बुद्धिबळपटू प्रज्ञानंदचा पराभवा माघे हि लपली आहे खूप मोठी प्रेरणादायी गोष्ट , प्रज्ञानंदच्या लढण्याची गोष्ट…..

Pragyananda Biography and Inspiring Story: मॅग्नस कार्लसन हा नॉर्वे चा चेस प्लेअर आहे. जो ५ वेळा world champion आहे. तसेच तो २०११ पासून वर्ल्ड नंबर वन प्लेअर आहे. कार्लसन बद्दल एक किस्सा सांगितला जातो त्याला चेस मधल्या १०,००० गेम्स लक्षात असल्याचा म्हणजेच कोणत्या प्लेअर चा खेळ कसा होता हे तो सांगू शकतो तेही काही क्षणात. कुठे रागात खेळायच, कुठे शांततेत खेळायच आणि समोरच्याला कूठे गोंधळून टाकायचं हे कार्लसनला चांगलच जमत. त्याच्या समोर कोणतीही साधी मॅच जिंकण सुद्धा अवघड असत.

एकदा का कार्लसन फायनलमध्ये पोहचला की तोच जिंकणार हे गणित सगळेजण पकडतात. पण भारताच्या प्रज्ञानंद रमेशबाबु ने त्याला आव्हान उभे केले.वर्ल्डकपचा फायनलचा पहिला खेळ ड्रॉ झाला तसेच दुसरा सुध्दा ड्रॉ झाला आणि खेळ गेला टाय ब्रेकर ला तर त्यामध्ये कार्लसन ने बाजी मारली. पण त्यापेक्षा जास्त कौतुक झालं ते प्रज्ञानंदच्या लढण्याचं. वयाच्या १८ व्या वर्षी त्याने मोठी मजल मारली आहे. प्रज्ञानंद हा चेन्नई शहराबाहेर पाडी उपनगरात एका दूमजली घरामध्ये राहतो.

आई वडील आणि एक बहिण असा प्रज्ञानंद चा कुटुंब आहे. बहीण वैशाली ही सुद्धा एक चेस मास्टर आहे. हे चेस च वेड त्यांच्या आईने लावलं. वैशाली आणि प्रज्ञानंद या भाऊ बहिणीने मिळून ट्रॉफी आणि मेडल्स ने घर भरलं आहे.प्रज्ञानंद ने वयाच्या ५ व्या वर्षीच स्पर्धात्मक चेस खेळायला सुरुवात केली होती. त्यामुळे त्याने ८-१० वर्षाखालील वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकल्या. वयाच्या १० व्या वर्षी इंटरनॅशनल आणि १३ व्या वर्षी तो ग्रँड मास्टर झाला.

फेब्रुवारी २०२२ मध्ये Airthings Masters म्हणून ऑनलाईन एक स्पर्धा झाली, या स्पर्धेत प्रज्ञानंदने सलग ३ मॅच हरल्या होत्या त्यानंतर समोर आला मॅग्नस कार्लसन तेव्हा पण कार्लसन जिंकेल असं वाटल होत पण प्रज्ञानंदच्या ३९ चालीने कार्लसनला हरवलं. त्या मॅच नंतर प्रज्ञानंदच नाव सगळीकडे पोहचलं.

महत्वाच सांगायचं झालं तर सध्या चालू झालेल्या २०२३ च्या वर्ल्डकप मध्ये तर त्याने इतिहास रचलाय. पहिल्या राऊंड मध्ये त्याला बाय मिळाला. दुसऱ्या आणि तिसऱ्या राऊंड मध्ये तो सहज जिंकला. पण खर आव्हान समोर आले ४थ्या राऊंड मध्ये सिकारू नाकाबोरा जो वर्ल्ड मध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे, पण याला सुद्धा टाय ब्रेकर मध्ये ३-१ ने हरवत प्रज्ञानंद quarter final ला पोहचला. quarter final ला tyachya समोर होता अर्जुन हिरेगाईस त्याचाच मित्र पण प्रज्ञानंदने याला सुध्दा टाय ब्रेकर मध्ये ५-४ ने हरवत तो Semi final ला पोहचला.

पण इथेपन सोप नव्हत कारण इथे त्याच्या समोर होता फाबियानो कारवाना जो वर्ल्ड मध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे, पण इथेसुध्दा प्रज्ञानंदने त्याला टाय ब्रेकर मध्ये हरवलं. असा एक एक राऊंड जिंकत प्रज्ञानंद Final मध्ये पोहचला आणि इथे सामोरं जायचं होत ते म्हणजे मॅग्नस कार्लसनला. तर त्याच्याबरोबर सुध्दा प्रज्ञानंदच्या दोन क्लासिकल मॅच ड्रॉ झाल्या, मग टाय ब्रेकरच्या पहिल्या rapid game मध्ये १७ व्या चालीसाठी ६ मिनिट ३४सेकंद वेळ घेतला आणि मॅच फिरली म्हणजे कार्लसन ने प्रज्ञानंदवर टाईमचा प्रेशर कायम ठेवला आणि ४७ चाली नंतर कार्लसन ने बाजी मारली.

तसेच दुसरा Rapid game ha ड्रॉ झाला. त्यामुळे साहजिकच पहिला रॅपिड गेम जिंकलेला कार्लसनने १.५ विरुद्ध ०.५ अशी बाजी मारत मॅग्नस कार्लसन वर्ल्डकप विनर ठरला. प्रज्ञानंद वर्ल्डकप जरी हरला असला तरी त्याची वर्ल्ड चॅम्पियनची संधी अजून त्याच्याकडे कायम आहे. वर्ल्डकप मधे टॉप तीन मध्ये आल्यामुळे तो आता candidates स्पर्धेत खेळेल आणि तिथे जिंकला तर तो वर्ल्ड चॅम्पियनसाठी वर्ल्ड चॅम्पियन मध्ये तो डीन लिरींग विरुद्ध तो खेळेल.

झालेल्या स्पर्धत प्रज्ञानंदने घवघवीत यश मिळवलं होत, पण या स्पर्धेत एक कमालीची गोष्ट घडली ती म्हणजे नाकाबोरा विरुद्ध मॅच चालू असताना प्रज्ञानंदची आई मॅच बघत होती आणि जेव्हा तो जिंकला तेव्हा सगळीकडे टाळ्यांचा गडगडाट झाला तसेच त्यानंतर काही लोक त्याचा ऑटोग्राफ घेत होते आणि तेव्हा प्रज्ञानंदच्या आईच्या डोळ्यातून अश्रू आले म्हणजेच केलेल्या कष्टाचं पांग फळाला आल होत हे दिसून आलं.

तसेच बाजूच्या टेबल वर कार्लसन ची मॅच चालू होती आणि तो ती जिंकला होता तेव्हा प्रज्ञानंद सुध्दा तिथेच होता तेव्हा कार्लसन उठून प्रज्ञानंदच्या पाठीवर थाप मारली अन we want to be like you अस तो म्हणाला.
प्रज्ञानंदने चेस कडे बघण्याचा दृष्टिकोनच जणू बदलला आहे. तुम्हाला यावर काय वाटतं ते comment box मध्ये नक्की कळवा.

Leave a Comment