छान छान मराठी बोधकथा | 10+ Small stories in marathi with moral | Moral Stories In Marathi

Small stories in marathi with moral-  नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या वेबसाइटवर. जर तुम्ही stories in marathi, सुंदर छान छान मराठी गोष्टी, संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत. मी आशा करतो की तुम्हाला आमच हे stories with moral in marathi, कलेक्शन नक्की आवडल ,जर आवडले तर सोशल मीडिया वर जरूर शेयर करा आणि अश्याच भारी भारी पोस्ट्स साठी आमचा ब्लॉग inmarathi.in ला आवशय भेट दया…

छान छान मराठी बोधकथा | Small stories in marathi with moral | Moral Stories In Marathi

Moral Stories In Marathi:- हुशार कोल्हा आणि धूर्त कावळा 

एक शेतकरी शेतामध्ये दुपारच्या वेळी झाडाखाली बसून जेवण करत असतो. तिथे त्याच्याबरोबर त्याची पत्नी आणि त्याचा लहान मुलगा जेवण करत असतो. त्या झाडावर तिथेच भुकेजलेला कावळा बसलेला असतो. त्याला खूप भूक लागलेली असते.

तो कावळा नजरचुकीने त्या छोट्या मुलाच्या हातातील भाकरीचा तुकडा पळवतो. एक कावळा, भाकरीचा मोठा तुकडा तोंडात धरून उडाला, तो एका उंच झाडावर जाऊन बसला. ते पाहून एक कोल्हा त्या झाडाखाली गेला आणि कावळ्याचा तोंडातला भाकरीचा तुकडा त्याला मिळावा म्हणून, कपटाने त्यांच्या सौंदर्याची तारीफ करू लगला; तो म्हणतो, ‘रे पक्ष्या, मी मी तुला खरेच सांगतो, तुझ्यासारखा देखणा पक्षी माझ्या पहाण्यात आजपर्यंत कधी आला नाही. तुझी पिसे काय सुंदर ! किती कोमल अहाहा ! तुझ्या शरीराचे तेज किती वर्णू ! तुझ्या अवयवांच्या ठेवणीकडे तर पहातच रहावे ! तुला इतके सर्व अनुकूल आहे, त्यावरून तुझा शब्दही तसाच चांगला असेल, असे मला वाटते. तो जर खरोखरच गोड असेल, तर मग तुझी बरोबरी कोण करणार आहे!’ ही स्तुती ऐकून आपण कोण, हे कावळा विसरला आणि अंमळ नटूनमुरडून मनात म्हणतो, ‘आपल्या स्वराच्या गोडपणाबद्दल यास शंका आहे, तेवढी काढून टाकावी.’ मग त्याने गाण्यास प्रारंभ केला ! तोंड उघडताच त्यात धरलेला भाकरीचा तुकडा खाली पडला, तो घेउन कोल्हा त्याच्या मूर्खपणास हसत हसत चालता झाला !

तात्पर्य:- आपल्या खोटया प्रशंसेस भुलून जे लबाडाच्या नादी लागतात, ते शेवटी बहुत करून फसतात.

Moral Stories In Marathi:- स्वार्थी मित्र 

एका गावात दोन मित्र राहत होते त्यांचे नाव राम आणि शाम. एके दिवशी ते फिरण्यासाठी शेजारच्या जंगलात दुपारी बाहेर पडले. जंगलात जाताना त्यांनी एकमेकांना वचन दिले की संकटात एकमेकांचे रक्षण करायचे.

ते जंगलाच्या मध्यभागी पोहंचताच अचानक एक अस्वल धावत त्यांच्याकडे येत असताना दिसले. राम स्वताचा जीव वाचवण्यासाठी पटकन शेजारच्या झाडावर चढतो पण शामला झाडावर चढता येत नाही. शाम घाबरून जातो त्याला काही सुचत नाही आणि जमिनीवर झोपतो आणि मेल्याचे नाटक करतो.

अस्वल शामच्या जवळ येते. ते शामला हुंगते. त्यानंतर अस्वल शामच्या कानाजवळ जातो. जणू काही अस्वल काहीतरी गुपित त्याच्या कानात सांगत आहे. शाम भीतीने शांत पडून राहतो.

