नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे inmarathi.in या ब्लॉग वरती स्वागत आहे. जर तुम्ही Motivational, Inspirational & Positive Thoughts in Marathi मध्ये वाचणार असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. येथे तुम्हाला Best Positive thoughts marathi मध्ये वाचायला मिळतील, म्हणून मित्रांनो या पोस्ट ला शेवट पर्यंत नक्की वाचा.
💕💖 चांगल्या लोकांना मिळणारा मान कधी कमी होत नाही,
शुद्ध सोन्याचे शंभर तुकडे केले तरीही त्याची किंमत कमी होत नाहीं,
चुकणं ही “प्रकृती”
मान्य करणं ही” संस्कृती”
आणि
सुधारणा करणं ही “प्रगती “आहे.
गरुडासारखे उंच उडायचे असेल तर,
कावळ्यांची संगत सोडावी लागेल.
जगायचे तर दिव्या प्रमाणे,
जो राजाच्या महालात आणि गरीबांच्या झोपडीत एक सारखा प्रकाश देतो…!!

Read More: 500+ good morning quotes in marathi | सुप्रभात कोट्स मराठी मध्ये | शुभ सकाळ शुभेच्छा
💐🍀🌺 🌺🍀💐
विश्वातील कोणतीच गोष्ट आपल्या स्वतःसाठी नसते..!
समुद्र स्वतः पाणी नाही पीत,
झाड स्वतः कधी स्वतःच फळ नाही खात,
सूर्य स्वतःसाठी सृष्टीचं पोषण नाही करत,
फूल अपल्या स्वतःसाठी सुगंध नाही पसरवत.
कारण इतरांसाठी जगण हेच खर जीवन आहे.
🌺💐🍀🍀💐🌺
💐🌺💐💐🌺💐🌺
झाकलेल्या मुठीतून वाळूचा कण निसटावा तस हळू हळू आयुष्य निघून चाललंय…
आणि…
आपण उगीच भ्रमात आहोत कि आपण वर्षा वर्षाने मोठ होत चाललोय.
प्रेम “माणसावर” करा त्याच्या “सवयीवर” नाही… . “नाराज” व्हा त्याच्या बोलण्यावर पण “त्याच्यावर” नाही… . “विसरा” त्याच्या “चुका” पण त्याला नाही… . कारण “माणुसकी” पेक्षा मोठ काहीच नाही…🌹🌹🌹🌹🌹🌹हाक तुमची साथ आमची.
जेव्हा सगळंच संपून गेलंय
असं आपल्याला वाटतं,
तीच खरी वेळ असते,
नवीन काहीतरी सुरु होण्याची.
💐आयुष्यात घेण्यापेक्षा देणं महत्वाचं आहे.शत्रुला क्षमा द्या.
प्रतिस्पर्ध्याला सहिष्णुता द्या.
मित्राला ह्रदय द्या.
मुलांना तुमचं उदाहरण द्या.
वडिलांना पुज्य भाव द्या.
आईला तुमच्या चारित्र्याची भेट द्या. स्वत:ला आत्मसन्मान द्या आणि जगाला सेवा द्या.
प्रत्येकाला काहीतरी द्यायचंच आहे हे विसरू नका. घेणार-यापेक्षा देणा-यालाच प्रतिष्ठा मिळते. इतिहासही ह्याला साक्षी आहे.
🌹!! श्री स्वामी समर्थ !!🌹🙏🙏
💐 संत तुकाराम महाराज म्हणतात.
जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले ।
तोची साधु ओळखावा देव तेथेची जाणावा।|
☝ देव जाणून घेण्यासाठी पॆसा नाही तर खरा भक्तिभाव लागतो.
☝देवाबद्दल अंधश्रद्धा अजिबात ठेवू नका पण देवावर श्रद्धा मात्र जरूर ठेवा.

