Prem kavita in marathi | मराठी कविता | प्रेम कविता

प्रेम कविता संग्रह फक्त तुमच्या साठी | emotional poem for love in marathi prem kavita in marathi. | मी खरंच तुझ्या प्रेमात पडलोय गं..

Read More : Prem kavita in marathi

मी खरंच तुझ्या प्रेमात पडलोय गं..👩‍❤️‍👩

मी खरंच तुझ्या प्रेमात पडलोय ग़

अजुन ही तुला हे कसे कळत नाही
तू नसताना ही तुझ्या आठवणीतच असतो
तू असतेस तेव्हा ते प्रेम तुला कसे कळत नाही

कधी पासून प्रेम करतोय तुझ्यावर
माझे मलाच ठाऊक नाही

पण एवढे मात्र नक्की आहे की
आता तुझ्या शिवाय मला काहीच ठाऊक नाही
तू नसतेस पण असे कधी वाटले ही नाही
तू असतेस कायम माझ्या मनातल्या घरा

तुझा आभासच अधिक सुखावतो मला
तुझ्या असण्याहून ही प्रिय आहे जरा
मनातले बोल ओठांवर येत नाही कधी
तुझ्या दुरावण्याची भीती उगीच मनी असते

तू असतेस तेव्हा बरेच काही बोलायचे असते
ते तसेच राहते आणि वेडे मन स्वत:शीच हसते

तुझी प्रतिमाच अधिक बोलते माझ्याशी
निदान माझे प्रेम तिला जाणवते तरी

पण मन पुन्हा स्वप्नातच रमते जागेपनी

प्रेम कळेल माझे तुला ही अन होशील माझी कधी तरी..


मी तुझ्यासाठी सगळ..💞

मी तुझ्यासाठी सगळ
काही सहन करेन मी तुलाच
सुखी ठेवण्यासाठी कष्ट करेन मी
तु फ़क्त हो म्हण…

जीवनाच सोन करेन मी
सगळ सुख मी तुला देइन
तुझीच पुजा आयुष्यभर
करेन मी
तु फ़क्त हो म्हण…

या जगाला सुद्धा जिन्कून
दाख्वेन मी
प्रेम काय असत हे
दाखवुन देइन मी
तु फ़क्त हो म्हण…

माझ्याबरोबर सदा रहा
अशीच साथ आयुष्यभर
देत रहा
मला तुझ्या प्रेमात पडु दे
जरा
तु फ़क्त हो म्हण…


Read More : Prem kavita in marathi

Read More : motivational kavita in marathi

प्रेम कविता संग्रह फक्त तुमच्या साठी| emotional poem for love in marathi prem kavita in marathi. | कॉलेजला जाताना समोरच तिला बघितली..


कॉलेजला जाताना समोरच तिला बघितली..👩😍

कॉलेजला जाताना समोरच तिला बघितली
मी दिसताच चालता चालता जरा थांबली

माझ्याकडे बघुन गोड हसली
ओठांची मोहोळ खुलली..
म्हटलं पोरगी बहुतेक पटली पण..
हत तिच्या मारी मागे वळुन बघितल

तर तिची मैत्रीण दिसली..
त्यादिवशी ती वर्गात आली येवुन नेमकी
माझ्याच शेजारी बसली माझ्या अंगावर
कशी शहारी पसरली बोलण्यासाठी जीभ सरसावली..
पण.. हत तिच्या मारी काही बोलणार इतक्यातच

म्हणाली..
“प्लीज, पुढे बसशील ती पहा माझी मैत्रिण आली.”
एकदा कॉलेजमधे परीक्षा सुरु झाली.
गाडी घेवुन जाताना रस्त्यातच मला भेटली
पाठुनच तिनं एक हाक मारली उशिर
झालेला म्हणुन लिफ्ट मागितली.

“थांब गाडी लावुन येतो!”

म्हणुन गेट पाशी सोडली..
पण.. हत तिच्या मारी गाडी लावे पर्यंत
हीच टाटा करुन सटकली शेवटी मनाची
तयारी केली शेवटचा पेपर संपल्यावर जाताना
तिला गाठली हळुच खिशातली चिठ्ठी सरकवली

गालावरची खळी पाहीली..
वाटल बहुतेक देवी पावली पण..
हत तिच्या मारी म्हणाली “सॉरी,
थोडक्यासाठी गाडी चुकली..


Prem kavita in marathi


प्रेमाचं रोपटं

ती रोज मला भेटायची
पाहताच मला थांबायची
गोड गोड
मान घाली घालून जायची

का ती हसत होती
आज मला कळलं
कारण प्रेमाचं रोपटं
माझ्या काळजात उगवलं

त्याच त्याच घटनांचा
ऊत आला होता
अचानक नजर भिडण्याचा
मोहर आला होता

का ती मुध्दाम भेटायची
आज मला कळलं
कारण प्रेमाचं रोपटं
माझ्या काळजात उगवलं

तिचा माझा तसा
काही परिचय नव्हता
पण हसण्यावर तिच्या
माझा जीव आला होता

नकळत प्रेमात रमलो
तेव्हा मला कळलं
कारण प्रेमाचं रोपटं
माझ्या काळजात उगवलं


Read More : Prem kavita in marathi


प्रेम म्हणजे ?

प्रेम म्हणजे ?
समजली तर भावना..♥
पाहिले तर नाते..♥
म्हंटले तर शब्द..♥
वाटली तर मैत्री..♥
घेतली तर काळजी..♥
तुटले तर नशीब..♥
पण मिळाले तर स्वर्ग.. ..♥♥♥♥


प्रेमाचे वादळ

ठरवून पण सहजपणे
माझ्या बाजूला बसतो
छोट्याशा विनोदावरही
जोरजोरात हसतो

कळतय मला
कळतय मला हास्यात तुझ्या
काय लपून बसलय
घाबरु नको मी ही मनात
तसच काहीसं जपलय

न संपण्यार्‍या गप्पांचं मी
पांघरुण घेऊन निजते
तुझी हुशारी उत्तरात नाही
प्रश्नांमध्ये दिसते

आत्मविश्वासाने नटलेला
स्वभाव मोहक रहस्यमय
सारखा तुझा उल्लेख ओठी
हवीहवीशी तुझी सवय

विश्वासार्ह न्यायबुद्धी
वर्तनातही सभ्यता
हात तुझ्या हाती देता
मनी लाभली शांतता

आरशाने पहिल्यांदा माझ्या
डोळ्यात भरले काजळ
नव्हती ही झुळुक मैत्रीची
होते प्रेमाचे वादळ


स्वप्नातील साज घेऊन ती आली

स्वप्नातील साज घेऊन ती आली
ना सांगताच ती या मनाची झाली
हृदय आता तिच्या शिवाय
धडकेना,
का माझिया प्रियाला प्रीत कळेना..❤

Leave a Comment