Read More : सकाळची भक्तिगीते मराठीत
प्रथम तुला वंदितो..🙏
प्रथम तुला वंदितो कृपाळा, गजानना, गणराया
विघ्नविनाशक, गुणिजन पालक, दुरित तिमिर हारका
सुखकारक तू, दुःख विदारक, तूच तुझ्यासारखा
वक्रतुंड ब्रम्हांडनायका, विनायका प्रभुराया
सिद्धिविनायक तूच अनंता, शिवात्मजा मंगला
सिंदूर वदना, विद्याधिशा, गणाधिपा वत्सला
तुच ईश्वरा साह्य करावे, हा भवसिंधु तराया
गजवदना तव रूप मनोहर, शुक्लांबर शिवसुता
चिन्तामणी तू अष्टविनायक, सकलांची देवता
रिद्धि सिद्धीच्या वरा, दयाळा देई कृपेची छाया
🌺.देहाची तिजोरी.🌺
देहाची तिजोरी, भक्तीचाच ठेवा
उघड दार देवा आता, उघड दार देवा
पिते दूध डोळे मिटूनी जात मांजराची
मनी चोरट्याच्या का रे भीती चांदण्याची
सरावल्या हातांनाही कंप का सुटावा
उजेडात होते पुण्य अंधारात पाप
ज्याचे त्याचे हाती आहे कर्तव्याचे माप
दुष्ट दुर्जनांची कैसी घडे लोकसेवा
स्वार्थ जणू भिंतीवरचा आरसा बिलोरी
आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी
घडोघडी अपराध्यांचा तोल सावरावा
तुझ्या हाती पांडुरंगा तिजोरी फुटावी
मुक्तपणे भक्ती माझी, तुझी तू लुटावी
मार्ग तुझ्या राऊळाचा, मला आकळावा
भलेपणासाठी कोणी बुरेपणा केला
बंधनात असुनी वेडा जगी मुक्त झाला
आपुल्याच सौख्यालागी करील तो हेवा
Read More : सकाळची भक्तिगीते मराठीत
Read More : भजनमाला संग्रह वाचण्यासाठी यावर क्लिक करा
🙏 उठि उठि गोपाला 🙏
मलयगिरीचा चंदनगंधित धूप तुला दाविला
स्वीकारावी पूजा आता, उठि उठि गोपाला
पूर्व दिशेला गुलाल उधळुन ज्ञानदीप लाविला
गोरस अर्पनि अवघे गोधन गेले यमुनेला
धूप-दीप-नैवेद्य असा हा सदुपचार चालला
रांगोळ्यांनी सडे सजविले रस्त्यारस्त्यातुन
सान पाऊली वाजति पैंजण छुनुछुनु छुनछुन
कुठे मंदिरी ऐकू येते टाळांची किणकिण
एकतानता कुठे लाविते एकतारिची धून
निसर्गमानव तुझ्या स्वागता असा सिद्ध जाहला
राजद्वारी झडे चौघडा शुभःकाल जाहला
सागरतीरी ऋषीमुनींचा वेदघोष चालला
वन वेळूचे वाजवि मुरली, छान सूर लागला
तरूशिखरावर कोकिलकविने पंचम स्वर लाविला
🙏 अमृताहूनि गोड 🙏
अमृताहूनि गोड नाम तुझें देवा ।
मन माझें केशवा कां बा नेघे ॥१॥
सांग पंढरिराया काय करूं यासी ।
कां रूप ध्यानासि नये तुझें ॥२॥
किर्तनीं बैसतां निद्रे नागविलें ।
मन माझें गुंतलें विषयसुखा ॥३॥
हरिदास गर्जती हरिनामाच्या कीर्ति ।
नये माझ्या चित्तीं नामा ह्मणे ॥४॥
🙏 शोधिसी मानवा 🙏
शोधिसी मानवा, राऊळी मंदिरी
नांदतो देव हा आपुल्या अंतरी
मेघ हे दाटती कोठुनी अंबरी?
सूर येती कसे वाजते बासरी ?
रोमरोमी फुले तीर्थ हे भूवरी
दूर इंद्रायणी, दूर ती पंढरी
गंध का हासतो पाकळी सारुनी ?
वाहते निर्झरी प्रेमसंजीवनी
भोवताली तुला साद घाली कुणी
खूण घे जाणुनी, रूप हे ईश्वरी
भेटतो देव का, पूजनी अर्चनी ?
पुण्य का लाभते दानधर्मांतुनी ?
शोध रे दिव्यता आपुल्या जीवनी
आंधळा खेळ हा खेळशी कुठवरी ?