🎭”विहरीत जाणारी बादली झुकते तेंव्हा पाणी भरून येते,
तसे जीवनात काही मिळवायचे असेल तर निश्चितच नम्र, लिन असावे लागते”
“विहीर खणत असताना
काठावर बसणाऱ्या लोकांचं लक्ष विहीरीतील दगडांकडे नसतं तर,
त्या दगडांमध्येही कुठं तरी
पाणी दिसतंय का हेच ते पहात असतात.
आपल्या आयुष्यात येणाऱ्या
माणसाचं निरीक्षण करतानाही
त्यांच्यातील वाईट गोष्टींऐवजी
चांगले गुण शोधण्याचा प्रयत्न करा.
नक्कीच चांगल्या गोष्टीसुद्धा सापडतील.”
🐾आयुष्य खुप सुंदर आहे…☺
कठीण काळात सतत स्वतःला सांगा,
शर्यत अजून संपलेली नाही,
कारण मी अजून जिंकलेलो नाही.
🍯पाण्याच्या माठाला विचारले की बाबा तू इतका
थंड कसा राहतो ?
माठाने अगदी मार्मिक ऊत्तर दिले.,
ज्याला माहित आहे की ज्याचा भूतकाळ माती व
भविष्यकाळही मातीच आहे तो कशावर गर्व
करणार…!
माणसाने सुध्दा जर हेच लक्षात
ठेवले तर!!!!!
🐚..आयुष्य खुप सुंदर जगु शकाल..🐚
🍁वाहनाची पुढची काच कधीही मोठी असते आणि मागे लक्ष ठेवण्याचा आरसा मात्र अगदी छोटासा असतो….
कारण….
कालचक्रात भूतकाळाला फारच थोडे महत्व आहे,
तेव्हा मागे तुमच्या भुतकाळाकडे फक्त लक्ष ठेवा,
मात्र भविष्यकाळाकडे विशाल नजरेने बघा आणी पुढे जात रहा.🍁
🍀🌷 प्रभातपुष्प🌷🍀
जीवन बदलण्यासाठी
वेळ ही सगळ्यांनाच मिळते,
पण वेळ बदलण्यासाठी
दोन वेळा जीवन नाही मिळत.
नेहमी आनंदाने जीवन जगा..
चांगल्या लोकांच एक वैशिष्ट्य असतं,
त्यांची आठवण काढावी लागत नाही,
ते कायम आठवणीतच राहतात…

लक्षात ठेवा लोक उगवत्या सूर्याला
नमस्कार घालतात, मावळत्या नाही.
🌹देव दगडात असतो कि नसतो?
☝एकदा स्वामी विवेकानंद यांना एका विद्वान(अतिहुशार) व्यक्तीने जेवणासाठी आमंत्रित केले.
👉जेवणाचा कार्यक्रम उरकल्यानंतर त्याने स्वामी विवेकानंद यांना सहज हसत हसत म्हणटले की,
” स्वामीजी बघाना काय मूर्ख लोक असतात, खुशाल दगडाचा देव बनवून त्याची पूजा करतात.
किती मूर्खपणा आहे.
मला तर देव या जगात अस्तित्वात असल्याचे वाटत नाही. सगळे थोतांड आहे.
तेहतीस कोटी काय या जगात एकही देव अस्तित्वात नाही.”
सगळा मूर्खपणा आहे. देव कुठे दगडाच्या मूर्तीमध्ये असतो का?❔
आणि…..
तो व्यक्ती खदखदा हसू लागला. 👉हे सर्व स्वामी विवेकानंदांनी
शांतपणे ऐकून घेतले व त्या व्यक्तीला म्हणाले की,
” तुमच्या पाठीमागे भितींवर लावलेला फोटो तुमच्या वडिलांचा आहे का? “
त्या व्यक्तिने होकारार्थी मान डोलावून म्हटले “हो ते माझे वडील होते, दोन वर्षापूर्वी त्यांचा स्वर्गवास झाला आहे.”
✨ स्वामीजी म्हणाले तुम्हांला कसे माहीत की तुमचे वडील स्वर्गातच गेले.
तो व्यक्ती निरूत्तर झाला.
