{Best} Puneri patya | अस्सल मराठी पुणेरी पाट्या

अस्सल मराठी पुणेरी पाट्या (puneri patya in marathi), मजेदार गमतीशीर पुणेरी विनोद शोधत आहात तर तुम्ही अगदी बरोबर ठिकाणी आला आहात मी आशा करतो की तुम्हाला हे आवडेल तर जास्त वेळ घालवू तर आणि पुणेरी पाट्या वाचून आनंद घ्या.. (puneri patya).


साने येथेच राहतात. उगीच भलतीकडे चौकशी करू नये.


हे कार्यालय आहे. आत पाहण्या सारखे काही नाही. आत येऊ नये.


सोसायटीच्या सभासदांशिवाय अन्य अवजड वाहनांस प्रवेश वर्ज्य.


शांतता राखा. थुंकू नका. माणसासारखे वागा.


वेटरला टिप देऊ नये. आम्ही त्यांना पुरेसा पगार देतो.


Read More : पुण्यातील बाहुबळी थाळीची बातमी वाचण्यासाठी यावर क्लिक करा….


लग्न अशी एकमेव जखम आहे
जी होण्याआधीच
हळद लावली जाते .


येथे चोरी करणारा नेहमी पकडला जातो. याची कृपया नोंद घ्यावी.


भिंती रंगवण्याची जबाबदारी कोणावरही दिली नसून ती जबाबदारी भिंतीवर थुंकून पार पाडू नये ही नम्र विनंती.


बंगला रिकामा आहे. आत चोरण्यासारखे काहिही नाही. विनाकारण कष्ट घेऊ नये.


दारावरील बेल फ़क्त एकदाच वाजवावी.
विजेचे बिल आम्ही भरतो.


तीनदा दार वाजवूनही दार उघडले नाही, तर मालकाला आपणास भेटावयाचे नाही असे समजावे.


इतरांनी वाहने लावू नयेत लावल्यास हवा सोडून दिली.


कृपया चूळ भरताना घाणेरडे आवाज काढू नयेत.


अब कि बार कुणाचेही असो सरकार पण बेल वाजवू नका १ ते ४ इथे दुपारी झोपतो मतदार.


आमच्या मुलाचे लग्न आता ठरले आहे , कृपया स्थळे आणू नयेत .


आम्ही शाकाहारी आहोत,पण आमचा कुत्रा शाकाहारी नाही.


इथे कम्प्युटर सीडीज, फ़्लॊपीज व स्वस्त दरात नारळ मिळतील.


एका घरासमोरील पाटी:
देशपांडे कुठे राहतात ते आम्हाला माहित नाही. उगाच घंटी वाजवून विचारू नका.


एका जिन्यातील पाटी:
वर चढताना ५वी पायरी तुटलेली आहे.


कुत्र्यांपासून सावध रहा.नको तिथे चावल्यास आम्ही जबाबदार नाहीत.


कृपया ग्राहकांनी मराठीतच बोलावे.


गाडीमध्ये तंबाखू खाऊन बसू नये व बसून तंबाखू खाऊ नये .


Leave a Comment