मराठी शब्दकोडी व उत्तरे | 100+ Marathi Kodi With Answer | Latest Marathi Riddles

मराठी शब्दकोडी- नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या वेबसाइटवर. जर तुम्ही Marathi Kodi With Answer, मराठी शब्दकोडी व उत्तरे ,अशा सपोस्टच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत. मी आशा करतो की तुम्हाला आमच हे Marathi Kodi With Answer,मराठी शब्दकोडी व उत्तरे ,कलेक्शन नक्की आवडल ,जर आवडले तर सोशल मीडिया वर जरूर शेयर करा आणि अश्याच भारी भारी पोस्ट्स साठी आमचा ब्लॉग inmarathi.in ला आवशय भेट दया…

नक्की वाचा: 50+ मराठी म्हणी अर्थासहित वाचण्यासाठी यावर क्लिक करा..👈

आटंगण पटंगण लाल लाल रान, अन् बत्तीस पिंपळांना एकच पान :-> तोंड(दात आणि जीभ)

 

हिरवी पेटी काट्यात पडली,उघडून पाहिली तर मोत्याने भरली :-> भेंडी

सुपभर लाह्या त्यात एक रुपया :-> चंद्र आणि चांदण्या

एवढस कार्टं घर कसं राखतं :-> कुलूप

हजार येती हजार जाती हजार बसती पारावर, अशी नारती जोराची हजार घेती ऊरावर :-> बस /ट्रेन.

सोन्याची सुरी भुईत पुरी, वर पटकार गमजा करी :-> गाजर

एका माणसाचे चार अक्षरी नाव काय? ज्याचे पहिले व दुसरे अक्षर म्हणजे त्याच्या बायकोचे नाव दुसरे व तिसरे अक्षर म्हणजे त्याच्या मुलीचे नाव तिसरे व चौथे अक्षर म्हणजे त्याच्या मुलाचे नाव व चारही अक्षर म्हणजे त्याचे नाव सांगा पाहु ते नाव काय? :-> सीताराम

सगळे गेले रानात, अन् झिपरी पोरगी घरात :-> केरसुणी

लाल आहे पण रंग नाही, कृष्ण आहे पण देव नाही, आड आहेपण पाणी नाही, वाणी आहे पण दुकान नाही :-> लालकृष्ण आडवाणी( माणूस )

मुकूट याच्या डोक्यावर, जांभळा­ झगा अंगावर :-> वांग

पुरूष असून पर्स वापरतो, वेडा नसून कागद फाडतो :-> कंडक्टर/ बस वाहक

पाणी नाही, पाऊस नाही, तरी रान कसं हिरवं , कात नाही,चुना नाही, तरी तोंड कसं रंगल :-> पोपट

पाटिल बुवा राम राम, दाढी मिशालांब लांब :-> कणीस

पांढरं पातेल पिवळा भात :-> अंड

दोन भाउ शेजारी, भेट नाही जन्मान्तरी :-> डोळे

तीनजण वाढायला बाराजण जेवायला :-> घड्याळ

कोकणातनं आली नार, तिचा पदर हिरवागार, तिच्या­ काखेला प्वार :-> काजू (फळासकट)

तीन पायांची तिपाई, वर बसला शिपाई :-> चूल आणि तवा

कोकणातनं आला भट , धर की आपट :-> नारळ

तिखट, मीठ, मसाला चार शिंग कशाला :-> लवंग

चार खंडांचा एक शहर, चार विहीरी बीना पानी, 18 चोर त्या शहरी 1 राणी आला 1 शिपाई सगळ्यांना मारुन मारून विहीरीत टाकी.!! सांगा काय आहे ? :-> कॅरम बोर्ड गेम

कोकणातनं आली सखी, तिच्या मानंवर दिली बुक्की , तिच्या घरभरलेकी- :-> लसूण

कुट कुट काडी पोटात नाडी, राम जन्मला हातजोडी कृष्ण जन्मला हात जोडी :-> देवर्‍यातील घण्टी / टाळ

काट्याकुट्या­ंचा बांधला भारा, कुठं जातोस ढबुण्या पोरा :-> फणस

मराठी शब्दकोडी
मराठी शब्दकोडी

कांड्यावर कांडी सात कांडी, वरसमुद्राची अंडी :-> ज्वारीचे कणीस

एवढीशी नन्नुबाय, सार्‍या वाटनं गीत गाय :-> शिट्टी

इथेच आहे पण दिसत नाही :-> वारा

आहे मला मुख,परंतु खात नाही, दिसते मी झोपलेली,पण असते पळतही, माझ्याशिवाय तुमचे,जगणेच शक्य नाही वहा तुम्ही माझी,थोडीशी कळजीही, मी कोण काढा शोधुन,नाहीतर बें म्हणा मागून :-> नदी

आटंगण पटंगण लाल लाल रान, अन् बत्तीस पिंपळांना एकच पान :-> तोंड(दात आणि जीभ)

 

Leave a Comment