त्यानंतर स्वामी विवेकानंदांनी त्या व्यक्तीला तो फोटो समोर आणुन ठेवण्यास सांगितलं.
त्याने त्याच्या वडिलांचा फोटो समोर आणुन ठेवला.
स्वामी विवेकानंदानी त्याला सांगितले कि,
🌟आता एक काम करा, या फोटोवर थुंका.
तो व्यक्ती विवेकानंदांकडे आश्चर्याने पाहून म्हणाला. “काहीतरीच काय सांगताय स्वामीजी, मी माझ्या वडिलांवर कसा काय थुंकू शकतो.”
स्वामी विवेकानंद म्हणाले, ” तो तर कागद आहे. ते थोडेच तुमचे वडील आहेत.”
त्यावर तो व्यक्ति म्हणाला “मी या फोटोमध्येच माझ्या वडिलांना पाहतो. त्यामुळे मी त्यांचा अपमान करू शकत नाही.”
✨🌟
यावर स्वामी विवेकानंद म्हणाले कि
👉 “जसे तुम्ही श्रद्धेने तुमच्या वडिलांना या फोटोमध्ये पाहता तसेच प्रत्येक व्यक्ती मूर्तीमध्ये परमेश्वर पाहत असतो. त्यामध्ये त्यांचा भक्तीभाव व श्रद्धा लपलेली असते.”
हे ऐकून तो व्यक्ती खुप खजील झाला व विवेकानंदांचे पाय पकडून माफी मागु लागला.
🌹 🌹 ॥ विचार धन ॥ 🌹 🌹
एका गावात एक साप वावरताना अनेकांना दंश करायचा. त्यापायी कित्येक मृत्यूमुखी पडले. पूर्वजन्मीच्या पापामुळे त्याला ही सर्प योनी मिळाली होती. याचा त्याला पश्चातापही झाला होता. सर्पयोनीतून मुक्त व्हावे असे त्याला वाटे. त्याने अनेकांना मुक्तीचा उपाय विचारला. अखेर एका साधुने सांगितले,’कोणालाही दंश करायचा नाही.’ सापाने ते ऐकले. तो निमूट एका जागी पडून राहायचा. एकाच जागी सरपटत राहिल्याने त्याला कुणी घाबरेनासे झाले. लोक त्याला छेडू लागले, छळू लागले. चुंबळीसारखा वेटोळे करून त्यावर घागरीचे ओझे ठेऊ लागले. बिचारा अगदी मरायला टेकला होता.
एकेदिवशी साधुमहाराज पुन्हा त्याच रस्त्याने जाताना त्यांना तो मरणोन्मुख साप दिसला. त्यांनी त्याची दशा पाहिली. कीव आली,’अरे, असे कसे झाले?’ त्यांना सगळा प्रकार लक्षात आला. त्यांनी विचारले,’स्वसंरक्षणासाठी तू फुत्कार तरी करीत होतास की नाही?’ सापाने नकारार्थी उत्तर दिले. साधुने त्याला फुत्कार करण्यास सांगितले. सापाने ‘स्वभावधर्म’ ओळखला नि काय चमत्कार झाला पहा, नुसत्या भयाने लोक त्याच्यापासून दूर राहू लागले.
“मूळ स्वभावधर्म सोडला, तर सापाचीही चुंबळ करायला लोक घाबरत नाहीत. तेव्हा सृष्टीने दिलेले बरे-वाईट संचित ज्याने त्याने संभाळून वागावे हेच खरे.”
🌹 सुंदर काय असतं ???
जे मन रागाहून जास्त अनुराग करतं आणि तिरस्काराऐवजी फक्त प्रेमच करतं…
ते मन सुंदर…
चांगल्या चेह-याहून जास्त चांगल्या मनाला जे प्राधान्य देतात…
ते विचार सुंदर…
आणि कितीही गैरसमज झाले किंवा कितीही राग आला तरीही थोड्याच अवधीमध्ये मनापासून सर्व माफ करून पुर्ववत होते…
ते नाते सुंदर…!

