा

फळे

राजा

राजे

आकारांतशिवाय इतर सर्व पुल्लिंगी नामांची रूपे दोन्ही वचनात सारखीच असतात.      

एकवचन

अनेकवचन  

देव

देव

उंदीर

उंदीर

कवी

कवी

शत्रू

शत्रू

लाडू

लाडू

कागद

कागद

तेली

तेली

गहू

गहू

मध

मध

स्त्रीलिंगी नामांची अनेकवचने

आकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन कधी आकारांत होते तर कधी ईकारांत होते.

एकवचन

अनेकवचन  

वेळ

वेळा  

वीट

विटा  

चूक

चुका

केळ

केळी  

भिंत

भिंती  

तारीख

तारखा

विहीर

विहिरी  

म्हेस

म्हशी  

सून

सुना

य नंतर ई आल्यास उच्चारात य चा लोप होतो.

उदाहरणार्थ  

गाय – गायी – गाई, 

सोय – सोयी – सोई इत्यादी

आकारांत स्त्रीलिंगी तत्सम नामाचे अनेकवचन एकवचनासारखेच राहते.

एकवचन

अनेकवचन

भाषा

भाषा

दिशा

दिशा

पूजा

पूजा

आज्ञा

आज्ञा

सभा

सभा

विद्या

विद्या

ईकारांत नामाचे अनेकवचन याकारांत होते ( अपवाद – दासी, दृष्टी इत्यादी )    

एकवचन

अनेकवचन

नदी

नद्या  

बी

बिया  

स्त्री

स्त्रिया

काठी

काठ्या  

भाकरी

भाक-या

लेखणी

लेखण्या  

उकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन वाकारांत होते ( अपवाद – वाळू, वस्तू, बाजू )   

एकवचन

अनेकवचन

सासू

सासवा

जाऊ

जावा  

जळू

जळवा

ऊवा

पिसू

पिसवा

एकारांत आणि एकारांत स्त्रीलिंगी शब्दांची रूपे आ – या कारांत होतात.

उदाहरणार्थ :

पै – पया     

प्रचारात असलेला ओकारांत स्त्रीलिंगी शब्द बायको असून त्याचे अनेकवचन बायका असे होते.  

नपुंसकलिंगी नामांची अनेकवचने      

अकारांत नपुंसकलिंगी नामाचे अनेकवचन एकारांत होते.

एकवचन

अनेकवचन

घर

घरे  

दार

दारे

फुल

फुले  

शेत

शेते

माणूस

माणसे  

घड्याळ

घड्याळे  

ईकारांत नपुंसकलिंगी नामाचे अनेकवचन एकारांत होते व विकल्पाने य हा आदेश होतो. (अपवाद – पाणी, लोणी, दही, अस्थी )

एकवचन

अनेकवचन

मोती

मोत्ये

मिरी

मिर्ये  

उकारांत आणि ऊकारांत नपुंसकलिंगी नामाचे अनेकवचन एकारांत होते क्वचित प्रसंगी ते वेकारांत होते.

एकवचन

अनेकवचन

पाखरू

पाखरे  

वासरू

वासरे

लिंबू

लिंबे  

पिलू

पिले

गळू

गळवे  

आसू

आसवे

एकारांत नपुसकलिंगी नामाचे अनेकवचन ईकारांत होते. (अपवाद – सोने, रूपे, तांबे, शिसे यांची अनेकवचने एकवचनाप्रमाणे राहतात.)          

एकवचन

अनेकवचन

केळे

केळी

गाणे

गाणी  

मडके

मडकी  

कुत्रे

कुत्री

खेडे

खेडी

रताळे

रताळी

आकारांत , एकारांत व ओकारांत नपुंसकलिंगी नामे मराठीत नाहीत.      

वचनासंबंधी विशेष गोष्टी

१. नामांच्या तीन प्रकारांपैकी सामान्यनामांची अनेकवचने होतात. विशेषनामांची व भाववाचक नामांची अनेकवचने होत नाहीत.

२. कधी कधी व्यक्ती एक असूनही त्या व्यक्तीबद्दल आदर दाखविण्यासाठी आपण त्या व्यक्तीबद्दल अनेकवचनी प्रयोग करतो.

उदाहरणार्थ :

१. गुरुजी आताच शाळेत आले.  

२. मुख्यमंत्री शाळेस भेट देणार आहेत.          

अशा वेळी त्यास आदरार्थी अनेकवचन किंवा आदरार्थी बहुवचन असे म्हणतात. असा आदर दाखविण्यासाठी राव, जी, पंत, साहेब, महाराज यासारखे शब्द जोडतात.       

उदाहरणार्थ  :

गोविंदराव, विष्णुपंत, गोखलेसाहेब इत्यादी.    

स्त्रियांच्या नावासमोर बाई, ताई , माई, आई, काकू इत्यादी शब्द येतात.  

उदाहरणार्थ  :

राधाबाई, शांताबाई, जानकीकाकू इत्यादी       

३. काही नामे नेहमी अनेकवचनी आढळतात.

उदाहरणार्थ  :

डोहाळे, कांजिण्या, शहारे , क्लेश, हाल, रोमांच इत्यादी. 

४. विपुलता दाखविण्यासाठी काही शब्दांचे एकवचन वापरतात.

उदाहरणार्थ :

१. यंदा-खुप आंबा पिकला, 

२. शेटजींच्या जवळ खूप पैसा आहे, 

३. पंढरपुरात यंदा लाख माणूस जमले होते.      

५. जोडपे, त्रिकुट, आठवडा, पंचक, डझन, शत, सहस्त्र, लक्ष, कोटी या शब्दांमधून अनेकत्वाचा बोध होतो, तरीही तेवढ्या संख्येचा एक गट मानून ते एकवचनी वापरले जातात.  

अनेक गट मानले तर मात्र अनेकवचनी वापरतात. तसेच ढीग, रास, समिती, मंडळ, सैन्य वगेरे शब्दांतील समूह हा एकच मानला जात असल्यामुळे ती एकवचनी ठरतात. मात्र समूह अनेकवचनी मानले तर ते अनेकवचनी ठरतात 

६. अधिक सलगी किंवा जवळीक दाखवायची असेल तेव्हा मोठ्या व्यक्तींबाबतही एकवचन वापरण्यात येते.   

उदाहरणार्थ  :

१. दादा शाळेतून आला.  

२. वाहिनी उद्या येणार आहे.  

३. बाबा गावाला गेला.

वाक्यप्रचार

शब्दशः होणा-या अर्थापेक्षा भिन्न व विशिष्ट अर्थाने रूढ होऊन बसलेल्या शब्दसमूहाला वाक्यप्रचार असे म्हणतात. यालाच कोणी वाक्संप्रदाय असेही म्हणतात. 

मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ठ अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला ‘वाक्प्रचार’ असे म्हणतात.

हे वाक्यप्रचार म्हणजे वाक्यांश असतो, ते पूर्ण वाक्य नसते.

अ :-

अवलंब करणे – स्वीकार करणे, आधार घेणे.

