निसर्गावर कविता | 15+ poems on the nature | मराठी कविता

Poems On The Nature- नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या वेबसाइटवर. जर तुम्ही poems on the nature, निसर्गावर कविता मराठी मध्ये ,संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत. मी आशा करतो की तुम्हाला आमच हे poems on the nature in marathi, निसर्गाच्या कवितांचा संग्रह कलेक्शन नक्की आवडले ,जर आवडले तर सोशल मीडिया वर जरूर शेयर करा आणि अश्याच भारी भारी पोस्ट्स साठी आमचा ब्लॉग inmarathi.in ला आवशय भेट दया…

निसर्गावर कविता |  Poems On The Nature In Marathi

खेड्यांतील रात्र

त्या उजाड माळावरती
बुरुजाच्या पडल्या भिंती,
ओसाड देवळापुढती
वडाचा पार- अंधार दाटला तेथ भरे भरपूर.
ओढ्यात भालु ओरडती,
वाऱ्यात भुते बडबडती,
डोहात सावल्या पडती
काळ्याशार-त्या गर्द जाळीमधि रात देत हुंकार
भररानी कोकस्थानी
उठतात ज्वाळ भडकोनी.
अस्मान मिळाले धरणी,
आर ना पार -अवकळा रात्रिचा प्रहर घुमे तो घोर.

श्रावणमास

श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे;
क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे.
वरती बघती इंद्रधनूचा गोफ दुहेरी विणलासे,
मंगल तोरण काय बांधिले नभोमंडपी कुणि भासे !
झालासा सूर्यास्त वाटतो, सांज अहाहा ! तो उघडे;
तरुशिखरांवर, उंच घरांवर पिवळे पिवळे ऊन पड़े.
उठती वरती जलदांवरती अनंत संध्याराग पहा;
सर्व नभावर होय रेखिले सुंदरतेचे रूप महा.
बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळचि ते,
उतरुनि येती अवनीवरती ग्रहगोलचि की एकमते.
फडफड करुनी भिजले अपुले पंख पाखरे सावरिती,
सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निजबाळांसह बागडती.
खिल्लारे ही चरती रानी, गोपहि गाणी गात फिरे,
मंजुळ पावा गाय तयाचा श्रावणमहिमा एकसुरे.
सुवर्णचम्पक फुलला, विपिनी रम्य केवडा दरवळला;
पारिजातही बघता भामारोष मनीचा मावळला !
सुंदर परडी घेउनि हाती पुरोपकंठी शुद्धमती
सुंदर बाला या फुलमाला रम्य फुले-पत्री खुडती.
देवदर्शना निघती ललना, हर्ष माइना हृदयात,
वदनी त्यांच्या वाचुनि घ्यावे श्रावणमहिन्याचे गीत.

poems on the nature
poems on the nature in marathi

आनंदी पक्षी

केव्हा मारुनि उंच भरारी । नभात जातो हा दूरवरी,
आनंदाची सृष्टी सारी। आनंदे भरली.
आनंदाचे फिरती वारे। आनंदाने चित्त ओसरे,
आनंदे खेळतो कसा रे। आनंदी पक्षी !
हिरवे हिरवे रान विलसते । वृक्षलतांची दाटी जेथे,
प्रीती शांती जिथे खेळते । हा वसतो तेथे
सुंदर पुष्पे जिथे विकसली। सरोवरी मधु कमले फुलली
करीत तेथे सुंदर केली । बागडतो छंदे.
हासवितो लतिकाकुंजांना । प्रेमे काढी सुंदर ताना;
आनंदाच्या गाउन गाना । आनंदे रमतो
जीवित सारे आनंदाचे । प्रेमरसाने भरले त्याचे;
म्हणोनिया तो रानी नाचे । प्रेमाच्या छंदे
आम्हाकरिता दुर्धर चिंता । नाना दु:खे हाल सभोता,
पुरे! नको ही नरतनु आता । दुःखाची राशी !
बा, आनंदी पक्ष्या, देई। प्रसाद अपुला मजला काही,
जेणे मन हे रंगुनि जाई। प्रेमाच्या डोही,
उंच भराऱ्या मारित जाणे । रुप तुझे ते गोजिरवाणे !
गुंगुन जाइल चित्त जयाने । दे, दे ते गाणे !

