नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या वेबसाइटवर. जर तुम्ही Poem In Marathi On Love , प्रेम कविता संग्रह मराठी मध्ये,अशा सपोस्टच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत. मी आशा करतो की तुम्हाला आमच हे Poem in Marathi On Love, Emotional Poem For Love In Marathi, कलेक्शन नक्की आवडल ,जर आवडले तर सोशल मीडिया वर जरूर शेयर करा आणि अश्याच भारी भारी पोस्ट्स साठी आमचा ब्लॉग inmarathi.in ला आवशय भेट दया…
Poem In Marathi On Love | 20+ प्रेमावरच्या कविता मराठीमध्ये | Love Poetry In Marathi
काहीतरी आहे तुझ्यात आणि माझ्यात…
तु माझ्यासोबत बोलतं नाहीस
तरी तुझ्यासाठी जिव तुटतोय।
खुप मुली येतात अन् जातात
तरी तुझ्यावरच जिव छुरतोय।
प्रत्येक कविता तयार होताना
तुलाच डोंळ्यासमोर ठेवतोय।
खरचं शब्दात नाही सांगु
शकतं तुझ्यावर किती प्रेम करतोय?
काही तरी आहे गं?
तुझ्या आणि माझ्यात।
त्यामुळे तर उदासी भरली
मन नाही लागतं कशात।
prem kavita in marathi love poem| प्रेम कविता | मराठी कविता
ती, पाऊस आणि आठवणी
आवडेल का तुला कधी ,
पुन्हा जुन्या आठवणीत रमायला ,
तुझ्या मनातलं स्वच्छंदी बोलायला ।।
आठवतांना सोबतीचे दिवस तुझे,
क्षण ते आनंदाचे , लहरी पणाचे.
आभाळापरी त्यांस सीमा नसावी,
ओढ त्या नभी मेघांची असावी.
बिजली त्या आठवणींची,
मेघांमध्ये कडकडावी.
आस त्या सरींची,
मनी फक्त उरावी.
बरसावे त्यांनी ही उत्कंठेनं ,
आठवणीत आपल्या.
सुखाचे सोबती स्पर्शुनी,
जाव्या रोमहर्षाला.
दुथडी भरून भावनांचे तरंग,
हृदयरुपी डोहातून उडावे.
नकळत डोळ्यातून ते,
अलगद वाहावे.
मोहोर त्या क्षणांना प्रवाहाने यावे ,
जणु संपूर्ण आयुष्य त्याने व्यापले जावे .
आज हि आठवणीत ,
रमतोय तुझ्याचं .
खरच नाही का जमणार तुला ,
तुझ्याच मनातलं बोलायला.
Prem kavita in marathi | मराठी कविता | प्रेम कविता
{Best} विनोदी कविता | funny poems short | हास्य कविता
तुझ्यात मी आणि माझ्यात तू
तुझ्यात मी आणि माझ्यात तू
तुझ्यात मी आणि माझ्यात तू
हरविते तू हरवितो मी
गहिवरते तू गहीवरतो मी
आपल्या दोघाच्या प्रेमाची साथ
लावते दीव्यातिल वात
वाटते मला कधी कधी
उंच अशा गगनात भरारी घ्यावी
जिथे फ़क्त तुझ्याशिवाय कुणीच नाही
हे जग हे नाते फ़क्त
तुझ्यात सामावले आहे
अशी असते मनात कुतूहल
तुझ्यात मी आणि माझ्यात तू
रम्य असेल छंद असेल
फुलाच्या पाकलितला गंध असेल
तुझ्याविना काही नाही अशी ही बुद्धि मंद असेल
तू जिव्हालू तू शहाणी
हवीहवीशी वाटणार्या सरिची परी तू
अप्सरा जरी नसली तरी मनाला मोहनारी मेनका तू
कविता करावी तुझ्यावर
ही कल्पना व्यक्त करणारी तू
मी कोण आहे हे मला दाखवणारी तू
अशा अर्गम्य असंख्य भावना व्यतीत तुझ्या सावलीत
फ़क्त तुझ्यात मी आणि माझ्यात तू…
पहिल्या नजरेतील प्रेम…
सवय तुझी झाली इतकी, दिवस माझा सरत नाही
तुझा चेहेरा पहिल्या शिवाय, शांत मला राहवत नाही.