अकांड तांडव करणे (आकांड तांडव करणे) – रागाने आदळआपट करणे.

अंग चोरणे – अंग रारवून काम करणे.

अंग टाकणे – शरीराने कृश होणे, रोडावणे.

अक्कल पुढे करणे – बुद्धीचा भलताच उपयोग करणे.

अंगावर शेकणे – मोठी हानी शिक्षा म्हणून भोगावी लागणे, हानिकारक होणे.

अंगाचा तीळपापड होणे – अतिशय संताप येणे.

अंगाची लाही लाही होणे – क्रोधाने क्षुब्ध होणे, मनाचा जळफळाट होणे.

अंगावर मूठभर मांस चढणे – धन्यता वाटणे.

अंगावर रोमांच उभे राहणे (अंगावर काटा उभा राहणे) – भीतीने किंवा आनंदाने अंगावर शहारे येणे.

अग्निदिव्य करणे – कठीण कसोटीतून पार पडणे, प्राणांतिक संकटातून जाणे.

अंगवळणी पडणे – सवय होणे.

अंगावर मास नसणे – कृश होणे, प्रकृती खालावणे, खूप थकणे.

अंग शहारून टाकणे – अंगावर रोमांच उभे राहणे.

अंग चोरून बसणे (अंग मारून बसणे) – अवघडून बसणे.

अंगीकारणे – स्वीकारणे.

अंगाचा खुर्दा होणे – शरीराला त्रास होणे.

अंगावर घेणे – एखाद्या गोष्टीचा स्वीकार करणे.

अंगाचे पाणी पाणी होणे – घाम येणे.

अंग मोडून काम करणे – खूप मेहनत करणे.

अंग काढून घेणे (अंग काढणे) – अलिप्त राहणे, संबंध तोडणे.

अंगाचा भडका उडणे – क्रोधामुळे अंगाची आग आग होणे.

अंतर देणे – सोडून देणे, त्याग करणे.

अंग झाडून मोकळे होणे – संबंध तोडणे.

अंगात त्राण नसणे – अंगातील शक्ती नाहीशी होणे.

अंगाने चांगला आडवा असणे – सशक्त असणे.

अंगात कापरे सुटणे – भीतीने थरथरणे.

अंगावर धावून येणे – मारावयास येणे.

अंगावर तुटून पडणे – जोराचा हल्ला करणे.

अटकेपार झेंडा लावणे – फार मोठा पराक्रम गाजविणे.

अटीतटीने खेळणे – चुरशीने खेळणे.

अठरा विश्वे दारिद्र्य असणे – अतिशय गरिबी असणे.

अडकित्त्यात सापडणे – पेचात सापडणे, मोठ्या अडचणीत सापडणे.

अडचणींचा डोंगर असणे – अनेक अडचणी येणे.

अवाक्षर न काढणे – एकही अक्षर न बोलणे.

अंतःकरण भरून येणे – हृदयात भावना दाटून येणे, भावनानी गहिवरून येणे.

अनुमती विचारणे – परवानगी मागणे.

अंतःकरणाला पाझर फुटणे (अंतःकरण विरघळणे) – दया येणे.

अंतःकरण तीळतीळ तुटणे – अतिशय वाईट वाटणे.

अंतःकरण विदीर्ण होणे – अतिशय दुःख होणे.

अंतःकरणाचा कोठा साफ असणे – मन स्वच्छ असणे.

अंतरीचा तळीराम गार होणे – इच्छा तृप्त होणे.

अंतर्मुख होणे – खोलवर विचार करणे.

अंतर्धान पावणे – नाहीसे होणे.

अंकित राहणे – गुलाम होणे, वश होणे.

अंत पाहणे – अखेरची मर्यादा येईपर्यंत थांबणे.

अंथरूण पाहून पाय पसरणे – ऐपतीच्या मानाने खर्च करणे.

अत्तराचे दिवे जाळणे – भरपूर उधळपट्टी करणे.

अद्वा तद्वा बोलणे – एखाद्याच्या मनाला लागेल असे बोलणे.

अन्नास जागणे – उपकार स्मरणे, उपकाराची जाणीव ठेवणे.

अनर्थ गुदरणे (ओढवणे) – भयंकर संकट येणे.

अनावर होणे – भावविवश होणे.

अन्नास मोताद होणे – उपासमार होणे, अन्न मिळण्यास कठीण होणे.

अवगत असणे – ठाऊक असणे.

अन्नावर तुटून पडणे – खूप भूक लागल्याने भराभर जेवणे.

अन्नास लावणे – उपजीविकेचे साधन मिळवून देणे.

अदृश्य होणे – लुप्त होणे, नाहीसे होणे.

अनुमताने चालणे – संमतीने वागणे.

अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे – थोड्याशा यशानेच गर्व करणे.

अवदसा आठवणे – वाईट बुद्धी सुचणे.

अवगत होणे – प्राप्त होणे.

अवहेलना करणे – दुर्लक्ष करणे, अपमान करणे.

अवाक् होणे – स्तब्ध होणे.

अळम टळम करणे – टाळाटाळ करणे.

अपराध पोटात घालणे – क्षमा करणे.

अपाय करणे – नुकसान करणे.

अभंग राहणे – भंग न होणे.

अंमल बनावणी करणे – अंमलात आणणे.

अभय देणे – सुरक्षितपणाची हमी देणे.

अभिवादन करणे – वंदन करणे.

अर्पण करणे – वाहणे.

अवसान चढणे – स्फुरण चढणे.

अनुग्रह करणे – उपकार करणे, कृपा करणे.

अधःपात होणे – विनाश होणे.

अवलोकन करणे – निरीक्षण करणे, पाहणे.

अवकळा येणे – वाईट अवस्था येणे.

अडकित्यात धरणे – अडचणीत टाकणे.

अद्दल घडणे – शिक्षा मिळणे.

अक्षत देणे – बोलावणे.

अक्षता पडणे – विवाह उरकणे.

अन्न अन्न करणे – अन्नासाठी फिरणे.

अवतार संपणे – मारणे, स्थित्यंतर होणे.

अळवावरचे पाणी – क्षणभंगूर.

अमर होणे – कायमची कीर्ती प्राप्त होणे.

अनिमिषपणे पाहणे – टक लावून पाहणे.

अस्वस्थता शिगेला जाणे – अस्वस्थता पराकोटीला पोहोचणे.

अग्निदिव्य करणे – प्राणांतिक संकटातून जाणे.

अति परिचयात अवज्ञा – एखाद्याच्या घरी सतत जाण्याने आपले महत्त्व कमी होणे.

अरेरावी करणे – मग्रुरीने वागणे.

अव्हेर करणे – दूर लोटणे.

अनुलक्षून असणे – एखाद्याला उद्देशून असणे.

अगतिक होणे – उपाय न चालणे, निरुपाय होणे.

अतिप्रसंग करणे – अयोग्य वर्तन करणे.

अति तेथे माती होणे – कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट होणे.

आ :-

आकाश कोसळणे – (आभाळ कोसळणे) फार मोठे संकट येणे.

