500+ Marathi Mhani | मराठी म्हणी | Marathi Slogans

Read More : marathi slogans

अळवाची खाज़ अळवाला ठा‌ऊक.
अर्थ – आपले व्यंग आपणासच माहिती असते

असेल हरी तर दे‌ईल खाटल्यावरी.
अर्थ – स्वतः आळशी पनाणे काहीही उद्योग नं करता
दैवावर विसंबून सर्व सुखे मिळण्याची अपेक्षा धरणे .

अड्क्याची भवानी सपिकेचा शेंदूर.
अर्थ – क्षुल्लक गोष्टीसाठी भरमसाठ खर्च

अर्धी दान महापुण्य
अर्थ – गरजू माणसाला दान दिल्यामुळे पुण्य मिळते .

असंगाशी संग प्राणाशी गाठ
अर्थ – अयोग्य माणसाशी संगत केल्याने प्रसंगी आपले प्राण गमवावे लागतात

अळीमिळी गुपचिळी
अर्थ – आपले गुपित किंवा रहस्य उघडकीस येऊ नये म्हणून गप्प राहणे.

अति रागा भीक मागा
अर्थ – ज्याला अतोनात राग येतो किंवा ज्याचा राग अनावर असतो त्याला पुढे भीक मागण्याची पाळी येते. इथे भीक म्हणजे याचना समजावी, ती कशाही साठी असु शकते.

अति शहाणा त्याचा बैल रिकामा
अर्थ– अति शहाणपणाने नुकसान होते.

अन्नछत्रात जेवण वर मिरपूड मागणे
अर्थ – फुकट तर जेवायचे वर पुन्हा मिजास दाखवायची.

अग अग म्हशी मला कुठे नेशी
अर्थ – स्वतःला हवी असणारी गोष्ट दुसऱ्याच्या आग्रहाखातर केली असे भासवणे.

अचाट खाणे अन मसणात जाणे
अर्थ – कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केल्यास परिणाम नुकसान दायक असतात.

अति तेथे माती
अर्थ – कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट ठरतो.

अडला हरी गाढवाचे पाय धरी
अर्थ – अडचणीच्या वेळी मूर्खाचीही मनधरणी करावी लागते.

असेल त्या दिवशी दिवाळी नसेल त्या दिवशी शिमगा
अर्थ – अनुकूलता असेल तेव्हा चैन आणि नसेल तेव्हा उपवास करण्याची पाळी.

अडली गाय फटके खाय
अर्थ – एखादा माणूस अडचणीत सापडल्यावर त्याला हैराण करणे.

अन्नाचा मारलेला खाली पाही नि तलवारीने मारलेला वर पाही
अर्थ – सौम्यपणाने मनुष्य वश करता येतो पण उद्धट पणाने तो आपला शत्रू बनतो .

अर्धी टाकून सगळीकडे धावू नये .
अर्थ – सबंध वस्तू मिळेल या आशेवर अर्धी टाकू नये.

अडाण्याची मोळी, भलत्यासच मिळी.
अर्थ – अडाणी माणसाने एखादी गोष्ट केली असता परिणाम विपरीत होतो.

अढीच्या दिढी सावकाराची सढी.
अर्थ – अडलेला माणूस सरकारच्या पाशात सापडतो.

अल्प बुध्दी, बहु गर्वी.
अर्थ – कमी बुद्धीच्या मनुष्यास गर्व अधिक असतो.

असतील मुली तर पेटतील चुली.
अर्थ – संतती असल्यास हिस्सेवाटे होतीलच.

असतील शिते तर जमतील भूते.
अर्थ – एखाद्या माणसाजवळ पैसा असेल किंवा फायदा होणार असेल त्याच्याभोवती माणसे गोळा होतात.

आवळा देऊन कोहळा काढणे
अर्थ – स्वार्थासाठी एखाद्याला लहान वस्तू देऊन मोठी वस्तू मिळवणे.

आयत्या बिळात नागोबा
अर्थ – दुसऱ्याने केलेल्या गोष्टीचा स्वतःकरिता आयता फायदा घेण्याची वृत्ती.

आपल्याच पोळीवर तूप ओढणे
अर्थ – फक्त स्वतःचाच तेवढा फायदा करून घेणे.

आधीच तारे त्यात शिरले वारे
अर्थ – आधीच मर्कट आणि त्यात मद्य प्यावे तसे होणे.

आ‌ईचा काळ, बायकोचा मवाळ.
अर्थ – आईकडे दुर्लक्ष करणे पण बायकोची काळजी घेणे.

आ‌ईची माया अन पोर जा‌ईला वाया.
अर्थ – फार लाड केले तर मुले बिघडतात.

आखाड्याच्या मेळावात पहेलवानाची किंमत.
अर्थ – योग्य माणसाचा योग्य ठिकाणी उपयोग.

आग रामेश्वरी अऩ बंब सोमेश्वरी.
अर्थ – गरज असलेल्या माणसाला मदत न करता ज्याला गरज नाही त्याला मदत करणे.

