Read More : मराठी भाषेचे महत्व | Marathi language
मराठी ही एक सुंदर भाषा आहे. जी मुख्यता: महाराष्ट्रात आणि मोठया प्रमाणात गोवा इथे बोलली जाते मराठी ही भारतातील २२ अधिकृत भाषापैकी एक आहे. मराठा हा भारतात सगळ्यात जास्त बोलली जाणारी चौथी भाषा आहे. मराठीच्या मुख्य पोटभाषा आहेत. त्या म्हणणे व-हाडी, कोळी, मालवणी आणि कोंकणी मराठी भाषा २००० वर्षापासून अस्तित्वात आहे म्हणूनच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्याचा प्रयत्न चालू आहे. आपण २७ फेब्रुवारीला मराठी दिन साजरा करतो. त्यादिवशी आपले लाडके साहित्यकार कुसुमाग्रजांचा वाढदिवस असतो.
१२८७ सी.ई नंतर यादव काळात मराठीचा वापर वाढला. यादव राजे अगोदर कन्नड आणि संस्कृत भाषा वापरत असत. १४ व्या शतकात शेवटी मराठी ही वर्णलेखाची प्रमुख भाषा झाली, असे मानले जाते की यादवांनी मराठीला प्राधान्य दिले कारण ते मराठी बोलणाऱ्या प्रजेशी स्वत:ला जोडण्याचा प्रयत्न करत होते. यादव राजवटीला शेवटच्या तीन राज्याच्या काळात ज्योतिष, आयुर्वेद, पुराण, वेदांत मराठी साहित्य गदय आणि काव्य रुपात तयार करण्यात आले.
आज मराठी ज्या रुपात जिवंत आहे ती फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे, त्यांच्या काळात मराठीला खरे महत्व प्राप्त झाले. शासकीय कामकाज आणि बोली भाषा म्हणून मराठीचा विस्तार झाला. मराठी भाषेवरील पार्शिअन भाषेचा प्रभाव या काळातच कमी झाला. या काळात मराठी ही मोडी लिपीत लिहिली जात असे. बऱ्याच वर्षापासून इंग्रजी माध्यमातून शिक्षण प्रणाली आल्यापासून मराठी माध्यमातील शिक्षणाला महत्व देणे कमी झालेले दिसते. मराठी भाषेतील साहित्य कविता, नाटके, प्रवास वर्णन, निबंध,लघुनिबंध हयाचा दर्जा बघितला तर अतिशय गर्व वाटतो. मराठी, साहित्यकारांनी आपल्यासाठी अतिशय मोलाचा ठेवा ठेवलेला आहे ते आपण मुलांना वाचण्यास प्रवृत्त करायला हवे. आपल्या महाराष्ट्राला बऱ्याच संतांचा ठेवा लाभलेला आहे.

संत ज्ञानेश्वर यांनी ज्ञानेश्वरी’ सारखा ग्रंथ लिहिला आहे. संत रामदास स्वामी हयानी “मनाचे श्लोक” लिहिले आहेत. हया दर्जेदार लिखाणाला न विसरता हयांचे अध्ययन, पठन, चिंतन करायला हवे. मराठी ही एक प्राचीन आणि सुंदर भाषा आहे. तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाच पाहिजे. बदलत्या काळात इंग्रजीसुद्धा शिकली पाहिजे, हिंदी सुद्धा बोलावी लागते पण जो गोडवा मराठीत आहे. तो कशातच नाही. आपण वेळेवर बदलले पाहिजे, पण याचा अर्थ असा नाही की आपण आपले मुळ, आपली भाषा, मराठी संस्कृती विसरली पाहिजे. मराठी भाषा ही इंडो युरोपिय भाषाकुलातील एक भाषा आहे. मराठी भाषा ९ व्या शतकापासून प्रचलित असून, मराठी भाषेची निर्मिती संस्कृतपासून झालेल्या महाराष्ट्री। प्राकृत व अपभ्रंश या भाषांपासून झाली आहे. महाराष्ट्र आणि गोवा हया राज्याची मराठी ही अधिकत भाषा आहे. मराठी मातृभाषा असणान्या लोकसंख्येनसार मराठी ही जगातील दहावी व भारतातील तिसरी भाषा आहे. २०११ च्या जनगणनेनुसार, मराठी बोलणान्यांची एकूण लोकसंख्या ९ कोटी आहे.