आकाश ठेंगणे होणे – अतिशय गर्व होणे, गर्वाने फार फुगून जाणे.

आकाश पाताळ एक करणे – आरडाओरड करुन गोंधळ घालणे.

आकाश फाटणे – चारही बाजूंनी संकटे येणे.

आक्रोश करणे – शोक करणे.

आकाशाला गवसणी घालणे – अशक्य गोष्ट करण्याचा प्रयत्न करणे.

आकर्षक असणे – मोह असणे.

आकृष्ट होणे – आकर्षित होणे.

आकाशमातीचे संवाद होणे – श्रेष्ठ कनिष्ठ एकत्र येणे.

आखाड्यात उतरणे – विरोधकांशी सामना देण्यास तयार होणे.

आगीत तेल ओतणे – अगोदर झालेल्या भांडणात भर घालणे, भांडण विकोपाला जाईल असे करणे.

आगीतून निघून फोफाट्यात जाणे – लहान संकटातून मोठ्या संकटात सापडणे.

आघाडीवर असणे – मुख्य व महत्त्वाचे असे गणले जाणे, पुढे असणे.

आच लागणे – झळ लागणे.

आचरणात आणणे – अमलात आणणे.

आक्रमण करणे – हल्ला करणे.

आकांत करणे – आरडाओरड करणे.

आकाशाचा ठाव घेणे – असाध्य ते साध्य करण्याचा प्रयत्न करणे.

आर्जवे करणे – पुन्हा पुन्हा विनविणे.

आग पाडणे – चहाड्या सांगून नाशास कारण होणे.

आठवण ठेवणे – ध्यानात ठेवणे.

आठवणींना उजाळा देणे – जुन्या आठवणी पुन्हा येणे.

आहारी जाणे – पूर्णपणे स्वाधीन होणे.

आवृत्ती करणे – पुन्हा पुन्हा नाचणे, नाव झळकणे.

आडव्यात बोलणे – कोणतीही गोष्ट सरळपणे न बोलणे.

आंधळ्याची माळ लावणे – विचार न करता जुन्या परंपरेनुसार वागणे.

आठवणींचा खंदक असणे – स्मरण शक्तीचा अभाव असणे.

आढेवेढे घेणे – एकदम तयार न होणे.

आण घेणे – शपथ घेणे.

आनंदाला पारावार न उरणे – अतिशय आनंद होणे, अमर्याद आनंद होणे.

आनंद गगनात न मावणे – अतिशय आनंद होणे, अमर्याद आनंद होणे.

आनंदाला सीमा न उरणे – अतिशय आनंद होणे, अमर्याद आनंद होणे.

आनंदाला उधाण येणे – अतिशय आनंद होणे, अमर्याद आनंद होणे.

आनंदाचे भरते येणे – अतिशय आनंद होणे, अमर्याद आनंद होणे.

आधार देणे – सांभाळ करणे.

आनंदाने डोळे डबडबणे – डोळे आनंदाश्रृंनी भरून येणे.

आपल्या पोळीवर तूप ओढणे – साधेल तेवढा स्वतःचाच फायदा करून घेणे.

आडवे होणे – निजणे.

आडून गोळी मारणे – स्वतः पुढाकार न घेता दुस-यांच्या हातून हवे ते काम करवून घेणे.

आत्मसात करणे – पूर्णपणे माहीत करून घेणे.

आत्मा जळणे – खूप दुःख होणे.

आदर सत्कार करणे – मान सन्मान करणे.

आभाळ पेलणे – अशक्य गोष्ट करण्याचा प्रयत्न करणे.

आपुलकी वाटणे – प्रेम व आस्था वाटणे.

आपत्याच पायावर घाव घालणे – स्वतःच आपले नुकसान करून घेणे.

आबाळ होणे – दुर्लक्ष होणे, हाल होणे.

आयत्या पिठावर रेषा (रेघोट्या) ओढणे – आयत्या मिळालेल्या संपत्तीवर चैन करणे.

आयुष्य वेचणे – एखाद्या गोष्टीसाठी आयुष्यभर झटणे.

आवळा देऊन कोहळा काढणे – स्वल्प (लहानशी) देणगी देऊन त्याच्या मोबदल्यात दुस-यांकडून मोठे कार्य करून घेणे.

आश्रय घेणे – मदत घेणे.

आश्चर्यचकित होणे – आश्चर्याने थक्क होणे.

आश्चर्याने तोंडात बोट घालणे – फार आश्चर्य वाटणे.

आवाज लागणे – प्रसंगाला साजेल असा आवाज गळ्यातून येणे.

आश्वासन देणे – कबूल करणे.

आमूलाग्र बदलणे – संपूर्णपणे बदलणे.

आडवे येणे – अडवणे.

आवाज चढविणे – रागावून खूप मोठ्याने बोलणे.

आड येणे – अडथळा निर्माण करणे.

आहुती देणे – प्राण अर्पण करणे.

आस्वाद घेणे – आनंद लुटणे.

आव आणणे – खोटा अविर्भाव करणे, उसने अवसात आणणे.

आसमान ठेंगणे होणे – ताठ्याचा कळस होणे (स्वर्ग दोन बोटे उरणे).

आळा घालणे – नियम लावून देणे, नियंत्रण ठेवणे.

आ वासणे – आश्चर्याने तोंड उघडणे.

आळोखे पिळोखे देणे – आळस झाडणे.

आळ घालणे – आरोप करणे.

इ :-

इंगा जिरणे – गर्व नाहीसे होणे, खोड मोडणे.

इंगा दाखविणे – धाक बसविणे, जरब बसविणे.

इकडचा डोंगर तिकडे करणे – फार मोठे कार्य पार पाडणे.

इरेला पेटणे – इर्षेने खेळू लागणे.

इशारा देणे – सावधगिरीची सूचना देणे.

इन्कार करणे – नकार देणे.

इरेस पडणे – एखादी गोष्ट करण्याची जिद्द असणे.

इतिश्री करणे – शेवट करणे.

इमानास जागणे – इमान कायम ठेवणे.

इकडचे तोंड तिकडे करून टाकणे – अतिशय जोराने थोबाडात मारणे.

इंगळ्या डसणे – मनाला झोंबणे, वेदना होणे.

इहलोक सोडणे – मरणे.

इनमीन साडेतीन – थोडेसे, नगण्य.

उ :-

उकळी फुटणे – खूप आनंद होणे.

उखळ पांढरे होणे – खूप द्रव्य मिळणे.

उखाळ्या पाखाळ्या काढणे – एकमेकांचे उणेदुणे काढणे.

उघडा पडणे – खरे स्वरूप प्रकट होणे.

उचल खाणे – एखादी गोष्ट करण्याची अनिवार इच्छा होणे.

उचल बांगडी करणे – जबरदस्तीने हलविणे.

उच्चाटन करणे – घालवून देणे, नष्ट करणे.

उच्छाद मांडणे – उपद्रव देणे.

उचंबळून येणे – भावना तीव्र होणे.

उजाड माळरान – ओसाड जमीन.

