Marathi Stories Reading | मराठी कथा | Marathi Stories In Marathi

Marathi stories reading : नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या वेबसाइटवर. जर तुम्ही stories in marathi , सुंदर छान छान मराठी गोष्टी, संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत. मी आशा करतो की तुम्हाला आमच हे stories with moral in marathi , कलेक्शन नक्की आवडल ,जर आवडले तर सोशल मीडिया वर जरूर शेयर करा आणि अश्याच भारी भारी पोस्ट्स साठी आमचा ब्लॉग inmarathi.in ला आवशय भेट दया.

Marathi Stories Reading | मराठी कथा | Marathi Stories In Marathi

Marathi Stories Reading:- दृष्ट मांजर 

जंगलामध्ये एका झाडावर घार राहत होती. त्याच झाडाच्या खाली मांजर राहत होती. झाडाच्या खाली खोडाजवळ एक डुकरीण तिच्या पिल्लांबरोबर राहत होती. पण त्यांचे कोणाचेच एकमेकांशी पटत नसे. शेजारी असूनही ते एकमेकांशी बोलत नव्हते.

मांजरीला वाटत होते की, उरलेले दोघे इथून जायला हवे म्हणजे पूर्ण झाडावर मी एकटीच राहीन. ती नेहमी बाकी दोघांना तेथून हटवण्यासाठी उपाय शोधत होती. एक दिवस तिच्या डोक्यामध्ये एक दुष्ट कल्पना आली. मांजराने घारीला बोलवले.

मांजर घारीला म्हणाली, “हे बघ डुकरीण झाडांची मुळे उकरत आहेत. लवकरच हे झाड पडेल आणि डुकरीण तुझ्या पिल्लांना खाऊन टाकण्याचा प्रयत्न करते .

घार हे ऐकून खूपच घाबरली. नंतर मांजर डुकरीणीकडे गेली आणि तिला म्हणाली, “तू जेव्हा बाहेर जाशील तेव्हा घार तुझ्या पिल्लांना खाऊन टाकणार आहे. मी तिला तसे म्हणताना ऐकले आहे.’

डुकरीण पण घाबरली. त्या दोघी घाबरून आपल्या घरातून बाहेर पडल्याच नाहीत. एके दिवशी दोघी भुकेने मारून गेल्या. अशा प्रकारे पूर्ण झाडावर मांजर एकटी राहू लागली. मांजरीने त्या दोघींना आपापसात घाबरूनच मारून टाकले.

तात्पर्य -शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ.

Marathi Stories Reading:- हुशार मुलगा आणि चोर

फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एक चोर होता. त्याला आपण चोर असण्याचा गर्व होता. त्याला वाटायचे की, आपल्या इतके हुशार कोणीच नाही. यथे मला
मला चोरी करण्यामध्ये कोणीच हरवू शकत नाही. तो सहज कोणालाही मूर्ख बनवत असे. तो कोठेतरी चोरी करायला गेला आणि चोरी न करता परत आला आहे अस कधीच झाले नाही .

एके दिवशी चोराने एका विहिरीजवळ एका मुलाला पहिले. तो मुलगा रडत होता. चोराने त्याला विचारले, “तू का रडत आहेस?” मुलाने त्याला दोरीचा एक तुकडा दाखवून म्हटले की, “या विहिरीत, माझी चांदीची बादली पडली आहे.”

चोराने विचार केला, “पहिली मी याची बदली काढून देतो. मग याची बादली चोरुयात”. विचार करून चोर मुलाला म्हणाला ,”तू रडणे थांबव” मी बादली शोधून काढतो.

त्याने कपडे काढले आणि विहिरीत उडी मारली. त्याने बादली शोधली, पण त्याला तिथे काहीच मिळाले नाही. जेव्हा तो विहिरीतून बाहेर आला.त्याने पहिले की, मुलगा त्याचे सगळे कपडे घेऊन गायब झाला होता. त्याने चोराला मूर्ख बनवले होते व चोर स्वताच फसला होता.

तात्पर्य- गर्वाचे घर खाली .

Marathi Stories Reading:- गर्विष्ठ गाढव आणि एक कुत्रा

फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एका माणसाजवळ एक गाढव आणि एक कुत्रा होता. एक दिवस तो माणूस त्याच्या जानावारांबरोबर शहरातून परतत होता. गाढवाच्या पाठीवर पोती लादलेली होती. तिघेही भुकेलेले आणि थकलेले होते.

मालक नेहमी गाढवाची जादा काळजी घेत असे. त्यामुळे गाढवाला गर्व झाला होता. गाढवाला कुत्र्याशी दोस्ती करण्यात रस नव्हता.
ते जंगलातून जात असताना तो माणूस थकलेला असल्यामुळे थोडा वेळ आराम करण्यासाठी जंगलात एका झाडाखाली बसला आणि त्याला झोप लागली. गाढव गवत खायला लागला.