थोडया वेळाने, अस्वलाला वाटते की शाम मेलेला आहे म्हणून ते तिथून निघून जातो. राम घाबरून खाली उतरतो आणि शामला विचारतो , ‘ अस्वलाने तुला काय सांगितले रे ‘..? त्यावर शाम उत्तर देतो की , “त्याने मला सल्ला दिला की स्वार्थी मित्रापासून दूर राहा. जे मित्र संकटकाळी साथ देत नाहीत ते खरे मित्र नसतात. त्या मित्राला आपली चूक समजली.

तात्पर्य – संकटकाळी जो मदत करतो तो खरा मित्र

Moral Stories In Marathi:- दुकानदार आणि हत्ती

एका गावात एक पाळीव प्राणी हत्ती राहत होता. सर्व गावकरी त्या पाळलेल्या हत्तीची काळजी घेत व त्याला खाऊ घालत असत.सर्व गावकऱ्यांचा तो हत्ती लाडका होता आणि सर्व गावकरी त्यला जीव लावत असे.

हत्ती रोज साकळी गावातील मंदिरात जात असे. रोज मंदिरात जाताना तो हत्ती एका फुलाच्या दुकानात थांबत असे. दुकानदार रोज फुले त्या हत्तीच्या सोंडेत देत असे. हत्ती तो फुले सोंडेत घेऊन मिरवत-मिरवत नेऊन मंदिरात जाऊन देवाच्या चरणी वाहत असे. हत्ती ज्याप्रकारे फुले मिरवीत नेणे आणि मंदिरात जाणे लोक आनंदाने बघत असत.लोक हत्तीचे कैतुक करत असे. हत्तीची श्रद्धा हा सर्व गावकऱ्यांचा कौतुकाचा विषय झाला होता.

एके दिवशी दुकानदार अत्यंत निराश अवस्थेत दुकानात बसला होता. रोजच्या सवयी प्रमाणे हत्ती दुकानात आला. निराश दुकानदाराने हत्तीला फुले देण्यावजी त्यच्या सोंडेला सुई टोचली. दुकानदारने कारण नसतानाही स्वताचा राग हत्तीवर काढला. हत्तीला फुले देण्याऐवजी हार ओवण्याची सुई जोरात टोचल्यामुळे हत्ती दुखवला गेला व त्याला त्या दुकानदाराचा राग आला.

आपल्याला या दुकानदाराने विनाकारण छळले त्यामुळे हत्तीने दुकानदाराला धडा शिकविण्याचे ठरविले. दुसऱ्या दिवशी हत्तीने दुकानच्या जवळून वाहणाऱ्या ओढयाच्या पाण्यातून चिखलयुक्त पाणी सोंडेने भरून घेतले.

हत्ती शांतपणे दुकानाजवळ आला .हत्तीने ते घाणरडे पाणी दुकानदार , फुले आणि हरांवर फवारले. दुकानदाराचा सगळा माल खराब झाला. त्याला स्वताची चूक कळून आली. मात्र त्यसाठी त्याला मोठी किमंत मोजावी लागली.

तात्पर्य – जसाच तसे.

Moral Stories In Marathi:- गाढवाचे किंकाळाने 

एका गावात एक गरीब कुंभार राहत होता. तो मडकी बनवून उदरनिर्वाह करत असे. त्याला मडकी बनवण्यासाठी मातीची फार गरज भासत असे, म्हणून त्याने माती आणण्यासाठी गाढव पाळले होते.

परंतु कुंभार गरीब असल्यामुळे गाढवाला पुरेसे खायला देऊ शकत नसे. एक दिवस कुंभार जंगलातून जात असताना त्याला एक वाघ उपाशी झोपलेला दिसतो. कुंभार त्याचा जवळ जातो, पाहतो तर तो वाघ मेलेला असतो. त्याला एक युक्ती सुचते. तो दिवसभर वाघाचे कातडे काडतो आणि घरी घेऊन येतो.