मेघांचा कापूस

फिकट निळीने रंगविलेला कापुस मेघांचा,
वरुनि कुणी गुलजार फिरविला हात कुसुंब्याचा
त्यातहि हसली मंदपणे ती चंद्रकला राणी;
कडेकडेच्या मेघांवर ये मोत्यांचे पाणी,
इंद्रनिळाचा रंग बहरवी गिरिच्या अंगाला,
मधुन जळाची शुभ्र शोभते ती मोहनमाला;
चौबाजूला थाट दाटला हा हिरवाळीचा,
सृष्टिसतीने साज घेतला पाउसकाळीचा.
यशस्विनी सौभाग्यदेवता माता जगताची;
घोर घनघटा भूलिंगाला प्रक्षाळुनि गेल्या 

औदुंबर

ऐल तटावर पैल ततावर हिरवाळी घेउन
निळासावळा झरा वाहतो बेटाबेटांतुन.
चार घरांचे गाव चिमुकले पैल टेकडीकडे;
शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गरदी पुढे.
पायवाट पांढरी तयातुनि अडवीतिडवी पडे;
हिरव्या कुरणांमधुन चालली काळ्या डोहाकडे
झाकळुनी जळ गोड काळिमा पसरी लाटांवर;
पाय टाकुनी जळांत बसला असला औदुंबर

तूं तर चाफेकळी !

“गर्द सभोती रान साजणी तू तर चाफेकळी !
काय हरवले सांग शोधिसी या यमुनेच्या जळी?”
ती वनमाला म्हणे “नृपाळा, हे तर माझे घर;
पाहत बसते मी तर येथे जललहरी सुंदर,
हरिणी, माझी तिला आवडे फारच माझा गळा;
मैना माझी गोड बोलते, तिजला माझा लळा.
घेउनि हाती गोड तिला त्या कुरणावरती फिरे-
भाऊ माझा, मंजुळवाणे गाणे न कधी विरे”
“रात्रीचे वनदेव पाहुनी भुलतिल रमणी ! तुला;
तू वनराणी, दिसे न भुवनी तुझिया रूपा तुला.
तव अधरावर मंजुळ गाणी ठसली कसली तरी;
तव नयनी या प्रेमदेवता धार विखारी भरी!
क्रीडांगण जणु चंचल सुंदर भाल तुझे हे गडे,
भुरु भुरु त्यावर नाचत सुंदर कुंतल कुरळे उडे.
अर्धस्मित तव मंद मोहने, पसरे गालावरी;
भुलले तुजला हृदय साजणी, ये चल माझ्या घरी,’
सांज सकाळी हिमवंतीचे सुंदर मोती घडे;
हात लाविता परि नरनाथा ते तर खाली पड़े.
ती वनमाला म्हणे नृपाळा “सुंदर मी हो खरी.