☝ परमेश्वर हा कणाकणांमध्ये सामावलेला आहे. कोणाला तो मातेच्या चरणामध्ये दिसतो तर कोणाला दिनदुबळ्यांमध्ये दिसतो.
‼ सुप्रभात ‼
अनुभवाने एक शिकवण दिली आहे, कुणाच्या चुका उणीवा शोधत बसू नका.
नियती बघुन घेईल हिशोब तुम्ही करू नका.
काही जिंकणं बाकी आहे,
काही हरणं बाकी आहे.
अजुनही आयुष्याचे पूर्ण सार बाकी आहे.
आपण चाललोय आपल्या ध्येयपूर्तीकडे,
आपण पहिल्या पानावर आहोत,
अजून संपुर्ण पुस्तक बाकी आहे..
सगळं विकत घेता येतं पण संस्कार नाही।
कितीही केल तरी वाळवंटात आणि समुद्रात पिक घेता येत नाही।
देह सर्वांचा सारखाच।फरक फक्त विचारांचा।
या छोटयाशा आयुष्यात एवढे नाव कमवा की,लोक तुमच्या कड़े “एकमेव उपाय” म्हणून पाहतील “पर्याय”म्हणून नाही…..!!!
रस्ता सापडत नसेल तर.
स्वत:चा रस्ता स्वत:च तयार करा.
वाटीभर शिरा समोर बघितला
अन् लक्षात आलं
की त्यात रवा, काजू, बदाम
सगळंच दिसत होतं..
पण, ज्यामुळे तो शिरा गोड लागतो
ती साखर कुठे दिसली नाही..
काही माणसं एखाद्याच्या आयुष्यात
अशीच असतात जी दिसत नसली
तरी त्याच्या
आपुलकीमुळे आणि गोडव्यामुळे
जीवनाला पूर्णत्व मिळतं राहते.
वर्गात शिक्षक विचारतात की,
गाव आणि शहर यात काय फरक आहे.?
एका मुलाने खुप सुंदर उत्तर दिले….., की इतकेच अंतर,
गावात गाई पाळल्या जातात आणि कुत्री भटकत फिरत असतात, तर शहरात कुत्री पाळली जातात आणि गाई भटकत फिरत असतात.
‘ जिवनाचे कडु सत्य आहे सर
अनाथ आश्रमात मुले
भेटतात-गरिबांची
आणि वृद्धाश्रमात म्हातारीमाणस भेटतात-‘श्रीमंताची👌👌👌

रोज स्वत:ला सांगा:
आजचा दिवस खुप सुंदर आहे.
मला जे वाटते त्यापेक्षा बरेच जास्त काहीतरी करण्याची क्षमता माझ्यात आहे.
रोजच असे क्षण असतात जे आनंदाने भारलेले असतात.
आज मी स्वत: आनंदीत राहीन आणि इतरांनाही आनंद देईन.
जीवन खुपच सुंदर आहे आणि मी ते अजून सुंदर करणार…!!!
रेस मध्ये पळणार्या घोड्याला “विजय” काय असतो हे माहितीही नसतं…
त्यावर बसलेल्या माणसाने दिलेल्या यातनांमुळे,
तो जिवाच्या आकांताने पळत असतो…
जेवढ्या यातना जास्त तेवढा घोड्याचा वेग जास्त…
आणी विजय पक्का…
त्याप्रमाणे तुमच्या जीवनात जेवढ्या अडचणी,
आणि जेवढ्या यातना जास्त तेवढाच तुमचा विजय पक्का…🌷🌷
रामायणात दोन व्यक्ति अशा होत्या,👇
एक बिभीषण आणि दुसरी
कैकयी.
रावणाच्या राज्यात राहूनही
बिभीषण बिघडला नाही,
श्रीरामाच्या राज्यात राहुन
कैकयी सुधारली नाही.
सुधारणे आणि बिघडणे व्यक्तिच्या
विचारावर आणि स्वभावावर
अवलंबून असते.
परिस्थितिवर नाही.