गोंडस मऊ चेहेरा तुझा,
दिवस भर पाहत राहीन,
पानिदार सुंदर डोळे तुझे,
मन भिजेतोेवर त्याना पाहत राहीन.
रागीट-प्रेमळ स्वभाव तुझा,
आंबट-गोड लोणचेे जणू ,
आपल्या पुढील सुखं साठी,
पाया आपण मजबूत खानु.
पडलेला चेहेरा तुझा पाहून,
मन माझे अस्थिर होते, प्रेमळ दोन हृदयाचे,
आपले हे प्रीतीचे नाते.
सुगंध तुझा प्रेमाचा, विसरवतो मला सर्व काही,
तू समोर येताच माझा,
मला तुझा शिवाय दुसरे काही दिसत नाही.
पडव्याचा सना सारखा,
करू सगळे सन आपण साजरा,
प्रत्येक सणाला माझा अंतरा साठी,
घेऊन येईन मी मोगऱ्याचा गजरा.
देवा कडे मागणी करतो,
आपली जोडी अशीच कायम ठेव,
तुझा शिवाय मी जणू,
शेव-पुरी without शेव,
पोट भरलेले असले तरी,
तुझा हातचा दोन पोळ्या जास्त खाईन,
आणि तू जेवली नाहीस हे समजता मला,
मी देखील तसाच उपाशी राहीन.
तुझा हातांमध्ये, प्रेमाची उब जशी मला जाणवते,
तुझा हात धरलेला सोडताना,
हा हात मी कसा सोडू या विचाराने माझे डोळे पाणवते. विचार दोघांचा, हुबेहु जुळतोे,
इतका करतो आपण विचार सारखा,
दोघे एकत्र एकाच वाक्य बोलतो.
तुझा माझा बादल बोलू तितका कमी आहे,
तुझा शिवाय मी आंधळा,
आणि माझा शिवाय तू अपुरी,
अशी आपली गत आहे. शब्द प्रेमाचे मांडता मांडता,
तुझा आठवणीत मी हरवून जातो,
माझांतल्या तुला शोधण्यासाठी,
आरसा समोर मे उभा राहतो.
तुझा उत्तरा साठी, मी अता वाट पाहतो,
तू पण माझा साठी दोन ओळी लिहिशील,
याच धुंदीत मे कायम राहतो,
विश्वास आहे तुझावर,
तू नक्की लिहिशील मला,
प्रेमात दोन ओळी लिहून तर बघ,
सगळं जग त्या दोन ओळीत दिसेल तुला.
शब्दांची ही महिफिलीला इथेच मी रोकतो,
वर लिहिलेल्या प्रत्येक शब्दात,
फक्त आणि फक्त तुलाच मी बघतो,
तुलाच मी बघतो…
नात तुझं माझं
पावसाळी दरवळते ऋतु बहरते
जणू एक नवी संध्याकाळ।
मन अशांत चोहीकडे एकांत
जणू एक कातरवेळ। तुझा विचार
आसुसलेलं मन जणू एक खुणावनारी पाउलवाट। तुझं दिसणं ह्दय धडधडणं जणू एक नवजिवन। मन ओलं चिंब शहारती अंग जण् पावसाळी मोहरच। तुझी मीठी कंप ओठी जणू एक परीस स्पर्श। तुझ्या डोळ्यात पाणी
पावसातील मंजुळ गाणी
जणू दवा जखमेवरची। तुझं माझं जवळ असणं
मन एकमेकांत फसणं
जणू एक मिलनच। मी तुझ्यासाठी तू माझ्यासाठी
जणू एक नातंच आगळीक। – श्रीकांत रा. देशमाने.
या वर्षी तरी देवा मला एक gf दे ..
या वर्षी तरी देवा मला एक gf दे ..
गोरी गोरी नसली तरी चालेल सावळी दे..
श्रीमंत नसली तरी चालेल गरीब दे..
जी माझ्या मनाला समजेल ….
जी माझ्या हृदयाला जपेल …
या वर्षी तरी देवा मला एक gf दे..
गेले कित्येक वर्षे मी मित्रांच्या gf ला बघत आलो..
गेले कित्येक दिवस नुसते स्वप्नेच बघत बसलो..
पण देवा आता तरी ऐक न माझे..
कुठे तरी सेटिंग लाऊन दे..
पण देवा आता तरी ऐक न माझे..
माझ्या हातात तिचा हात येऊ दे…
या वर्षी तरी देवा मला एक gf दे..
जी जीवनात माझ्या सुख आणेल..