उजेड पडणे – मोठे कृत्य करणे.

उल्लेख करणे – उच्चार करणे, सांगणे.

उंटावरून शेळ्या हाकणे – मनापासून काम न करणे.

उठून दिसणे – शोभून दिसणे, नजरेत भरणे.

उत्तेजन देणे – पाठिंबा देणे.

उतराई होणे – उपकार फेडणे.

उत्तीर्ण होणे – यशस्वी होणे.

उत्कंठा असणे – उत्सुक असणे.

उदक सोडणे – त्याग करणे.

उदरी शनी येणे – संपत्तीचा लाभ होणे.

उदास वाटणे – फार खिन्न वाटणे.

उद्धार करणे – प्रगती करणे.

उधाण येणे – चेव येणे, ओसंडून वाहणे, भरती येणे.

उध्वस्त होणे – नाश पावणे.

उधळून देणे – पसरून देणे.

उन्मळून पडणे – मुळासकट कोसळून पडणे.

उन्हाची लाही फुटणे (उन्हाचा जाळ पेटणे) – अतिशय कडक ऊन पडणे.

उद्योगात चूर होणे – कामात गुंग असणे, मग्न असणे.

उतू जाणे – कल्पनेपेक्षाही अधिक असणे.

उपासना करणे – पूजा करणे, आराधना करणे.

उपसर्ग होणे – त्रास होणे.

उपपादन करणे – बाजू मांडणे.

उपद्व्याप करणे – खूप त्रास सहन करणे.

उपदेशाचा डोस पाजणे – उपदेश करणे.

उंबरठा चढणे – प्रवेश करणे.

उबगणे – कंटाळा येणे.

उमाळा येणे – तीव्र इच्छा होणे.

उमज पडणे – समजणे.

उभ्या उभ्या चक्कर टाकणे – सहज जाऊन पाहून येणे.

उरकून घेणे – पार पाडणे.

उराशी बाळगणे – अंतःकरणात जतन करून ठेवणे.

उरापोटावर बाळगणे – सांभाळ करणे.

उरस्फोड करणे – काळीज फाटेपर्यंत कष्ट करणे.

उरी फुटणे – अतिशय दुःख होणे.

उरकून घेणे – आटोपणे, संपवणे.

उलगडा होणे – अगदी स्पष्टपणे समजणे.

उलटी अंबारी हाती येणे – भीक मागण्याची पाळी येणे.

उष्ट्या हाताने कावळा न हाकणे – कधी कोणाला काहीही मदत न करणे.

उसळी घेणे – जोराने वर येणे.

उसासा सोडणे – विश्वास सोडणे.

ऊत येणे – अतिरेक होणे, चेव येणे.

ऊन खाली येणे – सायंकाळ होणे.

ऊर दडपणे – अतिशय भीती वाटणे.

ऊर भरून येणे – भावना दाटून येणे.

ऊर बडवून घेणे – आक्रोश करणे.

ऊर फाटणे – अतिशय दुःख होणे.

ऊस मळे फुलणे – ऊसमळे चांगले वाढीस लागणे.

ऊहापोह करणे – चर्चा करणे (उहापोह करणे).

ए :-

एक घाव दोन तुकडे करणे – ताबडतोब निर्णय घेऊन गोष्ट निकालात आणणे.

एकजीव होणे – पूर्णपणे मिसळून जाणे.

एकटक पाहणे – स्थिर नजरेने पाहणे.

एकमत होणे – सर्वांचा सारखा विचार असणे.

एकमेवाव्दितीय असणे – अतुलनीय व सर्वोत्कृष्ठ असणे.

एका पायावर तयार असणे – फार उत्कंठीत होणे.

एकाग्रचित्त होणे – मन केंद्रित करणे.

एका वट्टात बोलणे – एका दमात बोलणे.

एकेरीवर येणे – भांडायला तयार होणे.

एखाद्या वस्तूवर डोळा असणे – एखादी वस्तू प्राप्त करून घेण्याची इच्छा असणे.

ओ :-

ओस होणे – रिकामे होणे.

ओढ घेणे – आकर्षण वाटणे.

ओली सुकी करणे – नाणे फेक करून निर्णय घेणे.

ओटीत घालणे – संगोपनासाठी दुस-यांच्या हवाली करणे.

ओवाळून टाकणे – तुच्छ समजून फेकून देणे.

ओक्शा बोक्शी रडणे – खूप रडणे.

औषध नसणे – उपाय नसणे.

औषधालाही नसणे – अजिबात नसणे, मुळीच नसणे.

ओढ लागणे – तीव्र इच्छा होणे.

क :-

कणीक तिंबणे – खूप मारणे.

कंठ दाटून येणे – गहिवरून येणे, दुःखाचा आवेग येणे.

कंठस्नान घालणे – ठार मारणे, शिरच्छेद करणे.

कच खाणे – माघार घेणे.

कणीक मऊ होणे – मार बसणे.

कट करणे – कारस्थान करणे.

कडुसे पडणे – सायंकाळ होणे.

कटाक्ष टाकणे – एक नजर टाकणे, नजर फिरविणे.

कंठशोष करणे – ओरडून गळा सुकविणे, उगाच घसाफोड करणे.

कणव येणे – दया येणे.

कपाळ फुटणे – दुर्दैव ओढवणे, मोठी आपत्ती कोसळणे.

कपाळमोक्ष होणे – मरणे, नाश पावणे, डोके फुटून मृत्यू येणे.

कपाळ उठणे – कपाळ दुखू लागणे.

कपाळ ठरणे – नशिबात लिहिण्यासारखी एकादी गोष्ट घडणे.

कपाळ पांढरे होणे – वैधव्य येणे.

कपाळी येणे – नशीबी येणे.

कपाळाला आठ्या पडणे – नाराजी दिसणे.

कपाळी (भाळी) लिहिलेले नसणे – नशिबात नसणे.

कंबर कसणे (कंबर बांधणे) – हिंमत दाखविणे, तयार होणे.

कष्टाने विद्या करणे – परिश्रम करून विद्या संपादन करणे.

कपाळावर हात मारणे – दुःख होणे, निराश होणे.

कपाळावर हात लावणे – निराश होणे.

कःपदार्थ असणे – क्षुल्लक वाटणे.

कपोतवृत्तीने वागणे – काटकसरीने वागणे.

कपाळाचे कातडे नेणे – सगळया जन्माचे मातेरे करणे.

कसोटीस उतरणे – अपेक्षित गोष्ट यशस्वीपणे करून दाखविणे.

करुणा भाकणे – विनविणे.

कबूल करणे – मान्य करणे.

कसाला लागणे – कसोटी पाहणे, एखाद्याची परीक्षा होणे.

कसास लावणे – कसोटी पाहणे, एखाद्याची परीक्षा होणे.

कंबर खचणे – धीर संपणे, धीर खचणे.

कळसास पोचणे – शेवटच्या टोकाला जाणे, पूर्णत्वाला पोहोचणे.

कळी उमलणे – चेहरा प्रफुल्लीत होणे.

कमाल करणे – मर्यादा वा सीमा गाठणे.