।। विचारांची दिशा बदला ।।
।। दशा आपोआप बदलेल ।।
जिवन खुप सुंदर आहे फक्त जगायला हव…💯🌹
रस्ता कितीही दगड खड्यांनी
भरलेला असला तरी
एक चांगला बुट घालुन त्यावर
आपण सहज चालु शकतो.
परंतु चांगल्या बुटामध्ये
एक जरी खडा असला तर
चांगल्या रस्त्यावर
काही पावले चालणे कठीण होते.
मनुष्य बाहेरच्या आव्हांनानी नाही
तर आतल्या कमजोरीमुळे
अयशस्वी होतो.
🙏”आयुष्य खूप सुंदर आहे एकमेकांना मदत करा🙏
या जगात सर्वात…
मोठी संपत्ती “बुध्दी”
सर्वात चांगल हत्यार “धैर्य”
सर्वात चांगली सुरक्षा “विश्वास”
सर्वात चांगले औषध “हसू”
आणि आश्चर्य म्हणजे हे
“सर्व विनामुल्य आहे”.
☄☄☄☄☄☄☄☄
।। नेहमी आनंदी रहा।।
बिरबलाने दिलेली दहा सर्वश्रेष्ठ प्रश्न …..
💐1– विश्वातली सर्वात सुंदर निर्मिति कोणती ?
उत्तर- माता..
💐2– सर्वश्रेष्ठ फूल कोणते आहे ?
उत्तर- “कापसाचे फूल”
💐3– सर्वश्र॓ष्ठ सुगंध कोणता आहे ?
उत्तर- पावसाने भिजलेल्या भूमिचा सुगंध..
💐4-सर्वश्र॓ष्ठ गोडवा कोणता ?
उत्तर- “वाणीचा”
💐5– सर्वश्रेष्ठ दूध-
उत्तर- मातेचे..
💐6– सर्वात काळे काय आहे ?
उत्तर- “कलंक”
💐7– सर्वात वजनदार काय आहे ?
उत्तर- “पाप”
💐8– सर्वात स्वस्त काय आहे ?
उत्तर- सल्ला..
💐9– सर्वात महाग काय आहे ?
उत्तर- “सहयोग”
💐10-सर्वात कडू काय आहे ?
उत्तर- “सत्य”…
💐खुप सुंदर प्रश्न आणि त्या प्रश्नाचे उत्तर…
प्रश्न : आयुष्य म्हणजे काय ????
उत्तर :- माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याला ” नाव ” नसतं पण ” श्वास” असतो आणि …
ज्यावेळी तो मरतो तेव्हा फक्त “नांव” असतं पण “श्वास” नसतो.
” नाव ” आणि ” श्वास ” यांच्या मधिल अंतर म्हणजेच “आयुष्य”…

फणसाची चव आणि रूप यातला फरक खाणार्याला कळतो.
माणसांची पारख ही त्यांच्या रूपावरून करू नका, खरा महत्वाचा असतो तो त्यांचा स्वभाव.
आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती कळत-नकळत काही तरी शिकवून जाते….
चांगल्या व्यक्तीसोबत मैत्री
ही ऊसासारखी असते,
तुम्ही त्याला तोडा, घासा, पिरगळा,
किंवा ठेचून बारीक बारीक करा
तरी अखेरपर्यंत त्यामधून गोडवाच बाहेर येईल….
🌹 “Life is very beautiful” 🌹
पिंपळाच्या रोपासारखं खडकावर उगवता आलं पाहिजे,
निर्भीडपणे निर्धाराच्या वाटेवर चालता आलं पाहिजे,
वादळांचं काय, ती येतात आणि जातात, मातीत घट्ट पाय रोवून उभं रहाता आलं पाहिजे
या साठीच तर गुरूंचे पाठबळ पाहिजे
ते मिळविण्यासाठी गुरुंवर निस्सीम भाव आणि दृढ श्रद्धा पाहिजे…
दिवा मातीचा आहे की सोन्याचा
हे महत्त्वाचं नसून
तो अंधारात प्रकाश किती देतो
हे महत्त्वाचं आहे
त्याचप्रमाणे मित्र गरीब आहे की
श्रीमंत आहे हे महत्त्वाचं नसून
तो तुमच्या संकटात किती
खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा राहतो
हे महत्त्वाचं आहे..
