Motivational kavita in Marathi | प्रेरणादायी कविता | मराठी कविता

आपल्या मध्ये काहीतरी करण्याचे धाडस निर्माण होईल अशा आपल्या “जाणता राजा” म्हणजेच शिवछत्रपतींच्या कवितांचा संग्रह | Shivaji maharaj kavita

जाणता राजा | motivation kavita in Marathi

अनेक झाले पुढेही होतील
अगणित ह्या भुमीवरती
जाणता राजा एकची झाला
तो फक्त “राजा शिवछत्रपती”।।१।।🚩

धर्म मराठा अभय मिळाले
सर्व समानभान नित्य आचरले
भगवा झेंडा घेऊन हाती
केली चहूकडे जनजागृती
तो फक्त “राजा शिवछत्रपती”।। २ ।।🚩

जिजाऊ माऊली दिव्य प्रेरणा
गुरू तुकाराम देऊ ज्ञाना
धाडसी मावळे भवानी सोबती
म्हणे हरहर महादेव गर्जती
तो फक्त “राजा शिवछत्रपती”।। ३ ।।🚩

स्वारी केली किल्ले घेऊनी
काही जिंकुन काही बाधून
मोगल नमले शिकस्त संपली
भल्याभल्यांची झोप उडवीली
तो फक्त “राजा शिवछत्रपती”।। ४ ।।🚩

रयतेचं राज्य स्थापनेसाठी
मावळे जमले विजयासाठी
ऐक्यासाठी दिली आहुती
मिळाली ज्यांना विरगती
तो फक्त “राजा शिवछत्रपती”।। ५ ।।🚩

मराठा राजा महाराष्ट्राचा
म्हणती सारे माझा – माझा
आजही गौरव गिते गाती
ओवाळूनी पंचारती
तो “राजा शिवछत्रपती” ।। ६ ।।🚩


Read More : प्रेरणादायी विचार | motivation quotes

Read More : मराठी सुविचार | Inspirational quotes | Marathi suvichar


🚩 लढता लढता हरलो जरी… 🚩

लढता लढता हरलो जरी,

हरल्याची मला खंत नाही..

लढा माझा माझ्यासाठी,

लढाईला माझ्या अंत नाही..

पुन्हा उठेन आणी पुन्हा लढेन शांत..

Motivational kavita in Marathi
Motivational kavita in Marathi

Read More : मराठी भाषेचे महत्त्व

🚩 मनातले छत्रपति आजही जिवंत आहे.. 🚩

आम्ही तलवारी सोडल्या पण,
हात तलवारी चालवायला विसरले नाहीत,

आम्ही नांगर सोडले पण,

जमीन फाडायला विसरलो नाहीत..
तोच रक्तातला लाव्हा आजही उफाळत आहे,

डोळ्यातला निखारा लालबुंद आहे,

पोलादी मुठीत हत्तीचे बळ आहे,
मनातले छत्रपति आजही जिवंत आहे……


🗡 छत्रपति सर्जा शंभु 🗡

फाटतो मराठ्यांचा उर..
दाटतो नभा फितुरीचा काळा कुट्ट धुर रक्तात
सळसळे तुझे नाव घेताच फाटती नसा..
झकते दुनिया ज्या चरणी तो विर असेल
कसा गर्जतो सह्यांद्रि ज्याच्या जोशाने..
उफानते ईंद्रायणी त्याच त्वेशाने बलदंड बाहु पहाडी
काया..

झुंजला छाव्या सारखा शंभुराया..
छत्रपति पुत्र सर्वशक्तिमान तु स्वराज्य सुर्या समान तु..
गर्वाने फडकते भगवे निशाण तु मराठ्यांचा सार्थ
अभिमान तु..

