दैनंदिन जीवनातील कामे सुकर पार पाडण्यासाठी आपल्याजवळ असेलेले एकमेव हक्काचे साधन म्हणजे मोबाईल. पण तुम्ही कधी हा विचार केलाय का कि जर आपल्याकडे मोबाईल नसता तर काय झालं असत? (mobile-naste-tar-nibandh-in-marathi).
मोबाईल नसता तर? मोबाईल चा शोध लागला नसता तर? हे आम्ही ह्या लेखातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मुलांना शाळेमध्ये बऱ्याचदा मोबाईल नसता तर? मोबाईल चा शोध लागला नसता तर? या विषयावर निबंध किंवा भाषण तयार करून आणण्यास सांगितले जाते. ह्या लेखामध्ये आम्ही मोबाईल नसता तर? या विषयावर मराठी माहिती दिली आहे. हि माहिती तुम्हाला मोबाईल नसता तर? ह्या विषयावर निबंध तसेच भाषण लिहण्यास मदत करेल. चला तर मग सुरु करूया.
Read More : माझी शाळा | My school essay in marathi
आज मोबाईल आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनला आहे. एकवेळ जेवायला मिळाले नाही तरी चालेल पण मोबाईल रिचार्ज साठी पैसा हवा अशी परिस्थिती बनली आहे. अगदी हातगाडीवाल्यापासून ते भाजी विक्री करणाऱ्या बाईकडेही आजकाल मोबाईल बघायला मिळतो. मोबाईल ने सामान्यांच्या आयुष्यात एक मोठी क्रांती घडवून आणली आहे.
दूरवर अमेरिकेत जाऊन वसलेल्या मुलांच्या म्हाताऱ्या आईबापासाठी मोबाईल हे एक वरदानच आहे. विडिओ कॉल मुळे त्यांना आपल्या मुलांशी नातवंडांशी सहज संवाद साधता येतो. इथेच न थांबता दररोजचे व्यवहारही आजकाल मोबाईल वर घरबसल्या होऊ लागले आहेत.

आधुनिक क्रांतीमुळे मोबाइल संगणकाचेही काम करू लागला आहे. त्यामुळे कुठल्याही क्षणी ई-मेल तपासण्यासारखे काम सोयीचे झाले. मोबाइलमधील घड्याळ, कॅलक्युलेटर, एफ. एम., कॅमेरा यासारख्या सुविधांमुळे इतर उपकरणांचे पैसे वाचले. र्वल्ड कॉलिंग कार्डसारख्या सुविधांनी परदेशस्थ नातेवाईक व उद्योजक यांच्याशी स्वस्तात संपर्क शक्य झाला. समुदातून मच्छिमारांना किनाऱ्यावर व डॉक्टरांना त्यांच्या दवाखान्याबाहेर कुठेही असताना संपर्क साधता येऊ लागल्याने अनेकांचे प्राण वाचले.
अपघातस्थळापासून कुणालाही पोलिसांशी संपर्क सहज शक्य झाल्याने तपासाचा वेग वाढला सरकारी क्षेत्रात काही योजनांमध्ये मोबाईलचा वापर आधीच सुरू झाला आहे. हवामान अंदाज, बाजारभाव, गॅस मागणी, सातबारा, बँक अपडेट अशा किती तरी गोष्टी मोबाईलद्वारा साध्य करणे सोपे झाले आहे. आता आणखी तीस योजना किंवा सरकारी सेवा मोबाईलवर उपलब्ध होणार आहेत. सूचना व प्रसारण मंत्रालय विभाग सध्या त्याच खटपटीला लागलं आहे.
Read More : माझे बाबा | My father essay in marathi
कोर्टात अपिल करायचे असेल, रेशन कार्ड बनवायचं असेल अथवा शस्त्र परवाना किंवा नुतनीकरण करायचं असेल तर अथवा मोर्चा, सभा, प्रदर्शनसाठी परवानगी मिळवायची असेल तर आता आपल्याला घरी बसल्या बसल्या करता येणार आहेत. त्यासाठी कुठे जायची गरज ‘भासणार नाही. सूचना आणि प्रसारण विभाग लवकरच देशभरात मोबाईल
ई-डिलिव्हरी प्लॅटफॉर्म लाँच करणार आहे. त्यानंतर तीसपेक्षा अधिक सरकारी सेवा मोबाईलवर उपलब्ध होणार आहेत.
आता काही राज्यांमध्ये काही सेवा उपलब्ध करण्यात आल्या आहेत, त्यात कोर्टात अपिल करणे, विवाह, जन्म मृत्यूच्या नोंदी, मतदार यादीत नावाचा समावेश करणे, पाणी किंवा वीज बीलाची नवी जोडणी, रेशन काईची मागणी, लाऊडस्पिकरथा परवाना आदींचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय वृद्धावस्था, विधवा, अपंग पेंशन योजनांसाठी आवेदनसुद्धा आता मोबाईलद्वारा करता येणार आहे.

पण जर मोबाईल नसेल तर? मोबाईल नसेल तर सोप्या वाटणाऱ्या गोटीही अवघड होऊन जातील.बँकांमध्ये लांबच
लांब रांगा लागतील, सर्वच व्यवहार प्रत्यक्षात जाऊन करावे लागतील. शहरात नोकरी करणाऱ्या लोकांना गावी पैसे पाठवण्यासाठी मनी ऑर्डर शिवाय पर्याय उरणार नाही. पोस्ट खात्याचे काम वाढेल, लोकांना एकमेकांशी संवाद साधण्यासाठी पत्रव्यवहार करावा लागेल. एकूणच सगळ्याच कामांसाठी एकमेकांवर अवलंबून राहावे लागेल.
Read More : असे बरेच निबंध वाचण्यासाठी यावर क्लिक करा..
एखादा अचानक गंभीर आजारी झाला तर डॉक्टर, अँब्युलन्स यांना तातडीने बोलावण्याचे काम मोबाइलच करतो ना? प्रवासाला निघालेल्या, फिरायला गेलेल्याला इमर्जन्सी तात्काळ संदेश मोबाइलच देतो ना? मोबाइल नसता तर बाहेर पडलेल्या व्यक्तीचा ठावठिकाणा शोधायचा कुठे? केवढी त्रेधा तिरपीट उडाली असती?
परंतु मोबाईल नसेल तर काही चांगल्या गोष्टीही घडतील. दररोज रात्री लहान मुलांना झोपवताना युट्यूज विडिओ ऐवजी अंगाईगीते ऐकू येतील. चांदोमामा ची आठवण काढत लहान मुले शांतपणे झोपतील. घरासमोर ची अंगणे, मैदाने मुलांनी तुडूंब भरतील, कबड्डी, खोखों, लगोरी हे खेळ परत बघायला मिळतील.
सणासुदीला मोबाईल वरून शुभेच्छा पाठवणारे नातेवाईक आता आवर्जून भेटायला घरी येतील. त्यानिमित्ताने लहानांना थोरामोठ्यांचे आशीर्वाद मिळतील. परदेशी वास्तव्यास असणारी मुले वर्षातून एकदा का होईना आईबापाला भेटायला मायदेशी परततील. लहान मुलांना नात्यांची माणसांची किंमत समजेल. सुट्यांमध्ये आईबाबा मुलांना फिरायला घेऊन जातील.
मोबाईल मुळे चांगल्या वाईट गोष्टी या घडतच राहणार. त्याच्या वापरावर यावर चालायला सगळ्यांनी शिकायला हवं. कारण जर मोबाईल नसेल तर खूप काही गोष्टी अवघड होऊन बसतील.