🌸🍁🌞 🌞🍁🌸
थोडा वेळ नाचल्यानंतर मोर सुद्धा निघून जातात, पण त्यांच्या नकळत काही मोरपिसे जमिनीवर तशीच पडून राहतात..
तसेच् आयुष्यात काही माणसे काही दिवस येऊन जातात,पण आयुष्याच्या वाटेवरती सुखद आठवणी ठेवून जातात..!!
||देव आमचा सांगुन गेला
पोटा पुरतेच कमव||
||जिवाभावाचे माणसे मात्र खुप सारे जमव||
ज्यावेळी माणूस स्वतःच्या स्वार्थाचा विचार न करता कार्य करतो त्त्यावेळी त्याच्या हातून सर्वोत्तम कार्य घडते. त्या कार्यामुळे समाजात ती व्यक्ती प्रभावी ठरते. निरपेक्ष भाव ठेवला तरच आपण योग्य कार्य करू शकतो.
शंभर वर्ष जिवंत राहण्यासाठी,
शंभर वर्ष जगणं गरजेच नाही, काहीतरी चांगलं काम करा कि लोक तुम्हाला शंभर वर्ष लक्षात ठेवतील,,,🌼🌼🌼🌼🌼
।।हेचि आम्हा करणे काम । बीज वाढवावे नाम ।।🌺🌺
ज्यावेळी माणूस स्वतःच्या स्वार्थाचा विचार न करता कार्य करतो त्त्यावेळी त्याच्या हातून सर्वोत्तम कार्य घडते.
शंभर वर्ष जिवंत राहण्यासाठी,
शंभर वर्ष जगणं गरजेच नाही, काहीतरी चांगलं काम करा कि लोक तुम्हाला हजारो वर्ष लक्षात ठेवतील,,, 😊😊
जेव्हा अडचणीत असाल तेव्हा
प्रामाणिक रहा,
जेव्हा आर्थिक परिस्थिती चांगली असेल तेव्हा
साधे रहा,
जेव्हा एखादं पद किंवा अधिकार
असेल तेव्हा विनयशील रहा,
जेव्हा अत्यंत रागात असाल,
तेव्हा अगदी शांत रहा”. यालाच आयुष्याचे “सुयोग्य व्यवस्थापन” असं म्हणतात…
जीवनाच्या बँकेत “पुण्याईचा”
” बँलन्स “
पुरेसा असेल तर
” सुखाचा चेक “
कधीच
” बाउंस “
होणार नाही .
जीभ नरम असते, कोमल असते आणि लवचिक असते. म्हणूनच ती अखेरपर्यत तोंडात सुरक्षित राहाते।
याउलट दात कठोर
असतात, तीक्ष्ण असतात, धारदार असतात म्हणूनच त्यांच्यापैकी एकही अखेरपर्यत तोंडात शिल्लक राहत नाही।।
म्हणूनच रोजच्या जीवनात सर्वांशी बोलताना कोमल शब्द वापरा. कठोर शब्दांनी माणसं दुरावतात।।।
नम्र रहा, आणि लवचिक बना…।
तुम्ही आयुष्यात नेहमीच यशस्वी व्हाल…।
💐 सुंदर दिवसांच्या सुंदर शुभेच्छा 💐
जी माणसं ध्येयाकडे नजर ठेवून
वाटचाल करत असतात,
ती सतत “धडपडत” असतात….
लोकांच्या दृष्टिने ती “धड” नसतात, कारण ती “पड़त” असतात. पण, खर म्हणजे ती ” पड़त” नसतात. तर, पड़ता पड़ता “घडत” असतात..
– स्वामी विवेकानंद.
जगी जीवनाचे सार
घ्यावे जाणुनी सत्वर
जैसे ज्याचे कर्म तैसे
फळ देतो रे ईश्वर ….