डौल तुझा वाघाचा दंश अस्सल नागाचा पेट घेतो समुद्र
__ आज हि..
जंजिरा वाट तुझीच पाहि कंठ दाटून येतो रे स्वराज्य
वेड्या तुझ्या हातातल्या टोचतात लोखंडी बेड्या..
आमच्यासाठी तु किती सोसल तुझच शौर्य त्या
ईतिहासाला

का टोचल रडतात मराठे दिवस तुझे अठवुण
जातात आश्रृ डोळ्यातले डोळ्यात आटुन..
गाठली तुच रे पराक्रमाची सिमा करुण

गेला पिढ्यान पिढ्याचे अमर आम्हा..
माझ्या शंभुच्या बलिदानाने कुणा
कुणाचा स्वाभिमान भडकतो..

छातीवर हाथ ठेवुन सांगा मराठ्यांनो
तुमच्या काळजात कोण धडकतो..

छत्रपति सर्जा शंभु महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा ।


म्हणूनच माझा महाराष्ट्र महान..🚩

म्हणूनच माझा महाराष्ट्र महान ।।ध्रु. ।।

भगवा इथल्या रक्तांत आहे
शिवबा इथल्या भक्तांत आहे
तीर्थ इथल्या नद्यांत वाहते
समृद्धी इथल्या खोऱ्यांत राहते
मराठमोळ्या संस्कृतीचा अभिमान
म्हणूनच माझा महाराष्ट्र महान ।। १ ।।

संतमहात्मे नि शूरवीर
समाजसुधारक नि क्रांतीवीर
जन्मले मायभूमीच्या रक्षणासाठी
लेकरे सारी तुझीच मराठी
गौरवशाली परंपरा भारताची शान
म्हणूनच माझा महाराष्ट्र महान ।। २ ।।

इतिहासाचा घेउनि वारसा
पाहतो अभिजाततेचा आरसा
सदैव पाउल पडते पुढे
किर्ती दाही दिशांना भिडे
एकमुखाने गाऊया गुणगान
म्हणूनच माझा महाराष्ट्र महान ।। ३ ।।

सचिन निकम, पुणे.

Inspirational poem
Motivational kavita in Marathi

ऐरा गैरा होण्यापेक्षा शिवराय होतो म्हणा

कसलं चिंतन करता एवढं
धरून तोंडात अंगठा
करायचाच असेल तर
करा विचार मोठा

दुसऱ्यांच्या जीवावर जगण्यात
कसलं आलंय आयुष्य
असेल जोर मनगटात तर
घडवा आपलं भविष्य

वाचावीर बनण्यापेक्षा
कृतीशूर कोणी बना
ऐरा गैरा होण्यापेक्षा
शिवराय होतो म्हणा


काळजाने वाघ…डोळ्यात आग.🔥

काळजाने वाघ…डोळ्यात आग…
ताकद हत्तीची…चपळाई चीत्त्याची…

भगवे रक्त…शरीराने सक्त…!!!
झुकते ईथेच दिल्लीचे तख्त…

अन झुकवु शकतात मराठेच फक्त…
कारण… “आम्ही आहोत छत्रपतिंचे भक्त…!!!


यश आपल्याच हातात असतं

विचार काय करतोस,
काहितरी करून दाखव..
वेळ जाईन निघून,
प्रवाहामध्ये तरून दाखव..

लाखो आले अन गेले,
बोल घेवडे सगळे..
स्व:ता काही नाही केले,
फ़क्त लोकाना उपदेश दिले..

उपदेशाचं कडू तु पिऊन तर बघ..
सत्याची कास धरून तर बघ..
कुणीतरी आपल्या भल्याच सांगत असतं..
एखाद्यावर विश्वास ठेवून तर बघ..

यश आपल्याच हातात असतं…

Motivational poem
inspirational poem in marathi

निराश होऊ नकोस..

जर तुझा काल मनासारखा गेला नसेल
तर निराश होऊ नकोस, लक्षात ठेव मित्रा

देवाने आज बनवलाय फक्त तुझ्यासाठी
पुन्हा नव्या जोमाने सुरुवात करण्यासाठी.


Leave a Comment