करणी करणे – चेटूक करणे.

कलुषित करणे – मलीन बनविणे, गढूळ करणे, एखाद्या विषयी वाईट मत करणे.

कळ लावणे – भांडण लावणे.

करकर दात चावणे – क्रोधाचा अविर्भाव करणे.

कलम होणे – पकडणे.

कसूर न करणे – आळस न करणे, चूक न करणे.

कब्जा घेणे – ताब्यात घेणे.

कळस होणे – चांगल्या किंवा वाईट गोष्टीचा अतिरेक होणे.

कस धरणे – सत्व निर्माण होणे.

करार मदार करणे – लेखी स्वरुपात निर्णय घेणे.

कळा पालटणे – स्वरूप बदलणे.

कढी पातळ होणे – दुखण्यामुळे जर्जर होणे.

कल्पांत करणे – मोठा कल्लोळ करणे.

कल्ला फाडणे – गोंगाट करणे.

कसर काढणे – एकीकडे झालेली कमतरता दुसरीकडे भरून काढणे.

कष्टी होणे – खिन्न होणे, दुःखी होणे.

कवडीही हातास न लागणे – एका पैशाचीही प्राप्ती न होणे.

करंट येणे – झटका येणे, आवेश येणे.

कृत कृत्य होणे – धन्यता वाटणे.

का कू करणे – मागे पुढे पाहणे, काम करण्यास टाळाटाळ करणे.

काटा काढणे – दुःख देणारी गोष्ट काढून टाकणे, समूळ नाहीसे होणे.

काडीमोड करणे (देणे) – संबंध तोडणे.

काळझोप घेणे – मृत्यू येणे.

काट्याने काटा काढणे – एका शत्रूच्या सहाय्याने दुस-या शत्रूचा पराभव करणे.

काथ्याकूट करणे – व्यर्थ चर्चा करणे.

कापूस महाग होणे – कृश होणे.

कान उपटणे – चुकीबद्दल शिक्षा करणे.

काढण्या लावणे – दोरीने बांधणे.

कान टवकारून ऐकणे – अगदी लक्षपूर्वक ऐकणे.

कान देणे – लक्षपूर्वक ऐकणे.

कान धरणे – शासन करणे.

कान फुकणे (कान भरणे) – चुकली (चुगली) करणे, चहाड्या करणे, मनात किल्मिश निर्माण करणे.

कान उघाडणी करणे – खरमरीत उपदेश करणे, कडक शब्दात चूक दाखवून देणे.

कानठळ्या बसणे – मोठा आवाज ऐकल्याने काही काळ काहीच ऐकू न येणे.

काना डोळा करणे – दुर्लक्ष करणे.

कानावर पडणे – सहजगत्या माहीत होणे, ऐकण्याचा योग येणे.

कानावर येणे – माहीत असणे, ऐकणे, कळणे.

काळे करणे – देशांतरास जाणे.

कानावर हात ठेवणे – नाकबूल करणे, नकारात्मक भूमिका घेणे.

कानोसा घेणे – दूरवरचे लक्षपूर्वक ऐकणे, चाहूल घेणे.

कानीकपाळी ओरडणे – वारंवार बजावून सांगणे.

कास धरणे – आश्रय घेणे.

कानाशी लागणे – चहाड्या करणे.

कानाला खडा लावणे – पुन्हा एखादी चूक न करण्याचा निश्चय करणे, धडा शिकणे.

कान टवकारणे – ऐकण्यास उत्सुक होणे.

काडी मोडून घेणे – विवाहसंबंध तोडून टाकणे.

कामगिरी पार पाडणे – सोपविण्यात आलेले काम पूर्ण करणे.

कामगिरी बजावणे – काम पार पडणे.

कानशील रंगविणे – मारणे.

कानशिलात देणे – मारणे.

कालवा कालव होणे – मनाची चलबिचल होणे.

काळीमा लागणे – कलंक लागणे, अपकीर्ती होणे.

कान फुटणे – ऐकू न येणे.

काट्याचा नायटा करणे – साधी गोष्ट वाईट थराला जाणे.

काट्याचा नायटा होणे – क्षुल्लक गोष्टीचा भयंकर परिणाम होणे.

कामाला भिडणे – जोरात काम करू लागणे.

कानात घुमून राहणे – आठवणीत पक्के रुजून राहणे.

कायापालट होणे – पूर्णपणे स्वरूप बदलणे.

कावरा बावरा होणे – बावरणे, घाबरणे.

काळजाचे पाणी पाणी होणे – दुःखी होऊन धैर्य व उत्साह नाहीसा होणे, अतिशय घाबरणे.

काळाची पावले ओळखणे – बदलत्या परिस्थितीची भान असणे.

काळजाचा ठेवा असणे – अत्यंत आवडती गोष्ट असणे.

काळाच्या उदरात गडप होणे – नष्ट होणे.

कानामागे टाकणे – दुर्लक्ष करणे.

कानात मंत्र सांगणे – गुप्त रीतीने सल्लामसलत करणे.

कान टोचणे – एखादी गोष्ट समजावून सांगणे.

कानाने आवाज टिपणे – लक्षपूर्वक ऐकणे.

काळजाचा लचका तुटणे – अत्यंत दुःख होणे.

कानाचा चावा घेणे – कानात सांगणे.

कानी घालणे – सांगणे, लक्षात आणून देणे.

कान लांब होणे – ऐकण्यासाठी उत्सुक असणे, अक्कल कमी होणे (गाढवाचे कान?)

काखा वर करणे – आपल्या जवळ काही नाही असे दाखविणे, ऐनवेळी अंग काढून घेणे.

काळजाचे कोळसे होणे – मनाला अतिशय वेदना होणे.

काळीज फत्तराचे होणे – अंतःकरणातील दया, माया इ. कोमल भावना नाहीशा होणे.

काकण भर सरस ठरणे – थोडेसे जास्त वा अधिक असणे.

कागाळी करणे – तक्रार किंवा गा-हाणे करणे.

कागदी घोडे नाचविणे – ज्याच्या पासून काही लाभ होण्याजोगे नाही अशा लेखनाचा खटाटोप करणे.

काळे करणे – निघून जाणे.

कान किटणे – तीच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगून कंटाळा आणणे.

कामास येणे – उपयोगी पडणे, लढाईत मारले जाणे.

काकदृष्टीने पाहणे – अतिशय बारकाईने पाहणे.

कासावीस होणे – व्याकूळ होणे.

कालवश होणे – मरण पावणे.

काडीने औषध लावणे – दुरून दुरून दुस-याचे उपयोगी पडणे.

काहूर माजणे – विचारांचा गोंधळ होणे.

किमया करणे – जादू करणे.

कित्ता गिरविणे – अनुकरण करणे.

किळस वाटणे – शिसारी वाटणे.

किल्ली फिरविणे – युक्तीने मन बदलणे.

किडून घोळ होणे – कीड लागल्यामुळे खराब होणे.

किंतु येणे – संशय वाटणे.

कीस काढणे – बारकाईने चर्चा करणे.

