Poems on rain | पाऊस | मराठी कविता

पावसाळा ऋतू वर काही कविता फक्त तुमच्यासाठी | poems on rain in marathi | Marathi kavita | पाऊस गाते गाणे..

Read More : poems on rain

Read More : friendship kavita

पाऊस गाते गाणे.. 🌧🎵

टिप टिप पाऊस
झो झो वारा
गीत गाऊ पाहतो
आसमंत सारा

कडाडणारी वीज
गडगडणारे ढग
धावण्यार्‍या छत्रीतली
आपली लगबग

डराव्‌ डराव्‌ बेडकं
छम छम तळे
लेझीम हाती घेऊनी जणू
थेंब लाटेवर पळे

खळ खळ झरा
तड तड पत्रा
पावसाने भरवली बघा
ताला सुरांची जत्रा

Read More : emotional poems on आई

पाऊस..🌧

एकदा पावसाने तुला विचारले.
साधारण कधी येऊ?
तर तू म्हणालीस,
-इच्छा नसताना.
पावसात तू जितकी चिंब भिजायचीस
तितकीच माझ्याकडे येताना कोरडी.
मग तूच मला गोष्ट सांगितलीस,
आपण दोघं ज्या कागदी नावेवर बसलो होतो
ती उलटल्याचई.
नंतर पावसाचे आणि तुझे वैर झाले.
तो वेगळ्याच टापूत बरसू लाघला
आणि तू वेगळ्या
मी मधल्यामध्ये कोरड्या नदीसारखा
आतून झिरपू लागलो.
नंतर नंतर
पाऊस आलच नाही
कधी तरी येईन एवढंच म्हणाला आणि
बी रुजल्यानंतरचं वाट पाहणं
आपण दोघाणि स्वीकारलं
समजूतदारपणे.

Read More : Marathi Suvichar

Read More : अर्थासहीत मराठी म्हणी

माझा पाऊस.. 🌦

पाऊस सगळ्यांचाच असतो
सगळ्यांनी तो भोगलेलाही असतो
मलाही पाऊस माहीत आहे
मीही पाऊस कधीतरी
भोगलेला आहे
झेललेलाही आहे
माझ्यासाठी
पाऊस म्हणजे
फक्त एक आठवण
लहानपणी माझा बाप
जेव्हा मारायचा
माझ्या आईला
योगायोगाने नाही
पण
पाऊस बाहेर
पडत रहायचा
माझ्या आईचे
पाणावलेले डोळे
मला फक्त दिसायचे
तिच्या झै
पाऊस
तोच पाऊस
मला आठवतो
तोच पाऊस मला
माहित आहे
माझ्यासाठी
पाऊस म्हणजे
दु:ख, यातना, क्लेष
अश्रू, हंबरडा
आणि मूक विलाप
माझ्या आईचा
पाऊस म्हणजे
माझ्यासाठी नेहमीच
पाण्याचा अर्थहीन
थेंबांचा
आणि
माझ्या गेलेल्या
आईच्या आठवणींचा

Read More : सूर्यनमस्कार करण्याचे फायदे

🌧 पाऊसप्तक 🌧

ढगांची पळपळ
थेंबाची ओंजळ

मृदेची सळसळ
बेधुंद तो दरवळ
पहिला थेंब खेळ
छतावरून घरंगळ

उतारावर ओघळ
पाखरांची अंघोळ
सांज पाऊस वेळ
पोरांचे पाण खेळ

मळभ अंधारखेळ
विजेची बंद वेळ

लोकांची पळपळ
वाहनांची वर्दळ

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!