कुत्रा गाढवाला म्हंटला,”कृपा करून थोडा खाली वाक”मी तुझ्या पाठीवर असणाऱ्या पोत्या मधून थोडेसे खायला घेतो. मला खूप भूक लागली आहे.

गाढवा त्याला म्हटला,”आपल्या मालकाला उठू देत, ते तुला काहीतरी खायला देतील.” कुत्रा गुपचूप झोपला. अचानक तेथे का लांडगा आला आणि तो गाढवावर तुटून पडला.

गाढव कुत्र्याला म्हणाला,”मित्रा, कृपाकरून माझे प्राण वाचव.”कुत्र्याला बदला घेण्यासाठी आयती संधी मिळाली होती. कुत्रा त्याला म्हंटला ,”आपल्या मालकाला उठू देत तो तुला वाचवेल. “गाढव जसा वागला होता. तसेच कुत्र्याने पण उत्तर दिले.

तात्पर्य-करावे तसे भरावे याची प्रचीती त्याला आली.

Marathi Stories Reading:- पती,पत्नी आणि गाढव 

एका गावामध्ये पती आणि पत्नी आपल्या गाढवाला गावाच्या जत्रेत विकण्यासाठी घेऊन जात होते. पत्नी गाढवावर बसलेली आणि पती पायी चालत ते जात असतात .
एवढ्यात रस्त्यावरील एकजण म्हणाला,”पहा!पत्नी गाढवावर बसली आहे आणि पती पायी चालवत आहे.”हे ऐकताच पत्नी खाली उतरते आणि तिने पतीला गाढवावर बसण्यास आग्रह केला .

तेवढ्यात कोणी तरी म्हटले,”अरे व्वा!बिचारा पत्नी पायी येत आहे आणि तू गाढवावर बसला आहेस? तुला लाज नाही वाटत?”तिच्या पतीला काहीच सुचेना की काय करावे.लोकांनी प्रश्न विचारू नये म्हणून पती आणि पत्नी दोघेही एकदमच गाढवावर बसले.

काही वेळाने एका मुलीने त्या तिघांना पहिले. मुलगी म्हणाली,”केव्हापासून तुम्ही दोघे गाढवावर बसला आहात? जरा गाढवाला आराम द्या की!”

लोकांच्या उलट-सुलट प्रतिक्रिया ऐकूनत्यामुळे तिघेपण पायी चालू लागले. ते पायी चालत आहे हे एका माणसाने पहिले तो म्हणू लागला कि,”गाढव असून पण पायी चालत आहे “.

तात्पर्य- आपण योग्य मार्गावर आसू तर आपण लोकांच्या उल-सुलट प्रतिक्रियांकडे लक्ष देता कामा नये.

Marathi Stories Reading:- गोंधळाचे राज्य 

फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एकदा एका देशात, खूप गोंधळ असतो. लोक वाईट वागायला लागतात. लोक एकमेकांचे ऐकत नसतात. कोणाचा कोणावर विश्वास नसतो. देशात चोरांचे प्रमाण वाढते. राजापण या सगळ्या गोष्टी मध्ये सहभागी असतो. त्याचे त्याच्या प्रजेकडे लक्षच नसते.

स्वर्गातून देव हे सगळ पाहत असतो. देवाला ते सगळ पाहून खूप वाईट वाटत. मग देव ठरवतो या सगळ्या लोकांना धडा शिकवायचा म्हणून देव एका जंगल प्रमुखाचे रूप धारण करतो. बरोबर एक भयंकर अक्राळ-विक्राळ कुत्रा घेऊन जातो.

कुत्रा लोकांच्या अंगावर जोरजोरात भुंकत असतो, भुंकण्याच्या दणदणीत आवाजाने लोक घाबरून इकडे तिकडे धावायला लागतात. लोकांच्या ओरडण्याचा आवज ऐकून राजा कसला आवाज आहे म्हणून बाहेर येतो. पाहतो तर, एक भयंकर कुत्रा त्याच्या मालकाबरोबर उभा असतो.

तो माणूस राजाला म्हणतो, ‘माझा कुत्रा भुकेलेला आहे आणि ज्या लोकांनी पाप केले आहे त्यांना तो खाऊन टाकणार आहे. ‘राजा घाबरतो. गयावया करू लागतो. राजा आणि देशातील सर्व लोक त्यंची माफी मागू लागतात.

जंगलाचा राखणदार त्याच्या खऱ्या रुपात म्हणजेच देव रुपात येतो. सर्वजण देवाची क्षमा मागतात. आणि पुन्हा असे न वागण्याचे वचन देतात.

तात्पर्य – नेहमी चांगले वागावे.