अरुण

पूर्वसमुद्री छटा पसरली रम्य सुवर्णाची
कुणी उधळली मूठ नभी ही लाल गुलालाची ?
पूर्व दिशा मधु मृदुल हासते गालच्या गाली
हर्षनिर्भरा दिशा डोलती या मंगल काली.
क्षितिजाची कड सारविली
उज्ज्वल दीप्तीने,
सृष्टिसतीने गळा घातले की अनुपम लेणे ?
हे सोन्याचे, रक्त वर्ण हे, हे पिवळे काही,
रम्य मेघ हे कितेक नटले मिश्रित रंगाही.
उदरातुनि बाहते कुणाच्या सोन्याची गंगा
कुणी लाविला विशुद्ध कर्पुररस अपुल्या अंगा ?
अरुण चितारी नभःपटाला रंगवितो काय,
प्रतिभापूरित करी जगाला की हा कविराय ?
की नव युवती उषासुंदरी दारी येवोनि
रंगवल्लिका रम्य रेखिते राजस हस्तांनी?
दिवसयामिनी परस्परांचे चुंबन घेतात–
अनुरागाच्या छटा तयांच्या खुलल्या गगनात!
स्वर्गीच्या अप्सराच अथवा गगनमंडलात
रात्रीला शेवटची मंगल गीते गातात ?
किंवा ‘माझी चोरुनि नेली मोत्यांची माला’
म्हणुनि नभःश्री रुसली आली लाली गालांला?
की रात्रीचे ध्वांत पळाले, आशेची लाली
उत्साहाशी संगत होउनि ही उदया आली
किंवा फडके ध्वजा प्रीतिची जगता कळवाया.

poems on the nature
poems on the nature in marathi

🌄 निसर्ग 🌄

लखलखता प्रकाश येई पहाटेच्या वेळी…
सुर्यातील तेजाची नवीन कोवळी किरणे सर्वांसोबत समान खेळी…

डोंगरायच्या कुशीत उगवतो सुंदर मनमोहक तेज देणारा पिवळा तांबुस सुर्याचा गोळा…
सूर्याचे दर्शन झाल्यावर होतात प्रसन्न माणसं व जमतो किलबिल करणाऱ्या पाखरांचा सोहळा…

पाखरांचा थवा उडतो नभात आनंदाने…
जणु किरणांच्या सानिध्यात फिरुनी झेप घेती भविष्याच्या रुपाने…

सुर्याची किरणे वाटे जणु त्याची लेकरं…
त्याच लेकरांचा उजेड पडुन फुलते एक एक कोमल सुगंधी फुलांची कळी सुरेख…

खळखळणारा धबधबा वाहतो दरी-दरीतुन ओथंबणाऱ्या सागरासारखा पांढरा शुभ्र…
जोड देतो हाच धबधबा, मिळुन साथ देतो मोकळ्या आकाशासारखा निरभ्र…

धबधब्याचं पाणी मिळे सर्व पशु प्राण्यांना स्वच्छ लाभदायक…
लाभाचे मोल जमतील व पाण्याचे बोल रमतील त्याहुन जीवनदायक…

थंड पाण्याचा स्पर्श जाणवतो अंगी गार गार शहारा…
शहारांमुळे बेभान होऊन मनाला मिळतोय राम्यकदायी निवारा…

हिरवं हिरवं गवत लागे पायी, जणु शालुचं मखमली…
मन नाचे धुंद होऊनी वाऱ्याच्या झुळझुळी…

डोंगर दऱ्या खोऱ्यांमधुन आवाज गुंजतो जागोजागी…
आवाजाचा पुन्हा प्रतिसाद येई मागोमागी…

जमिनीची लाल माती असते आपल्या पायाखाली…
राबणारा शेतकरी तिचं माती मस्तकी लावुन विश्राम घेतो झाडाखाली…

वर्तुळ आहे पृथ्वी त्यात व्यापलेला आहे विशाल महासागर त्याला मिळणाऱ्या प्रबलं लाटा…
लाटांचा आस्वाद घेऊनी मनाला जाणवते ऐतिहासिक शिवरायांचा मराठा

ह्याच मायेच्या मातीत जन्मास आलो आपण धरतीची मुलं…
अंगाई गात निवांत निजणारे धरतीची मुलं स्वप्नात पाहतात आयुष्यातलं मोठं पाऊलं

पाऊले पुढे जाऊनी स्वप्नात तयार होतो चांदण्याचा चमचमणारा एक तारा…
ताऱ्यांचे ब्रिज उठते पुढच्या आयुष्याचा साठा सारा…