मराठी भाषेचा उदय संस्कृतच्या प्रभावाखाली निर्माण झालेल्या भाषेचा महाराष्ट्री या बोलीभाषेपासून झाला, असे बहुतांशी मानले जाते. पैठण येथील सातवाहन साम्राज्याने महाराष्ट्राभाषेचा प्रशासनात सर्वप्रथम वापर केला. देवगिरीच्या यादवांच्या काळात मराठी भाषा व संस्कृतीची भरभराट झाली, मराठी ही भाषा देवनागरी लिपी वापरुन लिहिली जाते. इ.स. १२९० मध्ये ‘ज्ञानेश्वरी’ या ग्रंथाची रचना ज्ञानेश्वरांनी केली. महानुभाव संप्रदायाने मराठी साहित्यात मौलिक भर घातली. संत एकनाथ यांनी या भाषेत ‘भारुडे’ लिहिली आणि ‘एकनाथी भागवत’, भावार्थ रामायण’ आदि ग्रंथाची भर घातली.
Read More : मराठी भाषा दिवस / Marathi language
२७ फेब्रुवारी हा मराठी राजभाषा दिन! त्या निमित्ताने मराठी भाषेच्या सध्या स्थितीसंबधता चर्चा करणे उचित ठरावे. इंग्रजीचे आक्रमण आणि जागतिकीकरणाच्या झंझावतात मराठी भाषा अणि संस्कृती नष्ट होण्याची भीती सातत्याने व्यक्त केली जाते. परंतू आज जागतिक संदर्भातही मराठी भाविकांची असलेली प्रचंड संख्या पाहता तिच्या हासाची
ही भीती अनाठायी आहे असे म्हणावे लागेल.
खरचं, आपण सगळे भाग्यवान आहोत कारण मराठी ही भाषा खूपच गोड आणि सुंदर आहे. मराठी माणसाची खासियत अशी की तो हिन्दी, संस्कृत या भाषा सहज आणि सोप्यारितीने समजू बोलू शकतो. तसेच इंग्रजी भाषा बोलणेही सोपे जाते कारण मराठी भाषा ही या भाषांमधूनच विकसित केली आहे. तसेच तिचे विभाजन ही तेथील प्रदेशानुसार केले गेले आहे. त्यात विदर्भाची वैदर्भी,कोकणी, मालवणी अशा मराठी पुरक भाषांचा समावेश होतो. खेडयापाडयातही रांगडी आणि अशुद्ध, अपभ्रंश, असलेली भाषा असते. कशीही असो ती मराठीच म्हणन मराठी माणसाला आवडते. आपल्या भाषेचा आपल्याला अभिमान असतो. पण अलिकडे आपल्या तरुण मंडळींना इंग्रजी भाषेचे जास्त आकर्षण ! त्यात त्यांचा दोष नाही. कारण त्यातच महाविदयालयीन आणि आणि उच्च शिक्षण सर्व इंग्रजीतून होत असतं. पदव्या मिळवून तरुण मंडळी परदेशात उच्च शिक्षणासाठी जातात. तिथे इंग्रजी भाषाच बोलावी, लिहावी लागते.
Read More : यशस्वी माणसाची मराठीमध्ये यशोगाथा
Read More : Top मराठी सुविचार
मराठी ही निव्वळ भाषाच नाही तर एक संस्कृती आहे. मराठी भाषेचा इतिहास खूप आधीपासून म्हणजेच अगदी राष्ट्रकुट राजापासून अस्तित्वात आहे. मराठी भाषा लवचिक आहे. थोडया थोडया फरकाने शब्दांचे अर्थ बदलतात. मुंबईची मराठी भाषा। हल्ली खिचडी भाषा झाली आहे. शुद्ध मराठी राहिली नाही. तिच्यात हिंदी, मराठी, इंग्रजी यांची भेसळ झाली आहे. हिंदी आणि इंग्रजी सिनेमा पाहून भाषा अशी झाली आहे. पूर्वी मराठीला मान नव्हता, पण आता काही प्रमाणात आहे.
‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी! जाहले खरेच धन्य ऐकतो मराठी।।’