रात्री कुंभार वाघाचे कातडे गाढवाच्या पाठीवर टाकतो आणि गाढवाच्या कानात सांगतो, जा आणि शेतकऱ्यांच्या शेतामधील पिक रात्रभर खा. ते तुला वाघ समजतील. ते तुला घाबरून पकडायला येणार नाहीत. तुला पकडण्याचे धैर्य त्यांना होणार नाही.
अशा प्रकारे दररोज रात्री गाढव शेतकऱ्यांच्या शेतात पिक खात असे.

एका रात्री गाढव शेतकऱ्यांच्या शेतामधील पिक खाण्यात मग्न होते. त्याच वेळी त्याने गाढवीणीच्या ओरडण्याचा आवाज ऎकला. लगेचच तो देखील किंचाळून प्रतिसाद देऊ लागला. सर्व शेतकऱ्यांना खरा प्रकार समजला. ते शेतकरी गाढवाला चोप देतात.
आपण जे नाही ते दाखवायला गेल्यामुळे गाढवाने मार खाल्ला.

तात्पर्य – आती शहाणा त्याचा बैल रिकामा

Moral Stories In Marathi:- द्राक्षे आणि कोल्हा

एका जंगलात एक कोल्हा राहत होता. एके दिवशी, सकाळी त्या कोल्हाला भूक लागते. तो काहीतरी खाण्यासाठी इकडे तिकडे भटकू लागला. पण त्याला खायला काहीच मिळत नव्हते.

शेवटी त्याला एक द्राक्षांचा मळा दिसला आणि तो द्राक्षांच्या मळ्यात गेला. तिथे सगळीकडे द्राक्षेच द्राक्षे असतात. सगळीकडे द्राक्षांचे घडच घड लटकलेले दिसतात. कोल्ह्याच्या तोंडाला पाणी सुटते. तो विचार करतो, ही फळे चवदार दिसत आहेत. मला ती पाहिजेत.

कोल्हा तिथे थोडा वेळ बसतो आणि द्राक्षांचे वेल आणि द्राक्षे नीट पाहत असतो. द्राक्षे खूप उंचावर असतात. त्याच्या पोहंचण्यापलीकडे उंच लटकत होती. त्यामुळे तो उडी मारून पिकलेले द्राक्षे पकडण्याचा प्रयत्न करू लागतो.

परंतु तो द्राक्षापर्यंत पोहचू शकत नाही. तो पुन्हा पुन्हा उंचच उंच उड्या मारतो पण द्राक्षे नेहमी त्याच्या उंचीपासून लांबच लांब असतात. काही वेळाने तो उड्या मारून मारून दमून गेला. त्यानंतर तो स्वतःशीच पुटपुटला, कोणाला खायला हवी ही आंबट द्राक्षे? मला तर नकोतच..! असे म्हणून तो तेथून निघून जातो. आपल्या आवाक्याबाहेरच्या गोष्टींचा तिरस्कार कारण खूप सोप्पं असतं.

तात्पर्य – अंथरून पाहून पाय पसरावे.

Moral Stories In Marathi:- सुतार आणि माकड

एका जंगलामध्ये सुतार लाकूड तोडायला जात असे. त्या जंगलामध्ये काही माकडे राहत होती. एके दिवशी सुतार लाकूड तोडत असताना काही माकडांनी पहिले. त्या माकडांना ते पाहून कुतूहल वाटले.

दुपारच्यावेळी सुतार जेवण करण्यासाठी घरी जातो. त्यातील एका माकडाला सुताराची फजिती करावीशी वाटते, म्हणून तो तिकडे जाऊन लाकडामध्ये लावलेली पाचार काढण्याचा प्रयत्न करत असतो. तेवढ्यात जेवण करून सुतार तिथे येत असतो.

जेव्हा माकड त्या सुताराला पहातो आणि घाबरून जातो. तो पळून जाण्याचा प्रयत्न करत असतो परतुं , त्याच वेळेस माकडाची शेपटी लाकडामध्ये अडकते आणि त्या माकडाला पळून जाता येत नाही. सुतार तिथे पोहचल्यावर त्याला माकड दिसते. माकडाचे हे कृत्य पाहून सुतार त्याला खूप मार देतो.

तात्पर्य -आपण दुसऱ्यांच्या कामामध्ये ढवळाढवळ करता कामा नये.