कुंपणाने शेत खाणे – विश्वासातील माणसाने फसविणे, रक्षणकर्त्याने भक्षण करणे.

कुत्र्याच्या मोलाने मरणे – मरताना माणूस म्हणून काहीही किंमत न राहणे.

कुर्बानी करणे – बलिदान करणे.

कुजत पडणे – आहे त्या स्थितिपेक्षा अधिक वाईट अवस्था प्राप्त होणे.

कुजबूज करणे – आपापसात हळूहळू बोलणे.

कुकारा घालणे – मोठ्याने हाक मारणे.

कुत्रा हाल न खाणे – अतिशय वाईट स्थिती येणे.

कुत्र्यासारखे मळा धरून पडणे – घरातील कटकटींना कंटाळून सारखे घराबाहेर राहणे.

कुरघोडी करणे – वर्चस्व स्थापित करणे.

कुंद होणे – उदास होणे.

कुरुक्षेत्र माजविणे – भांडण तंटे करणे.

कुणकुण लागणे – चाहूल लागणे.

कुरापत काढणे – भांडण उकरून काढणे.

कुस धन्य करणे – जन्म दिल्याबद्दल सार्थक वाटणे.

कूच करणे – पुढे जाणे, कामगिरीवर निघणे.

केसाने गळा कापणे – विश्वासघात करणे.

केसालाही धक्का न लावणे – अजिबात त्रास न होणे.

केसांच्या अंबाड्या होणे – वृद्धावस्था येणे.

क्लेश पडणे – यातना सहन कराव्या लागणे.

कोणाच्या अध्यांत मध्यांत नसणे – कोणाच्या कामात विनाकारण भाग न घेणे.

कोंडीत पकडणे – पेचात सापडणे.

कोड पुरविणे – कौतुकाने हौस पुरविणे.

कोरड पडणे – सुकून जाणे.

कोंड्याचा मांडा करणे – काटकसरीने संसार करणे.

कोलाहल माजणे – आरडाओरड होणे.

कोप-यापासून हात जोडणे – संबंध न यावा अशी इच्छा करणे.

कोंडी फोडणे – वेढा तोडून बाहेर जाणे.

कोपर्‍याने खणणे – एखाद्याच्या चांगुलपणाचा फायदा घेणे.

कोंडमारा होणे – मन अस्वस्थ होणे.

कोंबडे झुंजविणे – दुस-यांचे भांडण लावून आपण मजा बघणे.

कोप-यात घेणे – एका टोकाला घेऊन कोंडी करणे.

कोणाचा पायपोस कोणाचे पायात नसणे – मोठा गोंधळ होणे.

कौशल्य पणास लावणे – अतिशय चतुराईने काम करणे.

कौतुक करणे – तारीफ करणे.

ख :-

खच्चून जाणे – धीर सुटणे.

खर्ची पडणे – वापरावी लागणे.

खच्चून भरणे – पूर्णपणे भरणे.

खनपटीस बसणे – सारखे एखाद्या गोष्टीच्या मागे लागणे.

खटू होणे – नाराज होणे.

खटपट करणे – प्रयत्न करणे.

खजील होणे – लाज वाटणे.

खडा पहारा होणे – काळजीपूर्वक करणे.

खडसून विचारणे – ताकीद देऊन विचारणे.

खंड नसणे – सतत चालू राहणे.

खंड पडणे – मध्येच काही काळ बंद असणे.

खंत वाटणे – खेद वा दुःख वाटणे.

खडा टाकून पाहणे – अंदाज घेणे.

खटाटोप चालविणे – प्रयत्न करणे.

खडे चारणे – शरण येण्यास भाग पाडणे, पराभव करणे.

खल करणे – खोलवर चर्चा करणे.

खबर नसणे – माहिम नसणे.

खस्ता स्थाणे – खूप कष्ट करणे.

खड्यासारखा बाहेर पडणे – निरूपयोगी ठरून वगळला जाणे.

खसखस पिकणे – खूप हसणे.

खडे फोडणे – दूषण देणे.

खर्ची पडणे – लढाईत मृत्युमुखी पडणे.

खळखळ करणे – हट्ट करणे.

खरवड काढणे – कान उघडणी करणे.

खरपूस ताकीद करणे – निक्षून सांगणे.

खडी ताजीम देणे – उभे राहून शिस्तीने मानवंदना देणे.

खरडपट्टी काढणे – रागावून बोलणे.

खाल्ल्या मिठाला जागणे – उपकाराची जाणीव ठेवणे.

खाजवून खरुज काढणे – मुद्दाम भांडण उकरून काढणे.

खांदा देऊन काम करणे – झटून काम करणे.

खापर फोडणे – दोष देणे.

खायला काळ अन् भुईत्या भार असणे – स्वतः काही ही काम नकरता दुस-यावर भार होऊन राहणे.

खायला उठणे – असह्य होणे.

खाल्ल्या घरचे वासे मोजणे – उपकार करणा-यांचे वाईट चिंतणे.

खार लागणे – झीज सोसावी लागणे.

खाईत पडणे – संकटात किंवा दुःखात पडणे.

खाऊन ढेकर देणे – गिळंकृत करणे.

खा खा सुटणे – खाण्याची एकसारखी इच्छा होणे, अधाशीपणाने खूप खात जाणे.

खिळवून ठेवणे – एकाच जागी स्थिर करून ठेवणे.

खिळखिळी होणे – मोडकळीला येणे.

खुट्ट होणे – अचानक बारीक आवाज होणे.

खुळे करणे – वेड लावणे.

खूणगाठ बांधणे – पक्के ध्यानात ठेवणे.

खो घालणे – अडचण आणणे, विघ्न निर्माण करणे.

ख्याली-खुशाली विचारणे – हालहवाल विचारणे.

खो खो हसणे – हसू न आवरणे, जोर जोराने हसणे.

खोर्‍याने पैसे ओढणे – पुष्कळ पैसे मिळविणे.

खोड मोडणे – एखाद्याची वाईट सवय तीव्र उपायाने घालविणे.

खोड ठेवणे – दोष ठेवणे.

ग :-

‘ग’ ची बाधा होणे – गर्व होणे.

गजर करणे – एकाच तालात सर्वांनी एकदम जयजयकार करणे.

गणना करणे – समाविष्ट करणे.

गढून जाणे – रंगून जाणे.

गंगार्पण करणे – कायमचे विसरणे.

गाणित पक्के बसणे – ठाम समजूत होणे.

गतप्राण होणे – मरणे.

गर्क असणे – गुंग असणे.

गर्क होणे – गढून जाणे.

गळ घालणे – आग्रह करणे.

गळ्यात पडणे – अतिशय आग्रह करणे.

गंगेत घोडे न्हाणे – एखादे मोठे काम पूर्ण होणे.

गहिवरून जाणे – दुःखाने कंठ दाटून येणे.

गयावया करणे – दीनवाणी प्रार्थना करणे, विनवणी करणे.

गडप होणे – नाहीसे होणे.

गटांगळ्या खाणे – नाकातोंडात पाणी जाऊन जीव घाबरा होणे.