आज अंबारी, उद्या झोळी धरी.
अर्थ – कधी वैभव तर कधी दैन्य.

आधी जाते बुद्धी, मग जाते लक्ष्मी
अर्थ – आधी आचरण बिघडते मग वाईट दशा प्राप्त होते.

आपण हसे लोकाला, शेंबूड आपल्या नाकाला
अर्थ – ज्या दोषाबद्दल आपण दुसऱ्याला हसतो , तोच दोष आपल्या ठिकाणी असणे अशी स्थिती.

आपला हात जगन्नाथ
अर्थ – मनुष्याचा उत्कर्ष त्याच्या कर्तृत्वावर अवलंबून असतो.

आखाड्याच्या मेळावात पहेलवानाची किंमत.
अर्थ – योग्य माणसाचा योग्य ठिकाणी उपयोग.

आग रामेश्वरी अऩ बंब सोमेश्वरी.
अर्थ – गरज असलेल्या माणसाला मदत न करता ज्याला गरज नाही त्याला मदत करणे.

आज अंबारी, उद्या झोळी धरी.
अर्थ – कधी वैभव तर कधी दैन्य.

आठ हात लाकुड, न‌ऊ हात धलपी.
अर्थ – अत्यंत मूर्खपणाची अतिशयोक्ती.

आपलेच दांत अऩ आपलेच ओठ.
अर्थ – शिक्षा करणारे पण आपणच आणि ज्याला शिक्षा करायची आहे तोही आपल्यातीलच अशी अडचणीची परिस्थिती.

आपल्या कानी सात बाळ्या.
अर्थ – एखाद्या वाईट कृत्यात आपले अंग मुळीच नाही असे दाखवणे.

आली अंगावर, घेतली शिंगावर.
अर्थ – संकटाशी धैर्याने सामना करणे.

आसू ना मासू, कुत्र्याची सासू.
अर्थ – जेथे जिव्हाळा नाही तेथे प्रेम नाही.

इच्छा तसे फळ.
अर्थ – जशी वासना असते असे फळ मिळते.

ईश्वर जन्मास घालतो त्याचे पदरी शेर बांधतो.
अर्थ – जन्मास आलेल्याचे पालनपोषण होतेच.

उंदराला मांजराची साक्ष.
अर्थ – दोघेही एकमेकांचे साक्षीदार असल्याची परीस्थिती.

उंदीर गेला लुटी आणल्या दोन मुठी.
अर्थ – प्रत्येक मनुष्य आपल्या क्षमतेनुसार काम करतो.

उडत्या पक्षाची पिसे मोजणे.
अर्थ – अगदी सहज चालता चालता एखाद्या गोष्टीची परिक्षा करणे.

उडाला तर कावळा, बुडाला तर बेडूक.
अर्थ – एखाद्या गोष्टीची परीक्षा होण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागते.

उतावळा नवरा घुडग्याला बाशिंग.
अर्थ – अतिशय उतावळेपणामुळे होणारे मूर्खपणाचे वर्तन.

उंटावरून शेळ्या हाकणे.
अर्थ – आळस, हलगर्जीपणा करणे.

Read More : मराठी सुविचार वाचण्यासाठी यावर क्लिक करा..

Read More : marathi slogans

उत्तम शेती, माध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी.
अर्थ – सर्व धंद्यात शेती उत्तम, त्यानंतर व्यापार आणि सरते शेवटचा क्रमांक नोकरी .

उथळ पाण्याला खळखळाट फार.
अर्थ – ज्याच्या अंगी गुण थोडा तो फार बढाई मारतो.

उद्योगाचे घरी रिध्दी सिध्दी पाणी भरी.
अर्थ – उद्योगी माणसाला सर्व वैभव प्राप्त करुन घेता येते .

उधार तेल खवट.
अर्थ – उधारीच्या वस्तूत काही न काही खराबी किंवा उणीव असतेच .

उधारीचे पोते, सव्वा हात रिते.
अर्थ – उधारीने घेतलेला माल नेहमीच कमी भरतो .

उभारले राजवाडे तेथे आले नकवडे.
अर्थ – श्रीमंत माणसाशी खुशात करणारे गोळा होत असतात .

उभ्याने यावे आणि ओणव्याने जावे.
अर्थ – येते वेळी ताठ मानेने यावे आणि जातेवेळी खाली मान घालून जाणे.

उसना पसारा देवाचा आसरा.
अर्थ – सारे प्रयत्न केल्यावर देवाची प्रार्थना करणे .

उसाच्या पोटी कापूस.
अर्थ – सद्गुणी माणसाच्या पोटी दुर्गुणी संतती .

ऊस गोड लागला म्हणून मुळासगट खावू नये.
अर्थ – एखादी गोष्ट चांगली असली म्हणून ती फार उपभोगू नये.

marathi slogans

Leave a Comment