अनुक्रमाणिक
MPSC परीक्षा कशी असते ते आपण जाणून घेऊया | mpsc exam information in marathi
मित्रांनो, देशांतील कोणत्याही राज्याची राज्यव्यवस्था सुरळीत चालण्यासाठी महत्वाचा घटक असतो तो ‘सक्षम प्रशासन’. त्या करिता आपल्या देशांत केंद्र सरकारनेराष्ट्रीय पातळीवर प्रशासकीय अधिकाऱ्याची निवड करण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाची’ स्थापना केली आहे.त्याचप्रमाणे, आपल्या देशांच्या प्रत्येक राज्यातील प्रशासन सुरळीत चालण्यासाठी प्रत्येक राज्याच्या राज्य शासनाने आपआपल्या राज्यात प्रशासकीय आयोगाची स्थापना केली आहे.
Read More : All marathi grammer | संपूर्ण मराठी व्याकरण
आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील प्रशासन सक्षम करण्यासाठी प्रशासकीय अधिकारी व
कर्मचारी यांची निवड करण्याच्या उद्देशाने सन १ मे १९६० साली महाराष्ट्र दिनाच्या दिवशी राज्यात ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थापना केली.
MPSC/ एमपीएस्सी) हे महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीतल्या वेगवेगळ्या सेवांसाठी आणि पदांसाठी स्पर्धा परीक्षा घेऊन उमेदवारांची निवड करण्याचं काम करते. यांच्यातून उपजिल्हाधिकारी, पोलीस-उपअधीक्षक, तहसीलदार, नायब-तहसीलदार, गट-विकास अधिकारी, मुख्याधिकारी इत्यादी पदे भरली जातात.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग
Maharashtra Public Service Commission (MPSC)
ब्रीदवाक्य | स्वसुख निरभिलाष: खिद्यते लोकहेतो: |
मुख्यालय | मंत्रालय, मुंबई, भारत बॅंक ऑफ इंडिया बिल्डिंग, ३रा माळा, एम.जी.रोड, हुतात्मा चौक, मुंबई – ४०० ००१ |
सेवांतर्गत प्रदेश | महाराष्ट्र |
मालक | महाराष्ट्र शासन |
Read More : ऐतिहासिक स्थळांबाबत माहीती .
वयमर्यादा / पात्रता :
वयाची 19 वर्षं पूर्ण असलेला कोणत्याही शाखेचा पदवीधर उमेदवार ‘राज्य सेवा परीक्षा‘ देऊ शकतो. खुल्या गटातल्या उमेदवारांना वय वर्षे ३८ पर्यंत ही परीक्षा देता येते आणि राखीव गटातल्या विद्यार्थ्यांना वय वर्षे ४३ पर्यंत ही परीक्षा देता येते. परीक्षा किती वेळा द्यायची यावर बंधन नाही. वयोमर्यादेत कितीही वेळा ही परीक्षा देता येते.
ही परीक्षा देण्यासाठी उमेदवाराला महाराष्ट्रातल्या अधिवासाचं प्रमाणपत्र (डोमिसाइल सर्टिफिकेट) मिळवावं लागतं. ‘राज्य सेवा परीक्षा‘ मराठी किंवा इंग्रजी भाषेतून देता येत असली तरी उमेदवाराला मराठीचं ज्ञान असणं आवश्यक असतं. शालान्त प्रमाणपत्र परीक्षेत मराठी हा विषय उमेदवाराने घेतलेला असणं आवश्यक असतं.
Read More : All marathi grammer | संपूर्ण मराठी व्याकरण
परीक्षेचे स्वरूप :
पूर्व परीक्षा : पूर्व परीक्षेसाठी 200 गुणांच्या दोन प्रश्नपत्रिका असतात, यासाठी आपणास 2 तासांचा वेळ असेल. प्रश्नपत्रिकेचे स्वरूप वस्तुनिष्ठबहुपर्यायी असून प्रश्नपत्रिका मराठी व इंग्रजी भाषेत असेल. पूर्व परीक्षा अभ्यासक्रम केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेप्रमाणेच आहे.
मुख्य परीक्षा : यात 6 पेपर एकूण 800 गुणांकरिता असतात.