Marathi Stories Reading:- चांगला माणूस आणि दृष्ट माणूस

एका गावामध्ये एक मंदिर होते. एक चांगला माणूस असतो तो देवाचा दिवा व पूजा करण्यासाठी रोज जात असे. हे सर्व तो देव प्रसन्न होण्यासाठी करत असे. पण एक दृष्ट माणूस त्या माणसाने लावलेला दिवा विझवून टाकत असे. चांगला माणूस पुन्हा दुसर्या दिवशी येतो व दिवा लावून जातो. पुन्हा दृष्ट माणूस येतो आणि दिवा विझवून टाकतो. तिसऱ्या दिवशी असेच होते. असे अनेक दिवस असाच नित्यक्रम चालू असतो .

चांगल्या माणसाच्या लक्षात येते कि आपण लावलेला दिवा कोणीतरी येवून विझवून जात आहे. मग तो माणूस विचार करतो कि आपण लावलेला दिवा रोज कोणीतरी विझवून टाकत आहे. दिवा लावण्यामध्ये काही अर्थ नाही.

एक दिवस तो दिवा लावण्यासाठी व पुजा करण्यासाठी मंदिरात जात नाही पण दृष्ट माणूस त्या दिवशी पण मंदिरात दिवा विझवण्यासाठी येतो पण मंदिरामध्ये दिवा लावलेला नसतो आणि दृष्ट माणसाला देव प्रसन्न होतो . कारण तो नित्यनेमाने त्याचे काम करतो .

तात्पर्य – नित्यनेमेने काम केल्यास फळ मिळते .

Marathi Stories Reading:- हुशार बेडूक 

फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे .एकदा एक राजा आपल्या मुलांसाठी राजवाड्याजवळ एक मोठ्ठ तलाव बांधतो आणि त्यात मुलांना खेळण्यासाठी मासे सोडतो.
तलाव तयार झाल्यावर त्याची मुलं तलाव पाहायला जातात. त्या तलावात सगळ्या माशांबरोबर एक बेडूकपण राहत असते. राजाच्या मुलांनी त्याअगोदर बेडूक कधी पाहिलेले नसते त्यामुळे त्यांना वाटते तलावात हा बेढब प्राणी कशाला? ते राजाला जाऊन सांगतात कि तलावात त्यांना न आवडणारा एक बेढब प्राणी आहे.

राजा लगेचच त्याच्या शिपायांना सांगतो कि त्या बेढब प्राण्याला मारून टाका. तेव्हा शिपाई तलावाच्या काठावर उभे राहून आपापसात काय करायचे ते ठरवू लागतात. कोणी सांगतात त्याला जाळून टाका, चिरडून टाका. सर्वांच्या वेगवेगळ्या सूचना येतात. शेवटी पाण्याला घाबरणारा वृध्द शिपाई सांगतो कि ‘त्या प्राण्याला दूर वाहत्या पाण्यात फेकून द्या म्हणजे तो वाहत जाऊन खडकावर आपटेल आणि मरेल.’ते ऐकून हुशार बेडूक म्हणाले मला पाण्यात फेकू नका नाहीतर मी मरून जाईन.’

बेडूकाची याचना ऐकून शिपाई त्याला पटकन पाण्यात फेकून देतात. बेडूक जोरजोरात हसू लागते आणि म्हणते ‘या मूर्ख लोकांना माहित नाही कि, मी पाण्यात किती सुरक्षित आहे.’

तात्पर्य – शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ट.

Marathi Stories Reading:- राक्षस आणि राजा

एका गावात एक राजकुमार राहत असे. तो अत्यंत शूर असतो. एक दिवस तो जंगलातून जात असताना त्यला एक राक्षस अडवतो. राक्षस त्याला धमकावतो ‘आता मी तुला खाणार आहे.’ राजकुमार म्हणतो, मी तुला माझ्या शस्त्रांनी ठार मारून टाकीन.

राजपुत्र राक्षसाबरोबर खूप वेळ धाडसाने लढाई करतो. राक्षसाला आश्चर्य वाटते, तो राजकुमाराला विचारतो. तू मला खरच घाबरत नाहीस?
राजकुमार त्याला म्हणतो,’ माझ्या पोटाच्या बेंबीत हिरा आहे आणि तेच माझ मोठ शस्त्र आहे. जर तू मला मारून टाकले तर तू देखील मरणार. त्यामुळे मला तुला घाबरण्याचे काहीच कारण नाही.

हे सर्व राक्षसाला खरच वाटले आणि तो राजकुमारला सोडून देतो: परंतु प्रत्यक्षात राजकुमारच्या पोटात हिऱ्याचे शस्त्र वगैरे काहीच नसते.ते राजकुमारने केलेले एक नाटक असते शेवटी त्याला त्याचे हजरजबाबिपनाचेच शस्त्र वाचवते.