आयुष्याला वळणं देऊन फुटते अंकुर रोपासारखे…
रोपाला वाढ मिळते नवं अलंकारासारखे…

पुर्ण सृष्टीचे अलंकार सामावले या सोनेरी, रुपेरी, चंदेरी निसर्गात…
या निसर्गाला पालवी फुटूनं झाडे नांदणार आनंदात…

मोठी आहे सृष्टी, मोठा आहे सागर, मोठं आहे जग, मोठी आहे प्रेमळ माती यावर खुलते मोठे स्वप्नाचे स्वर्ग…
ह्याच भाबड्या जीवाला रुजुन तयार झाले हे चमकणारे मोठे निसर्ग…

नक्की वाचा:  प्रेमावरच्या कविता

नक्की वाचा: विनोदी कविता (funny)

                          
निसर्गाच्या कवितांचा संग्रह फक्त तुमच्या साठी | poem on nature in marathi | nature kavita in marathi. | निसर्गासारखा नाही रे सोयरा..

निसर्गासारखा नाही रे सोयरा.. 🌳

निसर्गासारखा नाही रे सोयरा
गुरू सखा बंधू मायबाप
त्याच्या कुशीमध्ये सारे व्यापताप
मिटती क्षणात आपोआप

त्याच्या संगतीत फिटतो संदेह
वितळतो क्षोभ माया मोह
त्याच्या संकीर्तनी मुरविता देह
भेटतो उजेड अंतर्बाह्य

त्याच्या स्मरणाने प्रकाशते मन
उजळते जग क्षणकाली
स्थिरावते पुन्हा चळलेले चित्त
पुन्हा मूळ वाट पायाखाली

नभ उतरू आलं..☁️

नभं उतरू आलं, चिंब थरथर वलं
अंग झिम्माड झालं, हिरव्या बहरात

अशा वलंस राती, गळा शपथा येती
साता जल्मांची प्रीती, सरंल दिनरात

वल्या पान्यात पारा, एक गगन धरा
तसा तुझा उबारा, सोडून रीतभात

नगं लागंट बोलू, उभं आभाळ झेलू
गाठ बांधला शालू, तुझ्याच पदरा

– ना. धो. महानोर

निसर्गाच्या कवितांचा संग्रह फक्त तुमच्या साठी | poem on nature in marathi | nature kavita in marathi. | निसर्गासारखा नाही रे सोयरा..

नक्की वाचा:  कविता, उखाणे, चारोळ्या | marathi poem, ukhane in marathi, charolya

फुलपाखरू...🦋

फुलपाखरू !
छान किती दिसते । फुलपाखरू

या वेलीवर । फुलांबरोबर
गोड किती हसते । फुलपाखरू
छान किती दीसते । फुलपाखरू

पंख चिमुकले । निळेजांभळे
हालवुनी झुलते । फुलपाखरू
छान किती दीसते । फुलपाखरू

डोळे बारीक़ । करिती लुक लुक
गोल मनी जनु ते । फुलपाखरू
छान किती दीसते । फुलपाखरू

मी धरु जाता । येई ना हाता
दुरच ते उड़ते । फुलपाखरू
छान किती दीसते । फुलपाखरू

नक्की वाचा:  सुदृढ आरोग्य जगण्याचे काही मार्ग (health tips)

नक्की वाचा:  सगळं काही मराठीमध्ये वाचा

उनाड वारा..🌀

वारा उनाड तो
सोबतिला नभही असे दाटले
सूर्य झाकोळुन ते
बेभान बरसु लागले ..

सुरुवात झाली त्या
धुंन्द श्रावण सरीला
पुन्हा एकदा उधाण आल
मनात आठवांच्या बरसातीला ..