छापलेली पुस्तके वाचल्याने
खरे ज्ञान मिळत नाही…
अनुभवाचे पुस्तक वाचल्याने
खरे ज्ञान मिळते…
कारण…
छापलेल्या पुस्तकांचे लेखक
अनेक असतात…
पण…
अनुभवाच्या पुस्तकाचे लेखक
आपण स्वत: असतो..👍
चुकीच्या निर्णयामुळे अनुभव वाढतो..आणि योग्य निर्णयामुळे आत्मविश्वास…
म्हणून निर्णय चुक कि बरोबर विचार करायचा नाही..निर्णय घ्यायचा अनं पुढे जायचं…..।।।।।
“जीवनात एक क्षण रडवून जाईल तर दुसरा क्षण
हसवून जाईल…
या जीवनरूपी प्रवासात येणारा प्रत्येक क्षण
जीवन जगण्याची कला शिकवून जाईल……!💐🌹
केवडयाला फळ येत नाही पण त्याच्या सुगंधाने तो अवघ्या जगाला मोहवून टाकतो…..
आपलं जगणं दुसऱ्यासाठी जेवणातल्या मिठासारखं असावं….
पाहिलं तर दिसत नाही ,पण नसलं तर जेवणच् जात नाही…!
कुणाची निंदा करणे हे ‘ रोमिंग’ सारखे आहे. केली तरी ‘चार्ज’ लागतो, ऐकली तरी ‘ चार्ज’.
परोपकार करणे हे “LIC” सारखे आहे.
” जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी..”
आपण आपलं नित्यनियमाने ‘नामस्मरणा’चा’ प्रिमियम’ भरत रहावा. ‘सदगुरुकृपेचा’ ‘ बोनस’ अखंड मिळत जातो.
किती पैसा कमावला म्हणजे
माणूस श्रीमंत समजावा?
याचे फार छान उत्तर संत तुकाराम महाराजानी दिले आहे,
नीतिधर्माचे आचरण ठेवता यावे,
मुलाबाळांचे रक्षण करता यावे,
आईवडिलांची काळजी घेता यावी.
अब्रूने जगता यावे,
इतका पैसा जवळ असला
की तो मनुष्य श्रीमंत समजावा.
😊 🎭 ग्रंथ समजल्याशिवाय ”संत” समजणार नाही आणि
”संत” समजल्याशिवाय ”भगवंत” समजणार नाही. 🙏
एका व्यक्तीने श्रीसद्गुरुंना विचारले,
उत्सव साजरा करायला सर्वात चांगला दिवस कुठला?
श्रीसद्गुरुंनी शांतपणे सांगितले –
मरणाच्या “एक दिवस”अगाेदर !!
व्यक्ती म्हणाली मरणाचा तर दिवस माहीत नसतो.
श्रीसद्गुरु हसून म्हणाले “जीवनातला प्रत्येक दिवस शेवटचा समज”
आणि
जीवनाचा खरा आनंद घेण्यास आजपासून सुरवात कर………!!
एकदा राधाने कृष्णाला विचारले मैत्रीचा फायदा काय आहे…
कृष्ण हसून म्हणाला जिथे फायदा असतो तिथे ‘ *मैत्री कधीच नसते..
एक दगड कुत्र्याला मारा…
तो लगेच पळून जाईल…
पण तोच दगड मधमाशीच्या पोळ्याला मारा
त्या सर्व मिळून तुमच्यावर हल्ला करतील
दगड एक व मारणारा पण एकच
पण फरक आहे तो..
एकटे असण्याचा व..
संघटित असण्याचा🙏🌞🙏
आशीर्वाद मिळावा मोठ्यांकडून
आनंद मिळावा जगाकडून
कृपा मिळावी देवाकडून
स्नेह मिळावा सर्वांकडून
हीच प्रार्थना आहे देवाकडे
जगात माहिती नाही
किती दिवस राहायचं आहे,
जिंकून घ्या सर्वांची मन बस
हाच जीवनाचा दागिना आहे.