तात्पर्य – शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ट.

Marathi Stories Reading:- खरा न्याय

एका गावात राम आणि शाम नावाचे दोन व्यापारी राहत असतात. ते एकमेकांचे खूप चांगले मित्र असतात. एक दिवस अचानक राम त्याची सर्व संपत्ती गमावतो. तो गरीब होतो. तो शामकडे मदतीसाठी येतो. शाम खूप दयाळू मानाने फार चांगला असतो. तो क्षणाचा हि विचार न करता,रामला आपल्या संपत्ती मधील अर्धा वाटा देऊन टाकतो.

शामच्या मदतीमुळे रामला फार आनंद होतो. तो शामला वाचन देतो कि, जेव्हा कधी तुला मदत लागेल तेव्हा मी तुला अवश्य मदत करीन. खूप वर्षानंतर शाम गरीब बनतो. त्याला रामची आठवण येते आणि तो मदतीच्या अपेक्षेने रामकडे जातो. परंतु राम त्याला मदत न करता घरातून हाकलून देतो

शामला खूप वाईट. राम खूप बदललेला असतो. शामच्या एका नौकाराने हे सर्व ऐकलेले असते. तो राजाकडे जातो आणि राजाला सर्व गोष्ट सांगतो. राजा सगळे ऐकून घेतो. सगळी माहिती काढतो.

राजा शामला आणि रामला बोलावतो. राजा रामला त्याच्या वचनाची आठवण करून देतो. राजा लगेच रामला आदेश देतो कि, त्याने त्याची अर्धी मालमत्ता शाम बरोबर वाटून घ्यावी शामला योग्य तो न्याय मिळतो. शामने रामला अर्धी मालमत्ता दिली होती तशीच राम शामला देतो. आता खरा न्याय होतो.

तात्पर्य -खरा न्याय करावा.

Marathi Stories Reading:- दोन मित्र 

एका गावात रघु आणि श्याम नावाचे दोन शेतकरी असतात. दोघेही एकमेकांचे चांगले मित्र असतात. एक दिवस रघु काही कामानिमित्त बाहेरगावी जाणार असतो म्हणून तो त्याचा शेत नांगरण्याचा नांगर श्यामकडे ठेवून जातो. दुसऱ्या दिवशी श्याम नांगर विकतो व त्याचे पैसे मिळवतो. काही दिवसांनी रघु त्याचे काम संपवून श्यामकडे नांगर घ्यायला जातो. श्याम त्याला म्हणतो ‘ नांगर उंदराने खाल्ला’ .

श्यामचे हे विचित्र उत्तर ऐकून रघुला धक्काच बसतो. तो श्यामला धडा शिकवण्याचे ठरवतो. त्याच दिवशी संध्याकाळी रघु श्यामच्या मुलाला स्वत:च्या एका मित्राकडे नेतो. मित्राच्या घरी ठेवतो आणि त्याला सांगतो, कि जो पर्यंत मी परत येत नाही तो पर्यंत या लहान मुलाला तुझ्या घरी ठेव’.

रात्री उशिरा श्याम रघुला त्याच्या मुलाबद्दल विचारतो तेव्हा राम म्हणतो, ‘ एक पक्षी येउन तुझ्या मुलाला घेऊन गेला. ‘ श्याम त्याला चिडून म्हणतो पक्षी कसा काय मुलाला उचलू शकतो? त्यांचे भांडण मिटता मिटत नाही.

श्याम रागाने न्यायालयात जातो. न्यायाधीशांना सर्व हकीकत सांगतो. न्यायाधीश रामला विचारतात, ‘एखांदा पक्षी मुलाला कसा काय घेऊन जाऊ शकतो? हे कस शक्य आहे?

रघु न्यायाधीशांना म्हणतो ‘ जर पक्षी मुलाला घेऊन जाऊ शकत नाही तर मग उंदीर नांगराला कसा काय खाऊ शकतो? न्यायाधीशांना रघु काय बोलत आहे काहीच समजत नाही आणि ते त्याला म्हणतात,’ तुझ्या म्हणण्याचा अर्थ काय?
रघु त्यांना नांगराची हकीकत सांगतो.

न्यायाधीशांना समजते कि नक्की काय गडबड झाली. न्यायाधीश श्यामला सांगतात ‘ रघुला त्याचा नांगर परत दे, तो तुझा मुलगा तुला परत देईल.

तात्पर्य – कोणाचाही विश्वास तोडू नये.

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇

छान छान मराठी बोधकथा | 10+ Small stories in marathi with moral

Story In Marathi Akbar Birbal | अकबर बिरबलाच्या गोष्टी मराठी मध्ये

Stories In Marathi | 20+ मराठी बोधकथा | Short Stories with Moral for Kids

Leave a Comment