मंद त्या श्रावण धारा
बेभान बरसु लागतात
जाता जाता मागे मात्र
पाऊलखुणा तेव्हडया उरतात …

निसर्गाच्या कवितांचा संग्रह फक्त तुमच्या साठी | poem on nature in marathi | nature kavita in marathi. | निसर्गासारखा नाही रे सोयरा..

swami samarth tarak mantra | श्री स्वामी समर्थ तारक मंत्र

देव हनुमानाला हनुमान हे नाव कसे पडले ? | hanuman jayanti 2020

hanuman chalisa in marathi |श्री हनुमान चालीसा

मंद धुंद गारवा..🌨

मंद धुंद गारवा ओल्या मातीचा सुवास
वार्‍यासोबत पाऊस ढग करतो लांबचा प्रवास

झिरमिर झिरमिर पाऊस धारा ओली चिंब झाली धरा
कण कण ऊमलून येतो घेऊन नाविन्याचा ध्यास

दूर कोठे डोंगरात मयूर ठेक्यात करतो नाच
इंद्रधनुषी सप्तरंगात देव मुगुटाचा होतो भास

तन मन चिंब चिंब कुठे बुडाले सूर्यबिंब
चंद्र चंद्र चांदण्याचा येतो सुखाची घेऊन रास

🌳 एक झाड आणि चार फांद्या 🌳

एक झाड अन चार फांद्या
असेच काही जगणे असते
लक्ष विखुरली गवत पाती
तरी कुणाशी नाते नसते

सदैव आपल्या अवकाशात
अस्तित्वास असे टिकवणे
अन मुळाशी खोल खोलवर
ज्ञात अज्ञात ओल शोधणे

म्हटले तर छानच असते
हिरवी फांदी हिरवी पाने
अन कुणाची वाट पाहत
फुलाफुलातून असे बहरणे

दोन दिसांचा ऋतू नंतर
तिच धूळ माती वाहणे
जलकण आशा तहानलेली
सदैव उरात होरपळणे

एक वादळ पानापानात
सर्वस्वाला व्यापून उरले
अन विजेची तार लखलख
ल्याया तनमन उत्सुकले

निसर्गाच्या कवितांचा संग्रह फक्त तुमच्या साठी | poem on nature in marathi | nature kavita in marathi. | निसर्गासारखा नाही रे सोयरा..

poems on the nature
poems on the nature

हिरवेगार कुठे गाव दिसेना…

धरणी माता जागा देईना
काही केल्या राग शमेना
अशी माझ्यावर कोपली
श्रावणातही मिश्किल हसली…

धरणी माता जागा देईना
सुखद काही वर्षाव करीना
तलावात मृगजळा विना काही दिसेना
आपात मज हा आता सोसेना….

धरणी माता जागा देईना
पाल्ये तिची वने झाली जुनी
माथ्यावर ओकतोय सुर्य अग्नी
केली लेकरांवरची माया अळणी…

धरणी माता जागा देईना
कुशीत तिच्या थारा देईना
पायांची होते लाही लाही
थेंबाथेंबा साठी भटकंती ठाई ठाई….

धरणी माता जागा देईना
वातावरणाची झीज भरेना
काही केल्या राग शमेना
हिरवेगार कुठे गाव दिसेना.

मोती

थबथबली, जलदाली
रंगहि ते सुंदरता
व्योमपटी कृष्ण कुणी
नील कुणी गोकर्णी
तेजात चकमकती
जणु ठेवी आणुनिया
कोठारी पाहुनि ते
न्याहळुनी मग हाते
मधु मोती

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇

{Best} Latest 700+ Good Morning Msg Marathi | शुभ सकाळ

{Best} Good Night SMS In Marathi | Good Night Msg Whatsapp

{Best} Latest 150+ Royal Marathi Attitude Status | Marathi Attitude Status

मित्रानो तुमच्याकडे जर “Poems On The Nature In Marathi” विषयावर कविता असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते Poems On The Nature  निसर्गावर मराठी कविता या article मध्ये update करू. मित्रानो हि Poems On The Nature कविता जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share  करायला विसरू नका. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.in

Leave a Comment