{Best} Marathi kavita Aai | 10+ आई वरच्या कविता

Marathi kavita Aai – नमस्कार Inmarathi.in मध्ये तुमचे स्वागत आहे. आज तुमच्यासाठी घेऊन आलोय आई वरती सुंदर मराठी कविता आणि ते तुम्हाला नक्कीच आवडेल.

आई..

कुणीच नाही माझे .. आई
करूणेचे तळहात पोरके ..आई

आकांत श्वासांत , शांतता कुजबुज टाळे माझे ..आई
ना शुन्य आसपास, काळोख मावळे माझे ..आई
असे जवळ – तसे दूर भाबडे अंतराळ माझे ..आई

कुणीच नाही माझे ..आई
करूणेचे तळहात पोरके ..आई

असेल – आहे – असणार, कुणी शब्द गाळले माझे ..आई
अपराध असा परमेशाचा, का? तेज लोपती माझे ..आई
अभेद्य चौकट अश्रुंची, चित्र पुराणे माझे ..आई

कुणीच नाही माझे ..आई
करूणेचे तळहात पोरके ..आई

नक्की वाचा : shivaji maharajanchi kavita


     माझं दैवत..🙏

माझं दैवत उभं
माझ्याच घरात,
आयुष्यभरासाठी
‘आशीर्वाद’ देण्यास.

माझ्या मना
काहीच कळेना,
विसर मनाला
लागलो वारीला.

वारी-वारी करून
झालो मी बारीक,
खर्चुनी घरचं धन
लागली मनास सल.

सुखाच्या मी शोधात
कपाळी बुक्का लावत
माझं दैवत घरात
मी निघालो वारीत.

देहू-आळंदी झाले
पंढरी झाली-काशीलाही गेलो
मिसळलो मी वारीत
गुलाल खोबरे उधळत.

उशिराने कळुनी
चुकले मनास
‘वैभवाचं मंदिर’
त्यावर कळस.

‘तुळशीसम’ प्रसन्न
सगळीकडं सहभाग,
सुखदुखात सोबत
“मना हिरवं रोपटं”.

आली दाटुनी
नयनी आसवे,
मन माझे
पोरके झाले.

होतं घरीच दैवत
मी निघत वारीत,
मी निघत वारीत
माझं दैवत घरात.


नक्की वाचा : prem kavita in marathi


सुंदर भेट

देव तुला माझ्याकडे पाठवत आहे
वरील विशेष भेट म्हणून
मला जीवनाचे धडे शिकवण्यासाठी
आणि तुझ्या प्रेमाने मला जखडण्यासाठी.

हे देखील वाचा : 

love poem in marathi | प्रेम कविता| मराठी कविता

Prem kavita in marathi | मराठी कविता | प्रेम कविता

मित्रानो तुमच्याकडे जर “आई वरच्या कविता” विषयावर अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते Marathi kavita Aai आई कविता संग्रह या article मध्ये update करू . मित्रानो  हि Aai kavita in marathi कविता जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share  करायला विसरू नका. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.in

Leave a Comment