गत्यंतर नसणे – नाईलाज असणे, दुसरा उपाय नसणे.

गंध नसणे – अजिबात माहीत नसणे.

गर्भगळीत होणे – अतिशय घाबरणे, भयभीत होणे.

गमजा करणे – हुशारी मारणे.

गृहीत धरणे – मनात निश्चित कल्पना करणे.

गराडा घालणे – वेढा घालणे, घेराव घालणे.

गळा कापणे – विश्वासघात करणे.

गळा गुंतणे – अडचणीत सापडणे, अडचणीत घालणे.

गळ्याशी येणे – नुकसानी बाबत अतिरेक होणे.

गळ्यात धोंड पडणे – इच्छा नसत

प्रयोग

वाक्यातील कर्ता, कर्म, क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला प्रयोग असे म्हणतात.  

कर्त्याची किंवा कर्माची क्रियापदाशी जी जुळणी, ठेवण किंवा रचना असते तिलाच व्याकरणात प्रयोग असे म्हणतात.

कर्ता शोधताना प्रथम वाक्यातील क्रियापदाचा मूळ धातू शोधून काढावा व त्याला ‘णारा’ प्रत्यय लावून कोण? असा प्रश्न करावा म्हणजे कर्ता मिळतो.

वाक्यातील क्रियापदाने दाखविलेली क्रिया कर्यापासून निघते व ती दुस-या कोणावर किंवा कशावर तरी घडते.  

त्या क्रियेचा परीणाम ज्याच्यावर घडतो किंवा ज्याच्याकडे क्रियेचा रोख किंवा कल असतो ते त्या क्रियेचे कर्म असते.

ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची जरुरी लागते त्यास सकर्मक क्रियापद असे म्हणतात.  

ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची जरुरी लागत नाही, त्यास अकर्मक क्रियापद असे म्हणतात.

प्रयोगाचे प्रकार

मुख्य तीन प्रकार आहेत.

१. कर्तरी प्रयोग  

२. कर्मणी प्रयोग  

३. भावे प्रयोग

१.कर्तरी प्रयोग

जेव्हा क्रियापदाचे रूप हे कर्त्याच्या लिंग किवा वाचनानुसार बदलत असेल तर त्या प्रयोगास कर्तरी प्रयोग असे म्हणतात.

कर्तरी प्रयोगात कर्ता हा धातुरुपेश ( क्रियापदाच्या रूपावर अधिकार चालविणारा ) असतो.  

उदा.

अ) तो चाय पितो. (कर्ता- पुल्लिंगी)

आ) ती चाय पिते. (कर्ता- लिंग)

इ) ते चाय पितात. (कर्ता- वचन)

कर्तरी प्रयोगाची खूण कर्तरी प्रयोगात कर्ता हा नेहमी प्रथमांत असतो व कर्म हे प्रथमांत किंवा व्दितीयांत असते. 

उदाहरणार्थ  

अ) मी शाळेतून आताच आलो.

आ) पोपट पेरू खातो.  

इ) शिक्षक मुलांना शिकवितात.

कर्तरी प्रयोगाचे दोन उपप्रकार पडतात ते पुढीलप्रमाणे :-


अ) सकर्मक कर्तरी प्रयोग :-

ज्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात कर्म आलेले असेल तेव्हा त्यास सकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात.

कर्तरी प्रयोगातील क्रियापद सकर्मक असले तर त्यास सकर्मक कर्तरी प्रयोग म्हणतात.

उदा.  

अ) हितेश पाणी भरतो.

आ) प्रिया पाणी भरते.

इ) ते पाणी भरतात.

ई) ती गाणे गाते.  

आ) अकर्मक कर्तरी प्रयोग :-  

ज्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात जेव्हा कर्म आलेले नसते तेव्हा त्यास अकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात.

कर्तरी प्रयोगातील क्रियापद हे अकर्मक असल्यास त्यास अकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात.  

उदा.

अ) तो चालतो.

आ) ती चालते.

इ) ते चालतात.

ई) ती घरी जाते.

२.कर्मणी प्रयोग

क्रियापदाचे रूप कर्माच्या लिंग किवा वचनानुसार बदलते तर त्यास कर्मणी प्रयोग असे म्हणतात.

कर्मणी प्रयोगात कर्म प्रथमात असते. कर्ता प्रथमात कधीच नसतो. कर्ता तृतीयांत, चतुर्थेत, सविकरणी तृतीयांत किंवा शब्दयोगी अव्ययंत असतो.

उदाहरणार्थ  

अ) तिने गाणे म्हटले.  

आ) मला हा डोंगर चढवतो.  

इ) रामाच्याने काम करवते.  

ई) मांजराकडून उंदीर मारला गेला.

कर्मणी प्रयोगाचे प्रकार


१. प्रधानकर्तृक कर्मणी प्रयोग –  

कर्मणी प्रयोगाच्या वाक्यात जेव्हा कर्ता प्रथम मानला जातो तेव्हा त्या प्रयोगास प्रधानकर्तृक कर्मणी प्रयोग असे म्हणतात.

या प्रयोगात क्रियापद लिंगवचनानुसार बदलत असले तरी बहुतेक कर्ताच प्रधान असतो, त्यास प्रधानकर्तृक कर्मणी प्रयोग असे म्हणतात.  

उदाहरणार्थ  .

अ) तिने गाणे म्हटले.  

आ) मला हा डोंगर चढवतो.  

इ) त्याने काम केले.  

ई) तिने अभ्यास केला

२. शक्य कर्मणी प्रयोग – 

जेव्हा कर्मणी प्रयोगातील वाक्याच्या क्रियापदाचा अर्थ कर्त्यामध्ये ती क्रिया करण्याची शक्यता असल्यासारखा असतो, दिसतो तेव्हा त्या प्रयोगास शक्य कर्मणी प्रयोग असे म्हणतात.

रामाच्याने काम करवते या वाक्यात शक्यता सुचविलेली आहे यातील क्रियापद शक्य क्रियापद आहे त्यास शक्य कर्मणी प्रयोग असे म्हणतात.

उदा.  

अ) आई कडून काम करविते.

आ) भीमसेनला अजून गाणे म्हणवते.

३. प्राचीन कर्मणी प्रयोग / पुराण कर्मणी प्रयोग  :-

हा प्रयोग मूल संस्कृत कर्मणी प्रयोगापासून तयार झालेला आहे तसेच या कर्माच्या उदाहरणातील वाक्य संस्कृत मधील कवीरूपी आढळतात.        

प्राचीन मराठी काव्यात सकर्मक धातूला ज हा प्रत्यय लावून करिजे, बोलिजे, कीजे, देईजे, अशी कर्मणी प्रयोगाची उदाहरणे पहावयास मिळतात. या प्रकारच्या प्रयोगास प्राचीन किंवा पुराण कर्मणी असे म्हणतात.  

उदाहरणार्थ  .