माझी स्वप्ने पूर्ण करायला मदत करेल..
जी दुखात माझ्या सहभागी असेल..
अश्रू पुसायला प्रथम तिचा हात असेल..
या वर्षी तरी देवा मला एक gf दे..
जी मी काळा का गोरा बघणार नाही..
नको त्या अपेक्षा करणार नाही..
जी मी श्रीमंत का गरीब पाहणार नाही..
नको त्या कारणावरून भांडणार नाही…
या वर्षी तरी देवा मला एक gf दे..
जी माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवेल..
काटेरी रस्त्यावर चालताना हात सोडणार नाही..
जी विश्वासघात करणार नाही..
प्रेमामध्ये कधी स्वार्थ बघणार नाही..
या वर्षी तरी देवा मला एक gf दे..
आता तरी माझी हवा होऊ दे..
आपल्याकडे पण आहे चिकणी पोरगी
आता तरी शायनिंग मारू दे…
आपल्याकडे पण आहे पार्टी..
एक एक बियर होऊन जाऊ दे…
या वर्षी तरी देवा मला एक gf दे..
वाट बघून बघून थकलो रे मी
काही तरी जुळवून दे..
स्वप्ने बघून बघून वेडा होईल रे मी..
काही तरी मिळवून दे…
या वर्षी तरी देवा मला एक gf दे..
ह्या वर्षाकडून खूप केल्या आहेत अपेक्षा ..
करू नको उपेक्षा..
ह्या देवाकडून खूप आहेत आशा …
करू नको निराशा..
या वर्षी तरी देवा मला एक gf दे.. plz plz plz.. 🙂
प्रेम लग्नानंतरच..
एकदा एक फोन आला म्हणाली छान लिहीता
कवी महाशय सांगा न तुम्ही कुठे राहता
मी ही थोडा बावरलो भल्तच हे अघटीत
डायरेक्ट पत्ता विचारते बाई पहिल्यच भेटीत
हळूहळू जीव गुंतला रोज फोन यायचा
घरात असल्यावर जीव धाकधूक व्हायचा
कळल जर बायकोला तर आपलं काही खरं नाही
या वयात प्रेम करणे हे काही बर नाही
तासनतास चॅटींग मग व्हाटसप वर करायचो
मीही मलाच विसरून तिचा होऊन उरायचो
बस झालं म्हणलं आता एकदा तरी भेट दे
मोहरलेली, मंतरलेली सोनेरी पाहट दे
ठरला दिवस ठरली वेळ ठरल्या जागी गेलो मी
जवळ तिच्या जाताच कावरा बावरा झालो मी
दुसरी तिसरी कुणीच नसून होती माझीच बायको
हल्ली तुम्हाला सुचतात म्हणे धंदे ते नको नको
कसा बसा घरी आलो युद्ध घनघोर चाललेलं
ऐकवत होती एकेक शब्द फोनवर बोललेलं
आपल्या ताटातल सोडून म्हणे दुसऱ्याच्या ताटावर डोळा
वाढायला गेलं बुंदी तर आवडतो शंकरपाळा
कधी कधी झाला प्रसंग डोळ्यापुढे आणतो
चुकून कुणाचा आलच फोन तर ताई असच म्हणतो
प्रेमातच दडलं सारं काही..
या दिवशी तू एकदम वेगळीच होती
डोळ्यात ती भावना , कधीच विसरणार नाही अशी
ते प्रेम , जणू पृथ्वीवरचे सारे तुझ्यामध्येच एकवटलेले
निरोप घ्यायचा होता तेव्हा , पण सात समुद्र डोळ्यात साठलेले मन एकदम क्षीण झाले , दीन झाले
पालटून त्याने साथ सोडली या कुशाग्र मेंदूची
ब्रम्हचर्य लोपुनी, कायावाचामनी फक्त तुझा जाहलो
सत्य असत्य काम क्रोध लोभ मोह मद मत्सर
सर्व अंगिकारले , हळूहळू बाणले या देही
आज आता जरी कुणी विचारले
तू कधी देव पाहिला आहेस का , वेड्या ?
मी निक्षून सांगेन त्याला आणि प्रत्येकाला
खऱ्या प्रेमातच तो बैसला
प्रेमातच दडलं सारं काही
👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇
marathi poem on mother | आईवर काही सुंदर कविता
morning bhakti geet | सकाळची भक्तिगीते मराठीत | in marathi