Moral Stories In Marathi:- हुशार नावाडी 

एका गावात एक शेतकरी राहत होता. त्या शेतकऱ्याला प्राणी पाळण्याचे खूप आवड होती. त्याच्याकडे शेळी, सिंह ,मेंढ्या , गाय अशाप्रकरे अनेक प्राणी होते. त्या शेतकऱ्याच्या घराजवळ एक नदी होती.

एके दिवशी शेतकरी शेतातून येत असताना त्याच्याकडे शेळी, सिंह आणि गवताची पेंढी असते परंतु त्या दिवशी त्या नदीला पूर आलेले असतो. त्या शेतकऱ्याला काही सुचत नाही कस जावे नदी पार करून हा प्रश्न त्याच्यासमोर पडतो. तेव्हा त्या शेतकऱ्याला एक नावाडी नाव घेऊन येताना दिसतो .

तो त्या नावाड्याला बोलवून घेतो व सांगतो ह्या तीन गोष्टी आहेत. त्या तीन गोष्टी व्यवस्थित पोहोचवल्या तर मी तुला बक्षीस देईल. तो नावाडी विचार करू लागतो मग घेऊन जाण्यासाठी तयार होतो.

जर नावाड्याने गवत पहिल्यांदा घेतलं तर सिंह शेळीला खाऊन टाकेल. जर सिंहाला घेतलं तर शेळी गवत खाऊन टाकेल प्रश्न पडतो. नावाडी हुशार असल्यामुळे तो विचार करतो आणि कामाला सुरुवात करतो. नावाडी नावेत पहिल्यांदा शेळीला घेतो. तिला दुसऱ्या टोकाला सोडून येतो नंतर तो सिंहाला घेतो. सिंहाला दुसऱ्या टोकाला सोडतो आणि शेळीला स्वतःबरोबर घेऊन परत या तीराला येतो.

त्यानंतर तो शेळीला तिथेच ठेवतो आणि गवताची पेंढी दुसऱ्या टोकाला घेऊन जातो. सिंह आणि गवताची पेंढी एकत्रित ठेवतो. पुन्हा शेळीला आणण्यासाठी निघतो. शेतकरी खुश होतो. तो नावाड्याला बक्षीस देतो.

तात्पर्य – विचार करून काम केले तर अशक्य गोष्ट पण शक्य होते .

Moral Stories In Marathi:- कबुतर आणि भांडखोर कोंबडे

एके काळची गोष्ट आहे. एक माणूस एका गावात राहत होता. त्याच्याकडे दोन कोंबडे होते. एक दिवस तो बाजारातून येत असताना त्याला एक माणूस कबुतर पक्षी विकत असताना दिसतो. त्याने विचार केला माझ्या मुलांना हा पक्षी खूप आवडेल आणि त्यांना छान वाटेल.

त्याने तो कबुतर पक्षी खरेदी केला आणि आपल्या घरी घेऊन आला. त्याने कबुतर पक्षाला कोंबडयांबरोबर ठेवण्याचा निर्णय घेतला. पण कोंबडे कबुतर पक्षाला त्रास देत असत. कोंबडे त्याच्या मागे मागे जात आणि त्याला आपल्या चोचींनी मारत होते.

एकदा कबुतर पक्ष्याने विचार केला की, हे मला का त्रास देतात. मी यांच्यासाठी नवीन आणि अनोळखी आहे आसे समजून हे माझ्याशी वाईट वागतात.

एक दिवस कबुतर पक्ष्याने पहिले की, ते दोन्ही कोंबडे एकमेकांमध्ये भांडण करत असतात. एकमेकांवर आपल्या चोचींनी वार करत आहे. तेव्हा तो स्वतःशीच म्हंटला की, मला यांच्या वागण्याचे दुख वाटून घेता कामा नये. मला यांच्या वागण्याची तक्रार पण करायला नको.

हे मला चोचींनी मारत आहेत. मी हे पाहू शकतो की, हे एकमेकांमध्ये देखील लढाई करू शकतात. हा तर त्यांचा स्वभावच आहे. आपण इच्छा असूनही कोणाचाही स्वभाव बदलू शकत नाही .