आवडलेलं आणि निवडलेलं यांची जेव्हा सांगड घालता येत नाही तेव्हा आयुष्यात उरते ती फक्त “तडजोड “…. कारण आवडलेलं कधी आपल्याला विसरता येत नाही आणि निवडलेल मनापासून स्वीकारता येत नाही:
“स्वार्थासाठी व कामापुरती
जवळ आलेली माणसे…
काही क्षणात तुटतात
पण विचारांनी व प्रेमानी
जुळलेली माणसे…
आयुष्यभर सोबत राहतात”.
अनुभवाने एक शिकवण दिली आहे, कुणाच्या चुका उणीवा शोधत बसू नका.
नियती बघुन घेईल हिशोब तुम्ही करू नका.
काही जिंकणं बाकी आहे,
काही हरणं बाकी आहे.
अजुनही आयुष्याचे पूर्ण सार बाकी आहे.
आपण चाललोय आपल्या ध्येयपूर्तीकडे,
आपण पहिल्या पानावर आहोत,
अजून संपुर्ण पुस्तक बाकी आहे..
“विश्वास” इतरांवर
इतका करा की ,
तुम्हाला फसवताना ते
स्वतःला दोषी समजतील..
आणि
“प्रेम” इतरांवर❤
इतकं करा की ,
त्यांना तुम्हाला गमवायची
भीती राहिल…!!
चांगले कुटुंब आणि जीवाला जीव देणारे
मित्र भेटणे म्हणजे
दुसर काही नसून जिवंतपणीच मिळालेला स्वर्ग आहे.
“मृत्यु “आणि” मोक्ष “या मध्ये काय फरक आहे?
खूपच उत्तम उत्तर दिले सद्-गुरुंनी…
श्वास पूर्ण झाले आहेत आणि “इच्छा” बाकी राहील्या आहेत त्याला “मृत्यू” म्हणतात.
श्वास बाकी आहेत आणि सर्व “इच्छा” पूर्ण झाल्या आहेत त्याला ” मोक्ष ” म्हणतात.
“मागितले तरी सुख उसनं मिळत नाही”
“प्रयत्ना शिवाय कधीच ध्येयाचं शिखर गाठता येत नाही”
“आपल्या देवावर नेहमी नि:संकोच विश्वास ठेवा”
“योग्य वेळी तो इतकं देतो की मागायला काहीच उरत नाही”.
” हिरा आणि काचेत फरक ओळखायचा असेल तर उन्हात ठेवा,
जी गरम होते ती काच आणि जो थंड
राहतो तो हिरा.
आपल्या आयुष्यात कितीही संकटे आली तरी थंड रहा,
कारण संकटात जो स्वतःला शांत ठेवून संकटावर मात करतो तोच खरा हिरा ठरतो.
बाराखडीचा अर्थ इतका समर्पक असू शकतो, क, ख, ग काय सांगतं, जरा विचार करून बघा.
क – क्लेश करू नका.
ख – खंत करू नका.
ग – गर्व करू नका.
घ – घाण करू नका.
च – चिंता करू नका.
छ – छळ करू नका.
ज – जबाबदारी स्वीकारा.
झ – झाडे लावा.
ट – टिप्पणी करु नका.
ठ – ठगु नका.
ड – डाग लागु देऊ नका.
ढ – ढ राहु नका.
त – तत्पर राहा.
थं – थूंकु नका.
द- दिलदार बना.
ध – धोका देऊ नका.
न – नम्र बना.
प – पाप करु नका.
फ – फ़ालतू काम करू नका.
ब – बिघडु नका.
भ – भावुक बना.
म – मधुर बना.
य – यशस्वी बना.
र – रडू नका.
ल – लोभ करू नका.
व – वैर करू नका.
श – शत्रुत्व करू नका.
ष – षटकोनासारख स्थिर राहा.
स – सेवा करा.
ह – हसतमुख राहा.
क्ष – क्षमा करा.
त्र – त्रास देऊ नका.
ज्ञ- ज्ञानी बना.