माझी शाळा म्हणजे सरस्वती विद्यालय खरच सरस्वतीचे मंदिर आहे. आणि तिची इमारत २ नद्यांच्या संगमावर आहे . माझी शाळा अर्ध्या एकराच्या क्षेत्रात पसरलेली आहे, त्यामध्ये शाळेची इमारत, कॅम्पस आणि एक मोठे मैदान आहे. माझी शाळा सेमी-इंग्रजी शाळा आहे आणि मुख्य भाषा मराठी आहे, आमच्याकडे ५वी ते १०वी पर्यंत ६वर्ग आहेत.
प्रत्येक वर्गात अ आणि ब तुकड्या आहेत. प्रत्येक तुकडीमध्ये सुमारे ५० विद्यार्थी आहे, आणि माझ्या शाळेची एकूण संख्या ६५० एवढी आहे. माझी शाळा ग्रामीण भागात आहे, शाळेत मुलींची संख्या वाढवण्यासाठी आमची शाळा दरवर्षी मोहीम चालवते, आणि याचे परिणाम खूप चांगले आहेत. (my school essay in marathi)
Read More : mazi-aai-essay-in-marathi | माझी आई marathi nibandh वाचण्यासाठी यावर क्लिक करा….
माझ्या शाळेबद्दल मला सगळ्यात जास्त आवडणारी एक गोष्ट म्हणजे लिंग, धर्म किंवा जातीच्या आधारावर ते भेदभाव करत नाहीत. आपल्यासारख्या ग्रामीण भागात ही समस्या खूप प्रचलित आहे परंतु आमच्या प्रिय प्राचार्य सर यांच्या नेतृत्वाखाली आमच्या शाळेत हा भेदभाव आता प्रचलित नाही.
आपण जन्माला आल्यानंतर आपल्याला घडवण्यात तीन गोष्टींचा खूप मोठा वाटा असतो. एक आई, दुसरे आपला परिसर आणि तिसरा आणि महत्त्वाचा भाग म्हणजे आपली शाळा. वाढताना आपण जास्तीत जास्त वेळ आपल्या शाळेतच घालवतो. आपल्या शाळेवर आपले पालक एक मोठी जबाबदारी टाकतात.
सगळ्या शाळा ती जबाबदारी प्रामाणिकपणे पेलतात. म्हणून शाळा ही व्यक्ती आणि राष्ट्र घडवण्यात एक महत्त्वाचे कार्य करते.
आई म्हणायची पूर्वी मुळे शाळेत जाताना खूप रडायची. पण आता शाळा इतक्या आकर्षक झाल्या आहेत की गाडीत बसून आरडा ओरडा करीत शाळेत जाताना मजाच वाटते. (marathi nibandh mazi shala).
Read More : essay-in-marathi-on-rainy-season | पावसाळा nibandh वाचण्यासाठी यावर क्लिक करा….

हो, आमच्या वेळे पासूनच शाळेची गाडी सुरु झाली. त्यात ड्राइव्हर काकांच्या शेजारी बसून जाण्याची मजा काही औरच. मी सगळ्यात पुढे! अजून सांगायच झाल तर, मोठ्या बाईंपासून आमच्या क्लास टीचर पर्यंत सगळ्या इतक्या चांगल्या आहेत की आम्ही घरापेक्षा शाळेतच जास्त रमतो. आम्हाला कधीही छडीचा मार बसत नाही.
कधीही अंगठे धरून उभे राहणे, कोंबडा करणे अशा भयंकर शिक्षा आमच्या शाळेत नाहीत. आई तिच्या वेळच्या शिक्षा सांगते तेंव्हा अंगावर काटा उभा राहतो. पण याचा अर्थ आमच्या शाळेत शिस्त नाही असे मुळीच नाही. उलट आमची शाळा गावात शिस्तशीर मुलांची शाळा म्हणून ओळखली जाते. कारण आमच्या बाई म्हणतात “मुलांना असे करा म्हणून सांगावे लागत नाही.
ती अनुकरण करीत असतात. त्यांना फक्त कसे वागायचे हे आपली वागणुकीतून दाखवावे लागते.” म्हणून आमच्या टीचर बरोबर वेळेला, व्यवस्थित गणवेश घालून आणि शिस्तीत रांगेत उभ्या आहे हे पाहिल्यावर आम्ही देखील तसेच करतो. सांगावे देखील लागत नाही. (my school essay in marathi for class 6).
Read More : my village-essay-in-marathi | माझे गाव nibandh वाचण्यासाठी यावर क्लिक करा….
आमच्या शाळेच्या दिवसाची सुरुवात प्रार्थनेपासून होते. आम्ही सगळे वर्गा वर्गातून रांगेने मधल्या हॉल मध्ये जमतो. सरस्वती वंदने नंतर ओंकार आणि गायत्री मंत्र म्हंटला जातो. त्यानंतर महत्त्वाच्या बातम्या प्रतिनिधी सांगतात. मुख्याध्यापिका बाई त्या दिवसाचे सर्व धर्मातील महत्व सांगतात. आणि मग त्या दिवशी वाढदिवस असलेल्या मुलाचे किंवा मुलीचे एक रोप आणि फुल देऊन अभिनंदन केले जाते.
नंतर आमच्या वर्गात जाऊन दिवस सुरु होतो. आमच्या शाळेन एक से बढकर एक हुशार शिक्षिका आणि शिक्षक आहेत. त्यांना त्यांच्या विषयाची उत्तम माहिती आहे. आणि शिकवण्यात तर त्यांचा हात धरणारे कोणीच नाही. ते फक्त धडे वाचून शिकवित नाही तर त्या अनुषंगाने जग भरची माहिती आम्हाला देतात. त्यामुळे आम्ही फक्त पुस्तकी किडे न होता सर्व माहिती असलेले होतो. (marathi nibandh mazi shala).

