नीरज चोप्राने रचला इतिहास! भालाफेकीच्या अंतिम फेरीत अविश्वसनीय 88.17 थ्रोसह ऐतिहासिक जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपचे सुवर्ण जिंकले.

Neeraj Chopra Create History :जागतिक भालाफेक स्पर्धेत भारताचा प्रसिद्ध भालाफेकपटू नीरज चोप्रा याने दणदणीत कामगिरी केली. नीरजने या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून नवा इतिहास रचला. त्याने 88.17 मीटरपर्यंत भालाफेक केली. तर, पाकिस्तानी खेळाडू नदीम अर्शद दुसऱ्या क्रमांकावर राहिला आणि त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. नीरजने आज पुन्हा सुवर्ण कामगिरी करत क्रीडा क्षेत्रात जागतिक स्तरावर भारताचा झेंडा आणखी उंच केला.

वर्ल्ड चॅम्पियनशिप 2023 मध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर नीरज चोप्रा म्हणाला, – “सर्वांनी सांगितले की हे फक्त पदक जिंकण्यासाठी माझ्यासाठी शिल्लक आहे आणि मी ते आज जिंकले आहे, 90 मीटर मार्क शिल्लक आहेत, मला वाटले की हे आज घडले आहे परंतु आशा आहे की भविष्यात होईल.”

Leave a Comment