तात्पर्य – जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही .

Moral Stories In Marathi:- भित्रा व शूर मित्र

खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एक चोर दोन मित्रांवर हल्ला करतो. त्यातला एक मित्र जीव वाचवण्यासाठी पळून जाऊन लपून बसतो. पण दुसरा शूर मित्र चोराचा मुकाबला करतो आणि त्याला जखमी व निशस्त्र करतो.

हे पाहून डरपोक, भित्रा मित्र परत येतो. तिथे जवळ एक लाकूड पडलेलं असते ते लाकूड घेतो आणि चोराला म्हटला ‘थांब आता मी तुला माझी बहादुरी दाखवतो. त्याला माहित होते की,चोर आता त्याचे काही नुकसान करू शकत नव्हता. त्यामुळे भित्र्या मित्राने परीस्थितिचा फायदा घेतला. तो चोरासमोर बढाया मारू लागला. शूर मित्र त्याला म्हणला, तू आता शौर्याचे नाटक नको करूस.

स्वत:ची हातातील लाकूड फेकून दे. तू अशा वागण्याने दुसऱ्यांना मुर्ख बनवू शकतो. मला तुझे खरे रूप कळले आहे. खंर म्हणजे तू येथेच थांबून माझी मदत करायला हवी होती. धीराचे शब्द उच्चारून माझा आत्मविश्वास वाढवायला हवा होता. मी पहिले आहे तू किती भित्रा आहे.

तू तुझा जीव वाचवून पळून गेलास. कुठल्याही संकटाच्या क्षणी तुझ्या सारख्या माणसावर विश्वास ठेवला जाऊ शकत नाही. हे एकूण भित्रा मित्र खाली मान घालून तेथून निघून गेला.

तात्पर्य -विश्वासाला कधी तडा जाऊ देऊ नये.

Moral Stories In Marathi:- कपटी साप आणि लाकुडतोड्या 

हिवाळ्यातील गोष्ट आहे, एक दिवस सकाळी एक लाकुडतोड्या जंगलातून घरी जात होता. त्याला रस्त्यावर बर्फात एक साप पसरलेला दिसला. तो साप खूपच अशक्त होता. थंडीमुळे सापाची शारीरिक अवस्था खूपच खराब झाली होती, आकाशात उडणाऱ्या घारीने त्याला उंचावरून फेकले असावे, असे लाकुडतोड्याला वाटले.

लाकुडतोड्याला सापाची द्या आली. त्याला माहित होते की, जर सापाला अर्धमेल्या अवस्थेत सोडले तर कोणी न कोणी पक्षी त्याला खाऊन टाकेल.

लाकुडतोड्याने सापाला आपल्या कोटाच्या खिशात अलगद ठेवले आणि घरी घेऊन गेला. घर उबदार होते. घरात शेकोटी पेटविलेली होती. त्याने सापाला शेकोटी जवळ ठेवले. त्याच्या बायकोने सापाला औषध लावले आणि दुध पाजिले.

थोड्याच वेळात सापाला बरे वाटू लागले. लाकूडतोड्याच्या मुलांना साप खूप आवडला होता. एक मुलगा सापाला प्रेमाने गोंजराण्यासाठी पुढे जाऊ लागला. सापाच्या जवळ जाऊन मुलगा त्याला हाताळणार एवढ्यात सापाने बाळाला दंश करण्यासाठी फणा काढला.
हे पाहून लाकुडतोड्याने क्षणाचीही दिरंगाई न करता आणि उपकार न जाणणाऱ्या सापाचे कुऱ्हाडीने तुकडे केले. ज्या लाकुडतोड्याने त्याचे प्राण वाचविले होते त्याच्याच मुलाला दंश करण्यासाठी साप पुढे सरसावला आणि प्राण गमावून बसला.

तात्पर्य- उपकाराची फेड अपकाराने करण्याचा प्रयत्न केल्यास असेच होते.

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇

Story In Marathi Akbar Birbal | अकबर बिरबलाच्या गोष्टी मराठी मध्ये

Stories In Marathi | 20+ मराठी बोधकथा | Short Stories with Moral for Kids

Leave a Comment