Read More : diwali-essay-in-marathi | दिवाळी marathi nibandh वाचण्यासाठी यावर क्लिक करा….
आम्हाला एका विषयाचा धडा शिकवताना त्याबरोबर इतर विषयातील पण माहिती देतात. कोणीही टीचर नुसता भूगोल किंवा नुसते गणित असे एक्स्पर्ट नाही तर ते कुठलाही विषय तितक्याच कुशलतेने शिकवितात. त्यामुळे सर्वगुणसंपन्न म्हणजे काय हे आम्हाला कळते आणि आम्ही पण सर्व विषयात रस घेतो.
नुसताच अभ्यास ही पण आमच्या शाळेची ओळख नाही. मैदानी खेळ पण आलेच पाहिजे ह्याबद्दल आमच्या शाळेचा आग्रह असतो. आमच्या शाळेला मोठे क्रीडांगण आहे. तेथे सर्व मैदानी खेळ शिकविले जातात. कबड्डी, खो खो, क्रिकेट, टेनिस, व्हौलीबोल असे सर्व खेळ खेळले जातात. तसेच आमच्या कडून धावण्याच्या शर्यतीचा पण सराव करून घेतात. (my school essay in marathi for class 6).
व्यायाम शिक्षकांची तीक्ष्ण नजर मुलांमधील गुणाचं अवलोकन करीत असते. त्याप्रमाणे त्या त्या मुलाला विशिष्ट खेळाची सर्व माहिती देऊन प्रशिक्षक बोलावून त्याला प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे अंतरशालेय तसेच इतर देशामध्ये पण आमच्या शाळेतील मुळे चमकली आहेत. आम्ही गर्वाने सगळ्यांना सांगतो की हा खेळाडू आमच्या शाळेचा आहे.
नुसता खेळच नाही, तर इतरही गुणांची शाळेत कदर केली जाते आणि त्यानुसार त्या विद्यार्थ्याला घडवले जाते. काही विद्यार्थी अभिनयात हुशार असतात, काही गाण्यात, तर काही वादनात हुशार असतात. काही भाषण करण्यात तर काही विनोद सांगण्यात हुशार असतात. आमची शाळा रत्नपारख्याची नजर ठेवून विद्यार्थ्यांना निवडते आणि घडवते. (marathi nibandh).
त्यामुळे आमची शाळा ही गुणी मुलांची खाण आहे. आमच्या शाळेतील किती तरी मुले आज राष्ट्राचे वैभव आहे ते अशा द्रोणाचार्य शिक्षकांमुळेच! त्यामुळे आमच्या शाळेत प्रवेश मिळावा म्हणून सगळ्या गावाची धडपड असते. पण ह्याचा अर्थ असा नाही की आमची शाळा फक्त श्रीमंताची मुळे शाळेत घेते.
Read More : maze-baba-marathi-essay| माझे बाबा nibandh वाचण्यासाठी यावर क्लिक करा….
उलट आमचे शिक्षक गावा गावातून फिरतात आणि पाडे ,वस्त्या अगदी झोपडी मधील सुध्दा हुशार मुळे हेरून त्यांना फुकट शिक्षण देऊन त्यांचे व त्याबरोबर त्यांच्या घरच्याचं आयुष्य घडवितात. त्यापैकी कित्येक जण डॉक्टर , इंजिनियर , शास्रज्ञ आणि कलेक्टर झालेले आहेत.

मागच्याच वर्षी आमच्या शाळेतील 1998 साली दहावी झालेल्या मुलांचे संमेलन झाले होते. किती मोठे मोठे झालेले होते ते ! आणि किती भरभरून बोलत होते शाळेबद्दल. शिक्षकांच्या पाया पडत होते. अगदी अमेरिका ब्रिटन, आणि जर्मनी सारख्या देशातून येऊन त्यांनी हा समारंभ घडविला. आम्हालाही खूप चांगले मार्गदर्शन केले. खरच तेंव्हा आमच्या शाळेबद्दल अभिमानाने आमचा उर भरून आला. (my school essay in marathi)
आमच्या शाळेचा निकाल नेहमीच उत्तम असतो, मागच्या वर्षी दहावीच्या परीक्षेत ९६ टक्के यश प्राप्त केले आमची एक विद्यार्थीनी – – – – – – जिल्हा टॉपर आणि संस्कृतमध्ये राज्यात अव्वल आली. याचे सर्व श्रेय आमचे शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी, आणि प्रिन्सिपल सरांना जाते .
माझी शाळा जरी ग्रामीण भागातील असली तरी आम्ही खूप वेगाने आधुनिक शिक्षण पद्धती वापरात आणण्याचा प्रयत्न करत आहोत . गेल्या आठवड्यात प्रिन्सिपल सर यांनी सांगितले की, या वर्षांपासून सर्व विज्ञान आणि गणित वर्ग संगणकीकृत प्रणालीवर घेतले जातील, शाळेने सॉफ्टवेअर आणि प्रोजेक्टर्स देखील खरेदी केले आहेत. पालकांनी या संकल्पनेचे कौतुक केले आहे, त्यांनी असे केवळ चित्रपटांमध्ये पाहिले होते, पालक हे जाणून खूष आहेत की त्यांच्या मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत आहे.(marathi nibandh mazi shala).
असे वाटते शाळा सोडून जाऊच नाही. पण नाही! आम्हाला पण आमच्या शाळेचे नाव उज्ज्वल करायचे आहे. मला अशा शाळेचा भाग असल्याचा खूप अभिमान आहे. मी आशा करतो आमची शाळा असेच गुणवंत विद्यार्थी तयार करत राहील, आणि आमचे भविष्य सुंदर बनवण्यात मदत करत राहील.