prem kavita in marathi love poem| प्रेम कविता | मराठी कविता

काळजाला भिडणाऱ्या अस्सल प्रेम कविता संग्रह फक्त तुमच्या साठी | emotional poem for love in marathi |prem kavita in marathi

Read More : prem kavita in marathi 

जुळली हिच्याशी प्रीती |prem kavita in marathi

भुर-भुर फिरली-मनात भरली,नार जणू सोंगटी
क्षणात भिजली-भिजुन थिजली,जुळली
हिच्याशी प्रीती…||धृ||
डोळ्यापुढून तीला,येता जाताना
असा गमतीचा,हो झोका घेताना
मी पाहिलं तीला,श्वास तुटताना
माझ्या काळजाचा,ठोका चुकताना
मनात रूसली-रूसुन हसली, वाऱ्याची हो गती
क्षणात भिजली-भिजुन थिजली,जुळली
हिच्याशी प्रीती…||१||
माझ्यासाठी तीला,उभे राहताना

चोरून चोरून तीने,मला पाहताना
मी पाहिलं तीला,डोळे मिटताना
माझ्या डोळ्यात,कचरा लोटताना
कधी ती थंडली-कधी ती तापली,ही मौसमी हो
रेती
क्षणात भिजली-भिजुन थिजली,जुळली
हिच्याशी प्रीती…||२||
वाऱ्यासंगे तीला,पाहिलं वाहताना
माझ्या पाऊलखुणा,तीने मोडताना
मी पाहिलं तीला,मज भीडताना
माझ्यासाठी कधी,तीने रडताना
कधी सुखाची-कधी दु:खाची,ती जाहली
सोबती
क्षणात भिजली,भिजुन थिजली,जुळली
हिच्याशी प्रीती…||३||

मी पाहिलं तीला,मज भीडताना
माझ्यासाठी कधी,तीने रडताना
कधी सुखाची-कधी दु:खाची,ती जाहली
सोबती
क्षणात भिजली,भिजुन थिजली,जुळली
हिच्याशी प्रीती…||३||
पाऊस धारेमधी,तीला भीजताना
हिरव्या शालुमध्ये,आज सजताना
मी पाहिलं तीला,सुख वाटताना
तीच्यामुळं मनी,हर्ष दाटताना
ऊन्हात भाजली-पावसात भीजली,ही
भुरभुरणारी माती
क्षणात भिजली-भिजुन थिजली,जुळली
हिच्याशी प्रीती…||४||

Read More : prem kavita in marathi

Read More : suvichar in marathi

काळजाला भिडणाऱ्या अस्सल प्रेम कविता संग्रह फक्त तुमच्या साठी | emotional poem for love in marathi |prem kavita in marathi

कुणीच नाही माझे ..आई

कुणीच नाही माझे ..आई
करूणेचे तळहात पोरके ..आई

आकांत श्वासांत , शांतता कुजबुज टाळे माझे ..आई
ना शुन्य आसपास, काळोख मावळे माझे ..आई
असे जवळ – तसे दूर भाबडे अंतराळ माझे ..आई

कुणीच नाही माझे ..आई
करूणेचे तळहात पोरके ..आई

असेल – आहे – असणार, कुणी शब्द गाळले माझे ..आई
अपराध असा परमेशाचा, का? तेज लोपती माझे ..आई
अभेद्य चौकट अश्रुंची, चित्र पुराणे माझे ..आई

कुणीच नाही माझे ..आई
करूणेचे तळहात पोरके ..आई

Read More : inspirational kavita | प्रेरणादायी कविता

असं फक्त प्रेमच असतं

असं फक्त प्रेम असंत
त्याला हृदयातचं जपायचं
असतं प्रेमात अधिकार असतो
पण गाजवायचा नसतो प्रेमात
गुलाम असतो …
पण राबवायचा नसतो
प्रत्येकाला स्वातंत्र्य असतं पण स्वतःला स्वातंत्र्य नसतं
नेहमीच एकट्याचं
असतं पण दुसऱ्याशिवाय
शक्य नसतं कळत नकळत
कसं होतं ते मात्र कधीच
कळत नसतं…
असं फक्त प्रेमच असतं.

 

Leave a Comment