त्वा काय कर्म करिजे लघु लेकराने नळे इंद्रासी असे बोलिजेले  

जो जो कीजे परमार्थ लाहो विजी निशिधापासाव म्हणीजेलो

४. समापण कर्मणी प्रयोग :-

जेव्हा कर्मणी प्रयोगाच्या वाक्याच्या क्रियापदाचा अर्थ क्रिया समाप्त झाल्यासारखा असतो तेव्हा त्यास समापण कर्मणी प्रयोग असे म्हणतात.

त्याची गोष्ट लिहून झाली या प्रकारच्या वाक्यात त्याची हा कर्ता षष्ठी विभक्तीत आहे. लिहून झाली या संयुक्त क्रियापदाने क्रियापदाच्या समाप्तीचा अर्थ सूचित केलेला असतो अशा प्रकारच्या प्रयोगाला समापन कर्मणी असे म्हणतात.

उदा.  

अ) त्याचे पुस्तक वाचून झाले.

आ) रामाची गोष्ट सांगून झाली.

५. नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरी प्रयोग :-

ह्या प्रयोगात इंग्लिश मधील passive voice प्रमाणे वाक्याची रचना आढळते.  

कर्मणी प्रयोगातील कर्त्याला कडून हे शब्दयोगी अव्यय लावून इंग्रजी भाषेतील पद्धतीप्रमाणे रचना करण्याचा जो नवीन प्रकार आहे त्यास नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरी असे म्हणतात.  

तसेच वाक्याच्या सुरवातीला कर्म येते व कर्त्या कडून प्रत्यय लागतात.

उदा.  

अ) रावण रामाकडून मारला गेला.

आ) चोर शिपयांकडून पकडला गेला.

इंग्रजीतील Passive Voice ला मराठीत कर्मकर्तरी असे म्हणतात.  

सकर्मक धातूच्या भूतकालवाचक कृदंताला जा या सहाय धातूची मदत देऊन हा प्रयोग करतात, कर्मकर्तरी ला काहीजण नवीन कर्मणी असे म्हणतात.  

जेंव्हा वाक्यातील कर्माला प्राधान्य देऊन विधान करावयाचे असते किंवा कर्ता स्पष्ट नसतो किंवा कर्याचा उल्लेख टाळावयाचा असतो त्यावेळी हा प्रयोग सोयीचा असतो. 

उदाहरणार्थ  .

अ) गाय गुराख्याकडून बांधिली जाते.  

आ) न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला.  

इ )सभेत पत्रके वाटली गेली.  

ई) सर्वांना समज दिली जाईल.

३. भावे प्रयोग

जेव्हा कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग किंवा वचनात बदल करूनही क्रियापद बदलत नाही तेव्हा त्या प्रयोगास भावे प्रयोग असे म्हणतात

जेंव्हा क्रियापदाचे रूप कत्र्याच्या किंवा कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे बदलत नसून ते नेहमी तृतीयपुरुषी, नपुंसकलिंगी, एकवचनी असून स्वतंत्र असते, तेंव्हा अशा प्रकारच्या वाक्यरचनेस भावे प्रयोग असे म्हणतात.  

भावे प्रयोगात क्रियापदाचा जो भाव किंवा आशय असतो त्याला प्राधान्य असते व त्या मानाने कर्ता किंवा कर्म दोन्ही गौण असतात.

उदा.  

अ) संजयने गाईला पकडले.

आ) गीताने मुलांना मारले.   

भावे प्रयोगाचे तीन उपप्रकार पडतात ते पुढीलप्रमाणे :-


१) सकर्मक भावे प्रयोग :-  

ज्या भावे प्रयोगाच्या वाक्यात कर्म आलेले असते त्यास सकर्मक भावे प्रयोग म्हणतात.

उदा.  

अ) शिक्षकाने विद्यार्थ्यांना शिकविले.

आ) आईने मुलाला मारले.

इ) मांजराने उंदरास पकडले.

२) अकर्मक भावे प्रयोग :-

ज्या भावे प्रयोगाच्या वाक्यात कर्म आलेले नसते त्यास अकर्मक भावे प्रयोग असे म्हणतात.

उदा.  

अ) त्याने खेळावे.

आ) तिने जावे.

३) अकर्तुक भावे प्रयोग :-

भावे प्रयोगाच्या वाक्यात कर्ता आलेला नसतो तेव्हा त्यास अकर्तुक भावे प्रयोग असे म्हणतात.

उदा.  

अ)आता उजाडले.

आ)गप्प बसावे.

भावे प्रयोगाची खुण –

१. कर्ता तृतीयांत किंवा चतुर्थत असतो.  


उदाहरणार्थ  .

रामाने रावणास मारले.

२. कर्म असल्यास त्याची सप्रत्ययी वितिया विभक्ती असते.  


उदाहरणार्थ  .

शिक्षकांनी विद्यार्थांना शिकवावे.  

३. अकर्मक भावे प्रयोगात क्रियापद विद्यर्थी असते.  

उदाहरणार्थ  .

त्याने आता घरी जावे.

४. शक्यार्थक क्रियापदाचा नेहमीच भावे प्रयोग होतो.  

उदाहरणार्थ  .

त्याला घरी जाववते.

भावकर्तरी प्रयोग

उदाहरणार्थ  .

अ) मला आज मळमळते.  

आ) तो घरी पोहचण्यापूर्वीच सांजावले.  

इ) आज सतत गडगडते.  

ई) सहलीस जाताना कात्रजजवळ उजाडले.  

वरील वाक्यातील क्रियापदांना कर्ते असे नाहीत. सर्वच वाक्यातील क्रियापदे तृतीयपुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी आहेत म्हणजे ती भावेप्रयोगी आहेत पण त्यांना कर्ते नसल्यामुळे हा अकर्तुक भावे प्रयोग होय.  

अशा वाक्यात क्रियेचा भाव किंवा अर्थ हाच वाक्यातील कर्ता असल्यामुळे यास भावकर्तरी प्रयोग असेही म्हणतात.

मिश्र किंवा संकर प्रयोग

कर्तरी व कर्मणी या दोन्ही प्रयोगाच्या छटा आढळणाच्या वाक्यातील प्रयोगास कर्तु-कर्मसंकर प्रयोग असे म्हणतात.

उदाहरणार्थ  .

अ) तू मला पुस्तक दिलेस.  

अ) तू कविता म्हटलीस.  

आ) तुम्ही कामे केलीत.  

इ) तू लाडू खाल्लास.

कर्म भाव संकर प्रयोग

कर्मणी व भाचे प्रयोगाच्या छटा असणा-या वाक्यातील प्रयोगास कर्म भाव संकर भाव संकर प्रयोग असे म्हणतात.

उदाहरणार्थ.

अ) आईने मुलीला निजवले.  

आ) मी त्याला मुंबईस धाडले.

कर्तु भाव संकर प्रयोग

कर्तरी व भावे प्रयोगाच्या छटा असणा-या वाक्यातील प्रयोगास कर्तु भाव संकर प्रयोग असे म्हणतात.

उदाहरणार्थ.  

अ) तू गाईला घालविलेस.  

आ) तू मला वाचविलेस.

Leave a Comment